इथे खालील मुद्यांवर चर्चा / अनुभव अपेक्षीत आहे. शक्यतो उपदेशापेक्षा (काय करायला हवं वगैरेंचे डोस) अनुभव लिहा. आपण विचारांती काय निर्णय घेतला, का घेतला आणि तो कसा निभावतो आहोत.
- तुम्ही भारतात का परतलात, परतावसं का वाटलं (नक्की प्राण का तळमळला?) परतल्यावर आता कसं वाटतय ? (व्यक्तिगत बरेवाईट अनुभव, ठेचा, विचारमंथन).
-- तळ्यात मळ्यात- परतावसं वाटतय, हिम्मत होत नाही? दोलायमान परिस्थिती आहे? नवराबायकोपैकी एक अत्यंत नाखुष आहे ?
- परततानाची चेकलिस्ट ( काय करावे आणि करु नये)
- केल्याने देशाटन परदेशात काय मिळवलं, काय गमावलं
-भारतातील संधी, नोकरी, व्यवसाय, आर्थिक परिस्थितीचा आढावा (अनुभव), वर्क लाईफ बॅलन्स (व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्याला देता येणारा वेळ)
- मुलं आणि तदनुषंगिक शेकडो गोष्टी ( शाळा, शैक्षणिक पद्धत, पाल्याचा सर्वांगीण विकास, भाषांचा सराव, गणिताचा सराव, वातावरणाचा सराव)
- वृद्ध होत चाललेल्या मातापित्यांची जवाबदारी. पुन्हा एकत्र आल्यावरचे अनुभव. त्यांच्या दृष्टीकोनातून तुमचे परदेशगमन आणि पुनरागमन.
- समाजाचे देणे
- दोहोंचा अनुभव घेतल्यावर आता काय करायचा मानस आहे ?
खरयं, काय प्रचंड भाव वाढलेत
खरयं, काय प्रचंड भाव वाढलेत जागेंचे भारतात, पुणे, मुंबई तर विचारता सोय नाही. नोकरी धंदा करणारे आपल्या सारखेच (आर्थिक दृष्ट्या) इतके लोकं दिसतात आजु बाजुला पण घर घेणं परवडत नाही, मग ह्या जागांमध्यी राहातात तरी कोण आणि काय करतात असा प्रश्न पडतो
. असो, माझ्यामते थोडं लांब जरी असलं तरी स्वतःचं घर घेणच उत्तम. आता नोकरी धंदा जोमानी करायचं वय आहे तेव्हा पुढच्या १५-२० वर्षात घराचं कर्ज फिटलं की मग निश्चिंती. रिटायरमेंट जवळ आल्यावर ४०-५० हजार (२० वर्षांनंतर लाख सव्वा लाख) फक्त घरभाड्याच्या नावानी टाकणं जरा अवघड आहे.
इथले किमती बद्द्लचे पोस्ट
इथले किमती बद्द्लचे पोस्ट दुसर्या बाफ वर हलवले आहे.
इथे घर घेऊन घरघर
इथे घर घेऊन घरघर लागन्यापेक्षा इतक्या पैशात ग्रामीण भागात ५-१० एकर जमीन घेउण शेती सुरु करावी अस मला वाटाल्यला लागलेय!
सध्या इथे पण टीजर होम लोन ची
सध्या इथे पण टीजर होम लोन ची सुरुवात होत आहे. घातक. काल एक जाहिरात पाहिली. होम लोन पक्के निगोशीएट करावे लागेल.
टीजर होम लोन म्हणजे काय मामी?
टीजर होम लोन म्हणजे काय मामी? एका घरावर दुसर्या घराचे लोन घेणे तर नाही ना? तसे असेल तर घातकच!
रिटायरमेंटपर्यंत भाड्याने
रिटायरमेंटपर्यंत भाड्याने रहावे आणि गावात/ दूरवर एखादा प्लॉट घेऊन ठेवावा.. रिटायरमेंटच्या आसपास घर बांधावे... आणि सरळ गावात जाऊन रहावे.. हे मला भले वाटायला लागलेय.
चंपका अगदी अगदी रे..
वरिल किमतींचे आकडे
वरिल किमतींचे आकडे बघितल्यावर, भारतात (मुंबई, पुणे तसेच आसपासचा परिसर) घर घेण्याच्या शर्यती मधुन मी बाद झालो :स्मित:...
