मस्त धागा आहे. मी साधारण ४ वर्षांपूर्वी आयडी काढला होता तो याहूच्या आयडीप्रमाणे djdiwan असा रोमन होता. नंतर ४ वर्ष अज्ञातवास. गेल्या दीड महिन्यात पुन्हा आयडी काढायला गेलो तर समजलं कि खातं माबोनि अद्याप जपून ठेवलं आहे. सुखद धक्का बसला. मग देवनागरीत धनंजय या माझ्या नावानं आयडी काढायचा प्रयत्न केला पण तो आधीच घेतलेला होता. मग फार विचार न करता मुंगेरीलाल के हसीन सपने या माझ्या जुन्या आवडत्या मालिकेवरून आयडी घेतला. तसंही मला उगीच अति विचार करत बसायला आणि दिवास्वप्नं पाहायला आवडतं, त्यामुळेही ते सयुक्तिक झालं. सध्या तरी बदल करण्याचा विचार नाही. पुढचं पुढे.
Submitted by मुंगेरीलाल on 11 November, 2012 - 01:00
तरुणपणीं मी ज्या क्लबमधे खेळायला जायला लागलो तिथं माझा भाऊ आधीच सर्व परिचित होता. ' हें नवीन कार्टून कोण ? ' अशी माझ्याबद्दल विचारणा झाली कीं 'आपल्या ह्याचा भाऊ'! ' ,असं उत्तर यायचं. तेंव्हापासून "भाऊ "हीच माझी सर्वत्र ओळख झालीय.
' नमस' ही कोकणातली एक छोटीशी निसर्गसुंदर वाडी. निवृत्तिनंतरही तिथल्या बालपणीच्या रम्य आठवणींत मन अजूनही नांगर टाकूनच आहे . म्हणून ' भाऊ नमसकर ' !
Submitted by भाऊ नमसकर on 11 November, 2012 - 01:32
मला द्यायला आवडेल ते उत्तर:
समर्थांनी म्हटले आहे -
उत्कट भव्य तेची घ्यावे |
मळमळीत अवघेची टाकावे ||
मग निळ्या आकाशापेक्षा उत्कट भव्य ते काय असणार ? म्हणून हे नाव.
मला द्यायला आवडणार नाही ते उत्तर:
कोण इतकी जोडाक्षरे type करणार ? बोटांचे नाहीतर keyboard चे तुकडे पडतील.
खरे उत्तर:
माझे नाव ह्या नावाशी अगदी मिळते-जुळते आहे. (जोडाक्षरे नाहीत.), पण ते मिळत नाही म्हणून.
Submitted by आकाश नील on 25 December, 2012 - 02:03
कृपया, नविन सभासदांनी इथे लिहावे....... >>> मामी, तुम्ही नव्या सभासदांना आवाहन केलंत. माबो-वयानुसार
मी थोडासा जुना झालो असलो तरी अनेक बाबतीत नवीनच असल्यासारखा आहे....
मला माझं खरं नांव हेच सदस्यनाम म्हणून हवं होतं.
दुसरा कोणी उल्हास भिडे त्यावेळी मायबोलीत नव्हता त्यामुळे ते मिळताना अडचण आली नाही. हे माझं नशीब.
(आणि दुसरा कोणी उल्हास भिडे मायबोलीत नाही हे मायबोलीचं नशीब )
असो...... या निमित्ताने ही माझी रिक्षा (आयडी संबंधी मी उघडलेला धागा)
Submitted by UlhasBhide on 20 December, 2013 - 11:05
माझं माहेरचे नाव अंजली आहे, तो आयडी इथे आधीच आहे, तसेच अंजू हा आयडीपण होता म्हणून मी अन्जू असे लिहिले आणि तो आयडी स्वीकारला गेला. (हि काही इंटरेस्टिंग कथा वगैरे नाही), माझ्या नावाचा shortform वेगळ्या तऱ्हेने लिहिता आला.
