मायबोलीकरांच्या वापरावयाच्या नावांची कथा

Submitted by राजधर्म on 6 April, 2010 - 12:00

माबोवर अतिशय सुंदर आणि अर्थपूर्ण नावे (सभासदाचे नाव) आढळतात. आपल्याला हे नाव कसे सुचले हे जाणून घ्यायला आवडेल.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

खुप लहानपणी मी एका गावाला गेलो होतो. त्या गावाचे सगळे लोक अगदी स्वच्छ होते. सगळे लोक एकमेकान्ना विचारयचे की तू धुतलेस? (धो लिया? -> धु लिया -> धुळे). मला हे स्वच्छ गाव खुपच आवडले आणी मी त्या गावातच मुक्काम ठोकला. या गावाला गोर्‍यान्च्या (साहेबान्च्या) राज्यात ३ र्‍या क्रमान्काचे सुन्दर शहर आरेखनाचे पारितोशिक सुद्धा मिळलेले आहे ;).
हे गाव देवान्नापण आवडले आणी त्यान्नीपण इकडे देवपूर वसवले आहे Proud
अश्या महान गावाबद्दल आपुलकि म्हणुन आणी त्याच्या जुन्या स्म्रुति जागवण्यासाठी मी हा आय डी घेतला :). Light 1

धुळेकर

माझा आधीचा आय डी मृदुला०४ असा होता. लोकांचे वेग्वेगळे छान छान आय डी बघुन आणि इथे माझ्याशिवाय अजुन २ मृदुला आहेत असे लक्षात आल्यावर वेगळी ओळख हवी म्हणुन तो बदलुन डेलिया असा केला.

माझा आधीचा खुप जुना आय्डी माझ्या नावाचाच होता. पण मधे बरेच वर्ष इथे न फिरकल्याने बहुधा तो गेला. मग परत त्याच नावाने मिळेना, दुसर्‍या कुणि घेतला होता.
मला एक साधा, छान, पण कोणि त्या नावाने हाक मारल्यावर विचित्र न वाटणारा आय्डी हवा होता. माझ आवडिच झाड गुलमोहोर म्हणुन गुलमोहोर आयडि घ्यावा अस वाटल. पण त्याचा शॉर्ट फॉर्म व्हायची शक्यता होती, गुल कींवा मोहोर अशी. फुललेल्या गुलमोहोराची लालसर सावलीही मला आवडते, म्हणुन मग तो सावली आयडी. सावली अस लॉगिन करताना प्रत्येकवेळी ती सावली आठवते आणि मस्त वाटत Happy

आणि तू त्या गुलमोहोराच्या झाडाखाली बसून इंजिनिअरींगचा अभ्यासही केलायस नां? बघ, माझ्या लक्षात आहे. Wink

नावातच आले की सर्व काही... भटकायची प्रचंड आवड... पायाला भिंगरी लागल्याप्रमाणे सर्वदूर भटकंती सुरु असते.. तेंव्हा स्वतःला 'पक्का भटक्या' हेच बिरूद योग्य होते... Happy

माझा एक मित्र मला 'वत्सा' म्हटल्याप्रमाणे 'गिरीराज' म्हणायचा.
डोंगर-दर्‍यांची आवाही आहेच.. त्यामुळे हाच आयई घेतला!

जुन्या मायबोलीवर mi_anandyatri होतो कारण तिथे आधीच anandyatri नावाचा कुणीतरी होता. नवीन माबोवर तो नाहिसा झाला किंवा नाव सोडून गेला... म्हणून मला मिळाला..

मला हा शब्द खूप आवडतो... म्हणून घेतला. अगदी blogचं ही नाव तसंच आहे - आनंदयात्रा. कधीकधी वाटतं, की नाव_आडनावाचा आयडी घ्यावा.. पण नक्क्क्क्को... Happy

रोहित, तुझ्या नावाची कविता आणि प्रचि सोबत ती सादर करण्याची कल्पना खुपच आवडली! Happy

बाकी आयड्यांच्या कथा सावकाश वाचेन...

माझ्या नावाच्या पहिल्या अक्षरातले दोन अल्फाबेट्स sa आणि मी सध्या वास्तव्यात असलेल्या देशाच्या नावाचे शेवटचे दोन अल्फाबेट्स जोडून ny (sa+ny = सानी) असा आयडी घेतला... Happy

मला माझ्या नावाप्रमाणे मेल आयडी मिळाला नाही कुठेच. कॉमनमॅन कॉमननेम. Proud बटाटेवडा पण बुक होता सगळीकडे मग कांदापोहे असा आयडी घेतला. जुन्या माबोवर पण तोच होता. देवनागरीकरण झाल्यावरही मग तोच घेतला. Happy

webmaster Rofl

वेबमास्तर Lol

ऋयाम अन् माझं नाव सारखंच मग काय उलटं करणार?
म्हटलं आपलं टोपणनाव/खोटं नाव उलटं करावं..
म्हणून हा आयडी! Proud

माझं नाव राजेश, घरी सगळे राजु म्हणायतात आणि मित्र मैत्रिणी 'राजा' Happy
पण जुन्या माबोवर raja, raaja, raajaa असा आयडी मिळेना मग काय शेवटी एक y जोडला आणि मी जुन्या माबोवर rajya झालो.
मग देवनागरीत पण राजा हा आयडी मिळेना म्हणुन जुन्या आयडीलाच 'राज्या' केलं. Happy