वत्सला: मला जेवढे माहीत आहे
वत्सला: मला जेवढे माहीत आहे ते लिहीत आहे. जाण्कार खुद्द अमेरिकेतच आहेत.
डीटेल वारी माहिती नेट्वर आहे पण हे असे होम लोन असतात ज्यात पहिले कॅपीट्ल कापून घेत नाहीत. व अतिशय आकर्षक हप्ता ठेवतात. फक्त व्याज कापुन घेतले जाते. डयुरेशन ही वीस ऐवजी पंचवीस वरषे असते. अशाने लोक
होम लोन घेतात. मग जेव्हा कॅपिट्ल पण वसूल करतात तेव्हा एकदम हप्ता वर जातो. अमेरिकेत हे मॉर्टगेज क्रायसिस म्हणुन सर्च केले तर चान्गली माहिती मिळेल. तिथे काय झाले कि जे लोक खरेतर एलिजिबल नव्हते त्यांनी ग्रुहकर्जे घेतली व नंतर फेडता आली नाहीत तेव्हा ब्यांकेने घरातून काढले. याचा परीणाम एकूणच घरांच्या किमती घसरल्या व लोकांचे नुकसान झाले. वाढलेला हप्ता पे करण्याची बर्याच लोकांची ऐपत नव्हती. ही कर्जे एकत्र करून त्यांचे सीओडी बनवून भिन्त रस्त्यावर त्याचे ट्रेडिन्ग करण्यात आले. ....... खूप मोठी स्टोरी आहे.
हा या बीबीचा विषय नाही. पण या स्कीम्स्चे दूरगामी वैश्विक वाइट परीणाम झाले.
आज सगळी पोस्ट्स वाचली. अदिती,
आज सगळी पोस्ट्स वाचली. अदिती, मिल्या, पूनम छान आणि रैना मस्त ठेवलायस ह्या बीबीचा टोन.
चंपक, एक प्रश्न आहे. खेड्याकडे चला म्हणताय पण ते खरचं करतायेण्याजोगं आहे का? आज खेड्यांत दवाखाने, शिक्षण ह्या मूलभूत गरजा शहराच्या कितीतरी व्यस्त प्रमाणात आहेत ना? पुन्हा तोच मुद्दा मांडतोय, जेव्हा स्थिरावण्याचा प्रश्न येतो तेव्हा तुम्ही फक्त तुमचा विचार करुन कसं चालेल, मागच्या पिढीला (आई वडिल) आरोग्याच्या सुविधा आणि पुढच्या पिढीस (मुलं) शिक्षणाच्या सुविधा बघणं ही आपली जबाबदारी नाही का?
नि, तुझा जागेच्या किंमतीबाबतचा मुद्दा बरोबर आहे, पण बहुतेक जण आता आपण तरुण आहोत तर जास्त मेहनत (उदा. रोजचा प्रवास) करु, लांब का असेना पण स्वतःच्या मालकीच्या घरात राहू (म्हणजे स्थैर्याचा प्रश्न सुटेल) आणि निवृत्तीच्या वेळेस राहाते घर विकू, त्याच्या इक्विटीचा फायदा घेऊ असा विचार करतात, कारण रेंट भरलेले पैसे तसेच जातात ह्याउलट तुमच्या घरात तुमची चांगली गुंतवणूक (भावनिक तसेच आर्थिक) होऊ शकते. हा काही ह्या बीबीचा मुद्दा नाही पण घरांबद्दल किंमतींबद्दल बोललं जातय म्हणून म्हटलं.
धन्स मामी.
धन्स मामी.
नानबा, वर नीधप म्हणाली तसेच
नानबा, वर नीधप म्हणाली तसेच जागांचे रेटस कायच्या काय वाढलेत मुंबईत. पार्ला, सांताक्रुज या सारख्या ठीकाणी रहाणं म्हणजे स्वप्नच झालंय.
>> सायो, अग माझा जीव दडपतोय हे आकडे बघून!
उपास, भारतातल्या गावांमध्येही प्रकार आहेत - आणि अगदी खेडेगाव असेल तर प्रोब्लेम येईल, पण 'गाव्'/'छोटं शहर' ह्या ठिकाणी बहुतेकदा उत्तम हॉस्पिटल्स असतातच..
