परतोनि पाहे (परदेशातून परतलेल्या, परतू इच्छिणा-यांचे अनुभव)

Submitted by रैना on 5 January, 2010 - 01:52

इथे खालील मुद्यांवर चर्चा / अनुभव अपेक्षीत आहे. शक्यतो उपदेशापेक्षा (काय करायला हवं वगैरेंचे डोस) अनुभव लिहा. आपण विचारांती काय निर्णय घेतला, का घेतला आणि तो कसा निभावतो आहोत.

- तुम्ही भारतात का परतलात, परतावसं का वाटलं (नक्की प्राण का तळमळला?) परतल्यावर आता कसं वाटतय ? (व्यक्तिगत बरेवाईट अनुभव, ठेचा, विचारमंथन).
-- तळ्यात मळ्यात- परतावसं वाटतय, हिम्मत होत नाही? दोलायमान परिस्थिती आहे? नवराबायकोपैकी एक अत्यंत नाखुष आहे ?
- परततानाची चेकलिस्ट ( काय करावे आणि करु नये)
- केल्याने देशाटन परदेशात काय मिळवलं, काय गमावलं
-भारतातील संधी, नोकरी, व्यवसाय, आर्थिक परिस्थितीचा आढावा (अनुभव), वर्क लाईफ बॅलन्स (व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्याला देता येणारा वेळ)
- मुलं आणि तदनुषंगिक शेकडो गोष्टी ( शाळा, शैक्षणिक पद्धत, पाल्याचा सर्वांगीण विकास, भाषांचा सराव, गणिताचा सराव, वातावरणाचा सराव)
- वृद्ध होत चाललेल्या मातापित्यांची जवाबदारी. पुन्हा एकत्र आल्यावरचे अनुभव. त्यांच्या दृष्टीकोनातून तुमचे परदेशगमन आणि पुनरागमन.
- समाजाचे देणे
- दोहोंचा अनुभव घेतल्यावर आता काय करायचा मानस आहे ?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझ्या मते जर आऊटस्कर्टस मधे घ्यायचि तयारी असेल तर पुण्यात अजुनहि ४५ lakhs पर्यन्त मिळु शकेल flat ...म्हणजे निदान ३ वर्षापुर्वि तरी मिळत होता Happy (पाषाण सुस भाग) आणि मला तरि तो शाळा आजुबाजुचा एरीया या द्रुष्टीने चांगला वाटतो.

दादरला काही काळापूर्वी ४०००० / sft रेट चालला होता. Happy
आता माहीत नाही.
तरीपण दादरला जुन्या इअमारती पाडून उंच उंच इमारती उभ्या रहात आहेत आणि बहुतेक सगळे ज्वेलर्स जागा घेत आहेत.

>>जर १० - १५ वर्षे कमवून पैसे पुरेच पडणार नसतील शेवटी तर मग काय फायदा ? आयुष्यभर धावतच रहायचं का?

अहो पण एवढ्या वर्षात देशातली महागाई पण वाढतच असते. मी जेव्हा बाहेर पडलो तेव्हा असा विचार करत होतो की परत आल्यावर अजुन एक २ किंवा ३ बीएचके चा फ्लॅट घेता येईल. पण पुढच्या काही वर्षात भाव एवढे वाढले की विचार करणं देखील शक्य नव्हते. प्रत्येकाची कौटुंबिक पार्श्वभुमी, प्राथमिकता, आर्थिक गणिते वेगवेगळी असतात. एखादा माणूस जर परदेशात जायच्या आधी कनिष्ठ मध्यम वर्गातला असेल तर त्याची पहिली काही वर्षे ही कुटुंबाची आर्थिक पातळी सुस्थितीत आणण्यासाठी खर्ची पडतात. त्यापुढे जाऊन ती व्यक्ती बचतीचा, पुढच्या गुंतवणुकीचा विचार करु शकते. अशा लोकांची पहिली गरज असते ती रहाण्याच्या जागेची. साधारण २००४~०५ सालापर्यंत जे लोक जागा घेऊ शकले ते नशिबवान असे म्हणावे लागेल.

