युक्ती सुचवा/ युक्ती सांगा- २

Submitted by पूनम on 15 June, 2011 - 03:25

स्वयंपाकघरातल्या अनेक युक्त्या आपण http://www.maayboli.com/node/6359 पाहिल्यात. अनेक अडचणींवर मात करायलाही ह्याच धाग्यावर शिकलो. अशाच युक्त्या एकमेकांना ह्या पुढेही सांगत राहू, आता इथे ह्या नव्या धाग्यावर.

इथे काही विचारण्याआधी, मात्र हा आधीचा धागा पहायला विसरू नका.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हाच वरील प्रश्न मला आज पडला होता. शेवटी बिस्किटेच दिली. एक अ‍ॅपल संपत नाही. कापून दिले तर काळे होते म्हणून खात नाही.

दाणे भाजल्यानंतर त्याची साले मी सुद्द्धा काढत नाही कधीच, भाजलेल्या दाणयांचा सालासकटच कुट करते. हे बरोबर आहे की चुक? म्हणजे एक चव सोडली तर बाकी काही फरक पडत नसावा बहुधा.. फायबर असल्यामुळे चांगलेच असेल बहुतेक..

भाजलेल्या दाण्याची साले काढू नयेतच. सालासकटच कूट करावे. सालात एक प्रकारचे अ‍ॅन्टीऑक्सिडन्ट्स असतात, जे हृदयासाठी चांगले असतात. त्यामुळे सालं खावीत.

(हे समजल्यापासून मला हुश्श झाले होते. महाकंटाळवाणे काम- सालं काढणे, दाणे पाखडणे, सालं गोळा करणे आणि घरभर पसरलेल्यांचा केर काढणे! देवा रे!)

सालं जरी उपयोगी असली तरी शेंगादाण्याची नाकं वाईट ..त्यामुळे शक्यतो पित्त प्रकृतीच्या लोकांनी दाणे खायचेच झाल्यास वरची नाकं काढून टाकावीत आणि मगच खावे.

सालं जरी उपयोगी असली तरी शेंगादाण्याची नाकं वाईट ..त्यामुळे शक्यतो पित्त प्रकृतीच्या लोकांनी दाणे खायचेच झाल्यास वरची नाकं काढून टाकावीत आणि मगच खावे. >>>>
हो हो त्या नाकांमुळेच पित्त होते....
असेच लिबाच्या बी चे पण आहे... आय मीन मी ऐकले आहे.. लिबामधल्या एका बी मुळे पण खुप पित्त होते आणि एक बी पित्त शामक असते.. पण आपल्याला कळत नाही कुठली ते , म्हणुन सगळ्याच बीया काढुन लिंबाचा रस घ्यावा...

मुकुला, होलसेल साइजचे चॉकोलेट मिळते ते आणून मेल्ट करून त्यात ती सीरीअल्स मिसळून मोल्ड मध्ये घालायचे व फ्रीज करायचे. मस्त लागेल. चुरमुर्‍याचे चॉकोलेट यायचे ना एक तसे.

thanks ashwinimami for prompt response. jara jast pramanat urali aahet ... evadhi chocolates mhanje majhyach potat jateel. थोडीफार सादळली आहेत. तरी चालेल का?

मायक्रोवेव्ह मध्ये ३० सेकंद गरम करून घेता येतील. हेल्थ बार म्हणायचे असेल तर अजून ड्रायफ्रूटस वगैरे घालता येतील. एकदा बार बनविला कि त्याचे अर्ध्या इंचाचे तुकडे करायचे. पोस्ट डिनर एखादे खायला.

साक्षी१,
१) पनीर न तळता वापरता येते (तूकडे करुन किंवा कुस्करुन)
२) न तळता पॅनवर ठेवून रोस्ट करता येते किंवा ग्रील करता येते. कमीत कमी तेल लागते.
३) तळायचेच असेल तर तळल्यानंतर दूधात किंवा ताकात पाणी मिसळून त्यात पनीरचे तळलेले तूकडे टाकायचे, नरम राहतात.

मुकुला, चिवडा करता येईल का...कॉर्न्स वा राइस फ्लेक्स असतील त्या उरलेल्या सिरिअलात, तर मस्त लागेल. मी नेहमी राइस सिरीअल विकत आणते - फक्त चिवडा करायला. :)... पातळ पोह्यांचा करतो तसा करायचा.

