भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा (२०११-२०१२)

Submitted by मास्तुरे on 22 November, 2011 - 02:22

भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा १५ डिसेंबर पासून सुरू होतोय. सचिन, द्रविड व लक्ष्मणचा हा ऑस्ट्रेलियाचा अखेरचाच दौरा आहे. द्रविड या दौर्‍यानंतर बहुतेक निवृत्त होईल. या दौर्‍यात भारत एकूण ४ कसोटी सामने, २ T20 सामने व श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया विरूद्ध एकूण चार-चार ५० षटकांचे सामने खेळेल. अंतिम फेरीत आलेले २ संघ एकमेकांविरूद्ध एकूण (जास्तीत जास्त) ३ सामन्यांची मालिका खेळतील.

भारताचा कसोटी संघ असा आहे -
धोनी (कर्णधार व यष्टीरक्षक), सेहवाग, गंभीर, द्रविड, सचिन, लक्ष्मण, कोहली, रोहीत शर्मा, अजिंक्य रहाणे, वृद्धिमान साहा, अश्विन, इशांत शर्मा, उमेश यादव, विनयकुमार, प्रग्यान ओझा, अभिमन्यू मिथुन, झहीर खान

भारताचा ट-२० आणि एकदिवसीय सामन्यांचा संघ असा आहे -

धोनी (कर्णधार व यष्टीरक्षक), सेहवाग, गंभीर, रैना, सचिन, मनोज तिवारी, कोहली, रोहीत शर्मा, रवींद्र जडेजा, पार्थिव पटेल, अश्विन, राहुल शर्मा, उमेश यादव, विनयकुमार, प्रवीणकुमार, इरफान पठाण, झहीर खान

ऑस्ट्रेलियाचा कसोटी संघ असा आहे -
मायकेल क्लार्क (कर्णधार), एड कोवॅन, शॉन मार्श, रिकी पाँटिंग, डेव्हिड वॉर्नर, मायकेल हसी, डॅनियल ख्रिस्तियन, ब्रॅड हॅडिन (यष्टीरक्षक), पीटर सिडल्, जेम्स पॅटिन्सन, बेन हिल्फेनहॉस, मिचेल स्टार्क, नेथन लॉयन

ऑस्ट्रेलियाचा एकदिवसीय संघ असा आहे -
मायकेल क्लार्क (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, रिकी पाँटिंग, पीटर फॉरेस्ट, डॅनिअल ख्रिश्चिअन, डेव्हिड हसी, मायकेल हसी, मॅथ्यू वेड, ब्रेट ली, रायन हॅरिस, मिचेल स्टार्क, झेव्हिअर डोहेट्री, क्लिंट मॅके, मिचेल मार्श

ऑस्ट्रेलियाचा T20 चा संघ असा आहे -
जॉर्ज बेली (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर (उपकर्णधार), ट्रेव्हिस बर्ट, डॅनिअल ख्रिश्चिअन, झेव्हिअर डोहेट्री, जेम्स फॉकनर, एरॉन फिंच, ब्रॅड हॉग, डेव्हिड हसी, ब्रेट ली, मिशेल मार्श, शॉन मार्श, क्लिंट मॅके, मॅथ्यू वेड (यष्टीरक्षक)

श्रीलंकेचा एकदिवसीय संघ असा आहे -
जयवर्धने (कर्णधार), अ‍ॅन्जेलो मॅथ्यूज (उपकर्णधार), उपुल थरंगा, तिलकरत्ने दिलशान, कुमार संगक्कारा (यष्टीरक्षक), दिनेश चंडिमाल (यष्टीरक्षक), लाहिरू थिरिमान्ने, थिसारा पेरेरा, फरवीज महारूफ, रंगना हेराथ, सचित्र सेनानायके, लसिथ मलिंगा, नुवान कुलसेकरा, चनका वेलेगेदेरा, धम्मिका प्रसाद, थिलान समरवीरा (अजून समावेश नक्की नाही)

_________________________________________________

हा आहे दौर्‍याचा कार्यक्रम -

ऑस्ट्रेलिया अध्यक्षीय संघ वि भारत
१५-१६ डिसेंबर; स्थळ - कॅनबेरा, वेळ - सकाळी ५:३० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: अनिर्णित (धावफलक इथे आहे)

