न्यु जर्सी ए.वे.ए.ठी. अर्थात बाराकरांचा जी. टी. जी. २४ जुलै २०१०

Submitted by अनिलभाई on 21 May, 2010 - 20:42

ए. वे. ए. ठि. शनिवार दि. २४ जुलै २०१० रोजी सकाळी बरोब्बर ११ वाजून एकूणचाळीस मिनिटे नि तेहेतीस सेकंदाने चालू होईल. व ते संध्याकाळी पाच वाजून सतरा मिनिटे नि एकवीस सेकंदांनी संपेल.
या वेळा बंधनकारक नाहीत. कंटाळा आल्यास आधी गेले तरी चालेल, किंवा गंमत वाटत असेल तर थांबले तरी चालेल.
पोशाख :
भारतीय सणासुदीचा

पत्ता : स्वाती आंबोळे ह्यांच्या घरी. सर्वाना इ-मेल केला आहे. नाही मिळाल्यास स्वातीना इ-मेल पाठवा.

gtg_list२.JPG

Group content visibility: 
Public - accessible to all site users

कणसं नको!
डीजे, Proud
सायो, काही कन्फ्यूजन नाही आहे. रुनि वाल सोलायला मदत करायला आली तर मी बिरडं आणेन.
मी झुणका आणते म्हटलं तर बाई नको म्हणाल्या. आणते मग.

लालू, तुला नव्हे, बाकी ज्यांच्या नावावर काही नाहीये त्यांनी आणलं तरी चालेल. तू ऑलरेडी बव आणत्येस ना? मग डबल कशाला?

मृण आली तर तिला बिरडं आणायला सांगा चहाकॉफीपेक्षा. (तिला दोन हातांनी पटापट सालं काढता येतात म्हणे. कडधान्यांची.) Proud
एम्टी झुणका आणणार आहे का? की आंबा शिरा?
भात, आमटी / कढी यांपैकी काही नाही ठेवायचंय का?

बाकी अजूनतरी १६च लोकं निश्चित. तीही होष्ट धरून. त्यामानाने खूपच पदार्थ होतायत का?

अरे किती बदल होतायत इथे! बर मग मी पिठलं आणू शकते किंवा आंब्याचा शिरा ("किंवा" या शब्दाची नोन्द घ्यावी Proud ). काय ते सुचवा.

झुणका म्हणजेच (कोरडं) पिठलं ना ? ठाण्याला पोळी-भाजी केंद्रात तरी कांदा घातलेलं कोरडं पिठलच मिळायचं झुणका नावाने.

माझ्यामते नाही. आमच्याकडे झुणका होतच नाही कधी. नेहमी डाळीचं पिठलं आणि कुळथाचं पिठलंच होतं. दोन्ही जरा पातळच असतं.

<झुणका म्हणजेच कोरडं पिठलं.>
म्हणजेच रावणपिठले का?
कुळथाच्या पातळ पिठल्याला 'राम पिठले' म्हणता का?
आम्ही कणसांना 'बाजीराव कणसे' म्हणतो. कारण बाजीराव कणसे खात असे! त्यामुळे कसा तो शूर वीर झाला, त्याला मस्तानी मिळाली नसती तर भारतात इंग्रज कधीहि येऊ शकले नसते, नि आज आपण सगळे मराठीत बोललो असतो!

आम्ही कणसांना 'बाजीराव कणसे' म्हणतो. कारण बाजीराव कणसे खात असे! त्यामुळे कसा तो शूर वीर झाला, त्याला मस्तानी मिळाली नसती तर भारतात इंग्रज कधीहि येऊ शकले नसते, नि आज आपण सगळे मराठीत बोललो असतो!>>>>>>>>>>>>>>>>> Rofl
गाडी पार एका दमात सियाचेन हून कन्याकूमारी पर्यंत गेली!!!!!!! झक्की, धन्य आहात तुम्ही!!!!!! Lol

त्याला मस्तानी मिळाली नसती <<<< मस्तानी नावाचे एक पेय असते ... ते कावर्‍यांकडे मिळते... माणसाने 'कावरे' असू नये.. त्यामुळे डोके पिकू शकते.. पिकलेला आंबा गोड असतो... आंब्याचे लोणचे पण करतात.. त्यात खार असतो... खार भराभरा झाडावर चढते.... Happy Happy

देसाई, त्यांनी लावलेली कनेकशनं अधिक रोमांचकारक असतात पण! Proud आपण तसली लावली की मजा येत नाही.

हात नि तोंड, डोक्यापेक्षा तुफान जास्त वेगाने चालतात. संदर्भ, अर्थ, पुरावा, सत्यता, योग्यता असे निष्कर्ष माझ्या लिखाणाला लावून मी माझे अभिव्यक्ति स्वातंत्र्य धोक्यात आणू इच्छित नाही!

झक्की, बास करा आता! मा गरिब मानुस हापिसात क्युबिकलात बसतो! बावळटासारखा अजुन हसलो तर नोकरी वर गदा येइल माझ्या!!! Lol

त्वरा करा! त्वरा करा!!
याल तर गरमागरम झुणकाभाकर खाल. न याल तर पस्तावाल!

ए.वे.ए.ठी - झलक १ (अर्थात् भाकरीचा आग्रह करणारे झक्की) :

zakee_bhaakaree.jpg

<तिला दोन हातांनी पटापट सालं काढता येतात म्हणे. कडधान्यांची >

आणखी दोन हातांनी त्याच वेळी त्या फिरत्या चाकावरती देती मातीला आकार. पायाखाली चंड मुंड राक्षस रगडतात.

तोंडाने विश्वाचे अफाट कोडे उलगडून सांगत असतात.

अश्या चतुर्भुज देवीला आपण सगळे नमस्कार करू!
(नाहीतर कडधान्याची ऐवजी नि चंड मुंड राक्षसांच्या ऐवजी आपल्यातले काही दिसतील!)
Happy Light 1

Pages