मायबोलीकरांच्या वापरावयाच्या नावांची कथा

Submitted by राजधर्म on 6 April, 2010 - 12:00

माबोवर अतिशय सुंदर आणि अर्थपूर्ण नावे (सभासदाचे नाव) आढळतात. आपल्याला हे नाव कसे सुचले हे जाणून घ्यायला आवडेल.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझ खर नाव स्मिता....तो आय डी मीळाला नाही म्ह्णून ' हसणे '( smile) ह्या ला अनुसरुन
" सुहास्य" घेतला ....:)

सुरुवातीपासुनच मी मायबोली फक्त वाचते कारण मला वाचायला आवडते लिहिण्याचा कन्टाळा आहे. ते माझे नाव आहे आणि सहजच मिळाले

माझ्या मुलीचा जन्म चैत्रातला म्ह्णून तिचे एक नाव माझ्या आईने चैत्रगंधा ठेवले. आईने ठेवले म्हणून माझ्या विशेष आवडीचे. Happy जेव्हा माझ्या नावाचा आयडी मिळाला नाही तेव्हा हेच नाव डोळ्यासमोर आले आणि हा आयडी घेतला.

धागा काढल्यावर बरेच वर्षे माबोवर यायला जमले नाही. मात्र तुमच्या सगळ्यांच्या प्रतिसादाबद्दल आभार.

माझी कर्मभूमी रिझर्व बैंक म्हणून मनी घेऊ की सासरी आंब्याच्या बागा आहेत म्हणून मोहोर घेऊ या संभ्रमात होते. दोन्ही तितकेच जिव्हाळ्याचे म्हणून दोन्ही एकत्र करून मनीमोहोर असा घेतला.

मनीमोहोर- मला वाटले की मायबोली वर आल्यावर तुमच्या मनात मोहोर फुलतो ..म्हणून मनीमोहोर...:)
पण तुमचा विचार मस्त आहे..

मला मान्जरी फारच आवडतात..म्हणून माउ Happy

माझे नावच ऋन्मेष
माझी आई जेवायला बोलावताना मला ऋन्मेऽऽष अशी हाक मारते ..
तसेच नाव मग ईथे ठेवले, कारण नावात काही अतरंगी कॅरेक्टर असले की ते उठून दिसते Happy

बडबड करण्यापेक्षा मनातल्या मनातच खुप बोलत असते मी (झालं बसली तंद्री लाऊन, हा घरच्यांचा नेहमीचा डायलॉग Happy ) म्हणून आत्मधून! हो, आतमधून पण लागू होतंच!

फार्फार वर्षांपूर्वी भारतात इंटरनेट मिळू लागली, तेव्हा चॅट१.कॉम नावाची एक साईट असे. आजकालही हा सर्वर मिळतो, पण ती जावा चॅट चालत नाही.

इथे चॅट करताना ब्लँक नावाने जाण्याची सोय होती. म्हणजेच १-२-३-४ रिकाम्या जागा (स्पेस) अक्षर म्हणून वापरता येत. अशा आयडीने चॅट करणार्‍यास 'घोस्ट' म्हणत. मी घोस्ट बनून चॅटत असे. तिथे मला हे नांव मिळाले, व ते चिकटले.

नंतर याहूवरही जुन्या काळी चॅटरूम्स होत्या, तिथेही अनेक दिवस हा आयडी होता. ("पोल्ट्या" हे तिथल्या लोकांकडून जास्त वापरले जाणारे टोपणनांव.)

कालांतराने घोस्ट बनून इथे लिहायची वेळ आल्यावर तोच सुरू ठेवला. Wink

- Polite Ghost®

मला वेगवेगळ्या भाषेतील शब्दांचे आकर्श्ण आहे .
संस्कृत शब्द तर शाळेत असल्यापसून आवडते .

कुठल्यातरी एका धड्याच्या शेवटी शब्दार्थ असतात ना , तिथे "स्वस्ति" होता . ( तुझे कल्याण असो , सर्व काही चांगले होउ दे , या अर्थी) .

तो शब्दच एक्दम मनात भरला .

नंतर एक्दा , टीवीवर , रिश्ते सारख्या वगैरे काही मालिका लागायच्या ना , लघुकथांच्या , त्यात एका भागात , त्या हिरॉईनच नाव होत - स्वस्ति .

तेन्व्हा ठरवलं , पुढे मागे आपल्याला मुलगी झाली तर हेच नाव ठेवायचं , तो पर्यन्त माबोवर आयडी म्हणून घेतलं.:)

img

.

काही वर्षांपूर्वी ऑर्कुटवर एका समुहात एकाजणाने असाच एक धागा काढला, पूर्ण ओळख.
त्यात नाव:, कुठे रहता: काय करता: वय: इत्यादिंसोबत धर्म, जात, उंची केसांचा रंग इत्यादि सांगा असे सांगितले होते. टाइमपास धागा होता. त्यात टाइमपास करताना मी नाव सांगुन, रहाण्याचे ठिकाण पृथ्वी, ध्रर्म: मानव, जात: मानवजात असे करता करता सहज डोक्यात आले आणि नाव: बदलून मानव पृथ्वीकर असे केले.
पण नंतर ते मला खुप आवडले. इतरांनीही नाव छान लिहिले अशा प्रतिक्रिया दिल्या आणि मग हेच वापरायचे नाव धारण केले.
तेव्हा पासून तेच वापरतोय. कित्येक लोक माझं खरं नाव सांगितलं तर ओळखत नाहीत, मानव पृथ्वीकर सांगितलं की मग ओळखतात.

घारुअण्णा... आन्जर्ल्याचा काय रे तू?
आन्जर्ल्यात एक खांबेटे होते, शिकारी खांबेटे म्हणुनच ओळखले जात, ते तुझे कोण?

लाड माझे आडनाव. त्यामुळे शाळेपासूनच लाडू या टोपणनावाने प्रसिध्द. आधी राग यायचा कोणी म्हटलं कि. पण माबो वर हाच आयडी घ्यावासा वाटला

मला पियू आयडी हवा होता तुमच्यामुळे मिळाला नाही.

>> उगाच कौतुक केलं बाई या बाईचं Light 1

हे पण बघा:

पियु
पियु...
पियु गोरी

मला पण पुर्वी पियु (पहिला उकार) हा आयडी हवा होता. तो मिळाला नाही म्हणून हा घेतला.
आता मी याच आयडीसोबत (दुसरा उकार) कंफर्टेबल आहे. Happy

.

Pages