भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा (२०११-२०१२)

Submitted by मास्तुरे on 22 November, 2011 - 02:22

भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा १५ डिसेंबर पासून सुरू होतोय. सचिन, द्रविड व लक्ष्मणचा हा ऑस्ट्रेलियाचा अखेरचाच दौरा आहे. द्रविड या दौर्‍यानंतर बहुतेक निवृत्त होईल. या दौर्‍यात भारत एकूण ४ कसोटी सामने, २ T20 सामने व श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया विरूद्ध एकूण चार-चार ५० षटकांचे सामने खेळेल. अंतिम फेरीत आलेले २ संघ एकमेकांविरूद्ध एकूण (जास्तीत जास्त) ३ सामन्यांची मालिका खेळतील.

भारताचा कसोटी संघ असा आहे -
धोनी (कर्णधार व यष्टीरक्षक), सेहवाग, गंभीर, द्रविड, सचिन, लक्ष्मण, कोहली, रोहीत शर्मा, अजिंक्य रहाणे, वृद्धिमान साहा, अश्विन, इशांत शर्मा, उमेश यादव, विनयकुमार, प्रग्यान ओझा, अभिमन्यू मिथुन, झहीर खान

भारताचा ट-२० आणि एकदिवसीय सामन्यांचा संघ असा आहे -

धोनी (कर्णधार व यष्टीरक्षक), सेहवाग, गंभीर, रैना, सचिन, मनोज तिवारी, कोहली, रोहीत शर्मा, रवींद्र जडेजा, पार्थिव पटेल, अश्विन, राहुल शर्मा, उमेश यादव, विनयकुमार, प्रवीणकुमार, इरफान पठाण, झहीर खान

ऑस्ट्रेलियाचा कसोटी संघ असा आहे -
मायकेल क्लार्क (कर्णधार), एड कोवॅन, शॉन मार्श, रिकी पाँटिंग, डेव्हिड वॉर्नर, मायकेल हसी, डॅनियल ख्रिस्तियन, ब्रॅड हॅडिन (यष्टीरक्षक), पीटर सिडल्, जेम्स पॅटिन्सन, बेन हिल्फेनहॉस, मिचेल स्टार्क, नेथन लॉयन

ऑस्ट्रेलियाचा एकदिवसीय संघ असा आहे -
मायकेल क्लार्क (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, रिकी पाँटिंग, पीटर फॉरेस्ट, डॅनिअल ख्रिश्चिअन, डेव्हिड हसी, मायकेल हसी, मॅथ्यू वेड, ब्रेट ली, रायन हॅरिस, मिचेल स्टार्क, झेव्हिअर डोहेट्री, क्लिंट मॅके, मिचेल मार्श

ऑस्ट्रेलियाचा T20 चा संघ असा आहे -
जॉर्ज बेली (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर (उपकर्णधार), ट्रेव्हिस बर्ट, डॅनिअल ख्रिश्चिअन, झेव्हिअर डोहेट्री, जेम्स फॉकनर, एरॉन फिंच, ब्रॅड हॉग, डेव्हिड हसी, ब्रेट ली, मिशेल मार्श, शॉन मार्श, क्लिंट मॅके, मॅथ्यू वेड (यष्टीरक्षक)

श्रीलंकेचा एकदिवसीय संघ असा आहे -
जयवर्धने (कर्णधार), अ‍ॅन्जेलो मॅथ्यूज (उपकर्णधार), उपुल थरंगा, तिलकरत्ने दिलशान, कुमार संगक्कारा (यष्टीरक्षक), दिनेश चंडिमाल (यष्टीरक्षक), लाहिरू थिरिमान्ने, थिसारा पेरेरा, फरवीज महारूफ, रंगना हेराथ, सचित्र सेनानायके, लसिथ मलिंगा, नुवान कुलसेकरा, चनका वेलेगेदेरा, धम्मिका प्रसाद, थिलान समरवीरा (अजून समावेश नक्की नाही)

_________________________________________________

हा आहे दौर्‍याचा कार्यक्रम -

ऑस्ट्रेलिया अध्यक्षीय संघ वि भारत
१५-१६ डिसेंबर; स्थळ - कॅनबेरा, वेळ - सकाळी ५:३० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: अनिर्णित (धावफलक इथे आहे)

ऑस्ट्रेलिया अध्यक्षीय संघ वि भारत
१९-२१ डिसेंबर; स्थळ - कॅनबेरा, वेळ - सकाळी ५:३० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: अनिर्णित (धावफलक इथे आहे)