ऑस्ट्रेलिया अध्यक्षीय संघ वि भारत
१९-२१ डिसेंबर; स्थळ - कॅनबेरा, वेळ - सकाळी ५:३० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: अनिर्णित (धावफलक इथे आहे)

_________________________________________________

पहिला कसोटी सामना -
२६-३० डिसेंबर, स्थळ - मेलबोर्न, वेळ - सकाळी ५:०० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: ऑस्ट्रेलिया विजयी (धावफलक इथे आहे)

दुसरा कसोटी सामना -
३-७ जानेवारी, स्थळ - सिडने, वेळ - सकाळी ५:०० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: ऑस्ट्रेलिया एक डाव राखून विजयी (धावफलक इथे आहे)

तिसरा कसोटी सामना -
१३-१७ जानेवारी, स्थळ - पर्थ, वेळ - सकाळी ८:०० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: ऑस्ट्रेलिया एक डाव राखून विजयी (धावफलक इथे आहे)

चौथा कसोटी सामना -
२४-२८ जानेवारी, स्थळ - अ‍ॅडलेड, वेळ - सकाळी ५:३० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: ऑस्ट्रेलिया २९८ धावांनी विजयी (धावफलक इथे आहे)

मालिकावीर : मायकेल क्लार्क
ऑस्ट्रेलियाने मालिका ४-० अशी जिंकली.

_________________________________________________

पहिला T20 सामना -
१ फेब्रुवारी, स्थळ - सिडने, वेळ - दुपारी २:०५ पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: ऑस्ट्रेलिया ३१ धावांनी विजयी (धावफलक इथे आहे)

दुसरा T20 सामना -
३ फेब्रुवारी, स्थळ - मेलबोर्न, वेळ - दुपारी २:०५ पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: भारत ८ गडी व २ चेंडू राखून विजयी (धावफलक इथे आहे)

मालिका निर्णय: १-१ अशी बरोबरी

_________________________________________________

सर्व एकदिवसीय सामने दिवस-रात्र असे खेळले जातील.

पहिला एकदिवसीय सामना - विरूद्ध ऑस्ट्रेलिया
५ फेब्रुवारी, स्थळ - मेलबोर्न, वेळ - सकाळी ८:५० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: ऑस्ट्रेलिया ६५ धावांनी विजयी (धावफलक इथे आहे)
गुण - ऑस्ट्रेलिया ५, भारत 0

दुसरा एकदिवसीय सामना - विरूद्ध श्रीलंका
८ फेब्रुवारी, स्थळ - पर्थ, वेळ - सकाळी ९:५० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: भारत ४ गडी राखून विजयी (धावफलक इथे आहे)
गुण - श्रीलंका 0, भारत ४
आतापर्यंतचे एकूण गुण : ऑस्ट्रेलिया ५, भारत ४, श्रीलंका 0

ऑस्ट्रेलिया विरूद्ध श्रीलंका
१० फेब्रुवारी, स्थळ - पर्थ, वेळ - सकाळी ९:५० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: ऑस्ट्रेलिया ५ धावांनी विजयी (धावफलक इथे आहे)
गुण - श्रीलंका 0, ऑस्ट्रेलिया ४
आतापर्यंतचे एकूण गुण : ऑस्ट्रेलिया ९, भारत ४, श्रीलंका 0

तिसरा एकदिवसीय सामना - विरूद्ध ऑस्ट्रेलिया
१२ फेब्रुवारी, स्थळ - अ‍ॅडलेड, वेळ - सकाळी ८:५० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: भारत २ चेंडू राखून विजयी (धावफलक इथे आहे)
गुण - भारत ४, ऑस्ट्रेलिया 0
आतापर्यंतचे एकूण गुण : ऑस्ट्रेलिया ९, भारत ८, श्रीलंका 0

चौथा एकदिवसीय सामना - विरूद्ध श्रीलंका
१४ फेब्रुवारी, स्थळ - अ‍ॅडलेड, वेळ - सकाळी ८:५० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: बरोबरी (धावफलक इथे आहे)
गुण - भारत २, श्रीलंका २
आतापर्यंतचे एकूण गुण : ऑस्ट्रेलिया ९, भारत १०, श्रीलंका २

