मायबोलीकरांच्या वापरावयाच्या नावांची कथा

Submitted by राजधर्म on 6 April, 2010 - 12:00

माबोवर अतिशय सुंदर आणि अर्थपूर्ण नावे (सभासदाचे नाव) आढळतात. आपल्याला हे नाव कसे सुचले हे जाणून घ्यायला आवडेल.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला मुळात नील असा आयडी हवा होता.. पण तो आधिच कुणितरी घेतला होता.
मग नाव आणि आडनावातली दोन दोन अक्षरे घेउन neel_ved असा आयडी घेतला.
पण तरीही बहुतेक मायबोलीकर नील म्हणुनच हाक मारायचे Happy
मग देवनागरीकरणाच्या वेळेला तो बदलून _नील_ असा केला

नीधप म्हणते माझा आयडी पाहिल्यावर असे वाटते की मी दोन बाजुला दोन सिट अडवुन बसलोय Happy

मी तर म्हणते.....जिच्या लेखनास सदैव दाद द्यावीशी वाटते ....ती 'दाद' !
>>>

ह्याला माझही अनुमोदन

दोन बाजूला दोन सीट भारिच.
मास्तुरे म्हटलं की मलाही अशोक सराफच आठबतो.
इब्लिस, भारीच अर्थ आहे, मला नव्हतं माहिती. आता हे सांगून कुठेतरी शायनिंग मारता येईल.

मी एकदा माझ्या आईला विचारल होत की पत्रिकेत माझ दुसर नाव काय आहे ? आनि तिच प्रचंड डोक खाल्ल
मग तिन एक नाव सांगितल " अनुसया " Happy हेच नाव आहे की नाही माहीत नाही,, ????
आता हे नाव खुप जवळच आहे माझ्यासाठी...मला तर अर्थ पन माहीत नाही..जाणुन घेण्याची इच्छा पण नाही...
मग मी माबो आयडी घेताना हेच नाव घेतल Happy

शामला शामच्या आइने पाण्यात ढकलले तसे अवलनी मला माबोत ढकलले.तिच्या प्रेमळ धाकाने हातपाय मारते पण शोभनाताई हे माझे नाव मला अजिबात आवडत नाहि. .आज्जि मावशि काकु कहि चालल असत. प्रथम शोभना या माझ्या मुळ नावानेच सुरुवात केली होती तेच आवडत.पण पासवर्ड विसरला वगैरे वगैरे.मला या धाग्यामुळे हे सांगता येतय.धन्स राजधर्म.

शोभनाताईप्रमाणे मीही अवल करिश्म्यामुळे माबोकर Happy आधी खर्‍या नावाने... मग खर्‍या नावाची बरीच गर्दी
झाली...त्यात अवलने नाव बदलले...मग मीही सरसावले.माझ्या व मुलीच्या नावाचे आद्याक्षर घेउन मी अंशा झाले.मुलगी माझा अंश म्हणून मी अंशा Happy

शेवगा ????????? काय पण नाव आहे, पण या नावच बारसं माझ्या नवरोबा मुळे झाले. Lol
त्याच असं झाल.....
माझ खर नाव रुपाली... तेव्हा आम्ही (मी आणि माझा नवरा) बैंगलोरला नोकरी करत होतो. तर एकदा मी, माझा नवरा आणि माझी एक मैत्रिण कँटिन मध्ये जेवत होतो, जी मला पेरु म्हणायची पण हे कोणालाच माहीत नव्हते. तर त्या दिवशी तिने चुकुन मला पेरु म्हटले, झालं माझा त्यावेळी न झालेला नवरा मला म्हटला की तो पण मला त्याच नावाने हाक मारणार, मी त्याला नाही म्हणाले.
आणि बरोबर त्या दिवशी आमच्या ताटात शेवग्याची भाजी होती, मग काय तो म्हटला पेरु नाहितर शेवगा आणि तेव्हापासून जी सूरवात केली .. ती अजुन ९ वर्षा नतंर सुद्धा चालु आहे. Biggrin Biggrin

फक्त तो सगळ्याच्या पुढे तेवढ मला रुपाली म्हणतो. (नशीब माझं.....)

शेवगा हे नाव मला पण फार आवडत म्हणून्...मोबो मी शेवगा Happy

माझे नाव वर्षा..... हेच मला खुप आवडते.... पण इथे वर्षा आहेत खुप त्यामुळे आइडी मध्ये गोंधळ नको म्हणुन व्हिनस केले - व्हिनस म्हणजे शुक्र, जो माझ्या राशीचा स्वामी ग्रह आहे, स्त्रीसुचक, कलासक्त, रसिक वगैरे वगैरे..... आता मला नुसते व्हिनस म्हणुन घ्यायला देखील आवडले नाही म्हणुन आता माझा आईडी बनला आहे "वर्षा व्हिनस"

मला छोटा भीम खूप आवडतो. मायबोलीत छोटा भीम जादूच्या व जादूगारांच्या गोष्टी लिहितो. त्या गोष्टीतले शेवटचे वाक्य मला खूप आवडते. ते वाक्य असे : "हे नीच आसुरी प्रवृत्तीचे गुंड आपल्या झोटिंग-शाहीने निष्पाप कोवळ्या जीवना नाडत असतात ,यास्तव सावधान !!!!!!!!!!!!!!!!"
तसेच मला सगळे नाडत असतात. मला नाडणार्‍यांना मी आता आसूरी प्रव्रुत्तीचा गुंड किंवा झोटींगशहा असे म्हणणार आहे. यास्तव मी सावधान झालेलो आहे.व माझे नाव निष्पाप कोवळा जीव असे ठेवले आहे.