_________________________________________________

पहिला कसोटी सामना -
२६-३० डिसेंबर, स्थळ - मेलबोर्न, वेळ - सकाळी ५:०० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: ऑस्ट्रेलिया विजयी (धावफलक इथे आहे)

दुसरा कसोटी सामना -
३-७ जानेवारी, स्थळ - सिडने, वेळ - सकाळी ५:०० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: ऑस्ट्रेलिया एक डाव राखून विजयी (धावफलक इथे आहे)

तिसरा कसोटी सामना -
१३-१७ जानेवारी, स्थळ - पर्थ, वेळ - सकाळी ८:०० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: ऑस्ट्रेलिया एक डाव राखून विजयी (धावफलक इथे आहे)

चौथा कसोटी सामना -
२४-२८ जानेवारी, स्थळ - अ‍ॅडलेड, वेळ - सकाळी ५:३० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: ऑस्ट्रेलिया २९८ धावांनी विजयी (धावफलक इथे आहे)

मालिकावीर : मायकेल क्लार्क
ऑस्ट्रेलियाने मालिका ४-० अशी जिंकली.

_________________________________________________

पहिला T20 सामना -
१ फेब्रुवारी, स्थळ - सिडने, वेळ - दुपारी २:०५ पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: ऑस्ट्रेलिया ३१ धावांनी विजयी (धावफलक इथे आहे)

दुसरा T20 सामना -
३ फेब्रुवारी, स्थळ - मेलबोर्न, वेळ - दुपारी २:०५ पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: भारत ८ गडी व २ चेंडू राखून विजयी (धावफलक इथे आहे)

मालिका निर्णय: १-१ अशी बरोबरी

_________________________________________________

सर्व एकदिवसीय सामने दिवस-रात्र असे खेळले जातील.

पहिला एकदिवसीय सामना - विरूद्ध ऑस्ट्रेलिया
५ फेब्रुवारी, स्थळ - मेलबोर्न, वेळ - सकाळी ८:५० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: ऑस्ट्रेलिया ६५ धावांनी विजयी (धावफलक इथे आहे)
गुण - ऑस्ट्रेलिया ५, भारत 0

दुसरा एकदिवसीय सामना - विरूद्ध श्रीलंका
८ फेब्रुवारी, स्थळ - पर्थ, वेळ - सकाळी ९:५० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: भारत ४ गडी राखून विजयी (धावफलक इथे आहे)
गुण - श्रीलंका 0, भारत ४
आतापर्यंतचे एकूण गुण : ऑस्ट्रेलिया ५, भारत ४, श्रीलंका 0

ऑस्ट्रेलिया विरूद्ध श्रीलंका
१० फेब्रुवारी, स्थळ - पर्थ, वेळ - सकाळी ९:५० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: ऑस्ट्रेलिया ५ धावांनी विजयी (धावफलक इथे आहे)
गुण - श्रीलंका 0, ऑस्ट्रेलिया ४
आतापर्यंतचे एकूण गुण : ऑस्ट्रेलिया ९, भारत ४, श्रीलंका 0

तिसरा एकदिवसीय सामना - विरूद्ध ऑस्ट्रेलिया
१२ फेब्रुवारी, स्थळ - अ‍ॅडलेड, वेळ - सकाळी ८:५० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: भारत २ चेंडू राखून विजयी (धावफलक इथे आहे)
गुण - भारत ४, ऑस्ट्रेलिया 0
आतापर्यंतचे एकूण गुण : ऑस्ट्रेलिया ९, भारत ८, श्रीलंका 0

चौथा एकदिवसीय सामना - विरूद्ध श्रीलंका
१४ फेब्रुवारी, स्थळ - अ‍ॅडलेड, वेळ - सकाळी ८:५० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: बरोबरी (धावफलक इथे आहे)
गुण - भारत २, श्रीलंका २
आतापर्यंतचे एकूण गुण : ऑस्ट्रेलिया ९, भारत १०, श्रीलंका २

ऑस्ट्रेलिया विरूद्ध श्रीलंका
१७ फेब्रुवारी, स्थळ - सिडने, वेळ - सकाळी ८:५० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: श्रीलंका ८ गडी राखून विजयी (धावफलक इथे आहे)
गुण - ऑस्ट्रेलिया 0, श्रीलंका ५
आतापर्यंतचे एकूण गुण : ऑस्ट्रेलिया ९, भारत १०, श्रीलंका ७
आतापर्यंतची निव्वळ धावगती : ऑस्ट्रेलिया -0.११६, भारत -0.२४५, श्रीलंका +0.३२३