ऑस्ट्रेलिया विरूद्ध श्रीलंका
१७ फेब्रुवारी, स्थळ - सिडने, वेळ - सकाळी ८:५० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: श्रीलंका ८ गडी राखून विजयी (धावफलक इथे आहे)
गुण - ऑस्ट्रेलिया 0, श्रीलंका ५
आतापर्यंतचे एकूण गुण : ऑस्ट्रेलिया ९, भारत १०, श्रीलंका ७
आतापर्यंतची निव्वळ धावगती : ऑस्ट्रेलिया -0.११६, भारत -0.२४५, श्रीलंका +0.३२३

पाचवा एकदिवसीय सामना - विरूद्ध ऑस्ट्रेलिया
१९ फेब्रुवारी, स्थळ - ब्रिस्बेन, वेळ - सकाळी ८:५० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: ऑस्ट्रेलिया ११० धावांनी राखून विजयी (धावफलक इथे आहे)
गुण - ऑस्ट्रेलिया ५, भारत 0
आतापर्यंतचे एकूण गुण : ऑस्ट्रेलिया १४, भारत १०, श्रीलंका ७
आतापर्यंतची निव्वळ धावगती : ऑस्ट्रेलिया +0.४३३, भारत -0.६७२, श्रीलंका +0.३२३

सहावा एकदिवसीय सामना - विरूद्ध श्रीलंका
२१ फेब्रुवारी, स्थळ - ब्रिस्बेन, वेळ - सकाळी ८:५० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: श्रीलंका ५१ धावांनी विजयी (धावफलक इथे आहे)
गुण - श्रीलंका ४, भारत 0
आतापर्यंतचे एकूण गुण : ऑस्ट्रेलिया १४, भारत १०, श्रीलंका ११
आतापर्यंतची निव्वळ धावगती : ऑस्ट्रेलिया +0.४३३, भारत -0.७३३, श्रीलंका +0.४८१

ऑस्ट्रेलिया विरूद्ध श्रीलंका
२४ फेब्रुवारी, स्थळ - होबार्ट, वेळ - सकाळी ८:५० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: श्रीलंका ३ गडी राखून विजयी (धावफलक इथे आहे)
गुण - श्रीलंका ४, ऑस्ट्रेलिया 0
आतापर्यंतचे एकूण गुण : ऑस्ट्रेलिया १४, भारत १०, श्रीलंका १५
आतापर्यंतची निव्वळ धावगती : ऑस्ट्रेलिया +0.३१८, भारत -0.७३३, श्रीलंका +0.४२६

सातवा एकदिवसीय सामना - विरूद्ध ऑस्ट्रेलिया
२६ फेब्रुवारी, स्थळ - सिडने, वेळ - सकाळी ८:५० पासून (भारतीय प्रमाण वेळ)

आठवा एकदिवसीय सामना - विरूद्ध श्रीलंका
२८ फेब्रुवारी, स्थळ - होबार्ट, वेळ - सकाळी ८:५० पासून (भारतीय प्रमाण वेळ)

ऑस्ट्रेलिया विरूद्ध श्रीलंका
२ मार्च, स्थळ - मेलबोर्न, वेळ - सकाळी ८:५० पासून (भारतीय प्रमाण वेळ)

पहिला अंतिम सामना
४ मार्च, स्थळ - ब्रिस्बेन

दुसरा अंतिम सामना
६ मार्च, स्थळ - अ‍ॅडलेड

गरज भासल्यास तिसरा अंतिम सामना खेळवला जाईल.

तिसरा अंतिम सामना
८ मार्च, स्थळ - अ‍ॅडलेड

_________________________________________________

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ऑसीज भारताला घाबरले.

इंटरनेटवर जिथे तिथे ऑस्ट्रेलियाची प्रधानमंत्री बाई घाबरली आहे नि लोक तिला धीर देत आहेत असे फोटो पाहिले. म्हणून वाचायला गेलो - पण त्या भारताला घाबरल्या नसून दुसरेच काहीतरी कारण होते असे कळले.
मग लक्षात आले, भारताला कोण घाबरतो जगात? गोरे लोक तर नक्कीच नाही!

