भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा १५ डिसेंबर पासून सुरू होतोय. सचिन, द्रविड व लक्ष्मणचा हा ऑस्ट्रेलियाचा अखेरचाच दौरा आहे. द्रविड या दौर्यानंतर बहुतेक निवृत्त होईल. या दौर्यात भारत एकूण ४ कसोटी सामने, २ T20 सामने व श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया विरूद्ध एकूण चार-चार ५० षटकांचे सामने खेळेल. अंतिम फेरीत आलेले २ संघ एकमेकांविरूद्ध एकूण (जास्तीत जास्त) ३ सामन्यांची मालिका खेळतील.
भारताचा कसोटी संघ असा आहे -
धोनी (कर्णधार व यष्टीरक्षक), सेहवाग, गंभीर, द्रविड, सचिन, लक्ष्मण, कोहली, रोहीत शर्मा, अजिंक्य रहाणे, वृद्धिमान साहा, अश्विन, इशांत शर्मा, उमेश यादव, विनयकुमार, प्रग्यान ओझा, अभिमन्यू मिथुन, झहीर खान
भारताचा ट-२० आणि एकदिवसीय सामन्यांचा संघ असा आहे -
धोनी (कर्णधार व यष्टीरक्षक), सेहवाग, गंभीर, रैना, सचिन, मनोज तिवारी, कोहली, रोहीत शर्मा, रवींद्र जडेजा, पार्थिव पटेल, अश्विन, राहुल शर्मा, उमेश यादव, विनयकुमार, प्रवीणकुमार, इरफान पठाण, झहीर खान
ऑस्ट्रेलियाचा कसोटी संघ असा आहे -
मायकेल क्लार्क (कर्णधार), एड कोवॅन, शॉन मार्श, रिकी पाँटिंग, डेव्हिड वॉर्नर, मायकेल हसी, डॅनियल ख्रिस्तियन, ब्रॅड हॅडिन (यष्टीरक्षक), पीटर सिडल्, जेम्स पॅटिन्सन, बेन हिल्फेनहॉस, मिचेल स्टार्क, नेथन लॉयन
ऑस्ट्रेलियाचा एकदिवसीय संघ असा आहे -
मायकेल क्लार्क (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, रिकी पाँटिंग, पीटर फॉरेस्ट, डॅनिअल ख्रिश्चिअन, डेव्हिड हसी, मायकेल हसी, मॅथ्यू वेड, ब्रेट ली, रायन हॅरिस, मिचेल स्टार्क, झेव्हिअर डोहेट्री, क्लिंट मॅके, मिचेल मार्श
ऑस्ट्रेलियाचा T20 चा संघ असा आहे -
जॉर्ज बेली (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर (उपकर्णधार), ट्रेव्हिस बर्ट, डॅनिअल ख्रिश्चिअन, झेव्हिअर डोहेट्री, जेम्स फॉकनर, एरॉन फिंच, ब्रॅड हॉग, डेव्हिड हसी, ब्रेट ली, मिशेल मार्श, शॉन मार्श, क्लिंट मॅके, मॅथ्यू वेड (यष्टीरक्षक)
श्रीलंकेचा एकदिवसीय संघ असा आहे -
जयवर्धने (कर्णधार), अॅन्जेलो मॅथ्यूज (उपकर्णधार), उपुल थरंगा, तिलकरत्ने दिलशान, कुमार संगक्कारा (यष्टीरक्षक), दिनेश चंडिमाल (यष्टीरक्षक), लाहिरू थिरिमान्ने, थिसारा पेरेरा, फरवीज महारूफ, रंगना हेराथ, सचित्र सेनानायके, लसिथ मलिंगा, नुवान कुलसेकरा, चनका वेलेगेदेरा, धम्मिका प्रसाद, थिलान समरवीरा (अजून समावेश नक्की नाही)
_________________________________________________
हा आहे दौर्याचा कार्यक्रम -
ऑस्ट्रेलिया अध्यक्षीय संघ वि भारत
१५-१६ डिसेंबर; स्थळ - कॅनबेरा, वेळ - सकाळी ५:३० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: अनिर्णित (धावफलक इथे आहे)
ऑस्ट्रेलिया अध्यक्षीय संघ वि भारत
१९-२१ डिसेंबर; स्थळ - कॅनबेरा, वेळ - सकाळी ५:३० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: अनिर्णित (धावफलक इथे आहे)
_________________________________________________
पहिला कसोटी सामना -
२६-३० डिसेंबर, स्थळ - मेलबोर्न, वेळ - सकाळी ५:०० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: ऑस्ट्रेलिया विजयी (धावफलक इथे आहे)
दुसरा कसोटी सामना -
३-७ जानेवारी, स्थळ - सिडने, वेळ - सकाळी ५:०० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: ऑस्ट्रेलिया एक डाव राखून विजयी (धावफलक इथे आहे)
तिसरा कसोटी सामना -
१३-१७ जानेवारी, स्थळ - पर्थ, वेळ - सकाळी ८:०० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: ऑस्ट्रेलिया एक डाव राखून विजयी (धावफलक इथे आहे)
चौथा कसोटी सामना -
२४-२८ जानेवारी, स्थळ - अॅडलेड, वेळ - सकाळी ५:३० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: ऑस्ट्रेलिया २९८ धावांनी विजयी (धावफलक इथे आहे)
मालिकावीर : मायकेल क्लार्क
ऑस्ट्रेलियाने मालिका ४-० अशी जिंकली.