अनेकांचे असे मत असते की परदेशात जाऊन आलेल्या माणसा़कडे बक्कळ पैसा असला पाहिजे, नाही तर जाण्याचा काय उपयोग ?
एकतर बाहेरच्या देशांमधल्या राहणीमानानुसार तिथले खर्च पण मोठे असतात. तसेच सर्वांना पगार सारख्या प्रमाणात मिळतो असे नाही. कंपनीप्रमाणे सोयी पण बदलतात. मी जेवढा काळ बाहेर होतो, तेवढ्या काळात देशात जा ये करण्यासाठी मला खुप खर्च आला. पण काहीजण असे होते की त्यांची कंपनी त्यांना प्रवास भत्ता देत असे. तीच गोष्ट घरभाडे, घरातील आवश्यक वस्तु खरेदी, इ. ची. काही कंपन्या या खर्चासाठी सुद्धा भत्ता देतात. आम्हाला या प्रकारासाठी (घर सेटीन्ग) सुद्धा दोनवेळा स्वतःच खर्च करावा लागला.
अशा अनेक गोष्टींमुळे बचत कमी होऊ शकते. अर्थात ती बचत देशातल्या उत्पन्नाएवढी किंवा जरा जास्त असु शकते. पण गेल्या काही वर्षातल्या महागाईमुळे अशी बचत देखील किती पुरेशी असेल शंकाच आहे.

उपनगरी भागांबद्दल, तिथे घर घेण्याबद्दल बाऊ करू नये. उलट मध्यवर्ती भागापेक्षा तिथे जास्त सोयीसुविधा उपलब्ध असतात. मोठे रस्ते, भरपूर पार्किंग, उद्याने, हॉस्पिटल्स, शाळा-कॉलेजे असतात. मॉल्स आणि मोठे, देशीविदेशी ब्रँड्स देखील आऊटलेट्स सुरू करताना मध्यवर्ती भागांपेक्षा उपनगरे पसंत करू लागले आहेत. कारण त्यांना अभिप्रेत असलेला ग्राहक आता उपनगरांत जाऊन राहू लागला आहे. बरीच उपनगरे इतकी स्वयंपूर्ण झाली आहेत, की कुठल्याही कारणासाठी मुळ (जुन्या) शहरात जायची गरज भासत नाही. दिवसभर ट्रॅफिक, गजबजाट, प्रदुषण भोगल्यानंतर संध्याकाळी तरी जिथे शांत वाटेल, अशा ठिकाणी घर घेण्याकडे कल वाढत चालला आहे. त्यासाठी पाच-दहा-पंधरा किंवा त्यापेक्षा जास्त अंतर जावे लागले तरी कुणाची हरकत नसते.

आयुष्यभर भाड्याच्या घरात राहणे मनाला काही पटत नाही. त्यात शेवटपर्यंत मानसिक गुंतवणूक होतच नाही. घराचे भाडे हातातून गेले की संपले. घराचे हप्ते हातातून जात राहतात ते आपली मालकी हक्क अधिकाधिक प्रस्थापित करण्यासाठी. १० किमी अंतरावरचे घर परवडत नसेल, तर २० किमी दुर जावे. ३ बेडरूमचे घेण्यापेक्षा १ किंवा २ बेडरूमचे घ्यावे. आणि अ‍ॅमेनिटीजचा रेट जास्त असेल, तर (बांधकामाचा दर्जा पाहून) मध्यम / कमी अ‍ॅमेनिटीजवाले घ्यावे, पण घ्यावेच.

साधारण २००४~०५ सालापर्यंत जे लोक जागा घेऊ शकले ते नशिबवान असे म्हणावे लागेल >> बरोबर. बट देअर इज नेव्हर लेट. किंमती एकदम दुप्पट होणार नाहीत, हे खरे असले, तरी कमी होणार नसून वाढतच राहणार, हे नक्की. Happy

विषयांतर असेल, तर क्षमस्व.

हा बाफ वाचून जेवढी माहिती मिळते आहे तितकीच आणखी भिती वाटते आहे. निश्चित असे काहीच नाही. सर्व कसे प्रश्नचिन्ह आहेत. देश सोडणे सोपे आणि परत येणे फार जड असे झाले आहे. वर कुणीतरी म्हंटले तसे आपल्या देशात येऊन आपल्याला मध्यमवर्गीय आयुष्य तरी जगता येईल का असे वाटते. ज्यांनी परदेशात आल्यानंतर मोठ्या शहरात आधी घर घेऊन ठेवले आहे ते खरचं खरे विचारवंत.

मला सगळ्या ह्या चर्चेवरुन ही गोष्ट आठवली.
ONE BED ROOM
As the dream of most parents I had acquired a degree in Software
Engineering and joined a company based in USA, the land of braves and
opportunity. When I arrived in the USA, it was as if a dream had come
true. Here at last I was in the place where I want to be. I decided I
would be staying in this country for about Five years in which time I
would have earned enough money to settle down in India.

