मायबोलीकरांच्या वापरावयाच्या नावांची कथा

Submitted by राजधर्म on 6 April, 2010 - 12:00

माबोवर अतिशय सुंदर आणि अर्थपूर्ण नावे (सभासदाचे नाव) आढळतात. आपल्याला हे नाव कसे सुचले हे जाणून घ्यायला आवडेल.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला फार उंचचउंच टाचांची नाजूक बुटं घालायची सवय होती/आहे आणि मला दोन (दुष्ट :फिदी:) मोठ्या बहिणी आहेत म्हणून माझ्या बहिणीने लहानपणी माझे नाव सिंडरेला ठेवले होते. तोच इथे आयडी घेतला.

माझं खरं नाव दीपाली , मी कायम लोकांशी भांडणाच्या सूरात बोलते , मग सारखा दिवा द्यावा लागतो म्हणून मग दीपांजली घेतलं, सारखा दिवा द्यायचा कष्ट नाही ! Proud

मी ज्या दिवशी मायबोलीकर झाले, त्या पूर्ण दिवसभर मी "रजनीगंधा जीवनी या बहरूनी आली" गाणे गुणगुणत होते. माझं खरं नाव पण आयडी म्हणून उपलब्ध नव्हतं, मग "रजनीगंधा" आयडी घेतला.

सुरवातीला काही दिवस माबो फक्त वाचत होतो. मग ठरवले सदस्य व्हावे. पहिल्यांदा आयडी काय घेऊ हा विचार मनात आला तेव्हा म्हंटलं आयडी असा हवा कि मुखपृष्ठ उघडल्यावर आठवला पाहिजे. तेव्ढ्यात दिसले

***********
शुभंकरोती कल्याणम्
***********
मराठी संस्कृती जपणारा हा शब्द अगदी मनाला भिडला.
सर्वांचे शुभ आणि कल्याण होवो हा विचार मनात आला अन बस्स !!!

ठरवले हेच आपले नाव "शुभंकरोती"

माझी आय डी अशी...

गं = गंमतजंमत आवडते
गा = गावंढळ पणा नसानसात भिनला आहे.
ध = धमाल मला करता येत नाही.
र = रफ्फुचक्कर हा स्वभावाचा स्थायीभाव

मु = मुक्यांची भाषा लवकर कळते
टे = टेंभरासारखी नाकाची ठेवन असावी.

असाच काहीसा समज माझ्याविषयी, माझ्या बारशाला आलेल्या बायकांचा झाला असावा. म्हणुन मला तशी आय डी प्रदान केली असावी. (असा माझा अंदाज आहे)

माझा आयडी रोमन अक्षरात बीएसके होता. केदार जोशीने बस्के म्हणून हाक मारली आणि मग तीच इथे रूळली.
पुढे देवनागरी आयडी आल्यावर नावाचा आयडी मिळेना, मग बस्के घेतला. Happy

'परदेसाई' हे माझं पहिलं वहिलं (आणि कदाचित एकुलतं एक पुस्तक) जे मायबोलीवर आणि मायबोली मुळे प्रसिध्द झालं. (हे नांब लक्ष्मीकांत धुळे यांनी दिलं). तेव्हा मी परदेसाई.

पर लावलेला , परदेशात जाणारा देसाई.

विनय Happy

जन्मतारीख आणि वेळेनुसार माझ्या नावाचे आद्याक्षर "वे" आले म्हणून माझे नाव "वेबमास्तर" ठेवले. पण एकदा काही अडचणींमुळे जेंव्हा मायबोलीवर देवनागरी चालले नाही तेंव्हा मलाच प्रवेश घेऊन ते दुरुस्तही करता येईना. त्यामुळे "webmaster" असे रोमनमधे नाव घेण्याशिवाय पर्याय नव्हता. आणि आता जन्मभर मायबोलीवरचा वेबमास्तरमात्र स्वतः रोमनमधे नाव लिहतो असे बोलणे ऐकावे लागते.

Lol

मला बाई काही छान गोष्टच नाहिये सांगायला.. आई बाबांना आवडल नाव म्हणुन ठेवल. माबोवर आले तेव्हा इतकी गर्दी इथे नव्हती त्यामुळे आरामात हा आयडी मिळाला.

Lol

'लालू' हे माझे लहानपणापासूनचे टोपणनाव आहे. Happy तेव्हा आयडी घेताना काही विचार केलाच नाही. पूर्वी इंग्रजी 'Lalu' असा आयडी होता.
नावाची श्टोरी अशी - Little Red Riding Hood ही गोष्ट तुम्हाला माहीत असेलच. याच कथेचे मराठीतले 'अमर चित्र कथा' चे पुस्तक होते त्याचे नाव 'छोट्या लालूची गोष्ट'. त्यातल्या लालू मुलीवरुन त्याने माझे हे टोपणनाव ठेवले.