_________________________________________________
पहिला T20 सामना -
१ फेब्रुवारी, स्थळ - सिडने, वेळ - दुपारी २:०५ पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: ऑस्ट्रेलिया ३१ धावांनी विजयी (धावफलक इथे आहे)
दुसरा T20 सामना -
३ फेब्रुवारी, स्थळ - मेलबोर्न, वेळ - दुपारी २:०५ पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: भारत ८ गडी व २ चेंडू राखून विजयी (धावफलक इथे आहे)
मालिका निर्णय: १-१ अशी बरोबरी
_________________________________________________
सर्व एकदिवसीय सामने दिवस-रात्र असे खेळले जातील.
पहिला एकदिवसीय सामना - विरूद्ध ऑस्ट्रेलिया
५ फेब्रुवारी, स्थळ - मेलबोर्न, वेळ - सकाळी ८:५० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: ऑस्ट्रेलिया ६५ धावांनी विजयी (धावफलक इथे आहे)
गुण - ऑस्ट्रेलिया ५, भारत 0
दुसरा एकदिवसीय सामना - विरूद्ध श्रीलंका
८ फेब्रुवारी, स्थळ - पर्थ, वेळ - सकाळी ९:५० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: भारत ४ गडी राखून विजयी (धावफलक इथे आहे)
गुण - श्रीलंका 0, भारत ४
आतापर्यंतचे एकूण गुण : ऑस्ट्रेलिया ५, भारत ४, श्रीलंका 0
ऑस्ट्रेलिया विरूद्ध श्रीलंका
१० फेब्रुवारी, स्थळ - पर्थ, वेळ - सकाळी ९:५० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: ऑस्ट्रेलिया ५ धावांनी विजयी (धावफलक इथे आहे)
गुण - श्रीलंका 0, ऑस्ट्रेलिया ४
आतापर्यंतचे एकूण गुण : ऑस्ट्रेलिया ९, भारत ४, श्रीलंका 0
तिसरा एकदिवसीय सामना - विरूद्ध ऑस्ट्रेलिया
१२ फेब्रुवारी, स्थळ - अॅडलेड, वेळ - सकाळी ८:५० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: भारत २ चेंडू राखून विजयी (धावफलक इथे आहे)
गुण - भारत ४, ऑस्ट्रेलिया 0
आतापर्यंतचे एकूण गुण : ऑस्ट्रेलिया ९, भारत ८, श्रीलंका 0
चौथा एकदिवसीय सामना - विरूद्ध श्रीलंका
१४ फेब्रुवारी, स्थळ - अॅडलेड, वेळ - सकाळी ८:५० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: बरोबरी (धावफलक इथे आहे)
गुण - भारत २, श्रीलंका २
आतापर्यंतचे एकूण गुण : ऑस्ट्रेलिया ९, भारत १०, श्रीलंका २
ऑस्ट्रेलिया विरूद्ध श्रीलंका
१७ फेब्रुवारी, स्थळ - सिडने, वेळ - सकाळी ८:५० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: श्रीलंका ८ गडी राखून विजयी (धावफलक इथे आहे)
गुण - ऑस्ट्रेलिया 0, श्रीलंका ५
आतापर्यंतचे एकूण गुण : ऑस्ट्रेलिया ९, भारत १०, श्रीलंका ७
आतापर्यंतची निव्वळ धावगती : ऑस्ट्रेलिया -0.११६, भारत -0.२४५, श्रीलंका +0.३२३
पाचवा एकदिवसीय सामना - विरूद्ध ऑस्ट्रेलिया
१९ फेब्रुवारी, स्थळ - ब्रिस्बेन, वेळ - सकाळी ८:५० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: ऑस्ट्रेलिया ११० धावांनी राखून विजयी (धावफलक इथे आहे)
गुण - ऑस्ट्रेलिया ५, भारत 0
