न्यु जर्सी ए.वे.ए.ठी. अर्थात बाराकरांचा जी. टी. जी. २४ जुलै २०१०

Submitted by अनिलभाई on 21 May, 2010 - 20:42

ए. वे. ए. ठि. शनिवार दि. २४ जुलै २०१० रोजी सकाळी बरोब्बर ११ वाजून एकूणचाळीस मिनिटे नि तेहेतीस सेकंदाने चालू होईल. व ते संध्याकाळी पाच वाजून सतरा मिनिटे नि एकवीस सेकंदांनी संपेल.
या वेळा बंधनकारक नाहीत. कंटाळा आल्यास आधी गेले तरी चालेल, किंवा गंमत वाटत असेल तर थांबले तरी चालेल.
पोशाख :
भारतीय सणासुदीचा

पत्ता : स्वाती आंबोळे ह्यांच्या घरी. सर्वाना इ-मेल केला आहे. नाही मिळाल्यास स्वातीना इ-मेल पाठवा.

gtg_list२.JPG

Group content visibility: 
Public - accessible to all site users

<गोरेपान झक्की काळवंडलेत का एवढे?>
आत्ता आठवले. त्याकाळी आम्ही महाराजांच्या बरोबर निरनिराळे गड सर करायला उन्हातान्हाची पर्वा न करता मावळात भटकत असू! तेंव्हा मिशापण चांगल्या कळ्याभोर होत्या!

<तंदुरी रोटी आणि नान आणि भाकरीमधला फरक नक्कीच समजत असेल>

त्या बाबतीत आम्ही भेदभाव करत नाही. मिळेल त्या पालेभाजीबरोबर (अगदी शेपू असो किंवा आंबटचुका असो), तीहि नसल्यास कच्च्या कांद्याबरोबर सगळेच मोठ्या प्रेमाने खातो! नाहीतरी कुठली पालेभाजी कुठली हे तरी कुठे ओळखता येते! आम्हाला सर्व पालेभाज्या सुद्धा समान!

प्रत्येक बाई काहीतरी वेगळंच करतेय.. >> भारतातून कलाकार बोलावल्यावर असंच होणार.. Proud Light 1

लेफ्टून दोन नंबरच्या बाईंनी जोरात ताल धरलाय! >> Lol हो, त्या बाईने चेहरापण एकदम विचित्र केलाय.. विंगेत कोणालातरी डोळा मारतीये असं वाटतंय.. Proud

झक्की तुम्ही जीटीजीला मावळ पोषाख घालून या. दाढी, मिशा, केस सगळं काळेभोर रंगवून या.

सायो, त्या चालीवर नाही गं.
'चल गं सये वारुळाला वारुळाला वारुळाला गं.. नागोबाला पुजायाला पुजायाला पुजायाला गं' हे ऐकलंय्स का?
(हे जास्त औचित्यपूर्ण नाही का? :P)

नात्या, जीटीजीला ये. Happy
(उग्गाच कमेन्ट्स नकोत! :P)

<भारतातून कलाकार बोलावल्यावर असंच होणार>
फचिन, माझे वाक्य तुम्ही लिहीलेत! म्हणूनच तुम्हाला सिनेमात घेत नाहीत!!

हे नागोबा, ढवळ्या पवळ्या आमच्याकडे नाहीत, बँबी येईल कदाचित्. (बँबी कसली, बँबो आहे!)

हे नागोबा, ढवळ्या पवळ्या आमच्याकडे नाहीत
>> हो ना, झक्की काय शेतकरी आहेत का? त्यांच्या घराच्या मागे आहे ते बॅकयार्ड आहे, शेत नाही. Proud

दृष्ट लागली तुम्हा सर्वांची! यंदा एकच टोमॅटोचे झाड. नि तेहि बहुधा तुम्ही येइस्तवर मेलेले असेल!

आता पुढल्या वर्षी बघू!

धोतरा समूळ उपटून टाकला. पण आता वाटते, ठेवायला पाहिजे होता. म्हणजे कुणि कुणाला नागोबा, ढवळ्या पवळ्या वगैरे म्हणाले तर त्यांच्या पालेभाजीत हळूच मिसळून द्यायचा!

अस्सं! आमच्या घरी येणार आहात, परत जायचे आहे ना सुखरूप?>>>>>> झक्की, एकदम सुर्यकांत ष्टाइलीत डोळे बारिक करुन "अस्सं" म्हणताना डोळ्यापुढे आले Proud

केदारकरबुवांचे ह्या वेळी त्यावर प्रवचन असणार आहेत त्यामुळे शिताबाईंबद्दल माहिती ए वे ए ठि लाच मिळेल.

यावेळी लहान पोरं , नवरे असलं सामान कुणी बरोबर आणणार आहे का? Happy तसं असेल तर मग अमच्या घरच्या पब्लिकही ला विचारते.

माझा नवरा येणार आहे बहुतेक. तेव्हा ३ अनिश्चित धरा. भाकरीचे काँट्री पर हेड घ्या Happy तो आला तर छोटं पार्सल पण येइलच. त्यामुळे फचिनसाठी १ भाकरी जास्त आणा Proud

Pages