My father was a government employee and after his retirement, the only
asset he could acquire was a decent one bedroom flat..

I wanted to do some thing more than him. I started feeling homesick and
lonely as the time passed. I used to call home and speak to my parents
every week using cheap international phone cards. Two years passed, two
years of Burgers at McDonald's and pizzas and discos and 2 years
watching the foreign exchange rate getting happy whenever the Rupee
value went down.

Finally I decided to get married. Told my parents that I have only 10
days of holidays and everything must be done within these 10 days. I got
my ticket booked in the cheapest flight. Was jubilant and was actually
enjoying hopping for gifts for all my friends back home. If I miss
anyone then there will be
talks. After reaching home I spent home one week going through all the
photographs of girls and as the time was getting shorter I was forced to
select one candidate.

In-laws told me, to my surprise, that I would have to get married in
2-3 days, as I will not get anymore holidays. After the marriage, it was
time to return to USA, after giving some money to my parents and telling
the neighbors to look after them, we returned to USA.

My wife enjoyed this country for about two months and then she started
feeling lonely. The frequency of calling India increased to twice in a
week sometimes 3 times a week. Our savings started diminishing

After two more years we started to have kids. Two lovely kids, a boy and
a girl, were gifted to us
by the almighty. Every time I spoke to my parents, they asked me to
come to India so that they can see their grand-children.

Every year I decide to go to India? But part work part monetary
conditions prevented it. Years went by and visiting India was a distant
dream. Then suddenly one day I got a message that my parents were
seriously sick. I tried but I couldn't get any holidays and thus could
not go to India ...

The next message I got was my parents had passed away and as there was
no one to do the last rights the society members had done whatever they
could. I was depressed. My parents had passed
away without seeing their grand children.

After couple more years passed away, much to my children's dislike and
my wife's joy we returned to India to settle down. I started to look for
a suitable property, but to my dismay my savings were short and the
property prices had gone up during all these years. I had to return to
the USA...

My wife refused to come back with me and my children refused to stay in
India... My 2 children and I returned to USA after promising my wife I
would be back for good after two years.

Time passed by, my daughter decided to get married to an American and
my son was happy living in USA... I decided that had enough and wound-up
every thing and returned to India... I
had just enough money to buy a decent 02 bedroom flat in a
well-developed locality.

Now I am 60 years old and the only time I go out of the flat is for the
routine visit to the nearby temple. My faithful wife has also left me
and gone to the holy abode.

Sometimes I wondered was it worth all this?

My father, even after staying in India, Had a house to his name and I
too have the same nothing more.

I lost my parents and children for just ONE EXTRA BEDROOM.

Looking out from the window I see a lot of children dancing. This
damned cable TV has spoiled our new generation and these children are
losing their values and culture because of it. I get occasional cards
from my children asking I am alright. Well at least they remember me.

Now perhaps after I die it will be the neighbors again who will be
performing my last rights, God Bless them.

But the question still remains 'was all this worth it?'

I am still searching for an answer.................!!!

START THINKING

IS IT JUST FOR ONE EXTRA BEDROOM???

LIFE IS BEYOND THIS ?..DON'T JUST LEAVE YOUR LIFE ??..
START LIVING IT ??.

LIVE IT AS YOU WANT IT TO BE ??.

आंतर्जालविषयक कायद्यांबद्दल सचिंत होऊन मी इथले लिखाण उडवले आहे. उगाच मायबोलीवर काही गैर परिणाम होऊ नयेत म्हणून.

.

.

.

हूड "टिंबा" ची भाषा डोक्यावरनं चाललीये , जरा इस्क्टुन सांगा की राव Proud

आंतर्जालविषयक कायद्यांबद्दल सचिंत होऊन मी इथले लिखाण उडवले आहे. उगाच मायबोलीवर काही गैर परिणाम होऊ नयेत म्हणून.

वरची एक पोस्ट वाचून मला आता असं वाटतय की - उगाचच इतके दिवस मी गैरसमजात होते की विषय "परदेशातून परतलेल्या, परतू इच्छिणा-यांचे अनुभव" हा आहे!