पाचवा एकदिवसीय सामना - विरूद्ध ऑस्ट्रेलिया
१९ फेब्रुवारी, स्थळ - ब्रिस्बेन, वेळ - सकाळी ८:५० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: ऑस्ट्रेलिया ११० धावांनी राखून विजयी (धावफलक इथे आहे)
गुण - ऑस्ट्रेलिया ५, भारत 0
आतापर्यंतचे एकूण गुण : ऑस्ट्रेलिया १४, भारत १०, श्रीलंका ७
आतापर्यंतची निव्वळ धावगती : ऑस्ट्रेलिया +0.४३३, भारत -0.६७२, श्रीलंका +0.३२३

सहावा एकदिवसीय सामना - विरूद्ध श्रीलंका
२१ फेब्रुवारी, स्थळ - ब्रिस्बेन, वेळ - सकाळी ८:५० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: श्रीलंका ५१ धावांनी विजयी (धावफलक इथे आहे)
गुण - श्रीलंका ४, भारत 0
आतापर्यंतचे एकूण गुण : ऑस्ट्रेलिया १४, भारत १०, श्रीलंका ११
आतापर्यंतची निव्वळ धावगती : ऑस्ट्रेलिया +0.४३३, भारत -0.७३३, श्रीलंका +0.४८१

ऑस्ट्रेलिया विरूद्ध श्रीलंका
२४ फेब्रुवारी, स्थळ - होबार्ट, वेळ - सकाळी ८:५० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: श्रीलंका ३ गडी राखून विजयी (धावफलक इथे आहे)
गुण - श्रीलंका ४, ऑस्ट्रेलिया 0
आतापर्यंतचे एकूण गुण : ऑस्ट्रेलिया १४, भारत १०, श्रीलंका १५
आतापर्यंतची निव्वळ धावगती : ऑस्ट्रेलिया +0.३१८, भारत -0.७३३, श्रीलंका +0.४२६

सातवा एकदिवसीय सामना - विरूद्ध ऑस्ट्रेलिया
२६ फेब्रुवारी, स्थळ - सिडने, वेळ - सकाळी ८:५० पासून (भारतीय प्रमाण वेळ)

आठवा एकदिवसीय सामना - विरूद्ध श्रीलंका
२८ फेब्रुवारी, स्थळ - होबार्ट, वेळ - सकाळी ८:५० पासून (भारतीय प्रमाण वेळ)

ऑस्ट्रेलिया विरूद्ध श्रीलंका
२ मार्च, स्थळ - मेलबोर्न, वेळ - सकाळी ८:५० पासून (भारतीय प्रमाण वेळ)

पहिला अंतिम सामना
४ मार्च, स्थळ - ब्रिस्बेन

दुसरा अंतिम सामना
६ मार्च, स्थळ - अ‍ॅडलेड

गरज भासल्यास तिसरा अंतिम सामना खेळवला जाईल.

तिसरा अंतिम सामना
८ मार्च, स्थळ - अ‍ॅडलेड

_________________________________________________

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

<< त्यावरून हे बेतले आहे का? >> नाही ! माझ्यासारख्या क्रिकेटवेड्यांच्या सध्यां जीवावर जें बेतलंय, तेंच मांडायचा प्रयत्न केलाय !! Wink

होळीच्या 'मुहूर्तावर' आशिया कप चा धागा सुरु करा.
एकूण लंका फॉर्मात, बांगला देश 'अपने गली मे...' म्हणजे फक्त पाकीस्तान विरुद्ध जिंकता येइल, मग आपण जल्लोश करू!!

>> अरे, तू फारच सिरियसली घेतोस
मी नाही तू घेतोयस! इतकी उदाहरणं दिलीस लगेच म्हणून म्हणतोय. बायदवे, त्यातली ३ आउट झालेली उदाहरणं मान्य नाहीत कारण एक जास्त बॅट्समन शिल्लक आहे आपल्या वादातल्या केसपेक्षा. ४ किंवा ४ पेक्षा जास्त आउट त्या केसेस मंजूर!

>> अरे २ विकेट्स जाणे आणि ४-५ जाणे यात फरक नाही का रे?
फरक आहे ना म्हणूनच तर विकेट न घालवण्याचा पण प्रयत्न करायला लागतो! हा फरक तुला समजतो तर हा प्रश्न का नाही पडत की ४० ओव्हर्स पर्यंत फक्त ४ आउट आणि नंतर इतके आउट, असं का झालं? शिवाय, धावांचा पाठलाग करतानाच ४१-५० मधे विकेटी जातात असं नाही तर टार्गेट सेट करताना सुद्धा जातात. आपली वर्ल्ड कप मधली द. आफ्रिकेविरुद्धची मॅच आठव. ३९.४ ओव्हरला आपला २/२६७ स्कोअर होता तो ४९.४ ओव्हरला सर्व बाद २९६ झाला. म्हणजे ६० बॉलमधे फक्त २९ रना केल्या. शेवटी धोनी एका बाजूला १२ वर नाबाद राहीला. काहीही प्रेशर नव्हतं, बॅटिंग विकेट होती.

