परतोनि पाहे (परदेशातून परतलेल्या, परतू इच्छिणा-यांचे अनुभव)

Submitted by रैना on 5 January, 2010 - 01:52

इथे खालील मुद्यांवर चर्चा / अनुभव अपेक्षीत आहे. शक्यतो उपदेशापेक्षा (काय करायला हवं वगैरेंचे डोस) अनुभव लिहा. आपण विचारांती काय निर्णय घेतला, का घेतला आणि तो कसा निभावतो आहोत.

- तुम्ही भारतात का परतलात, परतावसं का वाटलं (नक्की प्राण का तळमळला?) परतल्यावर आता कसं वाटतय ? (व्यक्तिगत बरेवाईट अनुभव, ठेचा, विचारमंथन).
-- तळ्यात मळ्यात- परतावसं वाटतय, हिम्मत होत नाही? दोलायमान परिस्थिती आहे? नवराबायकोपैकी एक अत्यंत नाखुष आहे ?
- परततानाची चेकलिस्ट ( काय करावे आणि करु नये)
- केल्याने देशाटन परदेशात काय मिळवलं, काय गमावलं
-भारतातील संधी, नोकरी, व्यवसाय, आर्थिक परिस्थितीचा आढावा (अनुभव), वर्क लाईफ बॅलन्स (व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्याला देता येणारा वेळ)
- मुलं आणि तदनुषंगिक शेकडो गोष्टी ( शाळा, शैक्षणिक पद्धत, पाल्याचा सर्वांगीण विकास, भाषांचा सराव, गणिताचा सराव, वातावरणाचा सराव)
- वृद्ध होत चाललेल्या मातापित्यांची जवाबदारी. पुन्हा एकत्र आल्यावरचे अनुभव. त्यांच्या दृष्टीकोनातून तुमचे परदेशगमन आणि पुनरागमन.
- समाजाचे देणे
- दोहोंचा अनुभव घेतल्यावर आता काय करायचा मानस आहे ?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझे बाबा संघ कार्यकर्ते आहेत. शाखेत वगैरे जातात. तिथे त्यांना त्यांचे सगळे सहकारी भेटतात. घरी येणारे जाणारे सारखे असतात. सकाळचा पहिला चहा एकट्याने घेतला असे सहसा होत नाही. कोणी नाही तर शेजारचे जोशी काका असतात. गावातले अनेक राजकारणी/नेते मंडळी सल्लामसलतीसाठी येतात. रोजची १०१ मराठी वर्तमानपत्रं घरी येतात. आईचा पण मस्त गृप आहे. संध्याकाळी बायका आमच्या अंगणात जुनी गाणी/कविता/वाचलेले काही ह्यावर चर्चा करतात. दुखण्या खुपण्याला सगळे एकमेकांना साथ देतात. वर्षातुन ३-४ वेळा सगळ्या मैत्रिणी कुठे कुठे सहलीला जातात. शिवाय आमच्या, कॉलोनीतल्या इतर कुणाच्या शेतात हुर्डा पार्टी इत्यादी होतेच. जर इथे आणायचेच झाले तर ह्यातले मी काय देऊ शकते माझ्या आई-बाबांना ? तिथली धरणं भरली, प्रवरेला पाणी वाहिले की मलाच रडायला येते. बाबांच्या अस्वस्थपणाची तर कल्पनाही करवत नाही. And I am sure, थोड्या फार फरकाने अनेक पालकांची अशी स्थिती होइल. भलेही त्यामागची कारणं वेगळी असतील.

आई-बाबांना ४-६ महिने नक्कीच चांगलं वाटतं पण परत तिकडची ओढ लागतेच. वयाची ५०-६० वर्ष तिकडे काढलेली असतात.

सिंडरेलाला माझंही अनुमोदन!
आणि आईबाबांशिवाय इतरही काही जवळच्या नातेवाईकांमध्ये जीव अडकलाय माझा!

प्रीति, ४,६ महिनेही खूप झाले. आमच्याकडे १.५/२ महिने व्हायला आले की कासाविस होतो जीव. परत जायचे वेध. येतानाच ते १.५ महिन्यानंतरचं तिकीट बुक करुन येतात. कायमचं आणणं म्हणजे अशक्य गोष्ट. असं वाटतं की इथे येऊन मानसिक आजारच होतील.

सिंड्रेला अनुमोदन.१००% माझ्याकडे आइबाबांना यायला लागले. आम्ही तर भारतातच ना पण त्यांचे लिटरली काळीज तुट्ले पुणे सोडताना. एक आयडेंटीटीच तुटून पडली. त्यांनी मला बोलून दाखविले नाही तरी ते दोघे मनातन दु:खी होते.

