भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा १५ डिसेंबर पासून सुरू होतोय. सचिन, द्रविड व लक्ष्मणचा हा ऑस्ट्रेलियाचा अखेरचाच दौरा आहे. द्रविड या दौर्यानंतर बहुतेक निवृत्त होईल. या दौर्यात भारत एकूण ४ कसोटी सामने, २ T20 सामने व श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया विरूद्ध एकूण चार-चार ५० षटकांचे सामने खेळेल. अंतिम फेरीत आलेले २ संघ एकमेकांविरूद्ध एकूण (जास्तीत जास्त) ३ सामन्यांची मालिका खेळतील.
भारताचा कसोटी संघ असा आहे -
धोनी (कर्णधार व यष्टीरक्षक), सेहवाग, गंभीर, द्रविड, सचिन, लक्ष्मण, कोहली, रोहीत शर्मा, अजिंक्य रहाणे, वृद्धिमान साहा, अश्विन, इशांत शर्मा, उमेश यादव, विनयकुमार, प्रग्यान ओझा, अभिमन्यू मिथुन, झहीर खान
भारताचा ट-२० आणि एकदिवसीय सामन्यांचा संघ असा आहे -
धोनी (कर्णधार व यष्टीरक्षक), सेहवाग, गंभीर, रैना, सचिन, मनोज तिवारी, कोहली, रोहीत शर्मा, रवींद्र जडेजा, पार्थिव पटेल, अश्विन, राहुल शर्मा, उमेश यादव, विनयकुमार, प्रवीणकुमार, इरफान पठाण, झहीर खान
ऑस्ट्रेलियाचा कसोटी संघ असा आहे -
मायकेल क्लार्क (कर्णधार), एड कोवॅन, शॉन मार्श, रिकी पाँटिंग, डेव्हिड वॉर्नर, मायकेल हसी, डॅनियल ख्रिस्तियन, ब्रॅड हॅडिन (यष्टीरक्षक), पीटर सिडल्, जेम्स पॅटिन्सन, बेन हिल्फेनहॉस, मिचेल स्टार्क, नेथन लॉयन
ऑस्ट्रेलियाचा एकदिवसीय संघ असा आहे -
मायकेल क्लार्क (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, रिकी पाँटिंग, पीटर फॉरेस्ट, डॅनिअल ख्रिश्चिअन, डेव्हिड हसी, मायकेल हसी, मॅथ्यू वेड, ब्रेट ली, रायन हॅरिस, मिचेल स्टार्क, झेव्हिअर डोहेट्री, क्लिंट मॅके, मिचेल मार्श
ऑस्ट्रेलियाचा T20 चा संघ असा आहे -
जॉर्ज बेली (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर (उपकर्णधार), ट्रेव्हिस बर्ट, डॅनिअल ख्रिश्चिअन, झेव्हिअर डोहेट्री, जेम्स फॉकनर, एरॉन फिंच, ब्रॅड हॉग, डेव्हिड हसी, ब्रेट ली, मिशेल मार्श, शॉन मार्श, क्लिंट मॅके, मॅथ्यू वेड (यष्टीरक्षक)
श्रीलंकेचा एकदिवसीय संघ असा आहे -
जयवर्धने (कर्णधार), अॅन्जेलो मॅथ्यूज (उपकर्णधार), उपुल थरंगा, तिलकरत्ने दिलशान, कुमार संगक्कारा (यष्टीरक्षक), दिनेश चंडिमाल (यष्टीरक्षक), लाहिरू थिरिमान्ने, थिसारा पेरेरा, फरवीज महारूफ, रंगना हेराथ, सचित्र सेनानायके, लसिथ मलिंगा, नुवान कुलसेकरा, चनका वेलेगेदेरा, धम्मिका प्रसाद, थिलान समरवीरा (अजून समावेश नक्की नाही)
_________________________________________________
हा आहे दौर्याचा कार्यक्रम -
ऑस्ट्रेलिया अध्यक्षीय संघ वि भारत
१५-१६ डिसेंबर; स्थळ - कॅनबेरा, वेळ - सकाळी ५:३० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: अनिर्णित (धावफलक इथे आहे)
ऑस्ट्रेलिया अध्यक्षीय संघ वि भारत
१९-२१ डिसेंबर; स्थळ - कॅनबेरा, वेळ - सकाळी ५:३० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: अनिर्णित (धावफलक इथे आहे)
_________________________________________________
पहिला कसोटी सामना -
२६-३० डिसेंबर, स्थळ - मेलबोर्न, वेळ - सकाळी ५:०० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: ऑस्ट्रेलिया विजयी (धावफलक इथे आहे)
दुसरा कसोटी सामना -
३-७ जानेवारी, स्थळ - सिडने, वेळ - सकाळी ५:०० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: ऑस्ट्रेलिया एक डाव राखून विजयी (धावफलक इथे आहे)
तिसरा कसोटी सामना -
१३-१७ जानेवारी, स्थळ - पर्थ, वेळ - सकाळी ८:०० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: ऑस्ट्रेलिया एक डाव राखून विजयी (धावफलक इथे आहे)
चौथा कसोटी सामना -
२४-२८ जानेवारी, स्थळ - अॅडलेड, वेळ - सकाळी ५:३० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: ऑस्ट्रेलिया २९८ धावांनी विजयी (धावफलक इथे आहे)
मालिकावीर : मायकेल क्लार्क
ऑस्ट्रेलियाने मालिका ४-० अशी जिंकली.
