भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा १५ डिसेंबर पासून सुरू होतोय. सचिन, द्रविड व लक्ष्मणचा हा ऑस्ट्रेलियाचा अखेरचाच दौरा आहे. द्रविड या दौर्यानंतर बहुतेक निवृत्त होईल. या दौर्यात भारत एकूण ४ कसोटी सामने, २ T20 सामने व श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया विरूद्ध एकूण चार-चार ५० षटकांचे सामने खेळेल. अंतिम फेरीत आलेले २ संघ एकमेकांविरूद्ध एकूण (जास्तीत जास्त) ३ सामन्यांची मालिका खेळतील.
भारताचा कसोटी संघ असा आहे -
धोनी (कर्णधार व यष्टीरक्षक), सेहवाग, गंभीर, द्रविड, सचिन, लक्ष्मण, कोहली, रोहीत शर्मा, अजिंक्य रहाणे, वृद्धिमान साहा, अश्विन, इशांत शर्मा, उमेश यादव, विनयकुमार, प्रग्यान ओझा, अभिमन्यू मिथुन, झहीर खान
भारताचा ट-२० आणि एकदिवसीय सामन्यांचा संघ असा आहे -
धोनी (कर्णधार व यष्टीरक्षक), सेहवाग, गंभीर, रैना, सचिन, मनोज तिवारी, कोहली, रोहीत शर्मा, रवींद्र जडेजा, पार्थिव पटेल, अश्विन, राहुल शर्मा, उमेश यादव, विनयकुमार, प्रवीणकुमार, इरफान पठाण, झहीर खान
ऑस्ट्रेलियाचा कसोटी संघ असा आहे -
मायकेल क्लार्क (कर्णधार), एड कोवॅन, शॉन मार्श, रिकी पाँटिंग, डेव्हिड वॉर्नर, मायकेल हसी, डॅनियल ख्रिस्तियन, ब्रॅड हॅडिन (यष्टीरक्षक), पीटर सिडल्, जेम्स पॅटिन्सन, बेन हिल्फेनहॉस, मिचेल स्टार्क, नेथन लॉयन
ऑस्ट्रेलियाचा एकदिवसीय संघ असा आहे -
मायकेल क्लार्क (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, रिकी पाँटिंग, पीटर फॉरेस्ट, डॅनिअल ख्रिश्चिअन, डेव्हिड हसी, मायकेल हसी, मॅथ्यू वेड, ब्रेट ली, रायन हॅरिस, मिचेल स्टार्क, झेव्हिअर डोहेट्री, क्लिंट मॅके, मिचेल मार्श
ऑस्ट्रेलियाचा T20 चा संघ असा आहे -
जॉर्ज बेली (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर (उपकर्णधार), ट्रेव्हिस बर्ट, डॅनिअल ख्रिश्चिअन, झेव्हिअर डोहेट्री, जेम्स फॉकनर, एरॉन फिंच, ब्रॅड हॉग, डेव्हिड हसी, ब्रेट ली, मिशेल मार्श, शॉन मार्श, क्लिंट मॅके, मॅथ्यू वेड (यष्टीरक्षक)
श्रीलंकेचा एकदिवसीय संघ असा आहे -
जयवर्धने (कर्णधार), अॅन्जेलो मॅथ्यूज (उपकर्णधार), उपुल थरंगा, तिलकरत्ने दिलशान, कुमार संगक्कारा (यष्टीरक्षक), दिनेश चंडिमाल (यष्टीरक्षक), लाहिरू थिरिमान्ने, थिसारा पेरेरा, फरवीज महारूफ, रंगना हेराथ, सचित्र सेनानायके, लसिथ मलिंगा, नुवान कुलसेकरा, चनका वेलेगेदेरा, धम्मिका प्रसाद, थिलान समरवीरा (अजून समावेश नक्की नाही)
_________________________________________________
हा आहे दौर्याचा कार्यक्रम -
ऑस्ट्रेलिया अध्यक्षीय संघ वि भारत
१५-१६ डिसेंबर; स्थळ - कॅनबेरा, वेळ - सकाळी ५:३० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: अनिर्णित (धावफलक इथे आहे)
ऑस्ट्रेलिया अध्यक्षीय संघ वि भारत
१९-२१ डिसेंबर; स्थळ - कॅनबेरा, वेळ - सकाळी ५:३० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: अनिर्णित (धावफलक इथे आहे)
_________________________________________________
पहिला कसोटी सामना -
