मायबोलीकरांच्या वापरावयाच्या नावांची कथा

Submitted by राजधर्म on 6 April, 2010 - 12:00

माबोवर अतिशय सुंदर आणि अर्थपूर्ण नावे (सभासदाचे नाव) आढळतात. आपल्याला हे नाव कसे सुचले हे जाणून घ्यायला आवडेल.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आय = आयत्यावेळी .....कामाचा खोळंबा करणारा.
पी = पैसा ..... हा नेहमीच भांडणाच मुळ होतो .
एल= लबाडपणा...जो कधी लपवता नाही आला.
Lol

आधि मोगरा-केतकी नाव होत माझ. कारण दोन्हि माझ्या आवडिची फुल आहेत. पण नंतर चेंज करुन माझ स्वतःच्या पुर्ण नावचाच आय डी बनवला. आडनाव जरा लांबलचक आहे. पण मला फार आवडत. एक गोष्ट शेयर कराविशी वाटते. लॉगीन करताना मि पहील्या पानावरची माझ्या नावातली सगळी अक्षर शोधुन कॉपी पेस्ट करते.
देवनागरी मध्ये कसा लिहायचा आय डी? मला कळतच नाही!

देवनागरीत आयडी लिहीण्यासाठी भाषा टॉगल करावी लागेल. सध्या भाषेच्या चौकटीत इंग्रजी आहे त्यावर टिचकी मारुन मराठी करावे लागेल. आणि मग आपोआप युजरनेम मराठीत लिहीले जाईल. परत पासवर्ड लिहीतांना भाषा इंग्रजीत करायची गरज नाही. पासवर्ड आपोआप बरोबर घेतला जातो इंग्रजीत असला तरी.

मी लहान असताना आमच्या समोरच्या घरात एक ताई रहायची. मला तिचा फार लळा. ती कॉलेजमध्ये असेल आणि मी माँटेसरीत. ती माझे खूssप लाड करायची. घरी सगअळे आशू म्हणायचे आणि ती प्रेमाने मला 'माझी आशूडी' म्हणायची. आता तिचे लग्न झाले, लांब गेली, मुलं झाली.. मी ही मोठी झाले. पण मला तिची आठवण येतेच. त्यामुळे इथे आयडी घेताना तेच नाव आठवलं आणि मग लक्षात आलं अरे, डी म्हणजे यात आडनावाचं आद्याक्षरही आलं.. म्हणून आशूडी. Happy

सुर्यकिरण - एक दाक्षिणात्य राज्यात ऐकलेलं नाव, अन महाराष्ट्रात खूपच कमी ऐकण्यात आलेलं. तेव्हा थोडासा भाव खावून जातो मी कधी कधी. त्यामूळे मूळ नाव हीच माझी ओळख राहील असं ठाम मत म्हणून तो इथे माबोवर घेतला. पुर्वी इंग्लिशमधे होता "suryakiran"पण तेव्हा देवनागरी टायपिंग ची ओळख नव्हती म्हणून एक वर्ष तसाच लोळत राहीला. पण आता नविन "सुर्यकिरण" असा मराठीत आयडी घेवून एक वर्षाचा backlog भरून काढला. इथे लोक मला सुकी म्हणतात. अगदी सुक्या बोंबलासारख वाटतं हरकत नाही ! लाडाने म्हणत असतील कदाचीत , मित्रमंडळी मधे कधी sunray, सुर्यकिरण तर कधी नुसताच suryaa !

मी सुद्धा ह्यच विषयावर लेख लिहला आहे,मला आपल्या लेखाबद्द्ल समजल म्हणून आता तो उडवतो आहे.
बाकी लेख व प्रतिक्रीया छान.
हा एक योगायोग होता मी आपली कल्पना ठापली नाही खरच!!

इथे खूप अश्विन्या आहेत. केश्वीनी, मग एक आयुर्वेदाचार्य होत्या, त्यामुळे अश्विनी असा आय्डी मिळेना. त्यात
आय्डीचे महत्त्व इथे खूप आहे हे तेव्हा माहीत नव्हते. म्हणून मामी जोड्ले. लगेच आय्डी मिळाली. खरे तर मला आय्डी बदलून खुश्बू बेगम अशी आय्डी घ्यायची आहे. पण पेशन्स नाहीये. सगळे अहो मामीच म्हणतात त्यामुळे जराकसेतरीच होते. पण काय करणार. Happy

मायबोलीकर झालो ते Yahooच्या मुळ आयडी ने... तेव्हा 'दिपस्तंभ' या मायबोलीकर आयडीने प्रभावित केलं आणि मग परत १५ दिवसांनी Indradhanushya आयडी मायबोलीवर प्रवेश केला...
(देवनागरीत Login करताना कधीकधी त्रास होतो... पण मायबोलीच्या प्रेमा पुढे त्याच काहीच चालत नाही...) Happy

एक तर माझं नाव मला खुप आवडते...
आणि आविनाश म्हणजे ज्याचा कुणीही नाश करु शकत नाही...निरंतर...अखंड...असा त्याचा अर्थही मला खुप आवडत असल्याने हेच नाव आयडी म्हणुन ठरवले...

मी भ्रमर....... नाव मिलिन्द्....पुर्वीपासुन "भ्रमर" नावाने कविता लिहायचो, इथे आधिच एक भ्रमर होता....म्हणुन मग "मी भ्रमर"...........! जुने नाव सोडवेना......!

प्रीति हे माझं प्रचलित नाव तर ललिता हे माझ्या आजीनं ठेवलेलं माझं नाव. (माझा जन्म ललिता-पंचमीचा म्हणून.) इंग्रजी माबोवरच हा आय-डी घेतला होता. ( ती माझ्या सोशल नेटवर्कींगची सुरूवात होती. आपली ओळख कुणाला सहजासहजी कळू द्यायची नसते नेटवर इ.इ. मनाची समजूत होती.) देवनागरीतही तोच ठेवला.
(ललिता हे नाव मला कधीच आवडलं नव्हतं फारसं. पण माबो वर त्याचं लले, लली असे शॉर्टफॉर्म्स झाल्यापासून ते प्रचंड आवडायला लागलंय. :))

.

आधी ईंग्रजीत असल्याने विजया(पत्नी) चे वि / प्रशांत चे प्र असे vipra आय डी होता.
आता देवनागरीत विप्रा .

मी जन्माला आलो लहानपणी तेव्हा माझे टकले एका मालिकेतल्या 'चिमणरावां' सारखे दिसायचे
त्यामुळे माझ्या वडलांनी मला हे नाव दिले. काकांना ते अवघड वाटायचे म्हणुन ते मला चिमु म्हणू लागले.
आता मला माझ्या आयुष्यातली ९० ट्क्के लोकसंख्या ह्याच नावाने हाक मारते. मी त्यातल्यात्यात आत्मसम्मान म्हणून 'चिम्या'चा चिमणराव वापरतो.

दुसर्‍या एका साईटवर माझ्या खर्‍या नावाशी साधर्म्य असलेला आयडी मला हवा होता. पण लवकर मिळेना. म्हणून फक्त नावातले अद्याक्षर घेऊन कंटाळून mmm333. हा आयडी घेतला मग मा.बो.वरही तोच चालू केला...जो आजिबात आवडला नव्हता. mmm333. मग हा देवनागरीत कसा टाईप करणार? मग हिंदीतील मानुषी या मासिकाची आठवण झाली.(मानुषीचा अर्थ स्त्री असा होतो.) आणि उच्चारायलाही छान आणि सोपे वाटले. आणि पहिल्या धेडगुजरी आय डीपासून सुटका झाली.

Pages