आतापर्यंतचे एकूण गुण : ऑस्ट्रेलिया १४, भारत १०, श्रीलंका ७
आतापर्यंतची निव्वळ धावगती : ऑस्ट्रेलिया +0.४३३, भारत -0.६७२, श्रीलंका +0.३२३
सहावा एकदिवसीय सामना - विरूद्ध श्रीलंका
२१ फेब्रुवारी, स्थळ - ब्रिस्बेन, वेळ - सकाळी ८:५० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: श्रीलंका ५१ धावांनी विजयी (धावफलक इथे आहे)
गुण - श्रीलंका ४, भारत 0
आतापर्यंतचे एकूण गुण : ऑस्ट्रेलिया १४, भारत १०, श्रीलंका ११
आतापर्यंतची निव्वळ धावगती : ऑस्ट्रेलिया +0.४३३, भारत -0.७३३, श्रीलंका +0.४८१
ऑस्ट्रेलिया विरूद्ध श्रीलंका
२४ फेब्रुवारी, स्थळ - होबार्ट, वेळ - सकाळी ८:५० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: श्रीलंका ३ गडी राखून विजयी (धावफलक इथे आहे)
गुण - श्रीलंका ४, ऑस्ट्रेलिया 0
आतापर्यंतचे एकूण गुण : ऑस्ट्रेलिया १४, भारत १०, श्रीलंका १५
आतापर्यंतची निव्वळ धावगती : ऑस्ट्रेलिया +0.३१८, भारत -0.७३३, श्रीलंका +0.४२६
सातवा एकदिवसीय सामना - विरूद्ध ऑस्ट्रेलिया
२६ फेब्रुवारी, स्थळ - सिडने, वेळ - सकाळी ८:५० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
आठवा एकदिवसीय सामना - विरूद्ध श्रीलंका
२८ फेब्रुवारी, स्थळ - होबार्ट, वेळ - सकाळी ८:५० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
ऑस्ट्रेलिया विरूद्ध श्रीलंका
२ मार्च, स्थळ - मेलबोर्न, वेळ - सकाळी ८:५० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
पहिला अंतिम सामना
४ मार्च, स्थळ - ब्रिस्बेन
दुसरा अंतिम सामना
६ मार्च, स्थळ - अॅडलेड
गरज भासल्यास तिसरा अंतिम सामना खेळवला जाईल.
तिसरा अंतिम सामना
८ मार्च, स्थळ - अॅडलेड
_________________________________________________
परत एकदा सेंच्युरी हुकली..
परत एकदा सेंच्युरी हुकली..
कोणीतरी काहीतरी दिलासा द्या
कोणीतरी काहीतरी दिलासा द्या हो! सचिनचे हे असे किती काळ चालणार? प्रत्येक वेळी आशा ..निराशा!
अगदी अगदी वैताग आला!
तो 'चीकी' खेळायला लागला
तो 'चीकी' खेळायला लागला तेव्हाच शंका आली की आउट होणार. थोडा पेशन्स हवा होता - त्यांच्याकडे फक्त एकच स्लो बोलर आहे. पुन्हा फास्ट बोलर्स आलेच असते आणि त्यांना तो जबरी खेळत होता आज. स्लो बोलर्सही व्यवस्थित खेळत होता, फक्त फार शॉट्स मारता येत नव्हते, त्यामुळे वेगळे काहीतरी करायला गेला. नाहीतर आज १०० नक्की होते.
त्याची सेंचुरी या वनडे
त्याची सेंचुरी या वनडे सिरीजमधेच होणार! नाही झाली तर त्याच्या दोन हाफ सेंचुरीज एका सेंचुरी बरोबर धरल्या जातील, हुकुमावरून!
२३४ काढताना पण फेफरं भरणार
२३४ काढताना पण फेफरं भरणार आहेत आता... रैना आणि धोनीने निवांत विकेट्स टाकल्या..
अगदी खेळायला बोअर झाल्यासारखे
अगदी खेळायला बोअर झाल्यासारखे विकेट्स फेकत आहेत एकेक नग.