२६-३० डिसेंबर, स्थळ - मेलबोर्न, वेळ - सकाळी ५:०० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: ऑस्ट्रेलिया विजयी (धावफलक इथे आहे)
दुसरा कसोटी सामना -
३-७ जानेवारी, स्थळ - सिडने, वेळ - सकाळी ५:०० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: ऑस्ट्रेलिया एक डाव राखून विजयी (धावफलक इथे आहे)
तिसरा कसोटी सामना -
१३-१७ जानेवारी, स्थळ - पर्थ, वेळ - सकाळी ८:०० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: ऑस्ट्रेलिया एक डाव राखून विजयी (धावफलक इथे आहे)
चौथा कसोटी सामना -
२४-२८ जानेवारी, स्थळ - अॅडलेड, वेळ - सकाळी ५:३० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: ऑस्ट्रेलिया २९८ धावांनी विजयी (धावफलक इथे आहे)
मालिकावीर : मायकेल क्लार्क
ऑस्ट्रेलियाने मालिका ४-० अशी जिंकली.
_________________________________________________
पहिला T20 सामना -
१ फेब्रुवारी, स्थळ - सिडने, वेळ - दुपारी २:०५ पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: ऑस्ट्रेलिया ३१ धावांनी विजयी (धावफलक इथे आहे)
दुसरा T20 सामना -
३ फेब्रुवारी, स्थळ - मेलबोर्न, वेळ - दुपारी २:०५ पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: भारत ८ गडी व २ चेंडू राखून विजयी (धावफलक इथे आहे)
मालिका निर्णय: १-१ अशी बरोबरी
_________________________________________________
सर्व एकदिवसीय सामने दिवस-रात्र असे खेळले जातील.
पहिला एकदिवसीय सामना - विरूद्ध ऑस्ट्रेलिया
५ फेब्रुवारी, स्थळ - मेलबोर्न, वेळ - सकाळी ८:५० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: ऑस्ट्रेलिया ६५ धावांनी विजयी (धावफलक इथे आहे)
गुण - ऑस्ट्रेलिया ५, भारत 0
दुसरा एकदिवसीय सामना - विरूद्ध श्रीलंका
८ फेब्रुवारी, स्थळ - पर्थ, वेळ - सकाळी ९:५० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: भारत ४ गडी राखून विजयी (धावफलक इथे आहे)
गुण - श्रीलंका 0, भारत ४
आतापर्यंतचे एकूण गुण : ऑस्ट्रेलिया ५, भारत ४, श्रीलंका 0
ऑस्ट्रेलिया विरूद्ध श्रीलंका
१० फेब्रुवारी, स्थळ - पर्थ, वेळ - सकाळी ९:५० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: ऑस्ट्रेलिया ५ धावांनी विजयी (धावफलक इथे आहे)
गुण - श्रीलंका 0, ऑस्ट्रेलिया ४
आतापर्यंतचे एकूण गुण : ऑस्ट्रेलिया ९, भारत ४, श्रीलंका 0
तिसरा एकदिवसीय सामना - विरूद्ध ऑस्ट्रेलिया
१२ फेब्रुवारी, स्थळ - अॅडलेड, वेळ - सकाळी ८:५० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: भारत २ चेंडू राखून विजयी (धावफलक इथे आहे)
गुण - भारत ४, ऑस्ट्रेलिया 0
आतापर्यंतचे एकूण गुण : ऑस्ट्रेलिया ९, भारत ८, श्रीलंका 0
चौथा एकदिवसीय सामना - विरूद्ध श्रीलंका
१४ फेब्रुवारी, स्थळ - अॅडलेड, वेळ - सकाळी ८:५० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: बरोबरी (धावफलक इथे आहे)
गुण - भारत २, श्रीलंका २
आतापर्यंतचे एकूण गुण : ऑस्ट्रेलिया ९, भारत १०, श्रीलंका २