चला, हे सगळं डिस्कशन वाचून मी माझ्या गावात जमीन (प्लॉट) बघतेय - तुमच्या कुणासाठी पण बघायची आहे का? (म्हणजे म्हातारपणी पुण्यातला फ्लॅट भाड्यानं देणार आणि हा पैसा पेन्शन म्हणून वापरणार!)
माझी गावच्या घराची आणि
माझी गावच्या घराची आणि पुण्यातल्या घराची सोय आहे... तेव्हा मी त्याबाबतीत निवांत!!
नानबा, तुझी विपु बघ. इथे
नानबा, तुझी विपु बघ. इथे विषयाला फाटे फुटायला नकोत. चंपकचा खेड्यात चला हा मुद्दा कितीही आकर्षक वाटला तरी प्रत्यक्षात मला तरी शक्य नाही. एकतर पूर्ण आयुष्य मुंबईत गेलेलं, परत आलोच तर नोकरीही अशाच मोठ्या शहरात. मुलांना चांगलं शिक्षण, बाकीच्या सोयी देण्याचा जो प्रयत्न असणार तो खेड्यात साध्य होईल?
रैना, चांगला बा.फ. उघडला
रैना,
चांगला बा.फ. उघडला आहेस्..(कामाच्या व्यापात वाचायला मिळत नाहीये) आमच्या सारख्या अजून "तळ्यात्-मळ्यात" असलेल्यांना ईथे ईतरांचे अनुभव वाचून खूप फायदा होईल व विचारांन्ना चांगली दीशा मिळेल असे वाटते.
शिक्षण, आरोग्य, सुरक्षा, निरोगी समाज, संधी, स्वास्थ्य हे मुद्दे महत्वाचे-जगात कुठेही राहिलात तरी, असा आमचा तरी अनुभव आहे. मला वाटते साधारण कुठल्या गोष्टि वैयक्तीक आहेत अन कुठल्या समाजावर्/प्रदेशावर अवलंबून आहेत अशी विभागणी केली तर priorities ठरवता येतात अन निर्णय घ्यायला मदत होते.
असो... जमेल तसे वाचत राहीन.
खेड्याकडे चला हे प्रथमदर्शनी
खेड्याकडे चला हे प्रथमदर्शनी आदर्शवत अन अव्यवहार्य वाटते. मी काही अगदीच काटेवाडी ला जाउन राहु असे म्हणत नाही.
१) आज पुणे मुंबई परिसर ज्या वेगाणे वाढलाय त्याचा विचार करता, मुंबई थेट पनवेल च्या ही पुढे खोपोली ला खेटली आहे. मुंबई च्या वाढीला नैसर्गीक मर्यादा आहेत. अन पुणे तर शिरुर च्या आस पास घुटमळते आहे. केवळ ऑद्योगिक च नव्हे तर रेसिडेंशियल प्रोजेक्ट पण या दुरवर च्या 'खेड्या' मध्ये जात आहेत. मी कोथरुड ला राह्त होतो, तेंव्हा तिथले लोक १० वर्शापुर्वी इथे फक्त ४ लोक राहत होतो अश्या आठवणी सांगायचे. नगर ला राहुन पुण्या ला- चाकण ला अपडाऊन करणारे लोक खुप आहेत.
२) उदा. माझ्या गावी नेवासा फाट्या वर राहुन नगर अन ऑरंगाबाद (दोन्ही प्रतेकी ५५ किमी वर आहेत) ला जा ये करणारे खुप आहेत. अन त्यामुळे माझ्या गावी ही एक गुंठा जमीन किमान २-३ लाखाला मिळते. (पुर्वी शेतजमीन ५०,००० ला एक एकर मिळायचा.पण आता ४-५ लाखला एक एकर मिळते.) पण जसे नगर, ऑरंगाबाद ला थोडा विकास झाला, तसे लोक शांत शहराबाहेर म्हणुन नेवासा फाटा ला येउ लागले. आज नेवासा फाट्या वर अनेक दावाखाने, शाळा, महाविद्यालये सुरु आहेत. प्रत्येक जिल्ह्यात अशी अनेक ठिकाणे उदयाला आली. शहरीकरण इतके वेगाने होत आहे, कि शहर अन खेडे असा भेद करणे मिळणार्या सुविधेवर नव्हे तर मुख्य शहरापासुनच्या अंतरावर ठरवायला लागेल.