क्रिकेटरना मिळणार्‍या अमाप पैशांचा एक [ एकच ?] फायदा - कबड्डी विश्वविजयी महिला संघाला भरघोस बक्षिसं [ त्यातील तीन प्रमुख खेळाडूना प्रत्येकीं रु. १ कोटी] महाराष्ट्र शासनाने जाहीर केली आहेत. [अर्थात, हीं बक्षिसं खेळाडूंच्या प्रत्यक्ष हातात पडण्यापूर्वी नेहमीचा शासकीय घोळ असेलच !!]

शासकीय घोळ

अस्सं काय म्हणता? अहो शासकीय प्रक्रियेला वेळ लागणारच, नि म्हणून अ‍ॅडमिनिस्ट्रेटीव्ह कॉस्ट्सहि जास्तच होणार ना! मग त्यातून जे उरतील, त्यातला आयकर कापून उरलेले दहा रुपये १५ वर्षाच्या आत त्यांना मिळतील की. खरे म्हणजे एकच रुपया, पण पंधरा वर्षांनी दहा रुपये हेच सर्वात लहान चलन.
यात घोळ कुठे आहे?

भारतात कुठेहि घोळ, पैसे खाणे असे काही नसते. काही शासकीय प्रक्रिया असतात, नियम असतात, अ‍ॅडमिनिस्ट्रेटिव्ह कॉस्ट्स असतात. ते समजून घ्यायला पाहिजे. उगाच ओरडा!!
Proud

<< उगाच ओरडा!! >> झक्कीसाहेब, अगदीं खरंय तुमचं. आजच फेसबुकवर हे वाचलं -
When you have got an elephant by the hind leg, and he is trying to run away, it's best to let him run.
Abraham Lincoln.

>>> मास्तुरे एवढ्या लिन्क्स कोठून शोधल्या - Statsguru query, की तुमच्या आठवणीत काही मॅचेस होत्या त्यावरून की आणखी काही?

http://www.espncricinfo.com/ci/engine/series/index.html
वरील धाग्यावर पार १७७२ पासून आजतगायत खेळल्या गेलेल्या सर्व मालिकांचे व सामन्यांचे (कसोटी, एकदिवसीय, ट-२० इ.) धावफलक उपलब्ध आहेत.

उदा. हा पहा १७७२ मध्ये खेळला गेलेला हॅम्पशायर इलेव्हन वि. इंग्लंड सामन्याचा धावफलक.
http://www.espncricinfo.com/ci/engine/match/532814.html

आणि ही आहे १७७२ मध्ये खेळली गेलेली मालिका - http://www.espncricinfo.com/ci/engine/series/532521.html

>>> होळीच्या 'मुहूर्तावर' आशिया कप चा धागा सुरु करा.
एकूण लंका फॉर्मात, बांगला देश 'अपने गली मे...' म्हणजे फक्त पाकीस्तान विरुद्ध जिंकता येइल, मग आपण जल्लोश करू!!

झक्की, तुमच्याच शुभहस्ते हा धागा सुरू होऊ दे. आशिया कप लंकाच जिंकणार असं वाटायला लागलंय.

एक अतिशय दु:खद बातमी. द्रविड उद्या निवृत्ती जाहीर करणार आहे. श्रीलंकेचा द्रविड (महिला जयवर्देना) पुन्हा एकदा जबरदस्त फॉर्मात आलेला असताना, भारताचा द्रविड निवृत्त होणे ही दु:खद घटना आहे.
http://www.espncricinfo.com/india/content/current/story/556624.html

ही ग्रेग चॅपेलची खूपच वादग्रस्त व कठोर मुलाखत वाचा. आश्चर्य म्हणजे झक्कींचे आणि चॅपेलचे विचार अगदी तंतोतंत जुळतात.
http://www.indianexpress.com/news/test-cricket-too-hard-for-indians...-c...

झक्की म्हणजे मायबोलीचे च्यापेल गुर्जीच हेत. आन त्येंचा निवृत्त शिष्य म्हंजी गान्गुली ! Proud

झक्की, तुमच्याच शुभहस्ते हा धागा सुरू होऊ दे.