Lol

मला माझ्या नावाचा id आधीच कोणीतरी घेतल्यामुळे घेता आला नाही .. मग काहितरी नविन id शोधायचा म्हणून नावातल्या अक्षरांशी खेळता खेळता 'सशल' असं नाव सुचलं जे मला हवं होतं तसं नविन वाटलं म्हणून हा id घेतला ..

तो किरण फॉण्ट का कायतो असतो ना वेबवर, तो मी बनवला! (लोकं आडून आडून शिव्या घालतात नि समोर भेटले की कौतुक करतात तो) त्याच्यावरुन मग मी माझा आयडी 'किरण' बनवला!

नंतर लक्षात आले की अरेच्चा माझे नावपण किरणच! कै च्या कै योगायोग नै!

आधी kiran आयडी होता. मी देवनागरी आयडी घेतल्यावर इंग्लिश kiran id हातचा निसटला नि कोणी दुसऱ्या किरणने घेतला!

वेबमास्तरानुः तुमचा पुनर्जन्म झालेला दिसतोय! मागच्या जन्माच्या वेळेप्रमाणे 'अॅ' हे अक्षर आले होते ना (जे लिहायला पण भारी कष्ट पडायचे) ? Proud

वेबमास्तर Lol
सशल, तुझा आयडी एकदम हटके आहे.
माझा आधीचा आयडी 'सायोनारा' होता. जपानमध्ये असताना आवडला म्हणून घेतला. आयडींचं देवनागरीकरण झालं तेव्हा मला त्याने लॉगीन करता येईना म्हणून मग शॉर्टफॉर्म म्हणून 'सायो' घेतला.

जुन्या माबोवर माझा होता काहीतरी आयडी, आठवतही नाही. नंतर परत इथे यायला सुरुवात केल्यावर त्याचा पासवर्ड आठवेना मग नवीन आयडी शोधाशोध सुरु झाली. नावाप्रमाणे तर घ्यायचा नव्हता, भटकायची प्रचंड आवड म्हणून घेतला मग 'आऊटडोअर्स'.

जुन्या मायबोलीवर माझा आयडी 'निनावी' होता. मायबोलीवर रजिस्टर करताना (तेव्हा बर्‍याच स्वाती मेंबर असल्यामुळे) मला नावाचं कुठलंच कॉम्बिनेशन मिळे ना. आणि नाव_आडनाव असा लांबलचक आयडी घ्यायचा नव्हता. मग चिडून तो घेतला होता. Happy

मग कालांतराने (बहुधा मायबोलीवर लिहून लिहूनच असेल, पण) टायपिंग ही तितकी कटकट वाटेनाशी झाली, म्हणून सद्ध्याचा आयडी घेतला. Happy

किरण Proud

ओह स्वाती म्हणजेच निनावी ? >> हे जुन्या लोकांनां माहित आहे .. पण स्वातीच्या मायबोली पर्सनॅलिटी मध्ये ओळखू न येण्याजोगा बदल झाला आहे हेच ह्यातून स्पष्ट होते आणि काय? :p

मी बरेच दिवस मायबोलीवर रोमात असे. एकदा एका प्रथितयश मायबोलीकरणीशी भांडण्यासाठी p_sahasrabudhe असा भला मोठा आयडी काढला. कारण त्या भांडायच्या मुड मधे दुसरं काही सुंदर आणि अर्थपूर्ण काही सुचल नाही.. Proud
नंतर मग मला कथा पोस्टायच्या होत्या.. आणि त्या अनॉनिमसली म्हणून मग अ‍ॅडम आयडी घ्यायचं ठरलं... कारण लहानपणी आम्ही त्याआयडीने पुणे पिपल, MIRC वगैरे ठिकाणी चॅटींग करायचो... मला ती कथा पोस्टायची इतकी घाई झाली होती की मी "adm" असं स्पेलींग लिहिलं..., Happy तेव्हा ते बदलता पण यायचं नाही.. सो नंतर लोकांनी त्याचं अडम केलं... नंतर पूनम वैनींच्या कृपेने माझी खरी ओळख लोकांना कळलीच.. !!! Uhoh
पुढे देवनागरीकरण झाल्यावर p_sahasrabudhe परत जिवंत करून त्याचं पग्या केलं.. आणि adm असाच ठेवला कारण त्यावर रंगीबेरंगीचं पान आहे...
पग्या म्हंटल्यावर फुग्यातली हवा गेल्यासारखं वाटतं असं म्हणत साजिर्‍याने "आयडी बदल नाहितर... " अशी फोनवर जवळ जवळ धमकीच दिल्यावर पग्याचं पराग केलं.. अजून तरी तोच आयडी वापरतो आहे.. Happy

Pages