लोकहो, पर्सनल गोष्टी विपूवर नाही का करता येणार? सार्वजनिक ठिकाणी कशाला! तेही विषय वेगळा असताना! 'मायबोलीवरील नळ' असा विषय काढून तिथे भांडूयात, काय म्हणता? (ह्याचं उत्तर देणार असाल तर कृपया माझ्या विपू मध्ये द्या Wink )

(ज्या लोकांना लागू नाही त्यांनी लावून घेऊ नये)

'मायबोलीवरील नळ' >>> Lol Lol

जबरी कल्पना .... अ‍ॅडमिन खरेच काढा असा बाफ... कुठल्याही बाफ वर भांडणे झाली की ती तिकडे हलवायची... वेंधळेपणापेक्षा जास्ती हिट होईल तो बाफ Happy

झक्की : झालात का सुरू Uhoh

'मायबोलीवर नळ' .. Lol झक्कींच्या हंड्याला सर्वात जास्त पोचे येणार. ते स्वतः सोडून इतरच जास्त आपटणार ना त्यांचा हंडा. काय मज्जा येईल ना! तिथेच राहून भारतीय नळकोंडाळ्याचा लाईव्ह एक्स्पिरियन्स. त्यांना मग भारतात येणे नको. घर घेणे नको. अन १९५८ ची पांचट हिंदी बोलणे नक्को. Proud

नानबा.. ह्या अश्या नळाच्या अस्सल कल्पना Rofl सुचायला भारतीय सवयच हवी! Proud

बाय द वे, १ कोटीला ४ बेडरूमचे स्वतंत्र घर? एवढी स्वस्ताई आहे का अमेरिकेत की सध्या आलीये? की किंमत १ कोटी डॉलर आहे?

आता ना मला चक्करच येणारे, इकड तिकडचे आकडे ऐकून! माझा अगदी भ्रम निरास होत आहे ही चर्चा ऐकून..! ह्या चर्चेनुसार, मी बर्‍यापैकी श्रीमंत व्यक्ती आहे! माझ्या आजूबाजूला असे बरेच एन्.आर.आय आहेत की जे पुण्या मुम्बैला ३बेड रो हाऊस अथवा घर घेऊन रहात आहेत. ११ वर्षात भारतात माझ्यासारख्यांना जे जमलं ते ११ वर्षात परदेशी भारतीयांना जमलं नाही हे कसं शक्य आहे? Uhoh

त्यामुळे कित्ती महाग, कित्ती महाग असे न करत बसता, परत यायचे नक्की असेल तर काय परवडेल किंवा मला इथे-हे घ्यायचेय त्याची सध्याची भारतातली किंमत काय? अमूक प्रकारचे शिक्षण कुठच्या संस्थेत मिळेल व त्याची फी काय? असे प्रश्ण जर असतील तर अम्ही उत्तरे तरी देऊ शकू!

टिप :- कनिष्ठ मध्यमवर्गातून जाऊन परदेशी नोकरी करणारे ह्या प्रश्णातून वगळलेले आहेत. आणि कोणालाही टोचणे, बोचणे असा हेतु यामागे नाहिये!

मायबोलीवरील नळ>>>> Lol कसली भन्नाट कल्पना आहे. खरंच झक्की नी हूड आपापले हंडे नी कळशा घेऊन तिथेच पडीक दिसतील.

बाय द वे, १ कोटीला ४ बेडरूमचे स्वतंत्र घर? एवढी स्वस्ताई आहे का अमेरिकेत की सध्या आलीये? की किंमत १ कोटी डॉलर आहे?
>>> जाजू नाही गं १ कोटी डॉ कसले. १ कोटी रुपयेच Happy एक गंमत म्हणून लिन्क टाकतेय इथे. त्याने कन्फ्युजन वाढेल की कमी होईल माहित नाही Happy
शार्लेट नॉर्थ कॅरोलाइना मधले घर , अत्ताची लेटेस्ट किम्मत रुपयात सुमारे सवा ते दीड कोटी . (टीप - मी तिथे रहात नाही. असाच एक रँडम सर्च मारला एक कोटी रुपये किंमत धरून )

http://www.realtor.com/realestateandhomes-detail/1723-Sanridge-Wind-Dr_C...

Property Features
Single Family Property
Year Built: 1999
4 total bedroom(s) , 2.5 total bath(s) ,2 total full bath(s) ,1 total half bath(s)
2900 - 3500 total finished sq. ft.
Two story
Master bedroom ,Dining room, Kitchen, Office ,Laundry room
Hardwood floors
Fireplace(s)
Fireplace features: Gas fireplace logs, Great room
3 car garage
Heating features: Gas, Hot air, Multizone
Central air conditioning
Community swimming pool(s)
Approximately 0.28 acre(s)

आंतर्जालविषयक कायद्यांबद्दल सचिंत होऊन मी इथले लिखाण उडवले आहे. उगाच मायबोलीवर काही गैर परिणाम होऊ नयेत म्हणून.

Pages