अ‍ॅवोकॅडो जर हाताने कुस्करण्याइतकं मऊ असेल तरच ते पिकलेलं असतं का? मी काल ग्वाकामोले केलं होतं त्यातलं अ‍ॅवोकॅडो जरा कडक होतं. हाताने मिक्स होत नव्हतं. पण साल पूर्ण गडद किरमिजी (किंवा तपकिरी) होती. ते कच्च असेल का? कच्चं असेल या शंकेने मी खाल्लं नाही. खरं म्हणजे घेतानाच ते मऊ नाही हे जाणवत होतं, पण रंग बघून ते पिकलं असेल म्हणून आणलं. चव ठीक आहे, कच्चट लागत नाहिये, पण मऊ नाही म्हणून शंका येतेय. पूर्ण पिकलं नसेल तरी खाता येईल का? (किती बाळबोध प्रश्न! Uhoh )

प्रज्ञा, अवाकाडो झाडावर पिकत नाही. आणि झाडावरुन काढल्यावर कधी पिकेल, ते नेमके सांगता येत नाही. पण साल पूर्ण किरमिजी झाल्यावर हाताला किंचीत मऊ लागले कि पिकले असे समजायचे.
पूर्ण पिकलेल्या अवाकाडोचा गर कापताना, सुरीने लोणी कापल्यासारखे वाटते. (म्हणून त्याला बटर फ्रूट म्हणतात ) खरे तर पूर्ण पिकलेल्या अवाकाडोचा गर सुरीने नीट कापता येत नाही. म्हणजे पातळ स्लाईसेस करता येत नाहीत. त्यासाठी सालीसकट कापा करुन मग साल काढावी लागते.
कच्चे अवाकाडो कडवट लागते. पण तसे लागत नसेल तर ते खायला हरकत नाही. पूर्ण पिकलेला अवाकाडोला स्वतःची अशी काहीच चव नसते.
अवाकाडो कापल्यावर आतला काही भाग वेगळ्या रंगाचा असला तर मात्र तो काढून टाकायचा. तसेच बी असते त्या खोबणीला जर काही पापुद्रे चिकटलेले असतील तर तेही पुर्णपणे निपटून काढायचे.

साल पूर्ण किरमिजी होती, पण मऊ नाही लागलं हाताला. तरी घेतलं, सालीचा रंग बघून Sad
कापताना थोडसं कडक वाटलं, मऊ नाही. बाकी रंग सालीजवळ थोडा डार्क हिरवा आणि आतून फिक्कट पिवळसर होता. मागच्या वेळी केलं तेव्हा सुरेख झालं होतं. या वेळी रंग तसाच होता अ‍ॅवोकॅडोचा, पण काहीतरी बिनसलं.

कापताना थोडां कडक वाटलं असेल तरी आता खाता येईल का? नसेल तर काय करू? एवढं टाकायचं जिवावर आलंय! Sad

ओके! Happy

प्रज्ञा अवाकाडो शक्यतो थोडे कच्चे विकत घ्यावेत कारण फास्ट पिकतात.
ते मधुन अर्धे कापावेत आणि मग सोलावेत. सेम फॉर ड्रॅगनफ्रुट.
स्लायसेस करुन सॅन्डविच मध्ये छान लागतात.

प्रज्ञा, अ‍ॅवोकॅडो ब्राउन पेपर बॅग मध्ये ठेवल्यावर चांगले पिकतात अशी टिप फूड चॅनलवर पाहिली होती. अ‍ॅवोकॅडो चांगले आहे की वाईट हे विकत घेताना समजणे अवघड आहे असेही तीथे सांगीतल्याचे आठवते.

चमकी, पीठ फर्मेंटेड पाहिजे. नाहीतर सोडा/ बेकिंग पावडर लागेल. आप्पे करताना मंद गॅसवरच करायचे. पहिले मिश्रण तेलावर घालून झाकण ठेवायचे. ३ मिनिटे झालीकी झाकण काढून बघायचे. वरील भाग फुगीर होणार. मग हलक्या हाताने उलटायचे. प्रथम आत गेलेली बाजूच सुरेख गोल होते. ती वर ठेवून सर्व करायचे. ती बाजू खरपूस सोनेरी झाली पाहिजे पण जळली नाही पाहिजे. सोनेरी-> किरमिजी-> ब्राउन मग टर्न.

Pages