माझा आधीचा आयडी बघुन काहीजण मला 'राज्य' असेही म्हणायचे. चालायचं कोणीतरी माझ्यासारख्या महान माणसाने म्हटलंच आहे ना 'नावात काय आहे?' मग आयडीत तर काय असणार? Happy

मला प्रचंड आवडलेले आयडी "दाद आणि अज्जुका" Happy
पण सध्या अज्जुका गायब आहे Happy

खर सांगायचं तर, मी जेव्हा मायबोलीवर आले तेव्हा प्रत्येकाचे चित्र-विचित्र आयडी पाहिले आणि वाटले की खऱ्या नावाचा आयडी ठेवण्याची फशन नाही इथे... म्हणून मग मी माझ्याच खऱ्या नावाचा अर्थ असलेला आयडी घेतला.. पण आपल्या सुज्ञ मायबोलीकरांनी त्याचा शॉर्टफॉर्म केलाच... आणि 'पारो' असे नामकरण केले.. Happy

टोपणनाव हव होत म्हणून ऑर्कूटवर असल्यापासूनच सांज+संध्या केलं. त्यातही गणित आहे. गालगागा अशा गणात ते फिट्ट बसतं.. गझलेत शेवटच्या शेरात गझलकाराचं नाव देताना ते उपयोगीही पडतं.. तसही सांज आणि संध्या वेगळ्या नाहीतच..

माबोवरचे सर्वच आयडी लक्षवेधी आहेत. कल्पक आहेत..
काही जण या टोपणनावाने दर्जेदार लेखन करतात. मला त्यांचं कौतुक वाटतं. कारण हे नावासाठी, प्रसिद्धीसाठी लिहीत नाहीत.. निव्वळ स्वतःला आणि इतरांना आनंद देण्यासाठी लिहीतात असं वाटतं. ज्या वेळी हे लिखाण कुणी स्वतःच्या नावावर प्रसिद्ध करेल तेव्हा प्रॉब्लेम्स निर्माण होतील मात्र..

वारंवार आयडी बदलणा-यांचा खूप राग येतो. लक्षात ठेवावं लागतं.. किंवा आयडीवरून एखाद्याचं जुनं लिखाण शोधावं म्हटलं तर साहेबांनी / मॅडमनी आयडीच बदललेला असतो. मग ते सापडत नाही.. या महाभागांकडून माझ्यासारख्या सामान्य वाचकांचा . सहानुभूतीपूर्वक विचार होईल अशी अपेक्षा ठेवली तर चालेल ना ?

माझा आयडी तर एक वर्ष जुना आहे, पण मी तो वापरायला इतक्यातच लागले.

मी ज्या एरियात राहाते तिथे आजुबाजुला मराठी library नाही. मराठी वाचायला मी आणि माझी मैत्रिण अगदी तरसलो होतो. मग तिला माबो बद्द्ल कळालं. तिने आणि मी आयडी तर ओपन केल्या पण घाबरत. कारण इथले लोक आणि ह्या साइट्बद्दल काहीच महित नव्हतं. ऑन लाईन चॅट वगैरे काही आहे, उगाच कशाला खरी नावे द्या, म्हणुन आम्ही डमी नावे घेतली.

मी मनिषा. घरी सगळे माऊ म्हणायचे, म्हणून मी 'मनिमाऊ'. Happy

माझा आयडी योगायोगाने असा निर्माण झाला.
Ashok Thakare म्हणुन Athak . त्याचे मराठीत पण 'अथक' असे झाले अन या 'न थकणार्‍या' प्राण्याला ते आवडले Happy
पुढे नांवाचे देवनागरीकरण झाले तेव्हा नविन नांव शोधण्यास थकावे लागले नाही Happy

उदय वन.............

बहुतेक माझ्या नंतर देवाने साचाच तोडुन टाकला होता.............. Wink

त्याच बरोबर मी एकच मुलगा आई-वडिलांना..........

म्हणुन उदय वन........................

माझ्या नावानं आयडी काढणार होते पण आधीच कोणीतरी होतं माबोवर.......
म्हणून "साक्षी" ......
हे नाव आवडतं मला... सगळ्या सुखदु:खात साक्षीदार असं कोणीतरी असावं असं आपलं उगाचच वाटत नाही का....... Happy म्हणूनच हा आयडी.........

मी मा. बो. वर रजिस्टर झाल्यावर बरेच किस्से लिहीलेत आणि ते खरे आहेत आपल्या कंपनितली गुपितं कोण बाहेर फोडतय हे कळु नये म्हणुन टोपणनाव घ्यायला गेलो, चाफा आवडतो म्हणुन तोच आय.डी. घ्यायचा प्रयत्न केला पण तो आधीच बुक्ड असल्यामुळे एक f आणखी टाकला आणि चाफ्फा झालो. चाफ्फ्याचा कवठीचाफा कसा झालो ते कुणीतरी सांगेलच Happy
खरं नाव मुद्दाम लिहीत नाहीये माझे सर्वसाक्षी असलेले काही सहकारी इथे वावरत असल्याचा मला घनदाट संशय आहे. अनेक संगणकांच्या इतिहासात मी ही साइट पाहीलीये !

हे फारच विनोदी आहे. तुम्ही नाव लिहीलं नाही स्वतःचं पण प्रोफाईल मधे फोटो लावलाय. आता तो तिसर्याच कुणाचा असेल तर प्रश्ण मिटला.

prady Happy

Pages