माझ्या लहानपणी आमच्याकडे कामाला येणाऱ्या मावशी मला अंजूच्या ऐवजी आणजू म्हणायच्या. त्यांना अंजू म्हणता यायचे नाही. अन्जू आयडी मला मिळाला नसता तर कदाचित मी आणजू घेतला असता, अजूनही मला त्यांच्या हाक मारण्याची गंमत वाटते.
आता जे डुआयडी आहेत त्यांना तसे का करावेसे वाटते? हे जाणुन घ्यायला आवडेल.मला तर हा प्रकार स्किझोफ्रेनिक वाटतो.डुआयडी घेउन त्रास देणे ही मानसिक विकृती आहे का? मला त्या मृगरुप घेउन कामेच्छा पुर्ण करण्याचा प्रयत्न करणार्या कोण ते ऋषी त्यांची आठवण येते. ऋषी या प्रतिमेमुळे त्यांना त्यांच्या नैसर्गिक उर्मी व्यक्त करता येत नसाव्यात म्हणुन त्यांना असे मृगरुप घ्यावे लागले. डूआयडींचे तसेच काहीसे असावे.
Submitted by प्रकाश घाटपांडे on 20 December, 2013 - 23:17
माझी "नेत्रा" नावामागे थोडी दर्दभरी वगैरे वगैरे कहाणी आहे, आईला रेटीना चा त्रास आहे, तिच्या डोळ्यांच्या खोबणी होणार हे डॉ. नी निक्षुन सांगितले आहे, आणि जेनेटीक का कायसे असल्याने अस्मादिक ही तीच री ओढणार आहेत (कधीतरी!), मग तो पर्यंत तरी "ह्या डोळ्यांची दोन पाखरे" मा.बो.करांवर फिरवावी, म्हणुन मी "नेत्रा".
धन्यवाद गापै. ऋषींचे नाव विस्मरणात होते.
मला एकाज्योतिषाच्या धाग्यावर किंदम ऋषीचा अनुभव आला. डुआयडींचे मानसशास्त्र समजून घ्यायचे असेल तर डॉ.श्रीकांत जोशी यांचे मनोविकाराचा मागोवा हे पुस्तक जरुर वाचावे. एकूणच मानवी वर्तनाचा अभ्यास त्यात आहे. आयडी असो वा डुआयडी असो प्रत्येकामागे एक माणुसच आहे शेवटी.
Submitted by प्रकाश घाटपांडे on 23 December, 2013 - 11:53
नेत्रा, काही होणार नाही तुला जेनेटिक प्रॉपर्टीज सूप्त राहून जातील.
डॉ. इब्लिसना आईला कसला त्रास आहे ते सांगून तर बघ, कदाचित आईसाठीही काहीतरी उपाय मिळून जाईल.
अख्खी पोस्ट अवांतर झाली
Submitted by अश्विनी के on 23 December, 2013 - 12:28
फारच वैयक्तिक आणि अवांतर सुरु झाले,पण सगळ्यांना त्यांनी दाखवलेल्या concern साठी धन्यवाद. डॉ.इब्लिस व डॉ.कैलास ह्यांच्याशी वेगळा संपर्क साधेन.thanks once again.
नमस्कार
अचानक लक्ष गेलेंया बाफ कडे....
जसा दिसतो तसच वागण्याचाही प्रामाणिक प्रयत्नही करतो.. २००४ ला माबोकर होताना आयडी काय घ्यावा असा विचार करत होतो. परिचयात तर गावाचं पुर्वी नाव आंजर्लेकर असच लिहिल होतं आणि या व्हर्च्युअल जगात जर खरच कधी माबोकर भेटले प्रत्यक्ष तर ओळखणं सुकर व्हावे म्हणुन घा-या डोळ्यांची जोड असलेलं घारु आणि सहज आपलेपणा वाटावा अस आण्णा ,
अर्थात नुसत्या या एका आयडी नी ही बरीच ओळख ही दिली
काही नुस्तेच "ए /ओ आण्णा" म्हणतात तर काही "घारु" कधी "घा-या"
एकुण काय हा आय डी घेण्या मागचा उद्देश सफल झाला...
