मायबोलीकरांच्या वापरावयाच्या नावांची कथा

Submitted by राजधर्म on 6 April, 2010 - 12:00

माबोवर अतिशय सुंदर आणि अर्थपूर्ण नावे (सभासदाचे नाव) आढळतात. आपल्याला हे नाव कसे सुचले हे जाणून घ्यायला आवडेल.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी मयूर.

आयडी बनवला तेव्हा "रॉबर्ट लँगडन, सोफिया"चा "डा विन्ची कोड" पाहिला होता.
"तसलं" काहीतरी करु...

मयूर: - एम ए वाय यु आर.
ऋयाम: - आर यु वाय ए एम.
*आर कॅपीटल. Wink

मस्तच धागा आहे ..माबोवर नवीनच आहे पण इथल्या आय डी मुळे मज्जा वाटते वाचताना ..
सगळेच मस्त आहेत माझे आवडते..
रुयाम
लाजो बुनियाद कि हमलोग कुठल्या तरी सिरीयल मध्ये होती न
निम्बुडा
आगाऊ Happy
रच्याकने -- हे कस बुवा.
निधप मला वाटलं संगीत वगैरे शिकत असणार

माझं नाव अगदीच कॉमन .. वर्गात नेहमी २ प्रीती असायच्या .. कॉलेज मध्ये तर ३ इथे आधीच २ होत्या .. प्रित मला खूप आवडतं मग तेच ठेवलं..

मला सगळ्यात आवडलेला आय डी.....limbutimbu
मा बो वर नवीन आले तेव्हा वाटायचं की याला जाता येता सगळे टपली मारत असणार !

फारच मस्त धागा आहे...
राजधर्म चागंली आयडीया...
मलाही बरेच महिने हा प्रश्न होता.. की या आयडींच्या मागची कल्पना काय असेल... वाह वाह मज्जा आली वाचून
ऋयाम...लय भारी
मला काय माझ्या आयडीबद्दल सांगायला काहीच नाही...
नाव आशिष..त्याचे घरचे टोपणनाव आशू...मग त्यालाच चॅम्पियनमधला चॅम्प जोडला...कॉलेजमध्ये असतानाच...
त्यामुळे बरीच मित्रमंडळी आता आशू ऐवजी चॅम्प म्हणून बोलावतात...
माझा याहू, जीमेल, चेस, इंटरनेटवरचे वेगवेगळे गेम्स..जिथे जिथे आयडी लागतो तिथे हाच आहे...
ऋयामचा कॉपी राईट नसेल तर मीही नावाच्या स्पेलींगमध्ये उलटफेर करून काहीतरी बनवेन म्हणतो...

जुन्या माबोवर माझा आयडी होता "खंडोबा"
पण जवळ जवळ ४ वर्षानी पुन्हा मायबोली वर आलो.
आणि त्याचा पासवर्ड विसरून गेलो होतो.
मग नविन नाव घेताना माज्या GF चे नाव आणि माझे ना॑व एकत्र करून आत्ताचा नविन नाव दिला.....

माझे नाव झक्की. झक्की चा अर्थ नागपूरकडच्या लोकांना माहित असेल. अगदीच 'भैत्ताड' (दुसरा नागपुरी शब्द, अर्थ - प्रचंड मूर्ख) नाही, पण तर्हेवाइक नक्कीच. म्हणून हेच नाव घेतले. शिवाय मी लिहीतोच असे की, खरे, पण लोकांना अजिबात न आवडणारे असल्याने, अनेक लोक मला अनेक नावे ठेवतात. ती सर्व झक्की नावाच्या अंतर्जालावरील व्यक्तीला पोचतात, मी स्वतः पुनः नामानिराळा.

तसे माझे जे चांगले मित्र झाले आहेत, त्यांना माझे खरे नाव, फोन नं, घराचा पत्ता इ. सर्व माहिती आहेच. पण ते मला नावे ठेवत नाहीत. असे म्हणतात, की एकदा प्रत्यक्ष भेटल्यावर लोक मला नावे ठेवत नाहीत.

खरे तर काही लोक माझे नुसते नाव पाहिले तरी मी काय लिहीले आहे ते न पहाताच माझ्या लिखाणातून भलते भलते अर्थ काढतात. त्यातल्या एका नावाने तर, हेर नेमून माझी माहिती काढली. पण मी भारतात गेलो असता माझी भेट घेण्याचे टाळले. त्यामुळे त्या व्यक्तीला अजूनहि माझ्या लिखाणात वक्रोक्ति, उपहास , टीका यांचा भास होतो.

असो. पण ती व्यक्ति अतिशय हुषार व गुणवान आहे. म्हणून माझ्या लिखाणावर त्यांची प्रतिक्रिया आली की मला कळते मी काही तरी लक्षवेधी लिहीले आहे. त्यांचे पहिले नाव व त्याचा अर्थ मला माहित आहे, पण त्या सांगत नाहीत, तर मी कशाला?