ऑस्ट्रेलिया विरूद्ध श्रीलंका
१७ फेब्रुवारी, स्थळ - सिडने, वेळ - सकाळी ८:५० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: श्रीलंका ८ गडी राखून विजयी (धावफलक इथे आहे)
गुण - ऑस्ट्रेलिया 0, श्रीलंका ५
आतापर्यंतचे एकूण गुण : ऑस्ट्रेलिया ९, भारत १०, श्रीलंका ७
आतापर्यंतची निव्वळ धावगती : ऑस्ट्रेलिया -0.११६, भारत -0.२४५, श्रीलंका +0.३२३
पाचवा एकदिवसीय सामना - विरूद्ध ऑस्ट्रेलिया
१९ फेब्रुवारी, स्थळ - ब्रिस्बेन, वेळ - सकाळी ८:५० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: ऑस्ट्रेलिया ११० धावांनी राखून विजयी (धावफलक इथे आहे)
गुण - ऑस्ट्रेलिया ५, भारत 0
आतापर्यंतचे एकूण गुण : ऑस्ट्रेलिया १४, भारत १०, श्रीलंका ७
आतापर्यंतची निव्वळ धावगती : ऑस्ट्रेलिया +0.४३३, भारत -0.६७२, श्रीलंका +0.३२३
सहावा एकदिवसीय सामना - विरूद्ध श्रीलंका
२१ फेब्रुवारी, स्थळ - ब्रिस्बेन, वेळ - सकाळी ८:५० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: श्रीलंका ५१ धावांनी विजयी (धावफलक इथे आहे)
गुण - श्रीलंका ४, भारत 0
आतापर्यंतचे एकूण गुण : ऑस्ट्रेलिया १४, भारत १०, श्रीलंका ११
आतापर्यंतची निव्वळ धावगती : ऑस्ट्रेलिया +0.४३३, भारत -0.७३३, श्रीलंका +0.४८१
ऑस्ट्रेलिया विरूद्ध श्रीलंका
२४ फेब्रुवारी, स्थळ - होबार्ट, वेळ - सकाळी ८:५० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: श्रीलंका ३ गडी राखून विजयी (धावफलक इथे आहे)
गुण - श्रीलंका ४, ऑस्ट्रेलिया 0
आतापर्यंतचे एकूण गुण : ऑस्ट्रेलिया १४, भारत १०, श्रीलंका १५
आतापर्यंतची निव्वळ धावगती : ऑस्ट्रेलिया +0.३१८, भारत -0.७३३, श्रीलंका +0.४२६
सातवा एकदिवसीय सामना - विरूद्ध ऑस्ट्रेलिया
२६ फेब्रुवारी, स्थळ - सिडने, वेळ - सकाळी ८:५० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
आठवा एकदिवसीय सामना - विरूद्ध श्रीलंका
२८ फेब्रुवारी, स्थळ - होबार्ट, वेळ - सकाळी ८:५० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
ऑस्ट्रेलिया विरूद्ध श्रीलंका
२ मार्च, स्थळ - मेलबोर्न, वेळ - सकाळी ८:५० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
पहिला अंतिम सामना
४ मार्च, स्थळ - ब्रिस्बेन
दुसरा अंतिम सामना
६ मार्च, स्थळ - अॅडलेड
गरज भासल्यास तिसरा अंतिम सामना खेळवला जाईल.
तिसरा अंतिम सामना
८ मार्च, स्थळ - अॅडलेड
_________________________________________________
मास्तुरेजी, १९६७ ची गोष्ट
मास्तुरेजी, १९६७ ची गोष्ट ४३वर्षांपूर्वीची आहे; तोपर्यंतच्या काळात आपण एक लिंबूटींबू संघच होतो व सामना अनिर्णित ठेवला किंवा एखाद्या खेळाडूची व्यक्तीगत भरीव कामगिरी झाली याचंच आपल्याला कौतुक वाटायचं. आतां संघ जिंकावा , निदान बलाढ्य संघांशी तो तुल्यबळ ठरावा, ही रास्त अपेक्षा असते व म्हणूनच तसं न झाल्यास तीव्र प्रतिक्रिया उमटते. लागोपाठ परदेशांत मालिका हरण्याची ही पहिली वेळ नसली तरी अशी वेळ आतांही कां यावी, हा खरा प्रश्न आहे !