चSला. आटोपले एकदाचे कसोटी सामने!
आता पुनः सामना असेल तर एका दिवसात सोक्ष मोक्ष लागेल. उगाच हुरहूर नाही की कदाचित सचिन शतक करतो का, द्रवीड, लक्ष्मण, सेहवाग, गंभीर काही पराक्रम करतील का?
आता काही नाही!
खरेच परदेश दौरे बंद केले पाहिजेत. किंवा जमले तर आपण तिकडे लक्ष दिले नाही पाहिजे. मानसशास्त्रज्ञ सांगतात, ज्या गोष्टींमुळे दु:ख होते त्या गोष्टी टाळाव्यात म्हणजे डिप्रेशन येत नाही! माझे आजकालचे मायबोलीवरील लिखाण बघून, भारतीय खेळाडूंचा संघ सतत हरत होता याचा माझ्या मनावर फारच वाईट परीणाम झाला आहे असे माझे मलाच कळले!

आता क्रिकेट बघायचे नाही. फूटबॉल संपत आला आहे, बास्केटबॉल नि हॉकी कडे लक्ष द्यावे.

भारताकडेहि लक्ष द्यायचे नाही, काही चांगले ऐकायला येईल, बघायला मिळेल असे वाटते म्हणून लक्ष देतो. पदरी निराशाच. हुषार लोकांचे विचार वाचायला मायबोलीवर यावे तर हा धागा सोडून इतरत्र नुसते चक्रम लोकच वेळोवेळी समोर येतात!! तेंव्हा आता काही दिवस मायबोलीच बंद. मानसिक तब्येत सुधारली की बघीन.
हटकेश्वर, हटकेश्वर.

<< आता क्रिकेट बघायचे नाही. >> झक्कीजी, बघूं नका , पण तुमच्या खरमरीत कॉमेंटस मात्र येऊंद्यात; तसा क्रिकेट बघणं, समजणं व कॉमेंटस करणं याचा कांहीं संबंध नसावाच - माझंच उदाहरण घ्या ना !!! Wink
आणि हो, << बास्केटबॉल नि हॉकी कडे लक्ष द्यावे.>> बास्केटबॉलचं माहित नाही , पण हॉकी मात्र टाळा; हमखास डिप्रेशन - इथंही माझंच उदाहरण !!!

बाकी या पराभवांमुळे अनेक माजी फुटकळ क्रिकेटपटूंची तोंडे मात्र मोकाट सुटलीत... ज्यांनी मुष्किलीने २-४ टेस्ट खेळून स्वतावर कसोटीपटूंचा शिका मारुन घेतलाय असे लोक "बिग ३" ना म्हातारे, संघावरचे ओझे आणि असेच काही-बाही बोलत सुटलेत!
स्वता निवृत्त व्हायच्या वेळी, निवृत्तीचा निर्णय ज्या त्या खेळाडूने घेतला पाहिजेल इतरांना त्याचा अधिकार नाही, असा गळा काढणारे खेळाडू आता सिनियर्सना निवृत्तीचा सल्ला देऊ लागलेत... काहींनी तर परस्पर द्रवीडच्या निवृत्तीची घोषणाही करुन टाकलीय.... कहर आहे!
माझ्या मते खेळाडूंच्या फॉर्मपेक्षा त्यांची पराभूत मनोवृत्ती या पराभवाला अधिक जबाबदार आहे.
संघ पहील्या कसोटीपासुनच डिफेन्सिव्ह मोडमध्ये गेला होता.... आणि त्यातुन संघाला बाहेर काढायचे काम कॅप्टन, कोच आणि टीम मॅनेजमेंटचे होते... जे घडले नाही!
धोनीबद्दल आजवर कॅप्टन म्हणून माझ्या मनात एक आदर होता... पण या मालिकेत त्याच्यातली ती चमक कुठेतरी हरवलेली वाटली.... सहवागने तर शेवटच्या सामन्यात कॅप्टन्सीची अक्षरशः पाटी टाकली.
धोनीला कसोटीतील स्वताच्या परफॉर्मन्सबद्दल जाणवू लागलेली काळजी आणि त्यातून कसोटीत खेळत राहण्याच्या/न राहण्याच्या निर्णयाबद्दल त्याने केलेले सुतोवाच यावरुन त्याच्या मनात काहीतरी द्वंद चालू होते नक्कीच आणि त्याचा परिणाम त्याच्या कॅप्टन्सीवर झाला असावा!

मास्तुरे......................................... हा धागा बंद करुन नविन चालु करायचा का....तुम्हिच काढा....... ? तसे नविन धागा काढुन सुध्दा पानिपत हे निश्चितच आहे..... तरी ... असो.....

