न्यु जर्सी ए.वे.ए.ठी. अर्थात बाराकरांचा जी. टी. जी. २४ जुलै २०१०

Submitted by अनिलभाई on 21 May, 2010 - 20:42

ए. वे. ए. ठि. शनिवार दि. २४ जुलै २०१० रोजी सकाळी बरोब्बर ११ वाजून एकूणचाळीस मिनिटे नि तेहेतीस सेकंदाने चालू होईल. व ते संध्याकाळी पाच वाजून सतरा मिनिटे नि एकवीस सेकंदांनी संपेल.
या वेळा बंधनकारक नाहीत. कंटाळा आल्यास आधी गेले तरी चालेल, किंवा गंमत वाटत असेल तर थांबले तरी चालेल.
पोशाख :
भारतीय सणासुदीचा

पत्ता : स्वाती आंबोळे ह्यांच्या घरी. सर्वाना इ-मेल केला आहे. नाही मिळाल्यास स्वातीना इ-मेल पाठवा.

gtg_list२.JPG

Group content visibility: 
Public - accessible to all site users

धोतराचं माहित आहे मला.. त्याच्यानंतर बुवांनी झक्कींना नउवारीची लिंक विचारली होती. त्याच्याबद्दल म्हणतोय मी. म्हणूनच म्हणालो की बुवा नक्की काय नेसून येणार आहेत माहीत नाही.

भाई रुळावरून गाडी घसरतेय.. ब्रेक लावा Happy

आता कार्यक्रम ठरवा... म्हणजे प्रत्येकाने काहीतरी जबाबदारी घ्या ....

गेम्स काय काय खेळायचे?. लगोरी, विटी दांडु, क्रिकेट..
आता धोतर नेसुन खेळायच म्हणजे बैठे खेळच खेळावे लागतील. Happy

अमॄता भावे.. पेट का दुष्मन हाय हाय,
मेरी जान की दुष्मन हाय हाय हाय हाय,
झक्की और सगळे राजी,
फिर भी ना माने भावेजी,
वो दिल को तोडे, हाय हाय ना छोडे,
वो जलती जाये बाराके गटगपर,
अमॄता भावे.. पेट का दुष्मन हाय हाय, Lol

हॉर्स शू टॉस, बॅडमिंटन (चांगले शटल आणले आहे.) बेसबॉल बॅट, मिट्स, बॉल आहे.
गोल खो खो, लंगडी, लगोरी!

परदेसाई, अनिलभाईंचे उ. उ. विनोद! स्वाती_आंबोळे, वैद्यबुवा यांची गाणी. इ. इ.

मी हिंदी सिनेमातली गाणी लावतो, खरे तर लग्नात नाचायला योग्य अश्या गाण्यांची एक सिडि पण माझ्याकडे आहे. कुणाला नाचायचे असल्यास.

तेंव्हा इतर कार्यक्रमांची काळजी नको, असे वाटते.

सापडेच ना हा बाफ!

एवेएठीकरांसाठी सूचना :

अ. पोषाख - पुरुषांसाठी पर्याय :
> धोतर, बाराबंदी, चढाव, अक्कडबाज मिशा, कानात भिकबाळी मस्ट!
> सुरवार, अंगरखा, जिरेटोप, चढाव, दाढी आणि मिशा मस्ट!
> धोतर, बंडी, मुंडासं, पायात कडे, हातात सलकडे, अनवाणी येणे व सोबत पेट गाढव आणणे मस्ट!
> लुंगीवजा रुमाल, बंडी, डोक्याला रुमाल. कोळीनृत्य करून दाखवणे मस्ट!
> वल्कलं - फ्रीफॉर्म.

ब. पोषाख - स्त्रियांसाठी पर्याय :
> कोणत्याही पद्धतीने नेसलेली नऊवारी साडी. केसांचा खोपा किंवा अंबाडा. अमेरिकन क्वार्टरच्या नाण्याएवढे कुंकू किंवा चंद्रकोर. जमतील तितके जाचक दागिने. नथ मस्ट!
> सुरवार, अंगरखा, फेटा, पाठीला मुलाला बांधून आणणे मस्ट!
> वल्कलं - फ्रीफॉर्म.

हुकुमावरोन.
Proud

>>पाठीला मुलाला बांधून आणणे मस्ट!>>> का म्हणून बायकांनाच जाच? Proud
>>लोकांबद्दल न बोललेले बरे!>>> हो,हो. न झेपणार्‍या लोकांबद्दल न बोललेलंच बरं. Wink
एक सूचना: ज्यांना मेन मेन्युत आणण्यासारखे पदार्थ शिल्लक नाहीत त्यांना स्टार्टर्स ची सोय केली तर?(उदा: शोनू, मै)

स्वाती, ती भाकर्‍या सुमाकडून पिकप करुन आणेल, असं आहे ना ते? Uhoh
डोळ्यासमोर मै चौकडीची नव्वारी साडी, खणाचा ब्लाऊज,अंबाडा घालून चुलीसमोर 'आधी हाताला चटके तेव्हा मिळते भाकर' हे गाणं म्हणत भाकर्‍या बडवतेय असं दृष्य आलं. Biggrin

धोतर, बंडी, मुंडासं, पायात कडे, हातात सलकडे, अनवाणी येणे व सोबत पेट गाढव आणणे मस्ट!>>>>>> बाकी काही नाही जमलं तरी माझं (पापी) पेट गाढव नक्कीच घेऊन येइन. Proud
बाकी हवा जोरात आहे नाही आज? Proud

सायो, हो - पण म्हणजे एका पदार्थाची जबाबदारी ऑलरेडी आहे ना तिच्याकडे, असं.
रूनि, विकु, शोनू - हे आणू देत स्टार्टर्स?

ऐका हो ऐका!!!!! Happy
आता ५ मिनीटापुर्वी, माझ्या ब्वॉस नी हन्नी वोडका माझ्या ताब्यात दिलेली आहे!!!!! Happy
मी ही बाटली घेवून येइनच पण आणखिन हवी असल्यात $४५ प्रती बाटली लागतील. कोणाला इंटरेस्ट असल्यास नक्की सांगा, मी खरेदी करुन ठेविन. बाकी ही एकदम होममेड पोलिश वोडका आहे. ग्रेन अल्कोहोल आणि मध वापरुन केलेली.

Lol माझ्या नाही कै. त्या सुमाच्या हाताला चटके. (तेही अजून कुठे नक्की माहितीय!)
ड्रेस कोड भारी आहे पण ! मला तर कल्पनाच करवत नाहिये नौवारी, अन बरोबर न्यूयॉर्क स्टाईल "हळदीकुंकू" Lol

आणि हो, इथे सांगण्यात संकोच वाटत असल्यास, इमेलनी कळवा. ए वे ए ठि ला माझ्या गाडीच्या ट्रंकातून संपुर्ण गोपनीयतेची हमी देऊन वितरण करणेत येइल. Proud
अजुन कोणाला हाफ हवी असल्यास शेअर करता येइल. तो फिर है क्या रे कोइ? भाई कुठे गेले ?

Pages