परतोनि पाहे (परदेशातून परतलेल्या, परतू इच्छिणा-यांचे अनुभव)

Submitted by रैना on 5 January, 2010 - 01:52

इथे खालील मुद्यांवर चर्चा / अनुभव अपेक्षीत आहे. शक्यतो उपदेशापेक्षा (काय करायला हवं वगैरेंचे डोस) अनुभव लिहा. आपण विचारांती काय निर्णय घेतला, का घेतला आणि तो कसा निभावतो आहोत.

- तुम्ही भारतात का परतलात, परतावसं का वाटलं (नक्की प्राण का तळमळला?) परतल्यावर आता कसं वाटतय ? (व्यक्तिगत बरेवाईट अनुभव, ठेचा, विचारमंथन).
-- तळ्यात मळ्यात- परतावसं वाटतय, हिम्मत होत नाही? दोलायमान परिस्थिती आहे? नवराबायकोपैकी एक अत्यंत नाखुष आहे ?
- परततानाची चेकलिस्ट ( काय करावे आणि करु नये)
- केल्याने देशाटन परदेशात काय मिळवलं, काय गमावलं
-भारतातील संधी, नोकरी, व्यवसाय, आर्थिक परिस्थितीचा आढावा (अनुभव), वर्क लाईफ बॅलन्स (व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्याला देता येणारा वेळ)
- मुलं आणि तदनुषंगिक शेकडो गोष्टी ( शाळा, शैक्षणिक पद्धत, पाल्याचा सर्वांगीण विकास, भाषांचा सराव, गणिताचा सराव, वातावरणाचा सराव)
- वृद्ध होत चाललेल्या मातापित्यांची जवाबदारी. पुन्हा एकत्र आल्यावरचे अनुभव. त्यांच्या दृष्टीकोनातून तुमचे परदेशगमन आणि पुनरागमन.
- समाजाचे देणे
- दोहोंचा अनुभव घेतल्यावर आता काय करायचा मानस आहे ?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

उपास, अतिशय छान पोस्ट.
गट क्र.४ च्या लोकान्कडून त्यान्चे विचार अधिक सवीस्तर पणे वाचायला आवडतील.

उपास यांची पोस्ट उत्क्रुष्ट आहे. फक्त एकच पोस्ट save करून ठेवता येते का? किंवा फक्त एकाच पोस्टची लिंक कोणाला पाठवता येईल का?
जेव्हा कधी भारतात कायमचे परत जायचा निर्णय घ्यायची वेळ येईल (येत्या २-३ वर्षातच ती येईल असं वाटतयं) तेव्हा ही पोस्ट फारच कामास येईल. त्यावेळी ही शोधणे कठीण जाईल.

उपास, छान लिहीलस, सगळ्या कॅटगर्‍या कवर केल्यास आणि मस्त उलगडुन सांगितलस. दोन्ही कडे काम केल्यामुळे, जमल्यास इथल्या (अमेरिकेतल्या) आणि भारतातल्या वर्क कल्चर मधल्या फरकांबद्दल लिहीलस तर बरं होइल. परत एकदा " मस्त पोस्ट" Happy

सोहा... तुमच्या PC वर Wordpad/Word मधे copy/paste करून ठेवता येईल...


>>
सेव्ह केलेले डॉक्युमेन्ट हार्ड डिस्कचा प्रॉब्लेम झाल्यास जाऊ शकते त्यापेक्षा 'गूगल डॉक्युमेन्ट' या युटीलिटीत चढवून ठेवावे म्हनजे कधीही कुठेही बघता येऊ शकते...

मी असे कित्येक दांपत्य आणि एकटे पाहिले आहेत की ज्यांनी परदेशात बरेच वर्ष काम करुन देशात ते परत गेलेत आणि परत परदेशात आलेत.

माझी एक मैत्रीण वर्षभरापुर्वी ११ वर्षानंतर नोईडाला गेली. तिला आता तिने घेतलेल्या निर्णयाचा पश्चाताप होतो आहे. लहर आली की ती परत इथे अर्च करते नोकरीसाठी. मला सांगते की तू इथले आता नागरीकत्व घे. काही फरक पडणार नाही.

