मायबोलीकरांच्या वापरावयाच्या नावांची कथा

Submitted by राजधर्म on 6 April, 2010 - 12:00

माबोवर अतिशय सुंदर आणि अर्थपूर्ण नावे (सभासदाचे नाव) आढळतात. आपल्याला हे नाव कसे सुचले हे जाणून घ्यायला आवडेल.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पुर्वी आयपीएल हा आयडी होता, नंतर नाव आणि वर्ष जोडुन हा एकमेव आयडी आहे.
इतरांची जोडाजोडी पाहुन आता माझाही थोडा बदल करण्याचा मानस आहे.
Happy

माझा पहिले स्मिता बिनिवाले म्हणजे माझे खरे नावाचात आयडी होता... पण तो भुंग्या आहे ना... तो मला नेहमी म्हणायचा ....लक्ष्मी रोडवर चार मजली साड्यांची शो रुम असल्यासारखाच वाटतो हा आयडी :P.... नंतर सानी मला नेहमी स्मितु म्हणायला लागली म्हणुन मग मी हा आयडी घेतला Happy

पहीले मुक्तेश्वर१२३ हा होता , तो सुरुवात करावी या उद्देशाने
मग लोक १२३ काय विचारायला लागले. १२३ काढुन मुकुच घेतला
मग विदिपा उर्फ कणखर यांनी पुर्ण नावानी यायला सांगितले आता तोच आहे

सर्वात प्रथम,

विजय दि. पाटील

मग

विजय दिनकर पाटील

नंतर

कणखर

मग पुन्हा

विजय दिनकर पाटील

आणि आता.............

एकोणतीस दोनशे साठ - हा माझा मायबोली सभासद क्रमांक आहे म्हणून घेतला आहे. इथे सारेजण फक्त सभासद असतात हा विचार दृढ झाल्यामुळे असा निर्णय घेतला आहे.

* विशेष विनंती झाल्यास तोतया सभासद नामांबद्दलही सविस्तर माहीती देण्यात येईल.

* विशेष विनंती झाल्यास तोतया सभासद नामांबद्दलही सविस्तर माहीती देण्यात येईल.>>> द्यावी क्रुपया अशी विशेश विनंती.

माझा रविउपाध्ये होता तो मराठीकरणाच्या भानगडीत रेव्यु झाला . मग आता लोक विचारतात रेव्यु म्हणजे काय?

वर्ष दिड वर्ष झालं पण मा. बो. वर पाहीजे तशी जादु मी केली नाहि आणि कराविशी पण वाटली नाही कारण मला ईथ जास्त कोणी ओळखत नाही आधी दिलिप सोनवणे असा आयडी होता पण आता जादुगर म्हणुन मला ओळखतात सर्व .

माझा पर्यटनाचा व्यवसाय असुन त्यानिमित्ताने महाबळेश्वर, प॑चगणी, वाई, कोकण किनारपट्टी (बिचेस), पुर॑दर, रायगड, प्रतापगड, मुरुड, ज॑जिरा, सि॑हगड, शिवनेरी इ. किल्ले आणि अष्टविनायक इ. ठिकाणी फिरण्याचा योग येतो. यातील महडचा 'वरद विनायक' हे माझे विशेष आवडीचे ठिकण
आणी माझे नाव विनायक म्हणून मायबोलीवर मी 'वरद - विनायक.

मी महेश म्हणुन सरळ सरळ जसे नाव आहे तसाच आयडी घेतला, आधी रोमन लिपीमधे होता आता देवनागरीत आहे. मध्यंतरी जेव्हा देवनागरी आयडी घेणे सुरू झाले तेव्हा मी जास्त येत नसे माबोवर, नंतर येऊन पाहिले तर माझा आयडी घेतला गेला होता, मग अर्ज विनंत्या करून तो परत मिळवला. ज्यांनी मला तो उदारपणे देऊ केला त्यांचे मनःपुर्वक आभार.

ऋयाम चा आयडी आधी रूयाम असा होता, मी एकदा सहज ऋयाम लिहिले तेव्हापासुन त्याने हा बदल स्विकारला. Wink

मी चंद्रगुप्त.

म्हणजे मूळचा मी रानडुक्कर . काहीतरी वेगळं नाव हवं होतं म्हणून रानडुक्कर .

एका बीबीवर चाणक्यराव काहीतरी बोलले, वा कायपण आय डी आहे, असे काहीतरी.

मग लगोलग आय डी बदलून चंद्रगुप्त केला. Proud

पिसाळलेला हत्ती आय डी बाद झाला.