अगदी अगदी सिंडी.
माझे आई वडील येताहेत पुढच्या महिन्यात. पहिल्यांदाच . (आणि आत्ताच सांगितलय कि परत काही येणार नाही. :()
वडील तर एकच महिन्याच तिकिट काढायच म्हणुन सांगत होते. १५ दिवस तुझ्याकडे आणि १५ दिवस बहिणिकडे. मी जरा खुप दंगा केल्यावर थोडे अधिक दिवस रहातो म्हणुन कबुल केलय. पण ताबडतोब हे पण विचारुन घेतलय कि , "तिकिट प्री पोन करता येत ना?" आता काय करायच.:)
आमच्या घरी सतत माणस. ती इथे कुठून आणणार? पाण्यातुन काढलेल्या माशा सारखी अवस्था होईल त्यांची. आईला तर आमच्या मते मिलिअन्स अँड थाऊजंड्स मैत्रीणी. ती इथ स्वयंपाक घरात काम करुन बिझी राहिल. पण करमण शक्यच नाही तिला.
बेसिकली दोघांचीही मुळ इतकी घट्ट रुजली आहेत तिथे, आता कुठेतरी दुसरीकडे रुजण शक्यच नाही त्याना.

अगदी माझ्या मनातलं लिहिलत तुम्ही सिंडरेला ....
माझे आई बाबा आणि सासू सासरे सगळे आता पुढ्च्या १-२ वर्शात रिटायर होतिल....
आता हे सगळेच्या सगळे इथे येउन कायमचे राहतील आणि रमतील याची शक्यता शून्य आहे...
आणि यातलं कोणिही दूर असेल तरी घर अपूर्ण वाट्णारच...
तरीही यात भावंडं धरली नाहीत...
याशिवाय नवर्‍याचे आजी आजोबा आहेत...
माझी आजी राहते आई-बाबांसोबत.....या सगळ्याना तिकडे सोडून १ महिना इथे अमेरिकेत राहताना माझ्या आई आणि सासूचा जीव खाली-वर होत होता....आता गेले दोन दिवस माझी आजी हॉस्पिटल मध्ये आहे तर मी नुसते फोन करते आहे...मदत शून्य...आणि जिवाची घालमेल होते ती वेगळीच...

ही परिस्थिती सर्वांच्या बाबतीत सारखी नसणार....
माझ्या एका मित्राचे आई वडील मागच्या वर्षी २ महिन्याकरता आले होते...त्याना आवड्ले इथे राहायला....
मग ते ६ महिने राहिले....त्यामुळे प्रत्येकाची variables काय समीकरणेच वेगवेगळी असतात...
बर्‍याचदा ते समीकरणच मांडायलाच जमत नाही.....

माझी परिस्थितीपण सेम वरच्या सारखीच आहे. १५ वर्षात सासु,नणंद, आई फक्त एकच ट्रीप, सासरे २ वेळेस आले बस. वडिल नाहिच आले. सगळ्यांकडे १० वर्षे मटिपल एन्ट्री व्हिसा आहे. रिनिव्ह करत राहतात पण काहि उपयोग नाही. प्रत्येकजण तिकिट प्रिपोन करुन भारतात गेलेले. Sad
त्यामुळे ते इथे कायम राहण्याचा प्रश्नच नाही.

सिंड्रेला, मस्त जीवनशैली आहे तुझ्या आई-वडीलांची.. खरे तर ज्या लोकांनी कायमचे परदेशात स्थायिक होण्याचे ठरवले आहे , त्यांचे पण विचार जाणुन घ्यायला आवडले असते की त्यांनी काय गोष्टी पाहिल्या हा निर्णय घेताना. म्हणजे तुलना अजुन सोपी झाली असती.

आमच्याकडे पण तो प्रश्नच नाही. तिथे सगळे इतके त्यांच्या डेलीरुटीन मधे मग्न असतात कि इथे कायमचे रहायला कुणीच तयार होणार नाही. मागे सासरे आलेले ते जेमतेम दिड महिना राहिले. 'माझी किती काम खोळंबली आहेत तिथे' हेच सतत बोलायचे. कंटाळा यायच्या आत जाइन हे मुख्य. जितके दिवस होते तितके दिवस मजेत राहिले. Happy

खरे तर ज्या लोकांनी कायमचे परदेशात स्थायिक होण्याचे ठरवले आहे >> सुनिधी आमच्या बाबतीत सांगते - असे कधी काही ठरवलेच नव्हते. पहिले नवरा एम्.एस साठी (लग्न करुन)आला तीन वर्षांनी मी आले त्यामुळे देशात, इथे प्रचंड कर्ज (लोन). ते फेडायचे व थोडे (?) पैसे जमले की वापस जायचे असे विचार. पण हे करण्यात वेळ आणि भारत इतका पुढे निघुन गेला आम्ही आता वाट्ते या वयात परत स्ट्रगल करणे वर्थ आहे का. आता इथे आमचे एक वेगळे विश्व तयार झाले आहे.