वर महेश देखील म्हणतो आहे की त्याला आर्थिक अडचणीमुळे परत आता परदेशात नोकरी शोधाविशी वाटते.

देशात गेल्यानंतर कुणी काय केले यावर इथे खरे तर पोष्टस आले नाहीत. ज्यांची पुणे मुंबईत घरे आहेत त्यांचे ठिक पण ज्यांची नाहीत त्यांनी आधीच घर विकत घेण्याचा निर्णय देशात जाण्याआधी घेतला की नंतर? मुलांच्या शाळा आधीच ठरवल्यात की नंतर? नोकरी आधीच शोधली की तिथे गेल्यानंतर? आपण जेवढे कमवले तेवढे आता पुरे याचा खरचं विचार केला होता का? गणित करुन पाहिले होते का? परदेशात असताना आपण खूप भावूक होतो. अनेक लहानसान गोष्टीसाठी जीव तिळतिळ तुटतो. देशात गेल्यांनंतर आपण ईमोशनल फूल होउन निर्णय घेतला असे कधी वाटले का?

आणखी खंडीभर प्रश्न आहेत.

माझ्या ओळखीचे दोन कुटुंब त्यांची मुले ८वीत आणि १०वीत असताना भारतात परतली. मुलांना कसलाच त्रास झाला नाही आणि त्यांनी सोबत दिली असे सांगत होते.

बी मागे मायबोलीवर एकदा सुदर्शन नावाच्या आयडीने एक लेख लिहीला होता (आणि दै. सकाळमधेपण आला होता त्यांचा तो लेख), ते भारतात परतल्यावरचे त्यांचे अनुभव. त्या लेखात त्यांचे आणि त्यांच्या मुलांचे भारतात जुळवुन घेण्याबद्दलचे अनुभव लिहीलेले होते, मला तो लेख सापडला नाही. सुदर्शन या आयडीचा शोध घेतला तर 'हे पान बघायची परवानगी नाही' आले. मला तो लेख सापडला तर नक्की इथे डकवेन.

उपास, कडकडुन टाळ्या...
मला विचार करकरुन करकरुन एकच कळलय. मी माझ्या मुलांना भारतात जास्त आत्मविश्वासाने वाढवु शकते (अगदी खुप अभ्यास असला तरी),त्यांचे व्यक्तीमत्व घडवु शकते, जास्त कष्ट न घेता संस्कृतीशी ओळ्ख करुन देउ शकते कारण भारताची नस मला माहीत आहे. इतके वर्ष बाहेर आहे तरी पण भारतात जो बदल झालाय तो मला परत गेल्यावर अगदी थोड्या कळात समजु शकेल , समजावुन घेता येईल ह्याची खात्री आहे. सध्या मुलगी लहान आहे म्हणुन काळजी नाही पण ती ८ ची होईपर्यंत जाणार.
माझी १ मैत्रीण परत गेली ६ महिन्यापुर्वी. मुलगी ६ वर्षाची होती. नवरा इथे एक वर्ष राहुन घर विकुन परत जाणार होता. पण मंदी मुळे ते थोडे लांबणीवर पडेल असे वाटु लागले म्हणुन त्याने बायकोशी चर्चा केली, मुलीबद्दल. तर त्यांचे निरीक्षण, मुलगी पुण्यात, शाळेत इतकी चट्कन रुळली की जशी तिथेच जन्मली होती. तेव्हा त्यांना हायसे वाटले आणि अजुन २-अडीच वर्षे जर ती अमेरिकेत राहुन ८-९ ची असताना परत भारतात गेली तरी पुन्हा रुळेल ह्याची खात्री वाटली आणि बायको तिला घेउन परत आली. ती मुलगी इथे पण लगेच रुळली. असे अनुभव पाहिले की छान वाटते. माझी मुलगी आणि ती मुलगी व आम्ही आया जिवलग मैत्रीणी म्हणुन आम्हाला सर्वात आनंद, ते परत आल्याचे Happy , असो.

नोकरीच्या जगाचा विचार फक्त आम्हाला करायचा आहे, मुलीला नाही ती जमेची बाब, आणि त्या जगाशी विचार करुन अ‍ॅड्जस्ट व्हायला मला सध्या तरी काही संकट दिसत नाही.

रैना, छान.