शहराच्या केंद्रसथानी राहण्याची धडपड घरांच्या किमती वाढायला अप्रत्यक्ष हातभार च लावते. 'लोकेशन' ची किंमत बांधकामाच्या दर्जा पेक्षा अन इमारतीच्या सुरक्षितते पेक्षा जास्त महत्वाची ठरते. असो.
२) आरोग्य अन शैक्षणिक बाबतीत: अनेक टोलेजंग दवाखाने अन शाळा महाविद्यालये किमान पस्चिम महाराष्ट्रातील प्रत्येक तालुका पातळीवर सापडतील. ( देशातील आरोग्य अन शिक्षणाच्या दर्जाच्या बाबतीत मी काही बोलु नये अन तुम्ही काही ऐकु नये.) काही चांगले डॉक्टर अन संस्थाचालक अजुन शिल्लक आहेत इतकेच म्हणु शकतो.
मग ह्या जागांमध्यी राहातात
मग ह्या जागांमध्यी राहातात तरी कोण आणि काय करतात असा प्रश्न पडतो .>..
१.onsite जर दोघे नवरा बायको ह्यात वय २३ पासुनचए लोक येतात (मुल नसलेले) ३ वर्ष असतील तर ही घरे त्याना परवडतात. सोपे गणित आहे. onsite असताना एकाचा पगार बचत करायचा आनि दुसरर्याचा खर्च करायचा .tax कापला जाउन महिअना लोकांचे ३०००/३५०० डोलरची बचत होते.परत आल्यावर ही सगळी रक्कम flat मधे गुंतवायची उअरलेले रक्कम कर्ज, त्यावर भारतात tax benifit मिळतो. अशी बरीच जोदपी माझ्या officeमधे आहेत.
२.पुण्यात high profiled लोक म्हणजे medium scale company VP,CEOs बरेच आहेत ते लोकाही अशी महाग घरे घेउ शकतात.चांगली गोष्ट अशी की आज त्यात मराठी माणसेही आहेत.
३.दोघेही नवरा बायको भारतातच पण DM,senior manager अशा पदांवर असतील तर त्यांनाही ही घरे परवडतात.
४. कागदावर पगार नसलेले पण खुप चांगला व्यवसाय करणारे orthopedic surgeons,gynaclogists,CAs,sharebrokesrs,dentists,lawyers अशा अनेक लोकांना ही घरे परवडतात त्यांचे आठवड्याचे उत्पन्न लाखात असते.
५.single मुलगा २-२.५ वर्ष us/uk onsite जाउन आला तर २०-२५ लाख परत घेउ येतो अर्थात बचतीची सवय असेल तर, अशी मुले पिंपळे सोउदागर्,वारजे ,हडपसर ,अशा ठिकानी ३bhk ४५ लखात घेतात, उअरलेली रक्कम कर्ज, पुढच्या onsite मधे ते उअरले कर्ज फिटुन जाते.
६.मुंबैईतले घर विकुन मोठी रक्कम मिळल्यावर कोथरुडमधे त्यातल्या ६०% रकमेत decent flatघेउन उअरलेले ४०%वर निव्रुत्त आयुष्य आनंदात घालवणारे खुप जण आहेत.
७.अख्या भारतातले अनेक IAS ,IPS officers, Delahi sideचे industralist, मुलांच्या शिक्षाणाच्यासाठी पुधे लागेल म्हणुन किंवा आता हवा म्हणुन हे महाग flat घेतात.त्यांना ते परवडते
घरांच्या किमतीचा विषय आहे
घरांच्या किमतीचा विषय आहे म्हणून, मुम्बैची थोडी माहिती -
१. ठाणे पश्चिम, हिरानंदानी - ३ बेड - १ करोड ते १.५ करोड (पूर्ण पांढरा व्यवहार), लोधा - ३ बेड - ८५ लाखापासून पुढे (पूर्ण पांढरा व्यवहार), ३ हात नाक्याजवळ ३ बेड - १.५ करोड (काळा पैसा हवा)
२. घोडबंदर रोड - ३ बेड - नावाजलेले बिल्डर हाऊस - ६० लाख, सर्वसाधारण बि. हा. - ३ बेड - ४५ लाख.