कृपया चुकीचे वाटुन घेउ नका........

आपण बहुतेक सर्व ४ ही कसोटी सामन्यातुन केलेल्या धावांच्या अर्ध्यापेक्षा जास्त प्रतिसाद धाग्याला मिळाला आहे... Happy

चला. संपली एकदाची मॅच. अपेक्षेप्रमाणे आज तासाभरातच उरलेल्यांनी आपल्या वळकट्या बांधल्या आणि मार्गस्थ झाले. संपूर्ण मालिका भारत एका पराभूताच्या मनोवृत्तीतून खेळला. ना कधी जिंकण्याची जिद्द दिसली ना कधी हरता हरता प्रतिस्पर्ध्याला झुंझविण्याची लढाऊ वृत्ती दिसली. एखाद्या सरकारी कार्यालयात कारकुनांनी पाट्या टाकाव्यात आणि आला दिवस भरून काढावा अशा वृत्तीने भारत चारही सामने केवळ औपचारिकता पूर्ण करण्याकरता खेळला. भारताला प्रत्येक कसोटीत २ ऐवजी ३ डाव दिले असते, तरी मालिकेचा निर्णय बदलला नसता. अक्षरशः एका वर्षाच्या अवधीत शिखरावरून भारत तळाला पोहोचला. गॅरी कर्स्टनने जे कमावून दिले ते भारताने काही महिन्यांच्या अवधीत उधळून टाकले.

सीडल् ला सामनावीर व क्लार्कला मालिकावीर किताब दिल्याचे आश्चर्य वाटले. या सामन्याच्या पहिल्या डावात द्विशतक व दुसर्‍या डावात नाबाद अर्धशतक करणारा व संपूर्ण मालिकेतल्या एकूण ६ डावात १०० पेक्षा जास्त सरासरीने जवळपास साडेपाचशे धावा करताना ३ अर्धशतके, १ शतक व १ द्विशतक करणारा पाँटींग या दोन्ही पुरस्कारांसाठी सर्वार्थाने योग्य होता.

असो. आता ट-२० आणि एकदिवसीय सामन्यांची वाट बघूया.

हा सेहवाग वाय झेड आहे
'We also won 2-0 in India' - Sehwag
अपनी गली मे हर कुत्ता शेर होता है याला माहित नसावं.

India continue to keep bringing up their home record in response to their back-to-back 0-4 whitewashes in England and Australia. The moment the question about the whitewashes was asked, Virender Sehwag shot back even before it could be finished, "We also won 2-0 in India."

Sehwag didn't see a big difference in the way the team has been performing, just that the "time is not good". "Everybody is practising hard at home, and then we came here and practised really hard," he said. "We make our own plans, and it didn't click. It happens with every team, with every player. The time is not good for Indian team, for individuals, so maybe that's why we are not scoring runs.

"The moment the time changes, the next year we will see, or in the coming series, we will see our top order giving starts and middle order coming in and score big hundreds. It happens. If I am making any plans I won't tell you guys. I will go and execute in the ground rather than telling you."

आता The moment the time changes, म्हणजे काय? भारतीय संघाची पत्रिका दाखवायची असं म्हणणं आहे का या गाढवाचं?

ऑस्ट्रेलियाचा एकदिवसीय संघ जाहीर झालेला आहे (नावे वर दिली आहेत). पीटर फॉरेस्ट हा एक नवीन खेळाडू आहे. उद्या पहिला ट-२० सामना आहे (दुपारी २:०५ वाजता भाप्र वेळेनुसार). झक्कींना सामन्यासाठी ब्राह्ममुहूर्तावर उठावे लागणार. Biggrin

<< झक्कींना सामन्यासाठी ब्राह्ममुहूर्तावर उठावे लागणार. >> अहो, पण "आता क्रिकेट बघायचे नाही" या त्यांच्या ब्रह्मवाक्याचं काय !!! Wink

>>> << झक्कींना सामन्यासाठी ब्राह्ममुहूर्तावर उठावे लागणार. >> अहो, पण "आता क्रिकेट बघायचे नाही" या त्यांच्या ब्रह्मवाक्याचं काय !!!