हा खरा प्रश्न आहे ! फक्त
हा खरा प्रश्न आहे !
फक्त तुम्हा आम्हाला नि इथल्या थोड्या जणांना. खराब दर्जा असला तरी भाराभर पैसे देऊन खेळ बघायला जाणारे लक्षावधी लोक आहेत म्हणून बिसिसिआय खेळाडूंना पैसे देणारच. नि असेच चक्र चालू रहाणार.
मागे दुसर्या एका धाग्यावर कुणि तरी लिहीले होते की सगळे जग जरी चीनकडून माल घेत असला तरी चिनी मालाचा अमेरिकेतला दर्जा नि त्याच मालाचा भारतातील दर्जा यात खूप फरक असतो. कारण उघड आहे, कमी दर्जाचा मालच काय, भारतीय लोक कचरा सुद्धा घेतात नि चीनचे काय जाते, ते तुम्हाला कचरा सुद्धा विकतील.
क्रिकेट तरी याला कशाला अपवाद असेल?
हा एक चांगला ब्लॉग वाचला
हा एक चांगला ब्लॉग वाचला सध्याच्या परफॉर्मन्स बद्दल.
http://sidveeblogs.wordpress.com/2012/01/16/sydney-to-sydney-perth-to-pe...
http://www.youtube.com/watch?
http://www.youtube.com/watch?v=fzATDsXBPDo&feature=related
>>> मास्तुरेजी, १९६७ ची गोष्ट
>>> मास्तुरेजी, १९६७ ची गोष्ट ४३वर्षांपूर्वीची आहे;
मायबोलीवरील भाऊ, चिमण, झक्की इ. क्रिकेटप्रेमी पितामहांना ही मालिका (व १९५८-५९ मधली मालिका देखील) नक्की आठवत असणार असा माझा अंदाज होता.
एक उत्कृष्ट लेख -
http://www.thehindu.com/opinion/lead/article2806156.ece
उद्यापासून सुरू होणार्या ४
उद्यापासून सुरू होणार्या ४ थ्या कसोटीत तरी भारताने लाज राखावी.
उद्याच्या कसोटीसाठी भारतीय
उद्याच्या कसोटीसाठी भारतीय संघाला मनःपूर्वक शुभेच्छा !
भाउ, छान. हे असले
भाउ, छान.
हे असले बोलणार्यांना काय कळते, का बघावे लागते ते! अहो, जेवायला येणार नाही एक वेळ, पण सामना सुरु असताना बघायचे थांबवणार नाही!! ऐ कम्बख्त, तूने देखाहि नही!!
मी म्हणूनच टीव्ही वर पहाण्या ऐवजी पीसी वर बघतो. नि सक्काळी बघण्या ऐवजी रात्री बघतो.
ऑसीज -९८-३. पण पाँटींग व
ऑसीज -९८-३. पण पाँटींग व क्लार्क जोडी जमतेय. डेंजर !
भारताचे परत एकदा "ये रे
भारताचे परत एकदा "ये रे माझ्या मागल्या"
चांगल्या सुरुवातीनंतर माती खातायत
२१४- ३. पाँटींग शतकाच्या
२१४- ३. पाँटींग शतकाच्या उंबरठ्यावर. आज ऑसीजनी यादवला ठरवून लक्ष्य केलं असावं; ९ षटकात विकेट न मिळतां ६९ धांवा !
<< भारताचे परत एकदा "ये रे माझ्या मागल्या" >> उगीच कां वरच्या व्यंचितल्या आजीबाई इतक्या काँफिडन्टली टीव्ही न बघतां स्कोअर सांगीन म्हणताहेत !!