_________________________________________________
पहिला T20 सामना -
१ फेब्रुवारी, स्थळ - सिडने, वेळ - दुपारी २:०५ पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: ऑस्ट्रेलिया ३१ धावांनी विजयी (धावफलक इथे आहे)
दुसरा T20 सामना -
३ फेब्रुवारी, स्थळ - मेलबोर्न, वेळ - दुपारी २:०५ पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: भारत ८ गडी व २ चेंडू राखून विजयी (धावफलक इथे आहे)
मालिका निर्णय: १-१ अशी बरोबरी
_________________________________________________
सर्व एकदिवसीय सामने दिवस-रात्र असे खेळले जातील.
पहिला एकदिवसीय सामना - विरूद्ध ऑस्ट्रेलिया
५ फेब्रुवारी, स्थळ - मेलबोर्न, वेळ - सकाळी ८:५० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: ऑस्ट्रेलिया ६५ धावांनी विजयी (धावफलक इथे आहे)
गुण - ऑस्ट्रेलिया ५, भारत 0
दुसरा एकदिवसीय सामना - विरूद्ध श्रीलंका
८ फेब्रुवारी, स्थळ - पर्थ, वेळ - सकाळी ९:५० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: भारत ४ गडी राखून विजयी (धावफलक इथे आहे)
गुण - श्रीलंका 0, भारत ४
आतापर्यंतचे एकूण गुण : ऑस्ट्रेलिया ५, भारत ४, श्रीलंका 0
ऑस्ट्रेलिया विरूद्ध श्रीलंका
१० फेब्रुवारी, स्थळ - पर्थ, वेळ - सकाळी ९:५० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: ऑस्ट्रेलिया ५ धावांनी विजयी (धावफलक इथे आहे)
गुण - श्रीलंका 0, ऑस्ट्रेलिया ४
आतापर्यंतचे एकूण गुण : ऑस्ट्रेलिया ९, भारत ४, श्रीलंका 0
तिसरा एकदिवसीय सामना - विरूद्ध ऑस्ट्रेलिया
१२ फेब्रुवारी, स्थळ - अॅडलेड, वेळ - सकाळी ८:५० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: भारत २ चेंडू राखून विजयी (धावफलक इथे आहे)
गुण - भारत ४, ऑस्ट्रेलिया 0
आतापर्यंतचे एकूण गुण : ऑस्ट्रेलिया ९, भारत ८, श्रीलंका 0
चौथा एकदिवसीय सामना - विरूद्ध श्रीलंका
१४ फेब्रुवारी, स्थळ - अॅडलेड, वेळ - सकाळी ८:५० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: बरोबरी (धावफलक इथे आहे)
गुण - भारत २, श्रीलंका २
आतापर्यंतचे एकूण गुण : ऑस्ट्रेलिया ९, भारत १०, श्रीलंका २
ऑस्ट्रेलिया विरूद्ध श्रीलंका
१७ फेब्रुवारी, स्थळ - सिडने, वेळ - सकाळी ८:५० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: श्रीलंका ८ गडी राखून विजयी (धावफलक इथे आहे)
गुण - ऑस्ट्रेलिया 0, श्रीलंका ५
आतापर्यंतचे एकूण गुण : ऑस्ट्रेलिया ९, भारत १०, श्रीलंका ७
आतापर्यंतची निव्वळ धावगती : ऑस्ट्रेलिया -0.११६, भारत -0.२४५, श्रीलंका +0.३२३
पाचवा एकदिवसीय सामना - विरूद्ध ऑस्ट्रेलिया