असे कसे, अहो "उगाच अमेरिकेत राहिला म्हणजे शिंगे नाही फुटली, स्वतःला शहाणा समजायचे काम नाही, काय? ते अमेरिकेतले इथे इंड्यात चालत नाही! ह्ये क्रिकेट हाय, ब्येस्बॉल नाय."

शिवाय धागा काढणे म्हणजे जबाबदारी! हरलो तर लोक मलाच शिव्या देतील, नीट मुहूर्तावर काढला नाही म्हणून. ती जबाबदारी कोण स्वीकारणार? आपण चॅपेललाच सांगू धागा काढायला!
भारतात लीडर नाहीत म्हणे! मग एव्हढे झेड सिक्युरिटी वाले लोक काय आहेत तर? कमी पडले नेते, तर मुन्शिपाल्टी, शाळेतले मास्तर सगळ्यांना झेड सिक्युरिटी देऊ, की नेतेच नेते.

नेता म्हणजे काय हे समजते का त्या चॅपेलला?! त्याला काय सिक्युरिटी होती हो? वेळच्या वेळी हजर होणारा माणूस नेता असतो का?

एक अतिशय दु:खद बातमी. द्रविड उद्या निवृत्ती जाहीर करणार आहे. श्रीलंकेचा द्रविड (महिला जयवर्देना) पुन्हा एकदा जबरदस्त फॉर्मात आलेला असताना, भारताचा द्रविड निवृत्त होणे ही दु:खद घटना आहे.

>> सर्वात प्रथम जयवर्धनेला द्रविड म्हटल्याबद्दल आश्चर्य वाटले. जयवर्धनेच्या classy खेळाकडे बघूनही द्रविडच्या तंत्रशुद्ध खेळाची तुलना आजच्या काळात फार तर कलिस नि मूडमधे असलेला तेंडुलकर ह्यांच्याशी होउ शकेल. त्यांच्या away average मधली तुलना बघितली कि लक्षात येईल असे का म्हणतोय ते.

एक अतिशय दु:खद बातमी. द्रविड उद्या निवृत्ती जाहीर करणार आहे >> ह्या गोष्टीचे बरेच परीणाम होणार हे उघड आहे.

०. द्रवीडने aus series च्या पार्श्वभूमीवर निव्रुत्त होण्यापेक्षा, भारतातल्या एखाद्या glorious series नंतर जाणे मला अधिक आवडले असते. We will miss Dravid.
१. द्रविडच्या निव्रुत्तीनंतर तेंडुलकर नि लक्ष्मण ह्यांच्यांवर तसेच करण्याबाबत दबाव येउ लागले. विशेषतः जर पुढच्या काही सामन्यांमधे त्यांची कामगिरी खराब झाली तर. तसे बघता, gradual phaseout चा विचार केला तर तसे करणे योग्य ठरणार नाहि, त्या दोघांची गरज आता अधिक लागणार आहे.
२. सलामीच्या जोडिची कामगिरी अधिक चांगली होणे आता अधिक मह्त्वाचे ठरणार आहे कारण भरवशाचा नंबर तीन आता नसेल. ह्याच्याच उलट परीणाम म्हण्जे तेंडूलकर अधिक दबावाखाली येणार नि तो shell मधे जाऊन खेळणे अधिक सुरु होईल.
३. द्रविडची जागा त्याच्या techinique, temperament मधे घेऊ शकेल असा खेळाडू मला तरी दिसत नाहि. (replacement म्हणून नाहि पण potential असलेला). त्यातल्या त्यात पुजारा योग्य वाटतो कारण त्याला त्याचा off कुठे आहे हे माहित असावे असे त्याच्या खेळाकडे बघून वाटते. राहाणे तसा वाटला होता पण पूर्ण माहित नाहि. दुर्दैवाची गोष्ट हि कि पुजारा शेवटचा रणजी सीजन फारसा खेळला नाहिये injury मूळे तर राहाणे दौर्‍यावर असल्यामूळे खेळला नाहिये, त्यामूळे पुढच्या test team च्या वेळी त्यांचा विचार केला जाईल ह्याबद्दल शंका वाटते.
४. त्यामूळे कोहलीला वर ढकलले जाण्याची शक्यता वाटटे, नि त्याच्या मोकळ्या झालेल्या जागेवर शर्मा किंवा तिवारीची वर्णी लागू शकते. तिवारीबद्दल नीट कल्पना नाहि. पण सेहवाग बरेच दिवस खाली येण्याबद्द्ल hints देत असल्यामूळे, त्याला खाली खेचून, नविन सलामीचा खेळाडू खेळवायला हरकत नसावी. कोहलीला वर करण्यापेक्षा, लक्ष्मणला त्याचा आवडिचा तिसरा क्रमांक देऊन, सेहवागला सहावर ढकलता येणे शक्य आहे.

