न्यु जर्सी ए.वे.ए.ठी. अर्थात बाराकरांचा जी. टी. जी. २४ जुलै २०१०

Submitted by अनिलभाई on 21 May, 2010 - 20:42

ए. वे. ए. ठि. शनिवार दि. २४ जुलै २०१० रोजी सकाळी बरोब्बर ११ वाजून एकूणचाळीस मिनिटे नि तेहेतीस सेकंदाने चालू होईल. व ते संध्याकाळी पाच वाजून सतरा मिनिटे नि एकवीस सेकंदांनी संपेल.
या वेळा बंधनकारक नाहीत. कंटाळा आल्यास आधी गेले तरी चालेल, किंवा गंमत वाटत असेल तर थांबले तरी चालेल.
पोशाख :
भारतीय सणासुदीचा

पत्ता : स्वाती आंबोळे ह्यांच्या घरी. सर्वाना इ-मेल केला आहे. नाही मिळाल्यास स्वातीना इ-मेल पाठवा.

gtg_list२.JPG

Group content visibility: 
Public - accessible to all site users

एव्हढे पदार्थ आणणार म्हंटल्यावर खायला तीस लोक तरी लागतीलच << नांव ठिक आहेत.. पण चमचा चमचा भर आणले तर दोघानाही पुरणार नाहीत... Happy

तीन तासात १०५ नवीन पोष्टी!! अरे एवेएठीला बोलायला काहीतरी शिल्लक ठेवा की..

सर्वांनी येताना मैत्रिणी घेऊन या. मी बोलेन सर्वांशी. तसेच सर्व नवर्‍यांवर लक्ष पण ठेवेन की कोणी त्या मैत्रिणींशी बोलत तर नाहीये ना.. Proud

वृंदा यांची मेल आली आहे मला. त्या mixed कडधान्याची रसवाली उसळ / जिलेबी (राजभोग / BAPs ची ready made ) / मलई sandhwiches (homemade ) / पुरणाचे कडबू यांपैकी काय आणू असं विचारतायत.

प्राची एक कोथिंबीरी चं लोणचं करून आणणार आहे असंही लिहिलंय.

जर आपल्या २ नॉन व्हेज (चिकन, फिश) आणि ३ व्हेज (भरली वांगी, १ पालेभाजी, रावणपिठलं) डिशेस होणार असतील तर त्यांना उसळीपेक्षा गोडाचंच काहीतरी सांगावं का?

(त्या अफलातून सुगरण आहेत हे बाराच्या बशीतून प्रवास केलेल्यांना प्रत्यक्ष आणि बाकीच्यांना वृत्तांतावरून माहीत आहेच.) Happy

त्या mixed कडधान्याची रसवाली उसळ / जिलेबी (राजभोग / BAPs ची ready made ) / मलई sandhwiches (homemade ) / पुरणाचे कडबू यांपैकी काय आणू असं विचारतायत. >>>>>>
त्या अफलातून सुगरण आहेत >>>>>>

मग सगळच सांग आणायला त्यांना.. Proud

फक्त चारच ऑप्शन दिले त्यांनी? Sad

उसळीपेक्षा गोडाचंच काहीतरी सांगावं का? हो....

(त्या माझ्याबरोबर येणार आहेत.. तेव्हा चव घ्यायला मी पहिला ) Happy

उरलेली मलई सॅड्विचेस आणि कडबू मला पाठवा. Proud

ड्रेस्कोड? स्वाती, मी म्हर्‍हाट्मोळ्या बाया-बाप्यांना भेटायला आलेली, जीन्स टीशर्टातली फारेनर बाई बनून येईन (आलेच तर!) Proud

मी तर म्हणेन की गेल्या वेळी येणार म्हणून नंतर कॅन्सल केलं म्हणून मृ ला फ्लोरिडातूनच नऊवारी, नथ वगैरे घालून यायची शिक्षा द्यावी.

मृ, लई *ट दिसतं. विग लाव एक दिवस नी घट्ट आंबाडा घाल. गिटसच्या उपमाच्या अ‍ॅड मध्ये कोण आहे ती मराठी मुलगी? मस्त दिसते ती.

सायो, फोटो टाक.

स्वाती, टकमका बघत, तोंडाला पदर लावून, फसाफसा हसत, कानात कुजबुज. Proud

बरं आता गेम्स काय काय असणार आहेत त्याबद्दल बोला. नवीन काहीतरी शोधा.

देसाई, मावशी बनणार आहेत तर मग मला पेंद्या, लोंद्या गोंद्या काहीही चालेल. आपण कलेशी (कलाबाई नाही) इमानी! Proud

मग रस्ता दाखवा! हेटाळणी पुरे!
अरे, कोणी तरी एखादी रानभाजी बोले तो शेवाळ्याची भाजी वगैरे करुन आणा रे! मायबोली थीम ला साजेसं होइल अगदी.

काही प्रश्नः
'सिम' यांचे काय झाले?
>> 'सिम' (प्राची) येणार आहे.
ए.वे.ए.ठी.च्या मेनूत अमच्या तर्फे: कोथिंबिरीचे लोणचे, मलई सँडविचेस, जिलब्या.

बाप रे किती त्या पोस्टी !! माझ्या नावापुढे भाकरी पाहिल्या ! सुमाला फोन करून कन्फर्म करते. त्या नाही मिळाल्या तर पोळ्यांची सोय करीन. बाकी काही आणायला शिल्लकच नै बै ठेवलं तुम्ही लोकांनी Happy

Pages