न्यु जर्सी ए.वे.ए.ठी. अर्थात बाराकरांचा जी. टी. जी. २४ जुलै २०१०

Submitted by अनिलभाई on 21 May, 2010 - 20:42

ए. वे. ए. ठि. शनिवार दि. २४ जुलै २०१० रोजी सकाळी बरोब्बर ११ वाजून एकूणचाळीस मिनिटे नि तेहेतीस सेकंदाने चालू होईल. व ते संध्याकाळी पाच वाजून सतरा मिनिटे नि एकवीस सेकंदांनी संपेल.
या वेळा बंधनकारक नाहीत. कंटाळा आल्यास आधी गेले तरी चालेल, किंवा गंमत वाटत असेल तर थांबले तरी चालेल.
पोशाख :
भारतीय सणासुदीचा

पत्ता : स्वाती आंबोळे ह्यांच्या घरी. सर्वाना इ-मेल केला आहे. नाही मिळाल्यास स्वातीना इ-मेल पाठवा.

gtg_list२.JPG

Group content visibility: 
Public - accessible to all site users

चांदीची ताटं मिळणार आहेत का? << मॄ तो प्रश्न काय करताय असा आहे.. मिळणारेत असं कुणी म्हटलेलं नाही...
'चांदीची ताटं जेवायला वापरतोय..' , नाहीतर 'चांदीचं ताट उशाला घेऊन झोपतो' असं काहीही उत्तर असू शकतं त्या प्रश्नाचं.. Lol

चांदीच्या ताटांचे तसे बरेच काही काही करता येईल. तेंव्हा काळजी नसावी.

पण यंदा लाडवांशिवाय संमेलन होणार का?

कुणाजवळ एस यू व्ही आहे का? ते एस यू व्ही घेऊन लवकर येऊ शकतील का? म्हणजे भाड्याची टेबले नि खुर्च्या आणायला सोपे जाईल. फक्त २० मिनिटात जाऊन, टेबले, खुर्च्या लोड करून घरी परत येता येईल. तेंव्हा ११ वाजेस्तवर आलात तरी चालेल.

धन्यवाद.

>> पण यंदा लाडवांशिवाय संमेलन होणार का?

laadoo.jpg

जराशाने डब्यात भरून ठेवा.
जिलब्या यायच्यात. बाकी करंज्या, अनरसे, घीवर वगैरे तुम्ही आणा. Proud

इथे भेट देणार्‍या, रोमातल्या सर्व मंडळींनी अनुमती, नाराजी जाहीर करावी.
एक विचारः आपला मेन मेन्यू भाकरी आहे आणि बर्‍याच जणांकरता भाकरीही बर्‍याच लागतील. सुमा किती चार्ज करतील माहित नाही पण जे काय असतील ते आपण काँट्रिब्युशन काढून वाटून घ्यावेत का? जे कोण ऑर्डर करेल ते त्याचवेळी चार्ज विचारेल आणि मग इथे पोस्ट करु. साऊथहून येणार्‍या मंडळींना (भाई,देसाई, मैत्रेयी) तिथून घेऊन यायला हरकत नाही ना?

हो कॉन्ट्री काढा.
(पण तू किती भाकरी खाणार हा प्रश्न जाहिर विचारु नका. Proud )

बरं तो अति गोड मैसुरपाक बदलून मी दुसर काही आणू का? (पग्या येत नाही म्हणे).

विड्याची पानं. देवॉनला गुरुवारी जाता येणार नाही कारण मी गुरुवारी दुसर्‍या गावात असेन, मग रात्री शिकागो, अन लगेच शुक्रवारी दुपारी NY कडे. त्यामुळे देवॉनला जाउन येणे होणार नाही, नाहीतर आणले असते.

दुसरे काही चालेल जे मला आधिच आणता येईल असे. ( किंवा पानं तिथे मिळणार असतील तर कोणी आणत असेल तर आर्थिक भार मी उचलेन. )

अय अरे, येवढ काय च्यामारी अर्थसहाय्याचे घेऊन बसलाय. इथे कोणातच अर्थ नाहीये. तश्रिफ नीट न्यु यॉर्का पर्यंत आणायचं बघ फक्त.

केदार, तू लांबून येतो आहेस, त्यामुळे उगाच काही आणायला धावपळ करू नकोस.
(आपली उपस्थिती हाच आमचा संतोष! :P)

पण मग पान इथून येणारं कुणीतरी आणू शकेल की.
झक्कींच्या बॅकयार्डात पान खाऊन लांब पिंक मारण्याची काँपिटिशन करुयात. Happy

(आपली उपस्थिती हाच आमचा संतोष! >>>>>>> मला तर तो "संतोष, गॅस चालू कर.." वाला संतोष आठवला. अजुनही आठवलं की हसायला येतं मला. Lol

झक्की (२) चिप्स वगैरे
केदार---
विकु
अनिलभाई काहीतरी सी फुड
परदेसाई काहीतरी
वैद्यबुवा चिकन, पोळ्या
स्वाती पालेभाजी
सिंड्रेला--- जिलेबी?
सायो- भरली वांगी, कांद्याची चटणी
फचिन - कणसं, पार्टीचे सामान
लालू बिर्याणी
रुनि
मैत्रेयि - भाकर्‍या(पिकप)
वॄंदा + प्राची कोथिंबिरीचे लोणचे, मलई सँडविचेस, जिलब्या.
पग्या : बाकरवडी
मृण : चहा कॉफी

बिर्याणी या मेनूत बरोबर वाटत्ये का तुम्हाला?
तसंच इतका मराठी मेनू आणि कांदाभजी नाहीत?

मृण आली तर चहाकॉफी तिच्याकडून आहे. (नाहीतर मग झक्कींकडून. :P)

Pages