फिर वही पुरानी दास्तान याद आ
फिर वही पुरानी दास्तान याद आ गयी!
चला कोहलीचा पण डाव आटोपलेला
चला कोहलीचा पण डाव आटोपलेला आहे...
चला जिंकण्याची आशा दिसतेय
चला जिंकण्याची आशा दिसतेय आश्वीन चांगला खेळतोय.
India require another 42 runs with 4 wickets and 11.0 overs remaining
चला जिंकले एकदांचे !! इथं
चला जिंकले एकदांचे !! इथं सगळे अवाक झालेत ना !!
टोटली अवाकन्ड!
टोटली अवाकन्ड!
अश्विनला अजून एकदा खेळविणे हे
अश्विनला अजून एकदा खेळविणे हे लॉजिकच समजत नाहीय्ये
Ashwin's game all the way, brilliant with ball, cool with the bat
R Ashwin is Man of the Match.
एकूण क्रिकेट is a game of uncertainty हेच खरे!
<< एकूण क्रिकेट is a game of
<< एकूण क्रिकेट is a game of uncertainty हेच खरे ! >> खरंय. वास्तविक अश्विन ऑसीजविरुद्ध प्रभावी ठरायचा, तर त्यानी धुतला त्याला; आणि श्रीलंकेपुढे त्याचं काय चालणार असं वाटलं, तर 'मॅन ऑफ द मॅच' ठरला ! गावसकरला आपल्यापेक्षां क्रिकेट अधिक कळतं, हें आतां नाईलाजाने मान्य करावं लागतंय !!
चला! जिंकलो एकदाचे. १८१ ला ६
चला! जिंकलो एकदाचे. १८१ ला ६ वा गेला तेव्हा आवळे आले होते. पण जडेजा व अश्विनने खूप सेन्सिबली खेळून सामना जिंकून दिला. तसं पिचमध्ये बॉलरसाठी फारसं काही नव्हतं. आज मलिंगाने त्याचा भेदक यॉर्कर क्वचितच टाकला (फिक्सिंग?). धोनी आणि सेहवागने संतापजनक पद्धतीने आपल्या विकेट फेकल्या. रोटेशन पद्धतीनुसार पुढच्या सामन्यात बहुतेक प्रवीणकुमारच्या जागी इरफान किंवा यादवला खेळवतील आणि रोहीत शर्माच्या जागी मनोज तिवारीला.
>>> कोणीतरी काहीतरी दिलासा द्या हो! सचिनचे हे असे किती काळ चालणार? प्रत्येक वेळी आशा ..निराशा! अगदी अगदी वैताग आला!
शतक झाले नाही तर काय फरक पडतो? त्याने बर्यापैकी खेळून विजयाला हातभार लावला एवढे पुरेसे आहे.
मला वाटते राहुल शर्मा नि
मला वाटते राहुल शर्मा नि जाडेजा एकाच दिशेने बॉल वळवतात म्हणून अश्विनला ठेवले असावे. गावस्करच्या बोलण्याकडे फार लक्ष देउ नका, त्याचे कोटी मिळाले कि तो परत सूर बदलेल.
गावस्करच्या बोलण्याकडे फार
गावस्करच्या बोलण्याकडे फार लक्ष देउ नका, त्याचे कोटी मिळाले कि तो परत सूर बदलेल.
स्वतः selection committe वर गेला, तर मग जबाबदारी येते. त्यापेक्षा बाहेर राहून काही पण बोलायचे, जबाबदारी काही नाही. समजा आश्विन फेल झाला तर परत selection committe ला नावे ठेवायला मोकळा!
सर्वस्वी व्यक्तिपूजक असलेल्या भारतात त्याने काही केले तरी त्याला कोटी रु. देणारे भेटतीलच!!
कसाहि खेळला तरी कोटी रुपये घेऊन आय पीएल मधे खेळायला बोलावतातच, नि लोकहि जातात पैसे देऊन बघायला.
तेंव्हा असे असल्याने स्वतःचे पैसे सुरक्षित ठेवावे, नि माझ्या सारखे रिकामटेकडे असाल तरच लिहावे, काहीहि लिहीले तरी फरक पडत नाही.
<< काहीहि लिहीले तरी फरक पडत
<< काहीहि लिहीले तरी फरक पडत नाही. >> माझं ब्रीदवाक्यच उचललंत कीं झक्कीजी तुम्ही !