अरे हो एक तोटाही झाला.... माबोच्या सगळ्या गटग त सहजतेने ओळखणारा चेहरा आणी आयडी ही झालो...
Submitted by घारुआण्णा on 23 December, 2013 - 13:59
मस्त धागा आहे. मी साधारण ४
मस्त धागा आहे. मी साधारण ४ वर्षांपूर्वी आयडी काढला होता तो याहूच्या आयडीप्रमाणे djdiwan असा रोमन होता. नंतर ४ वर्ष अज्ञातवास. गेल्या दीड महिन्यात पुन्हा आयडी काढायला गेलो तर समजलं कि खातं माबोनि अद्याप जपून ठेवलं आहे. सुखद धक्का बसला. मग देवनागरीत धनंजय या माझ्या नावानं आयडी काढायचा प्रयत्न केला पण तो आधीच घेतलेला होता. मग फार विचार न करता मुंगेरीलाल के हसीन सपने या माझ्या जुन्या आवडत्या मालिकेवरून आयडी घेतला. तसंही मला उगीच अति विचार करत बसायला आणि दिवास्वप्नं पाहायला आवडतं, त्यामुळेही ते सयुक्तिक झालं. सध्या तरी बदल करण्याचा विचार नाही. पुढचं पुढे.
तरुणपणीं मी ज्या क्लबमधे
तरुणपणीं मी ज्या क्लबमधे खेळायला जायला लागलो तिथं माझा भाऊ आधीच सर्व परिचित होता. ' हें नवीन कार्टून कोण ? ' अशी माझ्याबद्दल विचारणा झाली कीं 'आपल्या ह्याचा भाऊ'! ' ,असं उत्तर यायचं. तेंव्हापासून "भाऊ "हीच माझी सर्वत्र ओळख झालीय.
' नमस' ही कोकणातली एक छोटीशी निसर्गसुंदर वाडी. निवृत्तिनंतरही तिथल्या बालपणीच्या रम्य आठवणींत मन अजूनही नांगर टाकूनच आहे . म्हणून ' भाऊ नमसकर ' !
मी छोटी आहे ना... म्हणुन
मी छोटी आहे ना... म्हणुन छोटी......
मला द्यायला आवडेल ते
मला द्यायला आवडेल ते उत्तर:
समर्थांनी म्हटले आहे -
उत्कट भव्य तेची घ्यावे |
मळमळीत अवघेची टाकावे ||
मग निळ्या आकाशापेक्षा उत्कट भव्य ते काय असणार ? म्हणून हे नाव.
मला द्यायला आवडणार नाही ते उत्तर:
कोण इतकी जोडाक्षरे type करणार ? बोटांचे नाहीतर keyboard चे तुकडे पडतील.
खरे उत्तर:
माझे नाव ह्या नावाशी अगदी मिळते-जुळते आहे. (जोडाक्षरे नाहीत.), पण ते मिळत नाही म्हणून.
कृपया, नविन सभासदांनी इथे
कृपया, नविन सभासदांनी इथे लिहावे.......
मी पण बदलू का आयडी आणि काय
मी पण बदलू का आयडी आणि काय घेऊ बदलून?
घेतला घेतला बदलून घेतला...
आयडी का बदलतात?
आयडी का बदलतात?
कृपया, नविन सभासदांनी इथे
कृपया, नविन सभासदांनी इथे लिहावे....... >>> मामी, तुम्ही नव्या सभासदांना आवाहन केलंत. माबो-वयानुसार
मी थोडासा जुना झालो असलो तरी अनेक बाबतीत नवीनच असल्यासारखा आहे....
मला माझं खरं नांव हेच सदस्यनाम म्हणून हवं होतं.
)
दुसरा कोणी उल्हास भिडे त्यावेळी मायबोलीत नव्हता त्यामुळे ते मिळताना अडचण आली नाही. हे माझं नशीब.