लालू धन्स मला हाच लेख म्हणायचे होते, मी लेखकाचे खरे नाव, सुदर्शन महाबळ लक्षात ठेवले होते त्यांचा मायबोली आयडी नाही त्यामुळे मला लेख सापडला नाही.

http://www.maayboli.com/node/13293

लोकहो- चेकलिस्ट आणि शाळा - प्रॅक्टिकल हाऊ टु याबाबत मुद्दे वरील धाग्यावर केलीत तर शोधणा-यांना सोपे पडेल.

वैचारिक भुमिका फक्त याच धाग्यावर मांडत रहा.

सुनिधी, तुझ्या मैत्रिणीचा अनुभव हाच जवळजवळ माझा अनुभव आहे ग... मुल खरच रुळतात पटकन. फक्त त्यांना आधीपासुनच कल्पना असेल तर जास्त चांगल. आम्ही आमच्या मुलीला बर्यापैकी म्हणजे ८०% आपल्याला परत जायचय हे पटवलय. Happy

उपासचं पोस्ट वाचलं. आयला, एव्हढं टाइप करणं खरोखर कौतुकास्पद. clap_1.gif असो. सुरुवात वाचुन वाटलं; चला एकतरी अनबायास्ड पोस्ट आलंय. पण कसचं काय, जसजसं पुढचं वाचत गेलो तसतशी निराशा वाढत गेली. तेचते मुद्धे (शिक्षणपद्धती, सोशल लाइफ, WLB, सण ई.) वेगळ्या वेष्ठनातुन समोर आले आणि पारडं स्वदेशाकडे झुकलं. अर्थात, यात काहीही गैर नाही पण अनबायास्ड पोस्ट आहे हा सुरुवातीला झालेला फुगा फुटला.

सुरुवातीचे एक्-दोन (रैना, महेश) वगळता, मी अजुन, आणि कदाचीत माझ्यासारखे अनेक, भारतात परतलेल्यांच्या प्रतिसादांची वाट पहात आहोत; straight from horse's mouth. कारण शेवटी आपण काय किंवा रमेश मंत्री, अपर्णा वेलणकर काय; सगळे ऐकीव वा वरवर पाहिलेल्या किस्स्यांवर लिहिणार... Happy आणि परतलेल्यांच्या अनुभवांतुन काही शिकायला मिळालं तर "सोने पे सुहागा". At end of the day, "दोन्ही घरचा पाहुणा उपाशी" (no pun intended) अशी आपली गत होऊ नये हीच सदीच्छा... cheers.gif

मनीष कुठे आहे ? तो गेला मागच्या वर्षी परत. शोधा त्याला Happy मला पण लिहायचे आहे उपाससारखेच मोठ्ठे पोस्ट Wink

माझ्या नवर्‍याचा मित्रही इथे १०-१२ वर्ष राहून सिटीझनशीप घेऊन हल्लीच परत गेला. मुलं साधारण ९ आणि ६,७ वर्ष होती. जायचं ठरल्यावर आधी मुलांच्या अ‍ॅडमिशन्स घेतल्या. स्वतःचं घर होतंच मुंबईत. त्याप्र्माणे बायको नी मुलं एप्रिल, मे च्या आसपास परत गेली. नवरा एक वर्षभर इथे काढून, साईड बाय साईड तिथे नोकरी शोधणार होता. दरम्यान त्याचा इथला जॉब गेला आणि लकीली मुंबईत मिळाला. पण छान चालू आहे त्यांचं.
एक मित्र सिंगापूरहून १० वर्षांनी परत गेला. तेव्हा मुलगा १२,१३ वर्षाचा होता. सिंगापूरला लोकल स्कूल्समध्ये आणि भवन्स इंटरनॅशनलला अभ्यासक्रम मुंबईसारखाच आहे त्यामुळे मुंबईच्या शाळेत जुळवून घ्यायला त्रास नाही झाला. त्यांचंही घर होतं तिथे त्यामुले तो ही प्रश्न मिटला. नवर्‍याला ट्रान्सफर मिळाली. आता मुंबईत ऑफिसला जाताना ट्रॅफिकमध्ये अडकून पडणं वगैरे होत पण होते त्याचीही सवय हळूहळू. बाकी त्यांचंही मस्त चाललंय.

