न्यु जर्सी ए.वे.ए.ठी. अर्थात बाराकरांचा जी. टी. जी. २४ जुलै २०१०

Submitted by अनिलभाई on 21 May, 2010 - 20:42

ए. वे. ए. ठि. शनिवार दि. २४ जुलै २०१० रोजी सकाळी बरोब्बर ११ वाजून एकूणचाळीस मिनिटे नि तेहेतीस सेकंदाने चालू होईल. व ते संध्याकाळी पाच वाजून सतरा मिनिटे नि एकवीस सेकंदांनी संपेल.
या वेळा बंधनकारक नाहीत. कंटाळा आल्यास आधी गेले तरी चालेल, किंवा गंमत वाटत असेल तर थांबले तरी चालेल.
पोशाख :
भारतीय सणासुदीचा

पत्ता : स्वाती आंबोळे ह्यांच्या घरी. सर्वाना इ-मेल केला आहे. नाही मिळाल्यास स्वातीना इ-मेल पाठवा.

gtg_list२.JPG

Group content visibility: 
Public - accessible to all site users

हो हो. अजूनही येण्याचं नक्की नाही. पण आले तर चहा-कॉफी माझ्याकडून.

मी काय म्हणते, एक स्वयंपाकी बसवा मागच्या आंगणात गरमागरम भाकर्‍या करायला. आणि एवीतेवी काँट्रीब्यूशन द्यायचंच, तर सगळाच स्वयंपाक करून घ्या. (मी ऊं शे हा) Proud

<केदार, तू लांबून येतो आहेस, त्यामुळे उगाच काही आणायला धावपळ करू नकोस.
(आपली उपस्थिती हाच आमचा संतोष!>

अनुमोदन. नाहीतरी इथे संतोष नावाचे कुणि नव्हतेच.

मृण्मयि, अहो, चहा कॉफी आहे इथेच, उगीच कशाला?
आणि भाकर्‍या आहेत पण झुणका नाही? मग रावण पिठले नि ठेचा खातात का भाकरीबरोबर?
नाहीतर कच्चा कांदा आहेच. अनेकदा कांदाभाकर शब्द ऐकला होता, पण कधी खायला मिळाला नाही हो पोटभर! (डोळे पाणावले ना माझी गरीबी म्हणा किंवा भारतापासून दूर गेल्याने झालेले हाल ऐकून म्हणा!)एक घास कांदा भाकर खाऊन आपण महाराष्ट्रातल्या शेतकर्‍यांबरोबर भावनिक ऐक्य साधू! (आधी हनि व्होडका, बीअर, मार्गरिटा, नंतर चिकन, भरली वांगी, जिलबी आहेतच. )

कांदा भजी ची कल्पना उत्तम. बटाटे वडे? 'गरम मसाला ' मधून घेऊन येऊ का?' पान कुठे मिळे? की सब्जीमंडीतले चालेल?

लालू.. वड्यांचे नाव ऐकून तुझ्या वेण्या उभ्या राहिल्या का ? Proud
केदार.. मला पाठवू नकोस.. पण गटगला जाताना ने(च).. Happy

गरम मसालातून आणायचं म्हणतायत ना झक्की, म्ग तू का करत बसतेस?
जिलब्या सिंडी आणतेय नी होममेड मलई सँडविच वृंदाताई आणतील. ( त्यांच्या नावापुढच्या जिलब्या काढा) तसंच भाकर्‍यांच्या काँट्रिमध्ये त्यांनाही धरायचंय.

सायो सांग की ...

मागवलय. मिळेल तेव्हा वाचेनच (आणि तुला देणार नाही फिदीफिदी).>>मी वाचलय आधीच. *अंगठा*

बिरडं की आमटी ह्यात अजूनही गोंधळच असल्याने आणत नाहीये कुणी Wink
लालू, >>>वडेच आणणार>>> आण की मग.
असामी, सांगुया तुलाही काय आणायचं ते.

<काय ठरला मग मेनू शेवटी?>
शेवट कुठे झाला? मागच्या वेळी साबुदाण्याची खिचडी आहे की नाही हे शेवटपर्यंत कळले नाही. आयत्या वेळी सुदैवाने बॉस्टनवासी आश्विनि यांनी खिचडी आणून उपासवाल्यांची सोय केली.
(पण तुम्हाला हे कसे माहित असणार? तुम्ही आलाच नव्हता!)

पण निदान २० जुलै पर्यंत तरी संख्या व मेनू नक्की करा! म्हणजे कमी अधिक गोष्टींची व्यवस्था करता येईल.
धन्यवाद.

असामी, झक्कींना साबुदाण्याची खिचडी हवी आहे. आण. Proud

>> बॉस्टनवासी आश्विनि यांनी खिचडी आणून उपासवाल्यांची सोय केली.
आणि एम्टीकडच्या जीटीजीला वेबमॅडमनी आणली होती. तेव्हा बोस्टनची परंपरा तुला सांभाळायला हवी. Proud

हो, पण त्याऐवजी काय ते ठरलं नाही. Proud
प्रत्येक पदार्थापुढेपण अनिश्चित असं लिहायला हवं बहुतेक. Proud

Pages