(आणि दुसरा कोणी उल्हास भिडे मायबोलीत नाही हे मायबोलीचं नशीब
असो...... या निमित्ताने ही माझी रिक्षा (आयडी संबंधी मी उघडलेला धागा)
माझं माहेरचे नाव अंजली आहे,
माझं माहेरचे नाव अंजली आहे, तो आयडी इथे आधीच आहे, तसेच अंजू हा आयडीपण होता म्हणून मी अन्जू असे लिहिले आणि तो आयडी स्वीकारला गेला. (हि काही इंटरेस्टिंग कथा वगैरे नाही), माझ्या नावाचा shortform वेगळ्या तऱ्हेने लिहिता आला.
माझ्या लहानपणी आमच्याकडे कामाला येणाऱ्या मावशी मला अंजूच्या ऐवजी आणजू म्हणायच्या. त्यांना अंजू म्हणता यायचे नाही. अन्जू आयडी मला मिळाला नसता तर कदाचित मी आणजू घेतला असता, अजूनही मला त्यांच्या हाक मारण्याची गंमत वाटते.
माझा आयडी माझ्या सध्याच्या
माझा आयडी माझ्या सध्याच्या पुस्तकाने बदलतो. आता 'गोष्टी गावाचे' येतंय्/आलंय म्हणून तो आयडी.
पूर्वी 'परदेसाई' आलं होतं तेव्हा तो आयडी..
Vinay Desai नावचं पुस्तकही
Vinay Desai नावचं पुस्तकही आहे का?

Vinay Desai नावचं पुस्तकही
Vinay Desai नावचं पुस्तकही आहे का? << ते पण लिहीन , त्यात काय?

लवकरच येतोय, चुकीच्या किनार्यावर..
>> लवकरच येतोय, चुकीच्या
>> लवकरच येतोय, चुकीच्या किनार्यावर..
येवा, येवा ..
केळफोर्णे आपलाच असा!
केळफोर्णे आपलाच असा! >>> हा
केळफोर्णे आपलाच असा! >>> हा काय नवीन प्रकार ?
श्री, काही नाही
श्री, काही नाही कॅलिफोर्नियाचा कोकण झालाय ना...
आता जे डुआयडी आहेत त्यांना
आता जे डुआयडी आहेत त्यांना तसे का करावेसे वाटते? हे जाणुन घ्यायला आवडेल.मला तर हा प्रकार स्किझोफ्रेनिक वाटतो.डुआयडी घेउन त्रास देणे ही मानसिक विकृती आहे का? मला त्या मृगरुप घेउन कामेच्छा पुर्ण करण्याचा प्रयत्न करणार्या कोण ते ऋषी त्यांची आठवण येते. ऋषी या प्रतिमेमुळे त्यांना त्यांच्या नैसर्गिक उर्मी व्यक्त करता येत नसाव्यात म्हणुन त्यांना असे मृगरुप घ्यावे लागले. डूआयडींचे तसेच काहीसे असावे.
हा हा! मधमाशांच्या पोळ्यावर
हा हा! मधमाशांच्या पोळ्यावर तुम्ही दगड मारला आहे, घाटपांडेसाहेब!!
माझी "नेत्रा" नावामागे थोडी
माझी "नेत्रा" नावामागे थोडी दर्दभरी वगैरे वगैरे कहाणी आहे, आईला रेटीना चा त्रास आहे, तिच्या डोळ्यांच्या खोबणी होणार हे डॉ. नी निक्षुन सांगितले आहे, आणि जेनेटीक का कायसे असल्याने अस्मादिक ही तीच री ओढणार आहेत (कधीतरी!), मग तो पर्यंत तरी "ह्या डोळ्यांची दोन पाखरे" मा.बो.करांवर फिरवावी, म्हणुन मी "नेत्रा".
आईग्ग नेत्रा !!!
आईग्ग नेत्रा !!!
it's ok, पियुपरी. मला हे नाव
it's ok, पियुपरी. मला हे नाव आवडते ही! आणि अजुन तरी तसे काही व्हायला बराच अवकाश आहे.