पाँटींगचं शतक ! उद्दामपणा
पाँटींगचं शतक ! उद्दामपणा सोडला तर एक क्रिकेटर म्हणून पाँटींगला सलाम केलाच पाहिजे !! त्याची तंत्रशुद्ध, शैलीदार फलंदाजी, तंदुरुस्ती, क्षेत्ररक्षणातील एकाग्रता, डेडिकेशन व चापल्य हें सर्व आदर्शवत आहे !!! "पाँटींग संपला " याला सचिनसारखंच त्याने बॅटनेच उत्तर दिलंय !!!! त्या उत्तराने आपल्यापुढे मात्र मोठ्ठं प्रश्नचिन्ह उभं केलंय, हें आहेच.
क्लार्कचंही शतक ! २९३-३
क्लार्कचंही शतक ! २९३-३ !!
खरंच काय चाललंय हें ऑस्ट्रेलियात ? Are we really so bad, so consistently ! Difiicult to digest !!! कांही तरी भयानक चुकतंय, कांही तरी आमुलाग्र बदलायला हवंय !!!
ऑस्ट्रेलिया - ३३२-३
ऑस्ट्रेलिया - ३३२-३ !
माझ्याशिवाय कुणीही इथं फिरकायलाही बघत नाही; त्याअर्थी, << कांही तरी भयानक चुकतंय, कांही तरी आमुलाग्र बदलायला हवंय >> हें मलाच लागू होतंय असं वाटतंय !!
भाऊ, मस्त चित्र
भाऊ, मस्त चित्र
>>> पाँटींगचं शतक ! उद्दामपणा
>>> पाँटींगचं शतक ! उद्दामपणा सोडला तर एक क्रिकेटर म्हणून पाँटींगला सलाम केलाच पाहिजे !! त्याची तंत्रशुद्ध, शैलीदार फलंदाजी, तंदुरुस्ती, क्षेत्ररक्षणातील एकाग्रता, डेडिकेशन व चापल्य हें सर्व आदर्शवत आहे !!!
अनुमोदन! पाँटींग पुल मारताना एका पायाच्या टाचेवर गोल फिरतो, तो शॉट अतिशय प्रेक्षणीय असतो.
असो. चांगल्या सुरवातीनंतर आज पुन्हा एकदा वाट लागली आहे. झहीर आणि अश्विन क्षेत्ररक्षण करताना चेंडू शेजारून जात असला तरी वाकून किंवा सूर मारून तो अडवायचा अजिबात प्रयत्न न करता थेट चेंडूच्या मागे धावायला लागतात, हे दयनीय दृश्य आज अनेकवेळा दिसले. आणि हे म्हणे तरूण रक्त आणि यांच्यासाठी म्हणे वयस्करांना निवृत्त करा.
(No subject)
भारत-ऑस्ट्रेलिया-श्रीलंका या
भारत-ऑस्ट्रेलिया-श्रीलंका या तिरंगी एकदिवसीय मालिकेसाठी श्रीलंकेने संघ जाहीर केला आहे (नावे वर दिली आहेत). दिलशानने कर्णधारपदाचा राजीनामा दिल्यामुळे महिला जयवर्धने पुन्हा एकदा कर्णधार झाला आहे. नुकत्याच संपलेल्या द. आफ्रिकेविरूद्धच्या ५ एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत आफ्रिकेने पहिले ३ सामने जिंकले, पण श्रीलंकेने उर्वरीत २ सामने ३०० पेक्षा अधिक धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करून जिंकले. त्यामुळे श्रीलंका परत उभारी धरू लागला आहे असे दिसत आहे.
भारताविरूद्धच्या २ ट-२० सामन्यांसाठी ऑस्ट्रेलियाने देखील आपला संघ जाहीर केला आहे (नावे वर दिली आहेत). आधीचा कर्णधार कॅमेरॉन व्हाईटची संघातून हकालपट्टी करण्यात आली असून, जॉर्ज बेली नवीन कर्णधार आहे. आश्चर्य म्हणजे, २००८ मध्ये निवृत्त झालेल्या व नंतर गेली ३-४ वर्षे क्रिकेट समालोचन करणार्या ब्रॅड हॉगला संघात घेण्यात आले आहे.