"I would have loved to have played Twenty20 cricket. That's one we missed out on," Waugh said on Monday. स्टीव्हलाही [ वय ४६ वर्षं ] आतां आयपीएलचे वेध लागलेत कीं काय !!!
शेवटी कोरा करकरीत रुपया, तोच
शेवटी कोरा करकरीत रुपया, तोच खरा देव, काय समजलास बेमट्या !
आपल्या टीम मधे एक विकेटकीपर
आपल्या टीम मधे एक विकेटकीपर आणि बाकी १० बॉलर घ्यावेत. विकेटी काढणं व शेवटी बॅट्समनची खरकटी काढणं इ. सगळं त्यांनाच करावं लागतं नाही तरी!
आज श्रीलंकेने आसीजची हवा टाईट
आज श्रीलंकेने आसीजची हवा टाईट केलेली आहे. ऑसीज ४१ षटकांत ७ बाद १९१. श्रीलंकेला हा सामना जिंकण्याची उत्तम संधी आहे. श्रीलंकेने ऑसीजला हरविले तर मजा येईल.
तसे काही झाले नाही.
तसे काही झाले नाही. ऑस्ट्रेलियाच जिंकले, ५ धावांनी!
मॅच जबरी झाली. अॅन्जेलो
मॅच जबरी झाली. अॅन्जेलो मॅथ्यूजने सामना जवळपास जिंकत आणला होता, पण थोडक्यात हारले.
हाच तो नुवान कुलसेकराने स्वतःच्या गोलंदाजीवर घेतलेला मायकेल हसीचा जबरदस्त झेल
जिंकणार का?
जिंकणार का?
जिंकले
जिंकले
जिंकले >>> चुकून !!
जिंकले
>>> चुकून !!
चक्क..
चक्क..
धोणीची सिक्सर जबरी!!!!
धोणीची सिक्सर जबरी!!!!
११२मी....
>>> चुकून !!असे नका म्हणू
>>> चुकून !!असे नका म्हणू हो!
चांगले खेळले शेवटी. धोनी द कूल!
हेच जर उलटे झाले असते नि ऑस्ट्रेलिया असेच जिंकले असते, तर भारताची शेवटची ओव्हर टाकणार्याला शिव्यांची लाखोली वाहिली असती!
पण गोरा मकाय, त्याची काही चूक नाही!
चुकून सिक्सर ?! जडेजा नि धोनी यांची पळापळ चुकून?
शेवटच्या १६ षटकांत फक्त ९२
शेवटच्या १६ षटकांत फक्त ९२ धावा हव्या होत्या व ३ च बाद झाले होते. ३५ व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर धोनी आला आणि एकदम परिस्थिती बदलली. पॉवरप्लेमधल्या खेळलेल्या १५ चेंडूत त्याने फक्त २ धावा करून प्राण कंठाशी आणले. धोनीच्या संथ खेळामुळे रैना व जडेजाला उचलून मारावे लागून बाद व्हावे लागले. ५० वे षटक सुरू झाले तेव्हा धोनी ५५ चेंडूत ३३ धावा काढून नाबाद होता आणि ६ चेंडूत १३ धावा हव्या होत्या. पहिल्या २ चेंडूत अश्विनने फक्त १ धाव घेतली. तिसरा चेंडू पडेपर्यंत धोनीला लाखोली सुरू होती. अचानक चित्र बदलले. ३ र्या चेंडूवर धोनीचा षटकार, ४ था चेंडू नोबॉल आणि त्यावर २ धावा आणि त्यापुढच्या चेंडूवर ३ धावा झाल्यामुळे जवळपास हारलेला सामना अचानक २ चेंडूत जिंकला.
असो. सोपा सामना अवघड करूनसुद्धा जिंकले हे महत्त्वाचे!
आधीचा खेळ नाही पाहूं शकलो पण
आधीचा खेळ नाही पाहूं शकलो पण शेवटचं षटक पाहिलं. अश्विन नुकताच खेळायला आला होता म्हणून
त्याच्या पहिल्या चेंडूवरच्या फटक्यावर एकच धांव घेऊन स्ट्राईक स्वतःकडे ठेवण्याचा धोनीचा निर्णय शहाणपणाचा; नंतर स्वतःवर घेतलेली जबाबदारी षटकार मारून व संयम राखत नीट खेळून पार पाडणं कौतुकास्पदच. अर्थात, ऑसीजनी नो-बॉल टाकून मदत केली पण ... Fortune favours the brave हें तर आहेच ना !
Pages