इथून वाशी ते सिप्झपर्यंत प्रवास शक्य आहे. (१ ते १.५ तास)
३. कल्याण - ३ बेड - नावाजलेले बिल्डर - ४० ते ४५ लाख (संकुलाची जागा/ सोयींनुसार)
४. खारघर - पनवेल - ३ बेड - नावाजलेले बिल्डर - ४० ते ४५ लाख (संकुलाची जागा/ सोयींनुसार)
इथे चांगल्या शाळा, वैद्यकीय सुविधा देखिल आहेत. १ पालक घरी रहाणार असल्यास कायम रहवासासाठी उत्तम पर्याय. दोन्ही पालकांनी असा सुपर प्रवास केला तर पोरे वेळ न मिळाल्याने वैतागतात.
५. बदलापूर - २ बेड /३ बेड - २० ते ३० लाख
सध्या तरी केवळ इन्वेस्टमेंट म्हणून योग्य
६. कोकणात - कुडाळ/ सिंधुदुर्ग/सावंतवाडी - ४०००० ते ७०००० रु गुंठा (कुठे आहे त्यानुसार), वेंगुर्ले - गोवा - १,००,००० - १,५०,००० रु गुंठा (कुठे आहे त्यानुसार)
७. रत्नागिरी, गोवा येथे (रु ७,००,००० ते २०,००,०००) फ्लॅट्स देखिल उपलब्ध आहेत. (निवृत्तीनंतर रहाण्यासाठी)
८. गोरेगाव - कुठचाही बिल्डर - रु. ७००० ते ९०००/ स्क्वे.फी. (रहेजा वै. सोडता ब्लॅक फॅक्टर आहे)
सध्याच भावंडांनी घरे घेतली आहेत. २ बेड चे घर रु ८०,००,००० ते १,००,००,००० मध्ये मिळेल.
भाडे एरीयानुसार साधारणतः रु. ३०,००० ते ५०,००० आहे.
टिप - अंधेरीच्या पुढे विचारण्याची माझी हिंमत नाही
पुण्याची माहिती जाणकार देतीलच.
मला पडलेले प्रश्ण -
१. १० ते १५ वर्षे परदेशात राहिलेल्या भारतीयांची तेथे स्वतःची घरे नाहीयेत का? ती विकून इथे घर घेता
येईलच ना? (माझ्या एका भावाने तसे केलं म्हणून विचारतेय)
२. १० ते १५ वर्षे परदेशात दोन्ही पालक कमावत असतील तरी भारतात मध्यमवर्गीय जीवन जगण्याएवढे पुरेसे सेव्हिंग होत नसेल तर परदेशात जाऊन काय आर्थिक फायदा झाला?
जाजू इतकं सरळ गणित
जाजू
इतकं सरळ गणित नसतं!
परदेशात घर घेतले तरी त्याचे हप्ते असतील ना, अन ते फिटले नसतील तर घर विकून काही फायदा होईलच असं नाही.
दुसरे म्हणजे आर्थिक फायदा काय झाला हा प्रश्न. तर त्याचेही सरळ उत्तर मिळेल अशी अपेक्षा करू नका. कोण आपली आर्थिक बाब,सांपत्तिक स्थिती इथे डीटेल मधे लिहील?! मी तर नाही लिहिणार. इथले प्रश्न आणि चर्चा यावरून त्यांना भारतातले मध्यमवर्गीय /उच्च वर्गीय जीवन परवडते /परवडत नाही असा काहीच निष्कर्ष काढण्यात अर्थ नाही. बहुतेक लोक जेव्हा इथे आले त्या जगात असतात, त्यांना भारतातल्या सगळ्याच किमती तेव्हाच्य आठवतात, म्हणून इथल्या चर्चेतून एकूण खर्च, किमती याचा आंदाज घेत असू शकतील, अर्थात मनातल्या अंदाजानुसार प्रत्यक्ष किमती जास्त वाटत असतील. यावरून त्यांना ते परवडते का यापेक्षा त्या किमतीला त्यांना ते 'वर्थ' वाटतंय का असा विचारही असेल (असू शकेल )त्या मागे. नाही का ?
यापेक्षा त्या किमतीला त्यांना
यापेक्षा त्या किमतीला त्यांना ते 'वर्थ' वाटतंय का असा विचारही असेल त्या मागे.