तुम्हाला काय वाटते ?

रवीडने aus series च्या पार्श्वभूमीवर निव्रुत्त होण्यापेक्षा, भारतातल्या एखाद्या glorious series नंतर जाणे मला अधिक आवडले असते. >>> सहमत. त्याला तसा पर्याय दिलाही असेल. पण द्रविड चा एकूण पॅटर्न पाहता त्याला जावेसे वाटले तर तो थांबणार नाही.

असा निर्णय घेण्यात द्रवीडने खाजगी आयुष्याचा हि विचार केला असेल. महत्वाचे काय, क्रिकेट की इतर काय चालू आहे ते. त्यावरून ठरवले असणार. आणखी एक दोन वर्षे खेळूनसुद्धा सध्या तेंडुलकर च्या मानाने त्याची जास्त प्रसिद्धी होणारच नाही, मग दुसरे काय करायचे असेल ते तरी करायला लागावे असा विचार त्याने केला असेल. आता क्रिकेटचे पैसे मिळणार नाहीत, पण तेहि त्याला माहित आहे. तसेहि त्याची बायको डॉक्टर आहेच.

झक्की, पैशाचा संबंध नाही. तो आयपीएल खेळेलच (यावर्षी तर आहेच, पण कदाचित पुढे २-३ वर्षेही). टेस्ट क्रिकेटमधून तसेही फार पैसे मिळत नाही इतर क्रिकेटच्या मानाने.

आता ही पिढी पुढे नक्की काय करेल कोणास ठाऊक - कॉमेंटरी, टीव्हीवरचे सल्लागार, बीसीसीआय ची पदे, खाजगी अ‍ॅकॅडमीज, किंवा पूर्ण क्रिकेटबाहेरचे काहीतरी?

>>> >> सर्वात प्रथम जयवर्धनेला द्रविड म्हटल्याबद्दल आश्चर्य वाटले. जयवर्धनेच्या classy खेळाकडे बघूनही द्रविडच्या तंत्रशुद्ध खेळाची तुलना आजच्या काळात फार तर कलिस नि मूडमधे असलेला तेंडुलकर ह्यांच्याशी होउ शकेल. त्यांच्या away average मधली तुलना बघितली कि लक्षात येईल असे का म्हणतोय ते.

द्रविडप्रमाणेच जयवर्धने श्रीलंकेचा मधल्या फळीतला आधारस्तंभ आहे. द्रविडप्रमाणेच तो स्टायलिश आहे. द्रविडप्रमाणेच तो मैदानावर सभ्यपणे व शांतपणे वावरतो. या सर्व कारणांमुळे तुलना केली.

अजून गांगुलीची जागा भरून निघाली आहे असे वाटत नाही. कोहली हा पर्याय आहे. पण अजून १-२ मालिकेनंतर ते स्पष्ट होईल. द्रविडची जागा भरून काढणारा एकही तंत्रशुद्ध खेळाडू दिसत नाही. तसं पाहिलं तर आता तंत्रशुद्ध खेळतं कोण? आताच्या संघातही सचिन व द्रविड हे दोघेच तंत्र घोटवलेले आहेत. उरलेल्यांना फारसे तंत्रशुद्ध म्हणता येणार नाही.

सचिन व लक्ष्मणवर द्रविडच्या अनुपस्थितीत खेळण्याच्या दबावापेक्षा द्रविडप्रमाणेच तुम्ही का निवृत्त होत नाही, हा दबाव जास्त असण्याची शक्यता आहे.