रेटिना च्या आजाराचे नाव लिहा.
रेटिना च्या आजाराचे नाव लिहा. धन्यवाद्!
नेत्र...असा कोणता आजार आहे?
नेत्र...असा कोणता आजार आहे? कळेल का प्लीज्?
नेत्रा,
नेत्रा,
नेत्रा, तुमचा आजार
नेत्रा, तुमचा आजार बळावेपर्यंत काहीतरी उपाय निघेल. मग तुम्हाला सुनेत्रा हे नाम घेता येईल.
आ.न.,
-गा.पै.
प्रकाश घाटपांडे, >> मला त्या
प्रकाश घाटपांडे,
>> मला त्या मृगरुप घेउन कामेच्छा पुर्ण करण्याचा प्रयत्न करणार्या कोण ते ऋषी त्यांची आठवण येते.
किंदम ऋषी ते. प्रत्येक तोतयाचे नाव किंदम_ ने सुरू करावे म्हणता?
आ.न.,
-गा.पै.
धन्यवाद गापै. ऋषींचे नाव
धन्यवाद गापै. ऋषींचे नाव विस्मरणात होते.
मला एकाज्योतिषाच्या धाग्यावर किंदम ऋषीचा अनुभव आला. डुआयडींचे मानसशास्त्र समजून घ्यायचे असेल तर डॉ.श्रीकांत जोशी यांचे मनोविकाराचा मागोवा हे पुस्तक जरुर वाचावे. एकूणच मानवी वर्तनाचा अभ्यास त्यात आहे. आयडी असो वा डुआयडी असो प्रत्येकामागे एक माणुसच आहे शेवटी.
नेत्रा, काही होणार नाही तुला
नेत्रा, काही होणार नाही तुला
जेनेटिक प्रॉपर्टीज सूप्त राहून जातील.
डॉ. इब्लिसना आईला कसला त्रास आहे ते सांगून तर बघ, कदाचित आईसाठीही काहीतरी उपाय मिळून जाईल.
अख्खी पोस्ट अवांतर झाली
फारच वैयक्तिक आणि अवांतर सुरु
फारच वैयक्तिक आणि अवांतर सुरु झाले,पण सगळ्यांना त्यांनी दाखवलेल्या concern साठी धन्यवाद. डॉ.इब्लिस व डॉ.कैलास ह्यांच्याशी वेगळा संपर्क साधेन.thanks once again.
नमस्कार अचानक लक्ष गेलेंया
नमस्कार
अचानक लक्ष गेलेंया बाफ कडे....
जसा दिसतो तसच वागण्याचाही प्रामाणिक प्रयत्नही करतो.. २००४ ला माबोकर होताना आयडी काय घ्यावा असा विचार करत होतो. परिचयात तर गावाचं पुर्वी नाव आंजर्लेकर असच लिहिल होतं आणि या व्हर्च्युअल जगात जर खरच कधी माबोकर भेटले प्रत्यक्ष तर ओळखणं सुकर व्हावे म्हणुन घा-या डोळ्यांची जोड असलेलं घारु आणि सहज आपलेपणा वाटावा अस आण्णा ,
अर्थात नुसत्या या एका आयडी नी ही बरीच ओळख ही दिली
काही नुस्तेच "ए /ओ आण्णा" म्हणतात तर काही "घारु" कधी "घा-या"
एकुण काय हा आय डी घेण्या मागचा उद्देश सफल झाला...
अरे हो एक तोटाही झाला.... माबोच्या सगळ्या गटग त सहजतेने ओळखणारा चेहरा आणी आयडी ही झालो...
माझ्या नावाचा आयडी मिळणे कठीण
माझ्या नावाचा आयडी मिळणे कठीण होतं. नाव आणि आडनाव दोन्हीही खुप कॉमन.
पण इथे मिळाला.
तसही खर्या नावाने लिहायला आवडते.
Pages