पण असते तरी घेतलं नसतं!
>> You said it right
(म्हणजे पैसे आहेत असं नाही..
भारतात घर हे आता एन आर आय
भारतात घर हे आता एन आर आय लाही परवडेल वाटत नाही. विशेष करून शहरात..
इथे राहात असलेल्या एका मित्राने (मुळ शिवाजीपार्क) दादर भागात एका इमारतीत घर पहायचे ठरवले. मित्र आर्किटेक्ट होता. तीन बेडरूमचे घर.. किंमत चार कोटी (One million Dollars). मित्र म्हणतो, 'माझं NJ मधलं तीन मजली घर, आणि आजूबाजूची पाऊण एकर जागा विकली' तरी मला कुणी मिलियन डॉलर देणार नाही.
(तो दादरकर असल्याने तिथेच जागा शोधत होता).
अग मैत्रेयी, सगळ्यांच्या
अग मैत्रेयी, सगळ्यांच्या सांपत्तिक स्थितीच विवरण नकोय ग..!
हा वर्थ वाटण्याचा मुद्दा माझ्या लक्षात आला नाही. मी सारखी तळ्यात - मळ्यात असते. थोडा वेळ युरोपात काढला की मी परत काही काळासाठी भारतात येते. त्यामुळे मला एकदम उकळत्या पाण्यात पडलेल्या बेडकासारखा झटका बसत नाही.
माझ्या आवडीच जीवनमान इथे हवे तर त्यासाठी एवढी किंमत द्यावी लागणारच अशी माझी धारणा झालीये.
मला हा प्रश्ण आहे की परदेशात जाण्यामागची काही कारणे असतात, जसे की चांगले शिक्षण, संधी, तसच आर्थिक सुद्धा आहेच ना? वर्ष - दोन वर्ष ऑनसाईट असलं की असणारी आर्थिक गणिंतं मला माहित आहेत पण १० - १२ वर्षाचा परदेशाचा हिशोब मला माहित नाही. जर १० - १५ वर्षे कमवून पैसे पुरेच पडणार नसतील शेवटी तर मग काय फायदा ? आयुष्यभर धावतच रहायचं का?
आंतर्जालविषयक कयद्यांबद्दल
आंतर्जालविषयक कयद्यांबद्दल सचिंत होऊन मी इथले लिखाण उडवले आहे. उगाच मायबोलीवर काही गैर परिणाम होऊ नयेत म्हणून.
अरे व्वा ! भारताने अमेरिकेला
अरे व्वा ! भारताने अमेरिकेला मागे टाकले वाटते!!
अहो झक्कीबुवा कायच्याकाय काय सान्गताय? आम्ही सु/दु दैवाने मनाने तळ्यात मळ्यात असलो तरी शरिराने सुद्धा भारतात आणि अमेरिकेत /परदेशात जाउन येऊन असतो. शोफर ड्रिवन गाड्या म्हणजे ३०००-४००० पगारवाला डायवर. (हो डायवरच - ड्राइव्हर नव्हे! त्याला मुम्बैइच्या traffic मध्ये डाइव्ह करायचे असते. ड्राइव्ह करण्याच्या सन्धी तशा कमीच.
असो. तो मुद्दा नव्हे.) षिणुमात दाखवतात तसा युनिफॉर्म्वाला सॅल्युट ठोकणारा शोफर आपल्याला परवडत नाही. आणि हो १२० डॉ नव्हे हो. रुपये असतील 
वरती arc नी लिहिलेल्या पोष्टितल्या कॅटेगोरीतले असतील ते!
