न्यु जर्सी ए.वे.ए.ठी. अर्थात बाराकरांचा जी. टी. जी. २४ जुलै २०१०

Submitted by अनिलभाई on 21 May, 2010 - 20:42

ए. वे. ए. ठि. शनिवार दि. २४ जुलै २०१० रोजी सकाळी बरोब्बर ११ वाजून एकूणचाळीस मिनिटे नि तेहेतीस सेकंदाने चालू होईल. व ते संध्याकाळी पाच वाजून सतरा मिनिटे नि एकवीस सेकंदांनी संपेल.
या वेळा बंधनकारक नाहीत. कंटाळा आल्यास आधी गेले तरी चालेल, किंवा गंमत वाटत असेल तर थांबले तरी चालेल.
पोशाख :
भारतीय सणासुदीचा

पत्ता : स्वाती आंबोळे ह्यांच्या घरी. सर्वाना इ-मेल केला आहे. नाही मिळाल्यास स्वातीना इ-मेल पाठवा.

gtg_list२.JPG

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वोक्के! म्हणजे मी आणणार त्या व्यतीरिक्त अजुन एक बाटली घेऊन येइन. किंवा त्याल विचारतो छोट्या बाटल्या असतील तर.

पत्रावळी / केळीची पानं, द्रोण वगैरे कोण आणणार आहे? फचिन का? का झक्की सर्वांसाठी चांदीची ताटंवाट्या ठेवणार आहेत? पाटांचं काय? Proud

अरे देवा. नऊवारी साडी आणि धोतर ड्रेस कोड खरचं एवढा सिरियसली घेतला कि काय ? Uhoh
गपं , समरला सुट होतील असे वेस्टर्न कपडे घाला आणि जा. Happy

गपं , समरला सुट होतील असे वेस्टर्न कपडे घाला आणि जा.
<< हवाइयन थीम ठेवा, सोप्पी आणि हवेशीर :)!

स्वाती येवढी काय लगेच रॉयल्टी चुकवायची फुल्या फुल्या टाकून! Proud तु बाराकर म्हणुन डिस्काऊंट दिला असता हन्नी वोडका मार्फत! बाकी महाराजांचे खरे मित्र तुम्ही! मुत्सद्दीच, नाही का?

हूला स्कर्ट्स हवेत असं काही नाही Proud
हवाईयन बिग फ्लोरल प्रिंट ड्रेस, केसात फुलं , गळ्यात हार , जमलच तर हवाईयन टॅटू वगैरे लावा आणि नारळाच्या करवंटीत कॉकटेल प्या :).
(रेफरन्स ला भगवान आणि गीता बाली पहा, शोला जो भडके) Proud

स्वाती_आंबोळे यांनी बर्‍याच सविस्तरपणे कपडे कुठले घालावे हे सांगितले आहे.

मला वाटते, गाण्याबरोबर त्यांनी कपडे कसे असावेत या विषयाचीहि शिकवणी लावली आहे. कोण बरे शिकवत असेल?
अरे हो, त्या नाही का, अमेरिकेतून 'कपडे कसे फाडावेत' याचे उच्च शिक्षण घेऊन भारतात गेल्या त्या? कविता लिहीतात. त्या कविता फक्त स्वातींनाच कळतात, नि स्वाती त्या कवितांना पहिला क्रमांक देतात! मग शिकवणी, सल्ला मसलत फुकट!

Light 1

आणि लालूंनी काय हे मधेच येणार की नाही असे काहीतरी सुरु केले आहे? अहो लालू, ओबामाची लोकप्रियता घसरली तरी काळजी करू नका. अजून दोन वर्षात पुनः वाढेल. की अ‍ॅल गोर चा घटस्फोट झाला म्हणून दु:खी आहात? की क्लिंटनच्या मुलीचे लग्न ठरले त्याच्या 'मेंदी' ला जायचे आहे? आपल्या दीपांजली ला द्या ते काँट्रॅक्ट!

मैत्रेयी सेड इट राइट. पाककलेची हौस/स्किल्स नसलेली मी आहे. पण मला मस्तानी अजिबात आवडत नाही. करता तर त्याहुन येत नाही. तेव्हा मी येताना राजभोगची रसमलई आणते. तेव्हढं पिठलं/ठेचा काढा माझ्या नावापुढचं.

बुवा,
बाटलीचे पैसे जरा कमी करा हो?. इतक्या पैश्यात मोठा काळा जॉनी वाकर येईल. Wink
इतकी महाग घेतली तर पाळी पाळी ने आणी पळी पळी ने घ्यावी लागेल. Happy

भाई, अहो भाव बॉसनी ठरवलाय, माझं त्यात काय पन कमीशान नाय! शप्पत Proud
मी त्याला छोट्या बाटल्या बनवायला सांगितल्या आहेत. तुम्हाला हवी असेल तर सांगा.

Pages