१९ फेब्रुवारी, स्थळ - ब्रिस्बेन, वेळ - सकाळी ८:५० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: ऑस्ट्रेलिया ११० धावांनी राखून विजयी (धावफलक इथे आहे)
गुण - ऑस्ट्रेलिया ५, भारत 0
आतापर्यंतचे एकूण गुण : ऑस्ट्रेलिया १४, भारत १०, श्रीलंका ७
आतापर्यंतची निव्वळ धावगती : ऑस्ट्रेलिया +0.४३३, भारत -0.६७२, श्रीलंका +0.३२३
सहावा एकदिवसीय सामना - विरूद्ध श्रीलंका
२१ फेब्रुवारी, स्थळ - ब्रिस्बेन, वेळ - सकाळी ८:५० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: श्रीलंका ५१ धावांनी विजयी (धावफलक इथे आहे)
गुण - श्रीलंका ४, भारत 0
आतापर्यंतचे एकूण गुण : ऑस्ट्रेलिया १४, भारत १०, श्रीलंका ११
आतापर्यंतची निव्वळ धावगती : ऑस्ट्रेलिया +0.४३३, भारत -0.७३३, श्रीलंका +0.४८१
ऑस्ट्रेलिया विरूद्ध श्रीलंका
२४ फेब्रुवारी, स्थळ - होबार्ट, वेळ - सकाळी ८:५० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: श्रीलंका ३ गडी राखून विजयी (धावफलक इथे आहे)
गुण - श्रीलंका ४, ऑस्ट्रेलिया 0
आतापर्यंतचे एकूण गुण : ऑस्ट्रेलिया १४, भारत १०, श्रीलंका १५
आतापर्यंतची निव्वळ धावगती : ऑस्ट्रेलिया +0.३१८, भारत -0.७३३, श्रीलंका +0.४२६
सातवा एकदिवसीय सामना - विरूद्ध ऑस्ट्रेलिया
२६ फेब्रुवारी, स्थळ - सिडने, वेळ - सकाळी ८:५० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
आठवा एकदिवसीय सामना - विरूद्ध श्रीलंका
२८ फेब्रुवारी, स्थळ - होबार्ट, वेळ - सकाळी ८:५० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
ऑस्ट्रेलिया विरूद्ध श्रीलंका
२ मार्च, स्थळ - मेलबोर्न, वेळ - सकाळी ८:५० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
पहिला अंतिम सामना
४ मार्च, स्थळ - ब्रिस्बेन
दुसरा अंतिम सामना
६ मार्च, स्थळ - अॅडलेड
गरज भासल्यास तिसरा अंतिम सामना खेळवला जाईल.
तिसरा अंतिम सामना
८ मार्च, स्थळ - अॅडलेड
_________________________________________________
भारताबाहेर झालेल्या मागच्या
भारताबाहेर झालेल्या मागच्या दहा मॅचेस मधे झिम्बाब्वे आणि अफगाणिस्तान विरूद्धचे सामने सोडले तर १० मॅचेस मधे ७ पराभव व ३ विजय असे रेकॉर्ड आहे भारताचे.
आता येथेही वयाने जास्त असलेले तीन लोक निवडून त्यांना बसवा म्हणायचे का?
मागच्या एक दोन वर्षांत भारताबाहेर सर्व प्रकारच्या क्रिकेट मधे रेकॉर्ड खराब आहे. त्यातल्या त्यात टेस्ट्स मधे २०११ च्या सुरूवातीपर्यंत चांगले होते (आफ्रिका सिरीजपर्यंत).
>>> भारताबाहेर झालेल्या
>>> भारताबाहेर झालेल्या मागच्या दहा मॅचेस मधे झिम्बाब्वे आणि अफगाणिस्तान विरूद्धचे सामने सोडले तर १० मॅचेस मधे ७ पराभव व ३ विजय असे रेकॉर्ड आहे भारताचे.