माझ्या घरी मी एकटाच कमावता आहे. आईला पेन्शन मिळते. बहिणींचे मलाच पहावे लागते. भाचे भाच्या देखील आहेत खूप. माझा आईसाठी खूप जीव तुटतो पण तिला इथे आणले तर तिची कितीतरी कामे इथे येऊन बंद होतील. तिथे ती काम वगैरे करुन चंचल राहते. इथे ती मी ऑफीसमधे गेल्यानंतर काय करेल मला कळत नाही. शिवाय आई निरक्षर आहे त्यामुळे भिती वाटते. मी जर देशात परत गेलो तर, म्हणजे कधीतरी नक्की जाईल, पण आत्ता गेलो तर परत आर्थिक चणचण नको भासायला पुढे चालून याची काळजी वाटते. तेंव्हा मन मारुन काही वर्ष इथे काढून जेंव्हा मला माझ्यावर विश्वास वाटेल तेंव्हा मी परतेन.

बी, चंचल नव्हे, व्यस्त म्हण. चंचल हा स्वभावविशेष आहे. ज्यांचं एका कामात फार काळ मन टिकत नाही, कॉन्संट्रेशन होत नाही त्यांना चंचल म्हणतात.:)

आमचे अकोला सुटेल. तिथले आम्ही पाहुणे होऊ.>> ह्याला मी स्वतःपुरता विचार म्हटल.

सगळ्यांच अगदी बरोबर आहे. सगळेच आईवडिल adjustहोऊ शकतील असं माझं म्हणणं नाही. फक्त जे केवळ आईवडिलांसाठी जात आहेत त्यांना एक विचार सुचवला. काही आईवडिल इथल्या लायब्ररी वगैरे सोईंवर खूष असतात. जे खूप सोशल नसतात ते लौकर adjust होतात. माझे सासरे इथे खूष होते. IIT तून Chemical Engineering चे Professor म्हणून Retire झाल्यावर इथे रोज सकाळी ८ ते संध्याकाळी ५ पर्यंत युनिव्हर्सिटीच्या लायब्ररीत बसायचे आणि त्या वेळात त्यांनी Chemical Engineering च एक पुस्तक लिहिल. सासूबाई आणि सासर्‍यांनी मिळून ब्रिज क्लब join केला. सासूबाईंनी मायकल्समधला पेंटींग क्लास जॉईन केला. दोघांनी स्वतःला बीझी ठेवलं आणि ज्या गोष्टी ते धकाधकीत करू शकले नाहीत त्या केल्या. त्यांनी नातेवाईक मित्र मैत्रिणी नक्कीच मीस केले असतील पण मुला नातवंडांबरोबर रहाणं त्यांना आवडलं.

बरोबर आहे आर्च. मी आता माझ्या ऐम. टेक. संपले की इथे आईला आणून पहातो. तिला इथे आवडले तर इथेच काही वर्ष आम्ही राहू. मग सोबत परत जाऊ कायमचे भारतात. पण अजून आईचा पासपोर्ट आलेला नाही. आई शाळेत गेली नाही त्यामुळे तिच्या जन्माचा दाखला वगैरे मला गोळा करावा लागणार. ती बहुतेक घरीच जन्मली असेल. त्यामुळे आणखीनचं कठिण. दरवेळी मी भारतात जातो तेंव्हा इतर कामे इतकी निघतात की आईच्या पासपोर्टाला मला वेळ नाही मिळत. आपल्याकडे हे दाखले ते दाखले इतके मागतात आणि ते मिळवताना खूप त्रास होतो.

चचंल शब्दाचे बरेच अर्थ आहेत. तुम्ही तो शब्द कुठल्या वाक्यात आणि कुठल्या भावनेनी वापरला त्यावरुन अर्थ निघतो.

बी, अरे युएसला जायचेय, पासपोर्ट हवा असे सांगून दाखला आणायचाच नाही. पॅन कार्डसाठी हवाय वै. असेच काही तरी सांगायचे. ग्रामपंचायतीच्या ऑफिसातून घ्यायचा दाखला अशावेळेस. थोडेसे नियम तोडावे लागतील पण त्याला गत्यंतर नाही.