इथे येउन दहावर वर्षे झाली. दर वेळी देशात जातो तेंव्हा बरेच भरपूर काही बदललेले असते. लोकहि नि देशही, चामग्लेहि नि वाईटही. मी ज्या देशातून आलो होतो तो देश आता तसाच्या नाही उरलेला नाही. माझ्यापुरते हे बदल quantum jumps सारखे आहेत,तर तिथे राहणार्‍यांसाठी ति साहजिकपणे झालेली गोष्ट आहे. माझ्यापुरता frozen देश हा माझ्या अनुभवविश्वाशी जोडलेला होता जो आता तसा उरलेला नाही. त्यामूळे आताचा जो देश आहे त्याच्याशी मला माझी तान परत जुळवता येईल कि नाही "फक्त" ह्यावर सगळे अवलंबून आहे. ह्याचे उत्तर मी कुठल्या गटात आहे किंवा त्या गटाचे काय common symptoms आहेत किंवा त्यांचे काय कार्यकारणभाव आहेत ह्यावर अवलंबून नसावे. इतरांना काय अनुभव आला ह्यापेक्षा माझी कोणत्या अनुभवांना तोंड द्यायची तयारी आहे ह्यावर माझे उत्तर अवलंबून असावे. बाकी सगळे आपोआप जुळून येईल.

ह्यातला "मी" हा (पहिले वाक्य वगळता) प्रातिनिधीक समजावा.

वर मनुस्विनीने मांडलेला मुद्दा वयाचा मुद्दा महत्त्वाचा नक्कीच आहे. वय आणि त्यानुषंगिक असणार्‍या जबाबदार्‍या ह्यामुळे बदलाला नकार देण्याची प्र्वृत्ती उपजतच येते, चाल्लय ना चाल्लूं दे असं म्हणत आपण शॉर्ट टर्म गोल्स वर इतकं लक्ष देतो की आपले लाँग टर्म गोल्स धूसर होऊ लागतात.
असामी, तुझा मुद्दा बरोबर आहे, एखाद्या प्रसंगाला कसे तोंड देऊ शकतो आपण हे आपणच ठरवायचे. तुला स्वच्छ दिसत असेल की तिथे काही आपले जंमणार नाही तर हे जेवढ्या लवकर रुजेल तेवढं सोप्प होईल इथे राहाणं. अशी स्पष्टता बर्‍याच जणांना नसते किंवा ती येण्याइतकी परिस्थ्तितीही नसते (उदा. २ब गटातले जीसी ची वर्षानुवर्षे वाट पाहाणारे) आणि मुख्य म्हणजे आपल्याला स्वतः व्यतिरीक्त कुटूंबातल्या इतरांचा (बायको, मुले, आई-बाबा) विचार करावाच लागतो. त्यामुळे मला बदल चालणार नाही म्हणून इतरांची ससेहोलपट होऊ लागली तर त्रास होईल ना? जो काही निर्णय घेऊ तो वेळेवर आणि कुटुंबियांना विश्वासात घेऊन घेता आला तर स्थैर्याचा मोठा प्रश्न सगळ्यांसाठीच सुटेल.

राज, मला माहित नाही तुम्हाला काय अपेक्षित होतं माझ्या पोस्ट मधून ज्यामुळे तुमचा भ्रमनिरास झाला Happy
परत जायचं की नाही हा इतका व्यक्तिगत आणि कौटंबागत प्रश्न आहे आणि त्याचे इतके विविध कांगोरे आहेत की प्रत्येकाने स्वतःला काय हवय ते शोधायला हवं. प्रत्येकाची चव वेगळी, शिवाय एकाच व्यक्तीची जिभेची चव बदलत असते स्थितीकालानुरूप (तोंड येणे, आजरपण..) त्यामुळे एकच मुद्दा (उदा. शिक्षण) प्रत्येकाला वेगळ्या प्रकारे मानवेल. हा मुद्दा विचारात घेतला जाणे हे इथे मह्त्त्वाचं इतकचं. मी अनबायस्ड लिहायचं असा प्रयत्न करुन तसं केलेलं नाहीये पण वाचणारा ज्या माईंड्सेट मध्ये वाचतोय त्यानुसार त्याला त्यातून गोष्टी दिसतील वा खटकतील असं दिसतय.