तुमच्या दोघांच्याही झोपेचं खोबरं होणार. त्यांच्या गुलाबी थंडीतल्या पहाटेच्या झोपेचं आणि तुमच्या वामकुक्षीचं! Wink

<< तुमच्या दोघांच्याही झोपेचं खोबरं होणार >> खोबरं झालेलं परवडलं, पण आतांही करट्याच हातात नाय दिल्या, म्हणजे मिळवलं ! Wink

आजचं टीम सिलेक्शन टोटल गंडलय.. ३ स्पीन आणि २ मिडियम पेस बॉलर्स..(रवींद्र जडेजा, अश्विन, राहुल शर्मा, विनय कुमार आणि प्रवीण कुमार) तेही ऑसीज विरुद्ध.. देवा ह्यांना वाचव..

मास्तरानं ऑस्ट्रेलिया जिंकणार म्हणून सांगितलंय, म्हणजे नक्की भारत जिंकणार. आपला घोडा भारत.

>> विनयकुमार चे पहिले चारही बॉल भयान होते. त्याला विकेट चुकून मिळाली
या मुळेच तर आपण लिमिटेड ओव्हर्स मधे जिंकायची शक्यता जास्त असते. असल्या बॉल्सना टेस्टमधे क्वचितच विकेट मिळाली असती. Wink

चिमण,

नेहमीप्रमाणे तू चुकीच्या घोड्यावर पैसे लावलेस आणि हात पोळून घेतलेस.

आज आपण हारलो यात काहीही आश्चर्य नाही. ट-२० प्रकारात भारत खूपच खालच्या स्थानावर आहे. २००७ मध्ये पहिला ट-२० विश्वचषक जिंकल्यावर आजतगायत या प्रकारात भारताची कामगिरी अत्यंत निराशाजनक आहे. २००९ व २०१० या ट-२० दोन्ही विश्वचषकांत भारत प्रत्येकी ३ सामने (म्हणजे एकूण ६ सामने) हारला होता. २००८ मधल्या न्यूझीलँडच्या दौर्‍यात भारत दोन्ही ट-२० सामने हारला होता. २०११ मध्ये भारत इंग्लंडविरूद्धचा एकमेव ट-२० सामना हारला होता. या कालावधीत भारताचे दोनच विजय आठवत आहेत. २००८ (किंवा २००९ मध्ये?) भारताने श्रीलंकेत श्रीलंकेला हरविले होते (त्यात दोन्ही पठाण बंधूंनी जबरदस्त फलंदाजी केली होती) व नंतर २००९ (का २०१० मध्ये?) मध्ये भारताने ऑस्ट्रेलियाला भारतात हरविले होते. या दोन विजयांव्यतिरिक्त अजून विजय आठवत नाहीत. २००७ मधल्या विश्वचषक विजयानंतर हे दोन सामने वगळता उरलेल्या बहुसंख्य ट-२० सामन्यांत भारताचा पराभव झालेला आहे.

गेली ४ वर्षे आयपीएलच्या तमाशात सर्वाधिक सहभात असणार्‍या भारताची या प्रकारातली दयनीय स्थिती ही एक शोकांतिका आहे.

आजचे धोनीचे डावपेच अनाकलनीय होते. आज इरफान पठाणला खेळवायला हवे होते. तो बॅटिंगही बर्‍यापैकी करू शकतो व सुरवातीच्या ३ डाव्या फलंदाजांविरूद्ध त्याच्या गोलंदाजीचा उपयोग झाला असता. तसेच एकदिवसीय मालिकेसाठी त्याला थोडा सरावही झाला असता.

स्वतः धोनीचा फलंदाजीतला बॅडपॅच अजूनही चालू आहे. त्याने खेळलेल्या पहिल्या १९ चेंडूत फक्त ८ धावा केल्या होत्या. जेव्हा त्याने मारामारी केली तेव्हा सामना हातातून निसटून गेला होता. सेहवागच्या फलंदाजीचा आणि क्षेत्ररक्षणाचा आनंद आहे. त्याला चेंडू अडवताना खाली वाकता येतच नाही. त्यातल्या गंभीर व कोहलीने बर्‍यापैकी प्रयत्न केला. पण ते बाद झाले तिथेच सामना संपला.

ऑस्ट्रेलियाच्या विरुद्ध ऑस्ट्रेलियातच ५ मंदगती गोलंदाज घेणे ह्यातच सगळं काही आलेलं आहे..

Pages