नव्हे! मॉल मध्ये असतात १२० डॉ चे पण बूट पण ते घेणारे आम्ही नव्हेत
>>वर्ष - दोन वर्ष ऑनसाईट असलं
>>वर्ष - दोन वर्ष ऑनसाईट असलं की असणारी आर्थिक गणिंतं मला माहित आहेत पण १० - १२ वर्षाचा परदेशाचा हिशोब मला माहित नाही. जर १० - १५ वर्षे कमवून पैसे पुरेच पडणार नसतील शेवटी तर मग काय फायदा ? आयुष्यभर धावतच रहायचं का? <<
१-२ वर्ष ऑनसाइटवर येऊन राहणार्यांच्या आणि १०-१५ वर्षं इथे राहणार्यांच्या लाइफस्टाईल्स आणि प्रायॉरीटीज वेगळ्या आहेत. आर्थिक गणिताच्या बाबतीत बोलायचं झालं तर १०-१५ वर्ष इथे राहणार्यांचं "नेट वर्थ", १-२ वर्ष राहणार्यांच्या पेक्षा जास्त असणं साहजीक आहे परंतु वर म्हटल्याप्रमाणे त्यांच्या प्रायॉरीटीज वेगळ्या आहेत. बर्याच जणांची दादर मध्ये नाही पण उपनगरांमध्ये घर कॅश देऊन घेण्याची ऐपत आहे; पण तीथे जाऊन राहतील की नाही याची शंका आहे.
किरण, १२० रु नाहित १२००रु
किरण, १२० रु नाहित १२००रु म्हण फार तर. खर तर जास्तीच पण कमी नाहित
प्रायॉरीटीज वेगळ्या आहेत का
प्रायॉरीटीज वेगळ्या आहेत का इत्यादी मला नाही माहिती पण ऑनसाईटवर येणारे देशात रहाण्याची तरतुद जेव्हा जेव्हा देशात जातात तेव्हा करत असतात.
आज अगदी दादर नाही पण सानपाड्याला (वाशी जवळ) आमच घर आहे. निर्धास्तपणे आम्ही कधीही परतु शकतो.
आंतर्जालविषयक कयद्यांबद्दल
आंतर्जालविषयक कयद्यांबद्दल सचिंत होऊन मी इथले लिखाण उडवले आहे. उगाच मायबोलीवर काही गैर परिणाम होऊ नयेत म्हणून.
झक्की, ह्या पोस्ट्मध्ये खरच
झक्की, ह्या पोस्ट्मध्ये खरच खूप तथ्य आहे.
झक्की, अगदी आमचेच अनुभव बोलत
झक्की, अगदी आमचेच अनुभव बोलत आहात असे वाटले.
त्या मानाने आपण भारतात गेलो
त्या मानाने आपण भारतात गेलो की आपल्याला भारतातले काहि 'दाखवायचे', आपल्याला बघायचे तर यजमानांचा खर्चहि आपणच करायचा. शिवाय, 'तुम्हाला मानसिक गरज आहे, म्हणून तुम्ही इथे येता, आमच्यावर उपकार नाहीत, अशी वृत्ति. उलट तुम्ही आलात की आम्हालाच तुमचे नखरे सांभाळावे लागतात!' काही दिले तर, 'उगाच तिकडचे दाखवून ऐट करू नका, तुमच्याकडे स्वस्तच असेल, सेलवर घेतलेले.
>> लहानपणी आमचे काही पाहुणे सहकुटुंब माझ्या गावी यायची. गावात फक्त आई बाबा - सगळे म्हणजे कमीत कमी बारा तेरा माणसं - बरं ते आलेले असायचे सुट्टी साठी - पण आईबाबांना दोघांनाही अपडाऊन करायला लागायची. आईचे इतके हाल व्हायचे - कारण बाकीच्यांची सुट्टी असेल तर कुणी उठायचं नाही - स्वैपाकात मदत नाही - तत्कालीन कामवाली पुन्हा येणार्यातली असेल तर ठीक, नसेल तर बाकीचे गाद्या काढल्यावर केरही काढायचे नाहित - जेवल्यावर मागचं आवरायचे नाहित. पुन्हा संध्याकाळी तीच गत - आपणच केर काढा मग गाद्या घाला.
काही नातेवाईक मात्र ह्या उलट - स्वतःचं घर असल्यासारखं घरात वागणार - ह्यात हक्कापासून - कामापर्यंत सगळंच आलं! असे पाहुणे अर्थातच हवेसे वाटायचे!
आपल्याकडून कसं वागलं जातय हे पण तपासून पाहिलं पाहिजे!
------
भारतातल्या शहरातल्या माणसांची स्वतःच्या कुटुंबाकरता वेळ काढता काढताच वाट लागलेली असते! ज्याची कल्पना अमेरिकेत राहून येऊ शकत नाही (unless नवरा बायको दोघही अमेरिकेत असताना - भारतीय कंपनी करता काम करत असतील)
हा ही मुद्दा लक्षात घ्या!
Pages