मराठी भाषेत रुढ झालेले इतर भाषांतील शब्द !

Submitted by भूत on 16 March, 2012 - 02:49

मायबोलीवरील एका धाग्यावर चालेल्या चर्चेत " मराठी भाषेत इतर भाषिक शब्द सामावणे " मराठी हिताचेच आहे असा एक सुर निघाला .

त्यावरुन सहजच विचार आला आजही अशे कित्येकशब्द आपल्या मराठी भाषेत असतील की जे मुळ मराठी नाहीत !

बघा तुम्हाला काही सुचतात का ?

( तटी : मराठी ही संस्कृतोभव आहे असे गृहीत धरले आहे तेव्हा "इतर भाषातील" म्हणजे संस्कृतेतर भाषातील शब्द असा अर्थ घावा Proud )

गुलमोहर: 

मराठीत ३५ टक्के शब्द फारसी भाषेतले आहेत.

म्हणजे प्रत्येक वाक्यातले १/३ शब्द.. तुमच्या वाक्यातले नेम्के फारशी शब्द कोणते?

स्पैनिशमध्ये ब्रेडला पान म्हणतात..पोर्तुगीज़ मध्ये त्यालाच पाव..हा शब्द आपल्याकडे प्रचलित झाला..
आणि jabon (उच्चार: खाबोन) चा आपल्याकडे साबण झाला असणार.. Happy

खाबोनचा साबण झाला? तुकारामानी नाही निर्मळ जीवन काय करील साबण म्हटले आहे... तेंव्हा त्या काळात पोर्तुगीजांची भाषा इतकी पसरली होती का?

नणन्द स्पैनिश शिकत असताना ह्या शब्दाचा उच्चार ऐकल्यावर साधर्म्य जाणवले म्हणून लिहिले..चुक झाली असल्यास माफ करा.. 'झाला असणार' असे सम्पादित करते.. Happy

A history of Konkani literature: from 1500 to 1992 ह्या पानावर मात्र हे सापडले: http://books.google.co.in/books?id=1YILeUD_oZUC&pg=PA27&lpg=PA27&dq=mara...

वाचकहो,

सवत याचं पुल्लिंगी रूप काय होत असावं ते नक्की माहीत नाही. मात्र एक अंदाज बांधता येतो. जुन्या शिवकालीन मराठीत 'ठेवलेल्या' स्त्रीला उपस्त्री म्हणंत असंत. राज्याभिषेकाप्रसंगी शिवाजीमहाराजांना ८ स्त्रिया आणि २ उपस्त्रिया होत्या असा उल्लेख आहे.

यावरून 'ठेवलेला' पुरूष म्हणजे उपमर्द धरायला हरकत नाही! Lol उपमर्द करणे या वाक्प्रचाराचा अर्थ चतुर वाचकांच्या ध्यानी आला असेलंच!! Proud

वस्तुस्थितीवर माझ्यातर्फे एक प्रकाशझोत : महाराष्ट्रातले एक राजकीय नेते जाहीर भाषणांत स्वत:ला मर्द म्हणवून घेतात. तर त्यांचे खाजगी सचिव साक्षात उपमर्द असणारंच की! Biggrin

आ.न.,
-गा.पै.

त्यांचे खाजगी सचिव साक्षात उपमर्द असणारंच की! >> Lol

पैलवान साहेब, तुमच्याही प्रतिसादांचा फॅन व्हावेसे वाटत आहे

जामोप्या

झक्की

गा मा पैलवान

अशोक

Pages