माझ्या एका मित्राने त्याच्या आईचा दाखला असाच तयार करून (?) आणला होता.

२०११ वर्षामधे भारतात परतायचा प्लान आहे. मि इथे आयटि फिल्ड मधे काम करते आहे. Systems Analyst आणि आता in Testing मधे. ६ वर्षांचा अनुभव होइल परत येइपर्यंत. इथे MS केलेले आहे. सगळा अनुभव इथला आहे. पुण्यामधे, मुंबई मधे साधारण काय range मधे salary आहेत या field मधे? कोणि या field मधे असल्यास मार्गदर्शन केले तर चांगले होइल.

कालच्या टाइम्स ऑफ इन्डियामध्ये वाचले. एक एनाराय बाइ ९ व ६ वर्शांच्या मुलींबरोबर भारतात व्हिजिट ला आल्या होत्या. ते आजीला भेटायला कोलकत्त्यास गेले होते/ आइ चेक इन काउंटर वर जाउन तिकिट घेइपरेन्त तिने मुलीला एका लोडर/ सुपरवायझर बरोबर उभे केले. ते सामान एक्स रे करण्याचे मशीन असते तिथे. तो ५४ वर्शीय अहमद. आई परत येइ पर्यंत त्याने ९ वर्शीय मुलीस मशीन मागे नेऊन गैर प्रकार केले. आइ परत आल्यावर तिने मुलगी रड्ताना पाहिली व चौकशी केली. त्याला पोलिसाच्या ताब्यात दिले आहे. एअर इंडियाचा लोडर.

परदेशात राहताना चांगल्या व विनम्र सर्विस स्टाफ ची सवय होते व इथे असे विचित्र अनुभव येतात देसी लोकांचे. मुलांच्या नाजुक मनावर वाइट परिणाम होतात पालकांना हळहळ वाटते. परत येत असाल तर मुलांना अगदी नजरे समोर ठेवा. कोणावरही विश्वास ठेवून नका. मला तर वाचून दोन मिनिटे कसे तरीच झाले.

भारतीय आईवडील प्रचंड practical असतात त्यामुळे कुणीही अपराधी भावना मनात आणु नये असे मल वाटते. आमच्या colonyतले आजी आजोबा आर्थिक स्वावलंबी,त्याअंचा मुलगा अमेरिकेत त्याची मुले तिकडच्या शाळेत, मुलगी मुम्बैइत. मधे आज्जींचा पायाला लागले त्यामुळे चालता येत नवते, आजोबांना वयोमानानुसार थकवा.मुलाला उगीचच अपरधी वाटत होते की आई वडीलांना एकते सोडले या वयात ,पण वाढत्या वयाच्या शाळेत जाणार्‍या मुलाना अचानक इथे कुठे घेउन येणार त्यामुळे दिवसातुन ३-४ काळजीचे फोन . शेवटी आजीनी त्याला साम्गितले हे बघ बिलकुल काळजी करु नकोस इथे २ beauroच्या बायका लवल्या आहेत मदतीला २४ तासासाठी . त्या सगले नीट बघतात.मुलीचे मुम्बईचे घर लहान म्हनुन तिथेही जाउन उगीच त्रास नको म्हणाल्या. कुठेही एव्हदीशी तक्रार नव्हती मुलांविशयी.मला वाटते की श्रावणबाळ होण्याच्या नादात पुढच्या पिढीचे नुकसान करु नये.

