मायबोलीकरांच्या वापरावयाच्या नावांची कथा

Submitted by राजधर्म on 6 April, 2010 - 12:00

माबोवर अतिशय सुंदर आणि अर्थपूर्ण नावे (सभासदाचे नाव) आढळतात. आपल्याला हे नाव कसे सुचले हे जाणून घ्यायला आवडेल.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बाप रे ! लोक काय विचार करुन करुन आयडीज घेतात. गापै ने तर मोठा अभ्यास करुन आयडी घेतला आहे. I am quite impressed !

इब्लिस Lol

मी पहिल्यांदा मायबोलीवर आले ते वाचण्यासाठी... खूप छान चर्चा-बिर्चा चालायची. इतरांचे आयडी बघितले... निनावी, झाड, जयावि, लिंबूटिम्बू?... खरी नावं द्यायची नाहियेत का काय?
शिवाय म्हटलं आपण कुठे काय लिहिणारोत... मनापासून दाद मात्रं देणार... म्हणून आयडी घेतला दाद.
कधीतरी पहिलीवहिली कथा (एकुणात पहिली वहिली) टाकली... आवडली लोकांना, बहुतेक... मग तोच आयडी कायम ठेवला.

@ अ‍ॅडमिन कृपया इकडे लक्ष द्याल का?
माझ्या नावाशी सार्धम्य असलेला आयडी मुद्दामून harassment च्या हेतूने काढला आहे.

मन्दार्_जोशी | 8 June, 2012 - 00:55 नवीन
मी चंद्रगुप्त.
म्हणजे मूळचा मी रानडुक्कर . काहीतरी वेगळं नाव हवं होतं म्हणून रानडुक्कर .
एका बीबीवर चाणक्यराव काहीतरी बोलले, वा कायपण आय डी आहे, असे काहीतरी.
मग लगोलग आय डी बदलून चंद्रगुप्त केला. फिदीफिदी

मन्दार्_जोशी | 8 June, 2012 - 01:10 नवीन
पिसाळलेला हत्ती आय डी बाद झाला.
माझा आय डी बदलून हत्तीपिसाळला किंवा बघतोस काय मुजरा कर .. असा काहीतरी करीन फिदीफिदी

मन्दार्_जोशी | 8 June, 2012 - 15:31
मी माझा आय डी चंद्रगुप्त होता तो बदलून मन्दार्_जोशी असा करत आहे.

माझ्या नावाशी सार्धम्य असलेला आयडी मुद्दामून harassment च्या हेतूने काढला आहे.

Proud

कसली हरॅसमेंट केली?

आय डी तोच असेल तर घेता येत नाही... पण फरक असेल तर घेता येतो. हा आय डी घेतल्यावर सिस्टिमने आय डी स्वीकारलेला आहे.. त्यामुळे तुम्हाला तक्रार करायचे कारण नाही.

तक्रार करायचा सगळ्यांना अधिकार आहे.
सिस्टिम हे यंत्र आहे. योग्य अयोग्य काय ते अ‍ॅडमिन ठरवतील.

मी तर म्हणते.....जिच्या लेखनास सदैव दाद द्यावीशी वाटते ....ती 'दाद' !
>>>

प्रचंड अनुमोदन Happy

कुणीतरी मंदिरा जोशी असा आय डी घेतलेला आहे, तर जोशी बुवानी त्यांच्याही विरोधात तक्रार केली आहे.. माझ्या नावचा अपभ्रंश करुन आय डी घेतला म्हणून! आयला, अजबच आहे.... यांचं नाव मंदार आहे, म्हणून बाकी जगानं मन्दार, मंदिरा, मंदिर, मंद... अशी काही नावे घ्यायचीच नाहीत की काय??

तक्रार करुन तरी काय उपयोग झाला जोशीबुवा, मंदिरा जोशी या नावाने एक नाही तर दोन आय डी मौजूद आहेत.. Proud

मनिमाऊ, धन्यवाद! Happy

धुंद रवी, खरंच सुरेख उत्पत्ती आहे तुमच्या नावाची!

दाद, तुमच्या नामनिवडीस दाद द्यावीशी वाटते! मूर्तिमंत निर्मळपणा!! Happy

आ.न.,
-गा.पै.

>>मन्दार_जोशी | 8 June, 2012 - 15:31 नवीन

मी माझा आय डी चंद्रगुप्त होता तो बदलून मन्दार्_जोशी असा करत आहे.
<<

खीखीखी

मंदार कागलकर जी
कदाचित हा बाफ तुमच्यामुळेच जिवंत रहाणारेय अस दिसतय
तुम्ही रोज आयडी बदलता आणि रोज इथे येउन त्याबद्दल माहिती देता Happy

नमस्कार , अचानक दिसला हा बाफ,
घारुआण्णा
माबोकर कधी-प्रेमाने अण्णा/घारु असही संबोधतात राग/निषेध ही घा-या म्हणुन करतायेतो....
अशा आयडीच कारण टिपिकल घारे डोळे,सानुनासिक स्वर,त्यामुळे कोणत्याही गटगला/ववि ला आयडी ओळखा यात मी लगेच बाद

मला विशाल कुलकर्णीने एकदा ए ठमे अशी हाक मारली होती... खूप गंमत वाटली... मग म्हटलं चला हाच आयडी घेऊ... तेव्हापासून तो चिकटलाच. आणि मला आवडलाही

कागलकर माझा तुम्हाला पाठिंबा आहे. तुम्हि काय वाटेल तो आयडि घेउ शकता.
कोणाला माकडचाळे आणी बिनडोकपणा करायचा असेल तर इब्लिस नाव घ्या. सध्याच्या त्या आयडिने माकडचाळे आणी बिनडोकपणा केल्यामुळे त्या नावाची इमेज तशी झालि आहेच! Proud

बेफिकीर, बरोबर. ते उत्पत्तीच्या ऐवजी व्युत्पत्ती हवं होतं! उत्पत्ती वस्तूशी निगडीत असते. तिचा अर्थ वेगळा होतो. लक्षात आणून दिल्याबद्दल धन्यवाद! Happy

धुंद रवी, तुमच्या नावाची व्युत्पत्ती फार छान आहे. मागे चुकून तिला उत्पत्ती म्हणालो.

