मायबोलीकरांच्या वापरावयाच्या नावांची कथा

Submitted by राजधर्म on 6 April, 2010 - 12:00

माबोवर अतिशय सुंदर आणि अर्थपूर्ण नावे (सभासदाचे नाव) आढळतात. आपल्याला हे नाव कसे सुचले हे जाणून घ्यायला आवडेल.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ऋयाम : तुझ्या आयडीचा उगम आवडला ........... Happy

माझ्या आयडी बद्दल : वि. कु. ने म्हटल्याप्रमाणे, आमचं नाव हीच आमची ओळख..... Happy
आमची कुठेही शाखा नाही ........... Lol

सिंडी पतंग उडवते आहे. स्लार्टी सिंडीची बहीण किंवा भाऊ नाही. स्लार्टी बार्टफास्ट हा ७६ वर्षांचा जख्ख म्हातारा आहे. त्याचा फोटो मी पाहिला आहे. तो सिंडीसारखा अजिबात दिसत नाही. शिवाय सिंडीचा कुठचाही भाऊ किंवा बहीण इतक्या वयाची असूच शकत नाही. कारण सिंडीचे वय ५५ पेक्षा जास्त नाही, हे मी खात्रीपूर्वक सांगू शकतो. फोटोवरून पण स्लार्टी नगरच काय, काय महाराष्ट्रातल्या कुठच्याही गावचा वाटत नाही. कोईरालांच्या घरी तो महामंत्री कम सल्लागार असल्याचा संशय होता. पण तो तोच होता, की त्याचा कुणी हेर-माणूस; त्याला पुष्टी मिळत नाही. नंतर नेपाळात वेगळ्याच चमूने सत्ता काबीज केल्यावर क्रांसकाकेचने त्याची हकालपट्टी केल्यामुळे त्यांच्या नावाने शंख करत तो हिमालयात आला. हिमालयात गेलेला मात्र तोच होता, याची खात्री आहे मध्यंतरी इथे आल्याच्या बातम्या होत्या, पण पुन्हा तो तोच असल्याचा फक्त संशयच आहे. अन्नपाणी काहीच घेत नसून फक्त हिमालयातल्या जडीबुटींवर जगत असल्याची शंका आहे, पण ही देखील फक्त शंकाच आहे. कारण जडीबुटी खर्‍या असल्या, तर जगत असलेला तो तोच आहे, हे कसे नक्की सांगणार?

काही खबर समजली, तर इथे नक्की लिहिन.

साजिरा....???? Uhoh स्लार्टी हे खरंच येवढं गूढ-रम्य प्रकरण आहे काय? तो फोटो मी पण पाहिला होता माबो प्रोफाईलवर....

साजिर्‍या, का घाबरवतोस लोकांना? Lol
अरुंधती, स्लार्टी हा एक स्वतंत्र अभ्यासाचा विषय आहे, प्रकरण नाही. पण आता त्या विषयाचे तास बंद झालेत. Happy

स्लार्टी बार्टफास्ट हा स्लार्टी बरखास्त झाल्याची माहिती काही विश्वसनीय सूत्रांकडून समजते, पण ही देखील फक्त शंकाच आहे. कारण, विश्वसनीय सूत्रे विश्वासार्ह आहेत की नाहीत याबद्दल तज्ज्ञात मतभेद आहेत.

अरे हा स्लार्ट्या म्हणजे का सुभाषचन्द्र बोस की काय?

त्याच्या नाहीशा होण्यावर एवढ्या दन्तकथा रचाव्यात. ? Angry

नीरजा, >>>सिंडीबाय आरतीची बहिण हे पण बरोबर... <<< आता कोणती आरती हे ही सांग बाई. कारन मी बुचकळ्यात पडलेय, माझी ही कोण बिछडी हुई बहीण म्हणून Uhoh Proud
मी आपली साधी (?) आरतीच पण हा आय डी आधीच बुक झालेला मग नावापुढे जन्म तारीख जोडली न काय !
नंतर देवनागरी मध्ये आयडी मिळणे सुरू झाले. तेव्हा हे आरती_२१ बरे वाटेना. मला धृव भट्ट यांची सागरतीरी ही कादंबरी आणि त्याची नायिका अवल फार आवडते. म्हणून मग मीही अवल Happy

ए , ए मग मी काय डुप्लिकेट वाटली की काय ? नाही हं मी ही मूळ आरतीच, नसेन मी मूळ नक्षत्रावर जन्मलेली म्हणून काय झालं Proud

वर्षाविहाराच्या (यू. के. ' ज रिसॉर्ट) सविस्तर माहितीचा धागा उघडण्यात आला आहे. नावनोंदणी, शुल्क इ. जाणून घेण्यासाठी खालील लिंक पहावी
http://www.maayboli.com/node/16976

तू दुसरी...

यावरून एक आठवले. आमची एक कलीग होती .तिच्या नवर्‍याचे नाव तुकाराम होते. तिला आम्ही नेहमी विचारीत असू तुकारामाची 'तु' पहिली की दुसरी? Proud
ती ओरडूनच उत्तर देई 'पहिली, पहिली, पहिली!":

ऋयाम - काही सापडून नाही राहीलं राव. कितीही उलटापालट केली तरी छानसं काही मिळतच नाहीये. आशूची अक्षरे फिरवून उषा होतय पण त्यात काही दम नाही वाटला.
तुलाच आशिष मध्ये किवा आशूचँप मध्ये काही सापडला तर कळव.

माझं Apahdeen म्हणजे आपह्दीन किंवा Ajareen म्हणजे आजरीन
असलं काहीतरी बकवास होतंय उलटं केल्यावर..
हेच बरंय... Happy

माझ्या नावात आणि आडनावात, (इंग्रजीमधे) तिच अक्षरे आहेत. दिनेश शिंदे.
माझी एक मैत्रिण होती, रेखा खरे
अशा आणखी जोड्या सापडल्या तर मला कळवा !
(विषयांतर झालेय, पण हल्ली सगळ्या बीबीवर तेच होतेय, तेव्हा चालवून घ्या. )

Pages