लहानपणि "ए बन्ड्या" अशि हाक एकु आलि कि जिथे असेन तिथुन येउन माझ्या बाबान्च्या गळ्यात पडायची सवय होति मला. थोडि मोठि झाल्यावर जरा लाज वाटायला लागलि या हाकेची. मी म्हणायचे, मी मुलगी असुन 'बन्ड्या' काय म्हण्ता मला, माझ्या मैत्रिणि हसतात. तर म्हणायचे, माझा तु बन्ड्याच आहेस.
मग लग्न ठर्ले. तेव्हा अगदि बजावुन ठेवायचे कि मला 'मीना' हाक मारा. बन्ड्या हाक मारु नका. तरि व्ह्यायचे तेच झाले. एकदा सासरच्या सगळ्या लोकानसमोर 'बन्ड्या' हाक मारली आणि सगळे पोट धरुन हसले. तेव्हा त्यान्च्या डोळ्यात चुकलो बुवा असे कहितरि मजेशिर भाव होते.
नंतर ते गेले मला सोडुन आणि त्यान्चि ती हाक पण गेली......कायमची..
आता कान आतुर होतात ति हाक पुन्हा ऐकायला.....पण आता कधिच नाहि ऐकु येणार्...माहित्ये मला.

म्हणुन माझा हा आयडी

काय पण मस्त धागा आहे.... सगळ्यांचे आयडी एकशेएक आहेत आणि त्याच्या गोष्टी पण..... Happy
Sad मला मात्र असा आयडी घेताच आला नाही ...... देवनागरीत लिहीताच आलं नाही..... Sad
शेवगा, सिंडरेला,ॠयाम..... हे आयडी मस्तच!!!! Happy

मी पूर्वाश्रमीची मनमोहिनी डोमकुंडवार. ड्यु आय झाल्यानंतर मला मन राहिले नाही. डोमकुंड घातले आधीच्या मेलेल्या आय डी च्या होमकुंडात. मग मोहिनी पवार उरले. आता मी आणि लिटल जिमी रोज येतो इथे फिरायला. हळूहळू व्यवसायाची घडी बसल्यावर आम्ही आमचा आवाका वाढवून विविध क्षेत्रे काबीज करणार आहोत. रात्रीच्या गालावर विमान आणणार आहोत. प्राणीसंग्रहालय काढणार आहोत.

खुपच छान धागा आहे. माझं खर नाव स्मृती (आई आणि बाबांच्या आद्याक्षाराने बनलेलं) सुभाष + मृदुला यांची आठवण म्हणून 'स्मृ'ती. म्हणूनच मी माझ्या आठवणींसाठी इथे नाव घेतलं स्मृतीच्या 'स्मृती' म्हणजेच स्मृतीच्या आठवणी Happy

माझं नाव चक्रमचाचा पडायच्या आधी मी गझला, कथा, कादंब-या लिहायचो. लोक माझा आदर करायचे. मग माझं डोस्कं फिरलं (म्हणजे लोकांच्या ते उशिरा लक्षात आलं. ते आधीपासूनच तसं असणार ना?). मी कुठेही काहीही बरळावयास सुरुवात केली. लोकांचे बाफ हायजॅक करायला सुरुवात केली. माझी विद्वत्ता पाजळावयास सुरुवात केली. कुणी विचारोत अथवा नाही, मी आपली मतं जबरदस्तीने मांडावयास सुरुवात केली. पण लोकांनी माझ्याकडे दुर्लक्ष करणे सुरु केले. मग एका तोंडाने पुरेना म्हणून हजार तोंडे झाली. ती तोंडे आपसात गप्पा हाणू लागली मग मी सर्वांना सळो कि पळो करून सोडले. नवोदितांना तर लिहीणे अशक्य करून सोडले. मग कुणीकुणी माझ्याशी नडले. मी मायावतार धारण केला. त्याची लोकांनी टिंगल केली. मग माझे एकनिष्ठ आणि हजारो तोंडे यांच्या मदतीने मी मोहीनीअवतारात धारण केला. सगळे विधीनिषेध गुंडाळून ठेवले. फक्त सळो किपळो करून सोडणे हे ध्येय ठेवले. मायबोलीवर फक्त माझेच म्हणणे अंतिम असावे इतकीच काय ती माझी इच्छा ! लोकांनी मी म्हणेन तसेच वागले पाहीजे इतकीच अपेक्षा आहे. मध्यंतरी माझी प्रकृती ठीक नव्हती. त्या काळात मला इथली काळजी होती. माझ्या अनुपस्थितीत लोक आनंदात असतील या शंकेने मला हैराण केले होते. माझ्या दुर्दम्य इच्छेने मी पुन्हा छळावयास परत आलोय पण लोक मला म्हणतात कि चक्रम झालेत... चाचा ! पण मला हे कळत नव्हतं. एक दिवस बॉसने नारळ दिला, मित्र दूर गेले, माझ्या मतांना किंमत उरली नाही मग काय चाचीने कान धरले आणि म्हणाली.. वयाला शोभेल असं वागा !

मग चक्रमचाचा हे नाव अ‍ॅ़सेप्ट केलं. जगाने आधीच केलेलं.

Pages