Submitted by पूनम on 15 June, 2011 - 03:25
स्वयंपाकघरातल्या अनेक युक्त्या आपण http://www.maayboli.com/node/6359 पाहिल्यात. अनेक अडचणींवर मात करायलाही ह्याच धाग्यावर शिकलो. अशाच युक्त्या एकमेकांना ह्या पुढेही सांगत राहू, आता इथे ह्या नव्या धाग्यावर.
इथे काही विचारण्याआधी, मात्र हा आधीचा धागा पहायला विसरू नका.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
दिनेशदा.. देवासमोर फोडतो ते
दिनेशदा.. देवासमोर फोडतो ते नारळ आहे मला सोलकढी बनवता येईल का??
देवापुढचा नारळ, कुठल्याही
देवापुढचा नारळ, कुठल्याही शाकाहारी पदार्थात वापरला तर चालतो.
धन्यवाद दिनेशदा
धन्यवाद दिनेशदा
नारळाची बर्फी बनवता येइल.
नारळाची बर्फी बनवता येइल. खवायला काही नसेल तर मिक्सरमध्ये टाकून बारीक करुन घ्या.
स्वाती नक्की का गं.... एकतर
स्वाती नक्की का गं.... एकतर ते देवासमोर फोडलेय म्हणुन टाकुन देता येणार नाही
मी_मयुरी , नक्की चालेल. मी
मी_मयुरी , नक्की चालेल. मी तरी देवापुढे ठेवतात त्या नारळांचे गोड पदार्थ नाहीतर शाकाहारी पदार्थ करतात असं पाहिलय. कोकणातले पुजारीपण तसच सांगतात.
नारळाच्या वड्या करा.
नारळाच्या वड्या करा.
काल रात्री कुकरच्या डब्यात
काल रात्री कुकरच्या डब्यात साबुदाणा भिजत घातला, आणि सकाळी ऊठून कुकरच्या दुसर्या डब्यात बटाटा उकडण्यासाठी पाणी घालून झाकण ठेवून किचनमधून बाहेर गेली. थोड्यावेळाने कुकर लावला, तीन शिट्या दिल्या. कुकरच झाकण उघडून डबा बाहेर काढून पहाते तर मी बटाट्याएवजी साबुदाण्याला तीन शिट्या दिल्या होत्या.
साबुदाण्याची घट्ट पोळी झाली आहे. आता काय करु?? साबुदाणा वडा बनवायचा बेत होता.
साबुदाण्याच्या पापड्या घालून
साबुदाण्याच्या पापड्या घालून टाका. ऊन आहे न तिकडे चांगलं?
धन्यवाद बिल्वा,
धन्यवाद बिल्वा, साबुदाण्याच्या पापड्या चांगली आयडिया आहे, पण उन्हाचा प्रॉब्लेम आहे.
चांगल कडक ऊन आहे पण अपार्ट्मेंट टेरेस लॉक असत आणि घरातील दोन्ही बाल्कनीमध्ये अजिबात ऊन येत नाही.
साबुदाणा मोकळा करणं शक्य असेल
साबुदाणा मोकळा करणं शक्य असेल तर ट्रे मधे पसरुन ओव्हन मधे थोडा वेळ गरम करता येइल... आणि मग त्या शिजले-भाजलेल्या साबुदाण्याचा चिवडा करता येइल बहुतेक.
लाजो, साबुदाणा मोकळा नाही होत
लाजो, साबुदाणा मोकळा नाही होत आहे. साबुदाण्याचा पि़झाबेस तयार झाला आहे.
बापरे... मग कापता येइल का? तस
बापरे... मग कापता येइल का? तस असेल तर वड्या काप आणि ओव्हनमधे गरम कर. गोल ऐवजी चौकोनी पापड्या....
लाजो, वड्या कापता येतील.
लाजो, वड्या कापता येतील.
ओव्ह्नमध्ये पापड्या कशा करायच्या???
तुपाचे भांडे धुताना त्यात
तुपाचे भांडे धुताना त्यात थोडे मोठ टाकून गरम (उकळते) पाणी घाला....सगळा ओशटपणा निघुन भांडे स्वच्छ होइल
वड्याकापुन ओव्हन मधे थोडा वेळ
वड्याकापुन ओव्हन मधे थोडा वेळ गरम कर मणजे कोर्ड्या होतिल... उन्हात वाळवता येणार नाहित म्हणुन ओव्हनमधे... आणि मग नेहमीसारख्या तळायच्या किंवा मावे मधे भाजायच्या
धन्स लाजो, त्वरीत
धन्स लाजो, त्वरीत प्रतिसादाबद्द्ल.
आर मी पण हेच लिहिले आहे
आर मी पण हेच लिहिले आहे विपुत
पण मावे मधे वड्या गरम केल्यास स्फोट (छोटासा ) व्हायची शक्यता आहे !
दिनेशदा, स्फोट नको. खिर नाहि
दिनेशदा, स्फोट नको.
खिर नाहि येणार का करता??
आता मला मदत करा जरा. मी एक
आता मला मदत करा जरा.