हा तिसरा विजय कोणाविरूद्ध आहे आणि कोणत्या वर्षी?
>>> आता येथेही वयाने जास्त असलेले तीन लोक निवडून त्यांना बसवा म्हणायचे का?
४ वर्षांनी परत आलेल्या ४० वर्षीय ब्रॅड हॉगने आपल्या सर्व तरूण गोलंदाजांपेक्षा जास्त चांगली गोलंदाजी केलेली आहे. आपल्या संघातले सर्वात वयस्कर ३ जण बसवायचे असतील तर अनुक्रमे सेहवाग, धोनी व गंभीरचा नंबर लागतो.
<< << झक्कींना सामन्यासाठी
<< << झक्कींना सामन्यासाठी ब्राह्ममुहूर्तावर उठावे लागणार. >> अहो, पण "आता क्रिकेट बघायचे नाही" या त्यांच्या ब्रह्मवाक्याचं काय !!!
"वयस्करांनी निवृत्त व्हावे" हा सल्ला आपल्यासाठी आहे असा गैरसमज करून घेऊन झक्कींनी मायबोलीवरून क्रिकेटसंन्यास घेतलेला दिसतोय.
मास्तुरे
मास्तुरे
एकदाच काय ते निकाल बदलुन
एकदाच काय ते निकाल बदलुन टाका....
आमचे चिंता कमी होइल....
..
एकदाच काय ते निकाल बदलुन
एकदाच काय ते निकाल बदलुन टाका....
आमचे चिंता कमी होइल....
...
काल ट-२० बघण्यासाठी आवेशात
काल ट-२० बघण्यासाठी आवेशात ऑफिसातून लवकर निघालो...अस्सल म्हाराष्ट्रीय पध्द्तीने ढोल्-ताशांनी स्टेडियमबाहेर गाजावाजा केला.....एएनझी स्टेडियम वर काल गर्दीचा उच्चांक नोंदवला गेला होता.. ...पण हाय!! नेहमीप्रमाणे सामना संपल्यावर रिकाम्या 'मनाने' घरी आलो.
आज ऑफिसात क्रिकेटचा विषय न काढता निमूटपणे काम करतोय
उद्याचा दुसरा ट-२० सामना खूप
उद्याचा दुसरा ट-२० सामना खूप चुरशीचा होईल असं वाटतंय. भारत पाठलाग करत असेल तर ऑस्ट्रेलिया ५ किंवा कमी धावांच्या फरकाने जिंकतील. भारताची पहिली फलंदाजी असेल तर ऑस्ट्रेलिया जास्तीत जास्त ३ चेंडू राखून सामना जिंकेल. कदाचित भारताला निसटता विजय मिळण्याची शक्यता सुद्धा नाकारता येईलच असे नाही.
<< कदाचित भारताला निसटता विजय
<< कदाचित भारताला निसटता विजय मिळण्याची शक्यता सुद्धा नाकारता येईलच असे नाही >>मास्तुरेजी , मी असं म्हणणं आतां सोडलं असलं तरीही तुमच्या दुर्दम्य आशावादाला मात्र प्रणाम !
अहो ते उपहासाने म्हणत असावेत.
अहो ते उपहासाने म्हणत असावेत. पण मॅच बघायची खुमखुमी जात नाहि
>>> पण मॅच बघायची खुमखुमी जात
>>> पण मॅच बघायची खुमखुमी जात नाहि
ती खुमखुमी निदान या जन्मी तरी जाणार नाही.
>>> << कदाचित भारताला निसटता विजय मिळण्याची शक्यता सुद्धा नाकारता येईलच असे नाही >>मास्तुरेजी , मी असं म्हणणं आतां सोडलं असलं तरीही तुमच्या दुर्दम्य आशावादाला मात्र प्रणाम !
समहाऊ मला असं वाटतंय की उरलेल्या सामन्यांमध्ये भारताचा खेळ एकदम टर्नअराउंड होईल व कामगिरी एकदम सुधारेल. हा आशावाद पोकळ आहे का ते लवकरच कळेल.
आपला थिंक टँक रिकमं मडकं
आपला थिंक टँक रिकमं मडकं झालेलं आहे... आजच्या टीम मध्ये पण काहीही बदल नाही....