>>आश्चर्य म्हणजे, २००८ मध्ये
>>आश्चर्य म्हणजे, २००८ मध्ये निवृत्त झालेल्या व नंतर गेली ३-४ वर्षे क्रिकेट समालोचन करणार्या ब्रॅड हॉगला संघात घेण्यात आले आहे.
आश्चर्य काही नाही. ऐन फॉर्मात असलेल्या खेळाडूंना २०-२० मधे वाया घालवणे आपल्याला छान जमते. तेच ऑस्ट्रेलियाने उलट करुन दाखवले आहे......निवृत्त झालेल्या खेळाडूंना खेळवून उमद्यांना आराम दिलाय.
Are we really so bad, so
Are we really so bad, so consistently ! Difiicult to digest !!! कांही तरी भयानक चुकतंय, कांही तरी आमुलाग्र बदलायला हवंय >>
दुसर्या कसोटीपासून हेच तर मी पण म्हणतोय. (अन मास्तुरे पण)
>> झहीर आणि अश्विन
>> झहीर आणि अश्विन क्षेत्ररक्षण करताना चेंडू शेजारून जात असला तरी वाकून किंवा सूर मारून तो अडवायचा अजिबात प्रयत्न न करता थेट चेंडूच्या मागे धावायला लागतात, हे दयनीय दृश्य आज अनेकवेळा दिसले.
आरे मास्तरा, चेंडू टिव्हीवर जवळून जातात असं दिसतं!
आरे मास्तरा, चेंडू टिव्हीवर
आरे मास्तरा, चेंडू टिव्हीवर जवळून जातात असं दिसतं!
त्याची तंत्रशुद्ध, शैलीदार फलंदाजी, तंदुरुस्ती,
हे सर्व पहायला काल खरेच छान वाटले. तसा क्लार्कहि छान खेळला. कुणि बाद होतील अशी पुसटशी सुद्धा शंका आली नाही. बेसबॉलवाल्यांनी बघितले असते तर म्हणाले असते हा खेळ संपणार तरी केंव्हा, कितीही होमरन मारून परत तोच माणुस फलंदाजी करतोय! मग बाकीच्या लोकांना कधी फलंदाजी मिळणार? नि इतक्या धावा काढल्या तरी त्याच गोलंदाजाला अजून कशाला ठेवले आहे? हाकलून द्या त्याला नि दुसरे आणा की बुलपेन मधून!!
<< मग बाकीच्या लोकांना कधी
<< मग बाकीच्या लोकांना कधी फलंदाजी मिळणार? >> सध्यातरी आपले फलंदाज हाच विचार मनात पक्का रुजवून मैदानावर जातात असं वाटतंय !!!
<< दुसर्या कसोटीपासून हेच तर मी पण म्हणतोय. (अन मास्तुरे पण) >> माझी 'ट्यूब लाईट' जरा उशीराच पेटते, इतकंच !!!
अहो भाऊ, क्रिकेटवर व भारतावर
अहो भाऊ, क्रिकेटवर व भारतावर अतीव प्रेम असल्याने त्याचा अडथळा होतो, म्हणून ट्यूब पेटायला उशीर लागत असेल, पण एकदा पेटली की काय विचारता महाराजा, सगळीकडे लखलखीत प्रकाश!
इथले सध्या जोरात असलेले एक रिपब्लिकन म्हणाले की माझे देशावर अतोनात प्रेम आहे, त्यामुळेच माझे विवाह बाह्य संबंध झाले!
मग काय विचार आहे, उग्गीच तुमच्या क्रिकेट प्रेमाचा अनादर करणार्या व्यक्तीला जरा धडा शिकवा!!
<< माझे देशावर अतोनात प्रेम
<< माझे देशावर अतोनात प्रेम आहे, त्यामुळेच माझे विवाह बाह्य संबंध झाले! >> झक्कीजी, तुमच्या त्या 'प्रेमळ' रिपब्लिकनला म्हणावं नुसतं ' विवाहबाह्य ' काय घेऊन बसलात, भारतात तर देशावर अतोनात प्रेम असणारे नेते सगळंच 'नियमबाह्य' करत असतात !!