खरंच द्रविड, तेंडुलकर, लक्ष्मण अशांचे पर्यायी खेळाडू असे 'विंग'मधे तयार असतात का त्यांची जागा तितक्याच समर्थपणे घ्यायला ? आपल्याच नाही , कुठल्याही देशात . शेन वॉर्न, मॅग्रा आत्ताच गेले ना ऑस्ट्रेलियाच्या संघातून बाहेर ! मला वाटतं 'पोटेन्शियल' हेरून नवोदित किंवा कांहीसे अनुभवी तरुण खेळाडू मैदानात उतरवूनच ते द्रविड, तेंडुलकर व लक्ष्मण [किंवा तत्सम ] होतील असा विश्वास व त्यासाठी कांही वेळ त्याना द्यावा लागतो; व त्यासाठी मुख्य म्हणजे निवडसमितिला स्वतःची पारख अचूक असल्याचा ठाम विश्वास असावा लागतो.
दुसरं, फलंदाजांची अशी एक असामान्य त्रयी आपल्याला खूप काळ लाभली, हें आपलं सुदैव ; पण जर अशा त्रयीशिवाय आपण लंगडेच होणार अशी भावना निर्माण झाली, तर सांघिक खेळात तें घातक ठरेल, असं मला तीव्रतेने वाटतं. त्यांच्या नसण्यानुळे जी कमतरता येईल ती संघातल्या सर्व खेळाडूनी फलंदाजी, गोलंदाजी व मुख्यतः क्षेत्ररक्षण यातील स्वतःची कामगिरी उंचावून भरून काढणं ही 'चँपियन' संघाची खरी ओळख आहे; थोडंसं धाडसाचं असलं तरी मी हे म्हणेन कीं ह्या त्रयीचं संघाबाहेर जाणं [ आत्ताच किंवा एकाच वेळी नव्हे] यामुळे खेळाडूना आपल्या सांघिक जबाबदारीची जाणीव व ती उचलायची प्रेरणा मिळण्याची शक्यताच अधिक आहे.
तिसरं व सर्वात महत्वाचं - हरणं, जिंकणं यापेक्षां कोण जिद्दीने, सर्वस्वाने व जबाबदारीने खेळतो हा मुख्य निकष संघ निवडीत लावणं आतां अपरिहार्य आहे; त्याशिवाय बर्‍याच खेळाडूंत सदोदित जाणवणारं शैथिल्य व मरगळ झटकणं कठीणच आहे.

असा निर्णय घेण्यात द्रवीडने खाजगी आयुष्याचा हि विचार केला असेल. महत्वाचे काय, क्रिकेट की इतर काय चालू आहे ते. त्यावरून ठरवले असणार. >>किती सिनीकल लिहिता हो तुम्ही ? Does he deserver that after what he has done for so many years ? Sad

IPL is necessary beast. बाहेर बसून म्हणजे सोपे आहे कि टेस्ट क्रिकेट हेच खरे क्रिकेट वगैरे. पण ज्या खेळाडूंची पोटे खेळावर चालतात त्यांचे काय ? तुमच्या आमच्यासारखे त्यांना pension/401 plan नाहित, त्यांनी IPL खेळून आपली बेगमी केली तर त्यात फार चूक काही नाहि. खरी जबाबदारी संघटनांची आहे कि त्या सर्व प्रकारच्या क्रिकेटमधे योग्य balance ठेवू शकतील.

खरंच द्रविड, तेंडुलकर, लक्ष्मण अशांचे पर्यायी खेळाडू असे 'विंग'मधे तयार असतात का त्यांची जागा तितक्याच समर्थपणे घ्यायला ?>> नाही पण त्यांची जागा घेऊ शकतील (त्यांची म्हणजे indivisual खेळाडूची नाहि तर ते ज्या जागेवर खेळत आहेत त्या जागेवर perform करण्याची जबाबदारी घेऊ शकतील) अशा खेळाडूंना योग्य प्रकारे groom करण्याची गरज आहे.

त्यासाठी कांही वेळ त्याना द्यावा लागतो; व त्यासाठी मुख्य म्हणजे निवडसमितिला स्वतःची पारख अचूक असल्याचा ठाम विश्वास असावा लागतो.>> +१. असे होण्ञाची शक्यता आपल्याकडे फार्शी मला तरी वाटत नाहि. आपण शक्य तोवर reactive mode मधे असतो. ह्याच्या जागी त्याला घालून बघू, चालतो का ह्या तत्वावर आपले गाडे चालते.

<< असे होण्ञाची शक्यता आपल्याकडे फार्शी मला तरी वाटत नाहि. >> असामीजी, इथंच खरं तर घोडं पेंड खातंय, असं नाही वाटत ? ' क्षेत्ररक्षणावर व तंदुरूस्तीवर भर द्यावा', ' दौरे आंखताना खेळाडूंची दमछाक होणार नाही याची काळजी घ्यावी ', ' योजनापूर्वक नवीन खेळाडूना संधी देवून नेहमी नवीन फळी तयार ठेवावी', ' एक समतोल ,सज्ज असा संघ तयार करावा' इ.इ. सर्वमान्य संकेतांच्या बाबतींत "असं आपल्याकडे होण्याची शक्यता नाही" असंच दुर्दैवाने म्हणावं लागतं. मग, हे सगळे मूलभूत संकेत धुडकावूनही आपला संघ मात्र विश्वविजेता व्हावा अशी आशा बाळगणं, हें स्वप्नरंजनच नाही का ? आपल्याकडे प्रतिभेची कमतरता नाही तर शिस्तबद्ध नियोजनाची आहे; व म्हणूनच, आत्तां ऑस्ट्रेलियात बसले तसे धक्के सहन करायची क्रिकेटप्रेमीना संवय ठेवण्याशिवाय गत्यंतर नाही.
<< Does he deserver that after what he has done for so many years ? >> सहमत. त्याने स्वतः संघाच्या कामगिरीत भरीव हातभार तर लावलाच पण इतरांसाठी एक प्रेरणादायक आदर्शही - ऑन अँड ऑफ द फिल्ड - ठेवण्याचं मोठं कार्यही केलंय. A true ambassador ! Deserves our salute !!