आजची जर मॅच आपण जिंकलो तर या
आजची जर मॅच आपण जिंकलो तर या बीबीवर लिहिणार्या सर्वाना माझ्यातर्फे मिठाई.
आपला थिंक टँक रिकमं मडकं
आपला थिंक टँक रिकमं मडकं झालेलं आहे >> अगदी.. त्या सेहवागला अजूनपण का घेतात ते कळत नाही. आतापण त्यानं कॅच अलमोस्ट टाकलाच होता. धोणी आणि इरफान चं काहीतरी वाकडं आहे बहुतेक... त्याला नुसता फिरायला घेउन जाणार हे लोक...
आज पहिलेंदाच टेरिफिक खेळले.
आज पहिलेंदाच टेरिफिक खेळले. कॉम्पिटिटीव्ह. चक दे!
टार्गेट १३२. हुश्श.. पण
टार्गेट १३२. हुश्श.. पण अजूनही फिंगर्स क्रॉस्ड. आपले वीर असल्या शक्य गोष्टी अशक्य करून दाखवण्यात पटाईत आहेत!
आत्तापुरते तरी खूष होऊन
आत्तापुरते तरी खूष होऊन घेऊया!
नंदिनी, केवळ तुमच्या
नंदिनी, केवळ तुमच्या मिठाईसाठी या वाक्याने हा बाफ सजवतोय!
आ.न.,
-गा.पै.
ताजा कलम : हावरटपणाबद्दल क्षमा असावी!
६६/१ ९ ओव्हर्स. यापुढे
६६/१ ९ ओव्हर्स. यापुढे हरण्याची शक्यता किती? मास्तर चुरशीचा सामना होणार म्हणतोय
आख्ख्या सिरीज मध्ये आज
आख्ख्या सिरीज मध्ये आज पहिल्यांदाच आपण मॅच जिंकू शकू असं वाटतंय...
आज घरी बसुन मॅच
आज घरी बसुन मॅच बघितली.....
लय भीरी
हुश्श! जिंकलो एकदाचे.
हुश्श! जिंकलो एकदाचे. शेवटल्या दहा चेंडूत फक्त सहा धावा? विजय लांबवण्यासाठी पैसे तर घेतले नसतील? उगीच आपली शंका!!
नंदिनी, मिठाई पाहिजे!
नंदिनी, मिठाई पाहिजे!
नंदिनी... मिठाई प्लीज....
नंदिनी... मिठाई प्लीज.... फायनली धापा टाकत का होईना मॅच जिंकलेली आहे..शेवटच्या १ धावे साठी सुद्धा ६ बॉल घालवले ते सुद्धा टी २० मध्ये..
मॅच कशी का होईना जिंकले हे
मॅच कशी का होईना जिंकले हे महत्त्वाचे.
जल्ला मी मिठाई देईन म्हटले की हमखास जिंकतात.
घ्या. सर्वानी तोंड गोड करा.
ठांकु... नंदिनी सरते शेवटी
ठांकु... नंदिनी
सरते शेवटी अटकेपार झेंडा रोविलाच... अभिनंदन!
भारताची पहिली फलंदाजी असेल तर ऑस्ट्रेलिया जास्तीत जास्त ३ चेंडू राखून सामना जिंकेल. >>> मास्तुरे... ऑस्ट्रेलियाने तुमचे भाकीत मनावर घेतले नसले तरी या वेळी गंभीर आणि धोनीने तुमचे ऐकले मात्र.
चला. परदेशातल्या लागोपाठ १७
चला. परदेशातल्या लागोपाठ १७ सामन्यांमध्ये विजय आपल्याला हुलकावणी देत होता. आज १८ व्या सामन्यात जिंकलो एकदाचे.
आजचा सामना चुरशीचा होईल असे वाटले होते. पण कागारूंनी निराशा केली. या सामन्यापासून भारत कात टाकून कामगिरी सुधारेल असेही वाटत होते. आजचा सामना जिंकल्यामुळे ही आशा बळावली आहे.
मास्तुरेजी, अभिनंदन ! तुमची
मास्तुरेजी, अभिनंदन ! तुमची ईच्छाशक्ती जिंकली !!!
धन्यवाद नंदिनी! तुमची मिठाई
धन्यवाद नंदिनी! तुमची मिठाई फारच चविष्ट आहे!
मास्तर fielding बघितली का ?
मास्तर fielding बघितली का ?
Pages