आ.न.,
-गा.पै.

माझ्या एका भावानी स्वतःच्या पहिल्या मुलानंतर एक छोटुशी मुलगी दत्तक घेतली. 'अवनी'
तिला ज्या दिवशी बघितलं त्याच दिवशी माझी आणि मायबोलीची ओळख झाली.
तेंव्हाच ठरवलं की जेंव्हा कधी इथे आयडी घेईन तो असेल 'अवनी'..माझ्या भाचीच्या नावाचा..
भाऊ आणि वहिनी यांच्या सामाजिक बांधिलकीस प्रणाम म्हणून !

अंदाजे २५-३० वर्षांपूर्वी 'एक डाव भुताचा' हा चित्रपट आला होता. मला तो खूप आवडला होता. त्यात दिलीप प्रभावळकरने खेड्यातल्या शिक्षकाचे काम केले होते व अशोक सराफने भूताचे काम केले होते.

अशोक सराफ दिलीप प्रभावळकरला 'ए मास्तुरे' अशी हाक मारत असतो. या चित्रपटातला मास्तर माझ्याप्रमाणेच साधाभोळा, सज्जन, गरीब, निष्पाप, कोणाच्या अध्यात ना मध्यात, स्वतःच्या शिक्षकी पेशाशी प्रामाणिक असा असतो. त्या चित्रपटात दिलीप प्रभावळकरला गावातले गांधी टोपी घातलेले गुंड पुढारी खूप त्रास द्यायचा प्रयत्न करतात. मलाही इथले काही गांधीवादी आयडी खूप त्रास द्यायचा प्रयत्न करतात. पण चित्रपटात शेवटी दिलीप प्रभावळकर त्यांना पुरून उरतो. तसाच मीही या गांधीवादी आयडींना पुरून उरतो. म्हणून माझा आयडी 'मास्तुरे'.

Biggrin

प्रसिद्ध हास्यकलाकार उमादेवी उर्फ टुणटुण ही मला आवडते. तिच्या देहबोलीमुले लोकांना जाम हसू यायचे. अफसाना लिख रही हूं हे गाणे तर जाम फेमस. त्यामुळे हा आयडी घेतला.

मायबोलीवर एक गोष्ट मला तुफान आवडते, ती म्हणजे कोणिही मायबोलीकर आपल्यापासुन कितीही लांब का असेना, अनोळखी चेहेर्‍याचा ही असेना, पण तो/ ती खूप जवळ आहेत असे वाटते.

वास्तवीक, प्रतीसाद देणारा/ री लांबच असतो/ते पण अगदी एकाच ऑफिसमध्ये बसुन बोलतोय असे वाटते.

वरचे मास्तुरेंचे लिखाण त्यावर जामोप्यांचा प्रतीसाद बघा, दोघे लांब असुनही समोरासमोर बसलेत असे वाटते. Biggrin

IBLIS: The Jinn who disobeyed Allah Ta’ala and was expelled from His mercy. It was Iblis who tempted Adam and his wife Hawwa (Eve), peace be on them, to approach the forbidden tree. He is also known as Shaitan (Satan). See Shaitan. See Holy Qur’an, Al-Baqara (2):130, 135. Surah 19 of the Holy Qur’an. संदर्भः

यातले इब्लिसाने आदम अन हव्वा ला 'फोर्बिडन ट्री'कडे जायला उद्युक्त केले हे मला फार आवडते. सगळ्याच अर्थ छटांनी. त्यांना 'प्रेमात' पाडले.. मानवजात तयार केली.. 'ट्री ऑफ नॉलेज' ची फळे चाखायला प्रवृत्त केले.. सत्य समजून घ्यायला मदत केली. हे मला जाम भावते. यात आदम्/हव्वा/इस्लाम/किंवा कोणताही 'धर्म' ही कॉण्टेक्स्ट गौण आहे.
वरतून मराठीतले 'इब्लिस' कारटे!
अजूनही ते बालपण अन इब्लिसपणा जपणार आहेच.

रच्याकने.
'मास्तुरे' म्हटल्यावर सामनामधील डॉ.लागू आठवत होते.. तुम्ही वेगळी कॉण्टेक्स्ट सांगितलीत, डोक्यातली इमेज पार बदलली Happy धन्यवाद!

मला मायबोलीचा शोध लागल्यानंतर बरेच दिवस मी रोमात असायचे. मग दुसऱ्यांच्या लिखाणाला दाद देण्यासाठी आयडी घ्यावासा वाटला. मराठी टंकलेखन येत नव्हत. माझ खर नाव ‘अपर्णा’. ते काही टंकता येईना! मग साध-सरळ असा ‘अनया’ आय-डी घेऊन टाकला झाल. बऱ्याच जणांनी बराच अभ्यास करून, विचार करून आय-डी घेतले आहेत. मी मात्र टंकता आला, तो घेतला.

Pages