राहुल प्लीज रिटायर होवू नकोस !
.
कोण भारताला वाचवेल फॉलो ऑन ला रोक्ण्यापासून ?
.
कोण विकेट कीपिंग करेल जेव्हा धोनी दुखापतग्रस्त असेल?
.
कोण ओपनिंग करेल जेव्हा सेहवाग दुखापत असेल?
.
जेव्हा सचिन खेळला नाही तेव्हा १०० रन्स कोण करेल?
.
कोण हरलेली मेच जिंकून आपल्या खिशात आणून घालेल?
.
कोण डायविंग करून् पहिल्या स्लीप मध्ये केचेस घेयील?
.
कोण आपल्या टीम च्या फिल्डर्स मध्ये नवीन जोश आणेल?
.
कोण सचिन बरोबर २०० किंवा ३०० रन्स च्या मोठ्या पार्टनरशिप करेल?
.
कोण दुसऱ्या टीम च्या खेळाडूना देखील मान सन्मान देयील?
.
कोण बोलिंग करेल जेव्हा आपले बोलर्स दुखापतग्रस्त असतील?
.
कोण पूर्ण दिवस टिकून राहून मॅच ला वाचवेल?
.
कोण तुझ्यासारखे फास्ट व स्पिन बोलर्स चे चेलेंज घेवून खेळेल?
.
कोण टीम मधल्या युवा खेळाडूना योग्य मार्गदर्शन करेल?
.
कोण????? आहे कुणाचे नाव? नाही ना? :`(
.
कारण दुसरा द्रविड होणे हे कधीच शक्य नाही!

द्रविड retire झाला. Its official now. I would loved for him to play one more series (but thats just cricket fan in me being selfish). He may not have left on high notes but left at his terms. (दोन्हि करणे फक्त गावस्करलाच जमलय).

I recall his 95 on Lords on his debut and feeling sad for him missing century. I recall him hitting Donald for six in that day and night match followed by Donald offering his choicest word to Dravid, while Dravid walking back simply ignoring him (Yeah that same scene we saw over and over again for next 15 years) . I remember him playing possibly best test inning played ever with VVS, wilting resolve of entire Aus team forcing them to stumble around the final frontier. I remember him carrying entire team against West Indies to kick off race for Number 1. Test spot.

strike rotate करायला लागल्यापासून त्याचा effectiveness ODI मधे पण प्रचंड वाढला. No wonder Indian test ascdeancy is coincided with his. द्रविड नेहमीच inert gas सारखा खेळत राहिला. ball after ball, over after over. He can wait endlessly till ballers offer bad ball for him putting it away. Sheer determination and endeless patience. incandencent दिव्यातल्या Tungeston सारखा बॉलर कितीही तापू दे, द्रविड आतल्या innert gas सारखा. (शेवटी फक्त tungeston wire जळते) End Result : Completely demoralised baller for others to feast upon. (सचिन चे dual अधिक flashy असतात. He can dominate ballers, toy around with them. But at the end, baller had a chance to come out more energised with satisfaction of having some hearty dual.)

गिलेस्पीने त्याच्याबद्दल जे म्हटलेले त्याहून अचूक काहि सांगणे अशक्य आहे. "He drains you (as a baller)". And this is coming from the guy who has abduance of energy to ball at dizzy pace for days in days out. Indian test cricket will miss him more than it will miss Tendulkar (when he hangs the boot).

All Time Best Indian Test Team निवडायची असेल तर नंबर १,३,४ हे कायमचे booked राहतील. Happy We are thankful to you Mr. Dravid. Take our bow !!!

Determination , Resilience, Artistry, Versatility, Integrity & Dignity !!
That's DRAVID !!! त्रिवार मुजरा !!!

द्रविडने पॅडस् कधीही न बांधण्यासाठी कायमचे सोडले. एक महान आणि सभ्य माणसांच्या खेळातला सभ्य खेळाडू सभ्यपणे बाजूला झाला. आता भारताला कायम १० खेळाडूंचीच टीम खेळवावी लागणार. Sad

Pages