<< उग्गीच तुमच्या क्रिकेट प्रेमाचा अनादर करणार्या व्यक्तीला जरा धडा शिकवा!! >> अशा सर्व व्यक्ती सध्यां ऑस्ट्रेलियात आहेत !
पाँटींगचं शतक ! उद्दामपणा
पाँटींगचं शतक ! उद्दामपणा सोडला तर एक क्रिकेटर म्हणून पाँटींगला सलाम केलाच पाहिजे !! त्याची तंत्रशुद्ध, शैलीदार फलंदाजी, तंदुरुस्ती, क्षेत्ररक्षणातील एकाग्रता, डेडिकेशन व चापल्य हें सर्व आदर्शवत आहे !!! >> पहिले विशेषण वगळता अनुमोदन.
Are we really so bad, so consistently ! Difiicult to digest !!! कांही तरी भयानक चुकतंय, कांही तरी आमुलाग्र बदलायला हवंय>> अहो तुम्हाला नि आम्हाला वाटून काय उपयोग, ज्यांना वाटायला हवे त्यांना वाटत नाहि तोवर काय उपयोग. भारतामधे rank turner बनवून खेळण्याबाबत आपले काय मत ?
उग्गीच तुमच्या क्रिकेट
उग्गीच तुमच्या क्रिकेट प्रेमाचा अनादर करणार्या व्यक्तीला जरा धडा शिकवा!! >> अशा सर्व व्यक्ती सध्यां ऑस्ट्रेलियात आहेत>>>
<< भारतामधे rank turner बनवून
<< भारतामधे rank turner बनवून खेळण्याबाबत आपले काय मत ? >> मला वाटतं इथंच, हल्लीच याबाबत भरपूर मतप्रदर्शन झालं आहे. [ माझंच मत हवं असेल तर माझ्या इथल्याच दि. १५ व १६ जानेवारीच्या पोस्ट वाचाव्यात; शिवाय "क्रिकेट-२" वरचं माझं हे मत -
<< आपल्या सर्व खेळपट्ट्या फिरकीला अनुकूल केल्या तर सर्व सामने आपण जिंकू. >> कदाचित असंही घडूं शकतं- १] आतां आपल्याकडे इतरांपेक्षां फार भेदक फिरकी गोलंदाजही नाहीत व आपल्या फलंदाजांकडेही फिरकी खेळण्याचं पूर्वीसारखं शैलीदार तंत्रही राहिलं नाही, त्यामुळे आपण इथंही मार खाऊं व २] बाहेरच्या देशांत सडकून मार खायला आपल्या खेळाडूना ही आयतीच सबब मिळेल !!! ].
इशांतबद्दल एक चांगले
इशांतबद्दल एक चांगले article
http://www.espncricinfo.com/australia-v-india-2011/content/current/story...
>>> आरे मास्तरा, चेंडू
>>> आरे मास्तरा, चेंडू टिव्हीवर जवळून जातात असं दिसतं!
अरे, ते फटके नंतर २-३ वेगवेगळ्या कोनातून दाखवले त्यावेळी ते फटके दोघांच्या पायापासून ३-४ फुटांवरून गेलेले दिसत होते. पण हे दोघे पठ्ठे अजिबात कंबरेत वाकायला किंवा सूर मारून अडवायला तयार नाहीत. कंबरेचे प्रॉब्लेम असतील तर रोज नाश्त्याला डिंकाचे लाडू, अळीवाचे लाडू इ. पौष्टीक आहार घ्या पण खाली वाकून चेंडू अडवा एवढीच माफक अपेक्षा आहे.
अर्थात झहीरला ह्या प्रकाराबद्दल माफी करता येण्यासारखी आहे (कारण तो "मोडेन पण वाकणार नाही" या बाण्याचा आहे), पण अश्विन सुद्धा त्याच्यासारखाच आळशी ! ! ! !
Pages