माझा आय डी बदलून हत्तीपिसाळला किंवा बघतोस काय मुजरा कर .. असा काहीतरी करीन Proud

मज्जा आली सगळ्यांच्या नावामागचे किस्से वाचताना. मी नगरी आहे पण मूळचा मराठवाड्यातून आलोय. तिकडे खेड्यात चिखलु हे टोपणनाव आहे बऱ्यापैकी, मित्र त्याचा चिखल्या करतात. मी जेव्हा मायबोलीवर आलो म्हणजे २ आठवड्यापूर्वी तेव्हा "मी अण्णा हजारे" यांना चिखल्या हा एक पावसाळ्यात पायांच्या बोटांमध्ये जो एक त्वचारोग होतो(त्यालाही चिखल्या म्हणतात) तसं काहीसं वाटलं. असो. तसंही लहान असताना पाउस , शेतातली माती आणि चिखल्या असं अतूट नाते होतेच. तर असा मी चिखल्या.

अस्मादिकांना काय नाव घ्यावं ते सुचेना. मग मनाला भावणार्‍या वैशिष्ट्यांची एक यादी बनवली. त्यानुसार सदस्यनाव कसं असावं याचे ठोकताळे बांधले.

१. नाव प्रसिद्ध असावे, पण सर्वतोमुखी नको. बाजीराव, शिवाजी, इत्यादि बाद.
२. नाव शक्यतो भारतीय असावे. आईन्स्टाईन, नील्स बोर, इत्यादिंना गौणप्राधान्य.
३. नावातून क्षात्रवृत्ती सूचित व्हावी. त्यामुळे सेनानी, क्रांतिकारक, खेळाडूंना प्राधान्य.
४. या नावाने आचरटपणा करण्यास शरम वाटू नये. (उदा: आ.क्र.१, आ.क्र.२, इत्यादि) त्यामुळे स्वातंत्र्यसेनानी (टिळक, सावरकर, इत्यादि) बाद. भारतीय शास्त्रज्ञही (सत्येंद्रनाथ बसु, जगदीशचंद्र बसु, चंद्रशेखर व्यंकट रामन, श्रीनिवास रामानुजन, इत्यादि) बाद.
५. नाव फार प्राचीन नको. शक्यतो अर्वाचीन असावे. कारण प्राचीन नावे खूपदा सर्वतोमुखी असतात.

या सर्व चाळण्यांतून शेवटी ३ नावे उरली. जर्मन विद्युच्चढाईचा (ब्लिट्झक्रीग) जनक हाईन्झ गुडेरियन, फ्रेंचांना (१९५४) आणि अमेरिकनांना (१९७६) व्हियेतनामात धूळ चारणारे जनरल ङ्गुयेन गियाप आणि राघोबादादा उपाख्य राघोभरारी.

राघोबादादा फार बदनाम आहेत. Sad जनरल ङ्गुयेन गियाप यांची मराठीतली आद्याक्षरे गुंगी अशी काहीशी होतात. हाईन्झ गुडेरियनची आद्याक्षरे तर विचारायलाच नकोत!

मग शेवटी क्रीडाक्षेत्राकडे वळलो. सुदैवाने पारंपारिक भारतीय मल्लविद्येचा मानकरी सापडला. तो आयुष्यात एकही लढत हरला नव्हता. इंग्लंडच्या दौर्‍यात अनेक नामवंत युरोपीय मल्लांना सहज धूळ चारली. जगप्रसिद्ध कुस्तीगीर होऊनही तो शेवटपर्यंत उतला नाही, मातला नाही, घेतला वसा टाकला नाही. Happy

त्याचं नाव गामा पैलवान. अशी आहे अस्मादिकांच्या सदस्यनामनिवडीची चित्तरकथा!

आ.न.,
-गा.पै.

मस्तय सगळ्यंच्या नावांच्या कथा Happy
ऋयाम ट्रिक आवडली. Happy
ओह.. विदीपा च कणखर होय.

लिंबु भाऊ तुम्ही पण कथा सांगा, का घेतला हा आयडी ते.

बाकी सर्वांची पण नाव आवडली.

टोपण नसलं तर पेन उघडा पडतो, vinayakparanjpe साहेब
अन टोपणनांव असलं तर पेन उघडून लिहायला प्रॉब्लेम येत नाही.

खरं नाव रविंद्र. पण नेहमी धुंदीतच असतो. कधी कधी धुंदीतुन सावरतो तेंव्हा विचार करतो की मी नक्की कोण आहे...

वळिवाच्या अल्लड पावसाचा एक मस्तवाल थेंब ? का...
तिच्या केसातल्या ओल्या वीणेवर, त्याच्या शापीत बोटांनी छेडलेला मोहाचा राग ?
स्वत:वरंच भाळून चढलेल्या नशेमुळं उठणारा रातराणीच्या श्वासातला गंध ? का...
आपल्या उन्मत्त गंधाच्या अस्मितेनं माजलेला एक बेफाम मोगरा... ?

मी नक्की कोण आहे ?
मनस्वी वणवा... रिमझीम पाऊस.... हळवा प्राजक्त.... की वाद्ळी उन्माद ?

ह्या सगळ्याची उत्तरं सापडता सापडता पुन्हा कसलीतरी धुंदी चढते....
आणि मग...
मोठ्या मुश्किलीनं मलाच सापडलेला मी पुन्हा हरवुन जातो.... आणि मग मागे उरतो धुंद रवी.

Pages