मी आजच माबो वर सदस्य झाले. गेली दहा वर्ष फक्त रोमामध्येच होते. जुन्या माबो वर आयडी होता पण लिहिल नाहि कधी. त्याच्या पासवर्ड ची गडबड झालि. नाहितरि वापरतच नव्हते मग नाद सोडला. नवीन धारण केलेल नाव मनीमानसी . माझा खर नाव अर्ध आनि माझ आवडता नाव मानसी.
जमेल तेन्व्हा प्रतिक्रिया तरी लिहिण्याचा प्रयत्न करणार आहे. मी मायबोलि आनि मायबोलिकर यान्ची अखन्ड फ्यान आहे. गेली बरिच वर्ष.... Happy

मजा आली सगळ्यांच्या कथा वाचून Happy
मला माझे नाव आयडी साठी घ्यायचे नव्हते. मग विचार केला की काय घ्यावे? तेव्हा माझे नाव हे एका फुलाचे नाव असल्याने, "एक फूल" घेतले..
दुसरा विचार म्हणजे type करताना ek fool असे करावे लागते..तेही बर्यापैकी खरेच आहे Lol

पियापेटी =प्रिया प्रिती :: Happy जुळ्या आहोत्,
खरेतर मला माझ्या नावापुढे तिचे नाव लावायला फार आवडते. म्हणुन मी लावते
-तसे पण सगळेच [ज्यानां आमच्यातला फरक कळत नाही ] दोघीनां ही या नावाने हाक मारत Happy

मला तशी हाक मारलेली अजुनही आवडते

>>>>. मला सगळ्यात आवडलेला आय डी.....limbutimbu
आईग्ग, आता कस होणार हिच? इथे असे उघडपणे कोणच म्हणत नाही बै
ह्यारी पॉटर स्टाईल मधे म्हणतात, "तुम्हाला माहित आहेच ना तो.... (ज्याच नाव घेत नाहीत Proud ) तो आवडतो / नावडतो अस म्हणतात Lol

>>>>> मा बो वर नवीन आले तेव्हा वाटायचं की याला जाता येता सगळे टपली मारत असणार !
वाटायचं? खात्री नाही? ठीके ठीके, अज्ञानात देखिल सुख अस्त Proud
(इथे बरीच लोक अजुनही लिम्ब्याला कोपच्यात घेऊन ठोकायची इच्छा करताहेत हे कशाला हिला सान्गाव? नकोच ते, नाही माहित तेच बरय Wink )

ऋयाम मी तसा पक्का पुणेकर आहे. पण तरीही चहा पाजायच्या बाबतीत काही हरकत घेणार नाही. (चुकुन भेटलो तर असा ऑप्शन असल्यामुळे असेल कदाचित).
या एकदा घरी, मस्त जेऊ-खाऊ घालतो. चहाचे काय घेऊन बसलात...

अश्विनी मामी, तुम्ही ते खुबु चं मनावर नाही का घेतलंत Happy ?
अजुनही बरीच मंडळी इथं येत नाहीयेत....
रॉबीनहुड, चाऊ!, नानबा, बारिशकर, सांजसंध्या, सगळे Admin लोक! Happy आणि इतर...

अगदी २००० मधे मी मायबोली रोमात वाचायचो.....मग कधीतरी mvdeshmukh हा id घेतला. इथे हळूहळू लिहीतांना (वाचतांना खरे तर !!!) बाकीच्यांचे चांगले कल्पक id दिसले....

मग मी "पळस" झालो.

स्लार्ट्याला सुरूवातीला मी एस एल आरती म्हणायचे.
मग तो बाप्या आहे हे कळलं (व्हर्च्युअल तरी...)
आता कुठं उलथलाय कोण जाणे...

स्लार्टी मलाही 'आरती'च वाटलेला नी ती सिंडीची बहिण आहे ह्याबद्दल काही शंका नव्हती Proud

मी राधेय
मला वाटतं की कोण हे तुम्ही ओळखलं असेलच. नसेल तर आठवा, कोणाकोणाला त्रास दिलाय तुमच्या कंपूने..मग कदाचित आठवेल मी कोण आहे ते! इथे कुठल्याही फालतू पोस्टला खुप उदो उदो केलं जाते आणि चांगल्या पोस्टची वाट लावली जाते. घाणेरड्या कवितांना वाह, फारच सुंदर वगैरे म्हंटलं जाते, फालतू अजिबात विनोदी नसलेलया पोस्ट वर हग्गलो अशा पोस्ट बघुनच हसु येतं. इथे काय चाललंय हे??

पण आता मात्र पुन्हा आलोय, एकेकाची वाजवायला. बघु या कोण मला खाजवते ते....

Pages