असो, परतीबद्दल म्हणायचं तर मी चूकांतून शिकलोय. आधी म्हटल्याप्रमाणे इथे २ वर्षे राहून परत गेलो (२००२-२००३). मग परतल्यावर २००४ मदध्ये मुंबईत होतो ३ महिने प्रवास करत, पुढे पुण्यात सदाशिव पेठेत राहिलो आठ महिने. जीवाचे मुंबई-पुणे केले Wink आणि आर्थिक नियोजन नीट केले नसल्याची किंवा काही गुंतवणूकीच्या संधी दरम्यान घालवल्याची बोच लागली. झालेली चूक सुधारण्यासाठी पुन्हा इथे येण्याचा निर्णय घेतला. सुदैवाने मार्केट चांगले होते, माझा प्रोफाईलही. महत्त्वाचा मुद्दा हा की, भारतात परतताना आर्थिक नियोजन, आर्थिक उद्दीष्टांची सुस्पष्टता अपरिहार्य आहे.

नंतर आलेल्या रैना, बी तसेच पहिल्यापासून सगळ्यांच्या पोस्ट्स परत एकदा बसून वाचून काढेन विकेंडला, खूप शिकायला मिळतय.

तोषवी एच ४ बद्दल जुन्या हितगूजवर बरीच चर्चा होती झालेली, खूप छान आणि माहितीपूर्ण अनुभव आहेत, नक्की वाच. बी बी नाही मिळाला तर मदत समिती आहेच Wink

आर्थिक उद्दीष्टांची सुस्पष्टता अपरिहार्य आहे. >> हे तर कधीहि आमच्याच्याने झाले नाही. How much is enough हे नक्की सांगताच येत नाही. आम्ही जेव्हा १०,०००रु. महिन्याला खुप होतील असे वाटायचे म्हणुन ते goal ठेवला होता. आणि आम्ही हे मिळवेपर्यंत महिन्याला २५,०००रु. लागतील असे कळले. Happy

निबंध - अगदी अगदी.. आपण येवढे पुरतील असं समजून पैसा वाचवावा तर महागाई इतकी वाढते मधल्या काळात की त्या 'येवढ्याचे' 'तेवढे' होतात. 'तेवढे' मिळवेपर्यंत पुन्हा गाडी पुढे गेलेली असते.
हे मी घराच्या किमतीच्या बाबतीत अगदी अनुभवलंय!

हे मी घराच्या किमतीच्या बाबतीत अगदी अनुभवलंय >> फक्त घरच नाहि तर सगळ्याच बाबतीत होते असे. म्हणुनच आता ठरवुन टाकले की दहा वर्षांनी रिटायर होणार मग सहा महिने इथे सहा महिने तिथे. Happy

मी २००६ च्या अखेरीस दुबई हुन भारतात परत आलो. दुबईचा फायदा हा की भारतात रुळायला फार त्रास पडत नाही. WLB दुबई - शारजा येथे खाजगी कंपन्यात नसतेच त्याचा पण त्रास नाही. उलट भारतात खुप छान आहे. वर खर्चाचा उल्लेख आला आहे. त्या संदर्भात काही माहीती. मी नोएडात रहातो.
घर भाडे - १३०००/- (३ बी एच के)
सोसायटी - १६५०/-
ग्रोसरी - ३००० - ४०००/-
वीज बील - २००० - ३५००/- (२ ए सी किंवा २ हिटर थंडीत सध्या तापमान ५ डी. ते १२/१३ डी आहे)
मुलाच्या शाळेची फी - ३५००/- (एका मुलाची नर्सरीची)
ट्रान्सपोर्ट - ३०००/-
बाकीचे खर्च - ३०००/-
सर्वसाधारण ३१ ते ३२ हजार महीन्याला लागतात. जर घराचे लोन असेल तर पझेशन मिळेपर्यन्त त्याचा हप्ता. तसेच बाकीचे अनेक खर्च आहेत.
येथे घराच्या किमती - २ बी एच के - ३० ते ३५ लाख, ३ बी एच के ३५ ते ४५ लाख आहेत.
तेव्हा परत येताना आर्थिक बाबींचा विचार अवश्य करावा.
मंदार

Pages