तूप करायला सांगू नका कारण एकदा प्रयत्न केला होता पुरेशी साय साठेपर्यंत त्याला वास येतो..
ते मला नाही आवडत त्यामुळे मी विकतचं क्रिम आणून त्याचं तूप करते घरी. मि चहात वगैरे घालून संपवायचा प्रयत्न करते, पण इतकी सगळी नाही संपत. 
मी एक लिटर गाईचं आणि एक लिटर म्हशीचं असं एकूण दोन लिटर दूध घेते. ते मला आठवडाभर जातं. एकदा तापवून फ्रिजात टाकलं तरिही मी २ दिवसांनी पुन्हा एकेकदा तापवते. इथे चितळेच्या दुधावर प्रचंड जाड साय येते. मी दही पण गायीच्या दुधाचं लावते त्यात साय नाही घालत. पण ती प्रचंड जाड साय येते त्याचं काय करू?
खीर होईल पण त्यासाठी ही तिचे
खीर होईल पण त्यासाठी ही तिचे तूकडे करावे लागतील.
एक छोटा तूकडा, मिक्सरमधे फिरवून बघता येईल. तो तर मोकळा झाला तर त्यात दूध साखर टाकून, जरा
गरम करायचे, मग सेट करायचे. पुडींग म्हणून द्यायचे. (इंडोनेशियातला खास प्रकार आहे म्हणून सांगायचे.)
काय आहे ना, हे सँपल जरा दुर्मिळ आहे त्यामूळे अनेक प्रयोग करुन, इथे रिझल्ट्स लिहावे लागतील.
पुरेशी साय साठेपर्यंत त्याला
पुरेशी साय साठेपर्यंत त्याला वास येतो. >>> फ्रीजमध्ये सुध्दा एक चमचा आंबट दह्याचे पहिल्याच दिवशी विरजण लावायच.. वास येणार नाही १० दिवस तरी. २ आठवड्या नंतर ताक / लोणी करू शकत
साय खायला आवडत असेल तर प्रश्नच मिटला. नाहीतर सायीच दही खा.
अनु सायीचं दही? महत्प्रयासाने
अनु सायीचं दही? महत्प्रयासाने वजन कमी केलंय.. ते पुन्हा वाढवू म्हणतेस?
आणि साय कुणाला आवडत नाही? मेरा बस चले तो..
अग, मग तूप करून पहा की..
अग, मग तूप करून पहा की.. माझेही उन्हाळ्यात एकदा-दोनदा वाशीळे तूप झाले होते. मनी खाईना, टाकवेना.. लाडू, शिरा, वड्या, हलवे इ.इ. त ढकलले. ८ दि. च्याच दुधाचे होते म्हणून बरे.
नंतर आई ने ही युक्ती सांगितली, लागू पडली 
साय घालुन पोळ्या कर, फेटुन
साय घालुन पोळ्या कर, फेटुन भाज्यांमधे घाल, हळद कालवुन चेहरा-अंगाला लाव... अगदीच संपत नसेल तर शेजारी/कामवालीला देऊन टाक... फुकट जाण्यापेक्षा कुणाच्या तोंडी लागेल
दक्षिणा, विरजण लावताना
दक्षिणा, विरजण लावताना सायीसकट लाव. त्याचं ताक कर. मस्त लोणी निघेल. नाहीतर सायीसकट ताक पी. मस्त क्रीमी ताक होतं.
दूध-दही-ताक-लोणी-तूप अशी सायकल आहे- अशा अर्थाचे एक बडबडगीतही आहे
अनु तुझी पोस्ट नीट कळली नाही
अनु तुझी पोस्ट नीट कळली नाही मला ती आंबट दही लावण्याची...
अगं साय पुरेशी साठेपर्यंत सुद्धा त्याला वास येतो तेच आवडत नाही मला.
लाजो तुझ्या आयडिया छान आहेत. भाजीत साय.. आहाहा.. स्लर्पी..
लोणकढी ताक.. चला आता तसंच
लोणकढी ताक..

चला आता तसंच करते. सायीमुळे अॅक्चुली दह्याला घट्टपणा सुद्धा येतो.. आवडतं मला ही पण टाळत होते
अग दक्षू, साय ढकलताक्षणी
अग दक्षू, साय ढकलताक्षणी विरजण लाव (म्हणजेच दह्याची कृती पण दही बाहेर ठेवून बनवायचे नाही ) अन फ्रीजमधे टाक. अन पुढच्या आठवडयातली साय ढकललीस की बाहेर ठेव यावे ळी अजून एक चमचा विरजण घालून बाहेर ठेव सकाळी.. संध्याकाळी तू घरी यी प्र्य्न्त विरजण लागेल. मग - लोणी-ताक-तूप कर.. समझी गयी?
ऐसा क्या अनू? अभी समझमे
ऐसा क्या अनू? अभी समझमे आगया.. ये भी ट्राय मारके देखती फिर.
पण फ्रिजात ठेवलं समज आणि लायट वगैरे गेली तर वास नै येत?
Pages