न्यु जर्सी ए.वे.ए.ठी. अर्थात बाराकरांचा जी. टी. जी. २४ जुलै २०१०

Submitted by अनिलभाई on 21 May, 2010 - 20:42

ए. वे. ए. ठि. शनिवार दि. २४ जुलै २०१० रोजी सकाळी बरोब्बर ११ वाजून एकूणचाळीस मिनिटे नि तेहेतीस सेकंदाने चालू होईल. व ते संध्याकाळी पाच वाजून सतरा मिनिटे नि एकवीस सेकंदांनी संपेल.
या वेळा बंधनकारक नाहीत. कंटाळा आल्यास आधी गेले तरी चालेल, किंवा गंमत वाटत असेल तर थांबले तरी चालेल.
पोशाख :
भारतीय सणासुदीचा

पत्ता : स्वाती आंबोळे ह्यांच्या घरी. सर्वाना इ-मेल केला आहे. नाही मिळाल्यास स्वातीना इ-मेल पाठवा.

gtg_list२.JPG

Group content visibility: 
Public - accessible to all site users

एव्हढे सगळे पदार्थ असल्यावर ग्रिलची काही गरज आहे का? का कुणि कणसे आणणार आहेत?

गतवर्षीच्या अनुभवावरून फचिन कदाचित् पुनः कधीहि कणसे आणायला बाजारात जाणार नाहीत! या वर्षी त्यांना पुनः स्टोअरमधे पाहून, स्टोअरचा मॅनेजर हातात बादली नि मॉप देऊन म्हणेल - आईल ५, लवकर!
Light 1 Happy

काल मेन्यूवर चर्चा झाली १५० पोस्टी पडल्या.. आज कपड्यांवर आणि भ्.मे. वर चर्चा करा.. बघू काही पोस्टी पडतात का?

नाही हो झक्की, उगीच काकूंना काही करायला नावायची गरज नाही! मी आपलं असंच मज्जेत म्हणत होते. (पुणेरी भाषेत "किडत" होते हो) Happy

परत धुवुन मिळेल ह्याची गॅरेंटी काय?. Happy
समझा दिलं तर नेसता येत का?.
मी एक लिंक मेल करतो. तिथे पाहुन शिकुन घे मग मला सांग.

Tying Dhoti.. Happy

मी अर्धी चड्डी, गडद रंगाची नि चहा सदरा, तो हि गडद रंगाचा घालणार आहे. 'पांढरे कपडे घालू नका. उगाच बीअर प्याल नि सांडाल सगळं अंगावर. कपडे मलाच धुवावे लागतात!! आणि त्या लहान मुलात पोरकटपणा करत बसू नका, आवरा आवर करत रहा. नाहीतर सगळे ठेवाल माझ्या साठी!'

आधी भारतीय पोषाख घालणार होतो, पण..... वाचलत ना वरचं!

मला वातते आता मधून मधून येणार्‍यांची यादी नि खाद्यपदार्थांची यादी पुनः लिहीत जा. कपड्यांबद्दल पुनः पुनः नाही लिहीलित तरी चालेल.

Lol
झक्की, तुम्ही फावल्या वेळात मोर्चात असतात तसे बोर्डस करुन ठेवा. कोणते कोणते स्मायली हवेत ते लिहा त्यावर. म्हणजे अ‍ॅडमिनना दाखवायला बरे पडतील.

अ‍ॅडमिन येणार आहेत का?
अनिलभाई, धन्यवाद. आता अनिलभाइंच्या परवानगीशिवाय कुणालाहि काहीहि बदल करता येणार नाहीत!

स्वाती म्हणजे स्वाती_आम्बोळे ना? मग त्या पालेभाजी आणणार? लाडू नाही?

नि पालेभाजी कसची? शेपूची का? की आंबट्चुक्याची, की चंदन बटव्याची?

झक्की, मी आणतो कणसं.. माझ्याकडे पार्टीचे सामान पण आहे मागच्या वेळचे. ते मी आणतो. तुम्ही नका आणू. लागलं तर बघून आणता येईल.

>> मग त्या पालेभाजी आणणार? लाडू नाही?
नाही. गो ग्रीन! Proud

पालेभाजी कसची म्हणजे? तुमच्या परसात असेल ती शिजवू. Proud

हो ना.. आणि बुवा झक्कींना नऊवारी साडी नेसायच्या वेबसाईटची लिंक मागत होते. गटगला बुवा नक्की कोणता पेहराव करणार आहेत ह्याची उत्सुकता आहे आता.. Proud

हा ना! एक तर दिवस भर गायब असतो अन मग उरलेल्या पोस्टींवरुन अनुमान बांधुन पोस्टी लिहीतोस काय रे फचिन? भाई, जरा पाठवा हो याला धोत्राची लिंक, बच्चा एकदम सिद्धा होऊन जाइल (काल मी झालो तसा) Proud

Pages