मायबोलीकरांच्या वापरावयाच्या नावांची कथा

Submitted by राजधर्म on 6 April, 2010 - 12:00

माबोवर अतिशय सुंदर आणि अर्थपूर्ण नावे (सभासदाचे नाव) आढळतात. आपल्याला हे नाव कसे सुचले हे जाणून घ्यायला आवडेल.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

माबोकर व्हायच्या आधी मी दोनेक महिने इथे येरझार्या घालत होते. जेव्हा इथली रहिवासी व्हायचं ठरवलं, तेव्हा माझ्या 'जुई' या नावाचा आयडी मिळालाच नाही. असा जबरदस्त आयडी ठेवायचा होता. चटकन काही आठवेना. दोन तास गुगलवर काहीतरी हटके शोधलं, पण रूचेना. मग सहजच माझं माझ्या हाताच्या बारा बोटांकडे लक्ष गेलं नि तेव्हा माझ्यावर पडलेल्या संस्कृतच्या प्रभावाने डोक्यात चटकन क्लिक झालं,द्वादशांगुला ! मग मी खुशीत हेच नाव ठेवून इथे वावरते आहे.

अरे वा असा पण धागा आहे...
मायबोलीवर यायच्या आधी मला ही वेबसाईट माहित नव्हती. एके दिवशी माझ्या बेस्ट फ्रेंड आदित्यला नेटवर वाचता ही साईट सापडली. महिनाभर त्याने इथल्या सगळ्या कथा वाचल्या. आणि एके दिवशी अभ्यास करताना मला आपल्या मायबोलीबद्दल सांगितलं . मला लिहायला आवडत असल्याने इथे मी लगेच आयडी काढला. मला ऋचा नाव खूप आवडतं पण ऑलरेडी या नावाचा इथे आयडी होता. मग विचार करताना एक सुभाषित दिसलं. त्यात आदिसिद्धी हा शब्द होता.श्लोकात दिलेल्या पाच गुणांपैकी गायन सोडल्यास उरलेले चार गुण माझ्यात आहेत.म्हणून मग हाच आयडी घेतला. आणि आदित्य+ सिद्धी= आदिसिद्धी हे आयडी काढल्यावर आठ दिवसांनी त्याच्या लक्षात आलं आणि त्यानेच मला सागितलं.

महाविध्यालयात असतान तिथे एक खोली भाडे तत्वावर घेऊन रहायचो आम्ही मुली. त्या घराचे मालक आजोबा नेहमी मला नाजुक म्हणुन हाक मारायचे
त्यान्ची आठवण म्हणुन माझा आयडी नाजुक Happy

मी जन्मजात "टवाळ" आहे. कारण मी दुसरं काही होउच शकलो नसतो. आधी नुसता टवाळ होतो. काही काळ माबो पासून लांब गेल्या वर परत आलो तो पर्यंत स्क्रीन नेम मराठीत लिहिण्याची सोय झाली होती. पण या गडबडीत मला माझा मुळ आयडी सापडेना. म्हणून मग "टवाळ - एकमेव" झालो. अर्थात वाढत्या वयात टवाळक्या कमी झाल्यात नैसर्गिकपणे. पण पुर्णतः संपलो मात्र नसावा.

नमस्कार. मी जवळपास ५ वर्षांपासून माबोवर येत आहे. पण इथे सदस्य नव्हते, ७-८ महीन्यांआधी सदस्य व्हायचा ४-५ वेळा प्रयत्न करूनही ते अयशस्वी ठरले.नेमकं काय चूकत होतं, माहीत नाही. त्यामुळे तो नाद सोडून मी मायबोलीवरील आगमनासाठी माझ्या भावाचा id हायजँक केला आहे आणि मी आहे आता कबालीचाचा.तर ही आहे माझ्या वेगळ्या आयडीची वेगळी कथा Happy Happy

स्माईली कशी द्यायची ( बीग बॉस २ धागा) या वरील अन्जू च्या सुचनेप्रमाणे वरील स्माईली दिल्या आहेत . धन्यवाद अन्जू.

बापरे ! मी २०१० मधे सुरु केलेला हा धागा अजूनही म्हणजे ९ वर्षे जिवंत आहे हे पाहून आनंद झाला !

Pages