इथे काही जणांनी मुलाना नाती-गोती मिळावीत म्हणुन परत यायचे मत मांडले आहे. पण भारतात मुख्यत्वे मोठ्या शहरात तर सगळेच western culture (त्याची भ्रष्ट नक्कल) येत आहे. त्यात काय डोंबलाची नातीगोती तुम्ही त्यांना शिकवणार.आणि परक्या लोकांची भ्रष्ट नक्कलच मुलाना शिकवाण्यापेक्षा खरेखुरी पाश्चिमात्या संस्क्रुती शिकलेले जास्त चांगले नाही का.
इथे एक किस्सा जाता जाता सांगावासा वाटतो,
माझा अमेरिकेतला मावसभाउ आणि वहीनी decemberमधे इथे आले होते. दोघांचेही इकदे यायचे की नाही असे तळ्यात मळ्यात आहे.त्याच्या भारत्भेटीच्या निमित्तने मामाने हुरडा पार्टी केली सगळ्या भाच्याना बोलावले.भावाला अगदी गहीवरुन आले. वहीनीला म्हणाला बघ कसे छान वातते आपल्या लोकात्.मी म्हंटले थांब .लगेच निष्कर्ष काढु नकोस .तुझ्या निमित्ताने आम्हाला हुरडा पार्टी तरी मिळाली otherwise मामाशी अशा आमने सामने भेटीचा प्रसंअग आमचा वर्षभरात आलाच नाहिये. तु इथे कायमचा आलास तर ही एवडी हुर्डा पार्टी पण मिळेल ह्याची शाश्वती नाही.jokes apartतुला दुसर्‍या कुठल्या कारणांसठी यायचे असेल तर ये भारतात पण आपली माणसे ह्या भाबड्या कारणासाठी आलास तर पोपट होइल.वर्षभर chatting,orkut throughतुझ्याशी जेवदे माझे बोलने होते त्याच्या १/१० ही भारततल्या माव्स भावंडांशी होत नाही.
तुम्ही तुमच्या जुन्या आठवनीतले नातेसंबध शोधत परत येत असाल तर अपेक्षाभंगाचे दु;ख पदरी यायची जास्त शक्याता आहे.१५ दिवसांच्या भारत भेटीत सगलेच चान वागतात ,ground reality तुम्हाला कुनीच स्पष्टपणे सांगणार नाहीत.

>>भारतात मुख्यत्वे मोठ्या शहरात तर सगळेच western culture (त्याची भ्रष्ट नक्कल) येत आहे. त्यात काय डोंबलाची नातीगोती तुम्ही त्यांना शिकवणार.आणि परक्या लोकांची भ्रष्ट नक्कलच मुलाना शिकवाण्यापेक्षा खरेखुरी पाश्चिमात्या संस्क्रुती शिकलेले जास्त चांगले नाही का.

अगदी अगदी. आम्ही १ वर्ष भारतात होतो. सगळीकडेच western culture आणि तेही आपल्या सोयीप्रमाणे बदललेले (म्हणजे चांगले सोडायचे आणि वाईट तेव्हढे घ्यायचे).

इकडे बोलावले तर लगेच कशाही सुट्ट्या मिळवुन आलेले नातेवाईक तिकडे १ वर्षात एकदाही भेटले नाहीत कारण त्यांना सुट्टीच नव्हती लांब बंगळूरूला यायला.

परत जायचे असेल तर इतरांसाठी (नातेवाईक, मुले कुणीही) जाण्यात फारसा अर्थ नाही. तुम्हाला स्वतःला तिकडे राहणे जास्त आवडणार असेल तरच जावे. कारण at the end of the day जाणे/ न जाणे हा निर्णय तुमचा असणार आहे आणि तो तुम्हाला निभवायचा आहे.

१५ दिवसांच्या भारत भेटीत सगलेच चान वागतात ,ground reality तुम्हाला कुनीच स्पष्टपणे सांगणार नाहीत.
>> माहीत नाही.. निदान माझातरी आत्तापर्यंतचा अनुभव खूप वेगळा आहे.. मला वाटतं फॅमिली सापेक्ष असतं हे!

कधी कधी मला वाटतं.. 'रहायचं का जायचं' हा निर्णय आपण अगदी अगोदरच - आपल्या नकळत घेऊन टाकलेला असतो.. आणि मग आपण त्याच्या समर्थनार्थ कारणं शोधत रहातो..

काल लिहायचे राहुन गेले. आर्क, तुम्ही दिलेल्या आजी आजोबांसारखी लोकं फारच दुर्मिळ. माझ्या मावस आजीचा मुलगा (माझा मामा) सध्या इथेच स्थायीक आहे. आजी आजोबा मात्र आजिबात खुष नाहीत. मुख्य म्हणजे ते काही मदत सुद्धा घ्यायला नाही म्हणतात. त्यांचा हाच अट्टाहास की मुलानी भारतात येवुन राहावं. या मुळे त्यांना स्वतःला सुद्धा पुष्कळ त्रास होत आहे, तरिही ते पुर्ण वेळ कोणाला कामावर ठेवायला नाहीच म्हणतात. एकंदरित अवघड परिस्थिती आहे.

१५ दिवसांच्या भारत भेटीत सगलेच चान वागतात ,ground reality तुम्हाला कुनीच स्पष्टपणे सांगणार नाहीत.
>> माहीत नाही.. निदान माझातरी आत्तापर्यंतचा अनुभव खूप वेगळा आहे.. मला वाटतं फॅमिली सापेक्ष असतं हे!>>

नानबा, दोन्ही पोष्ट बद्दल अनुमोदन.
अजूनही नात्यातली ओढ तशीच वाटते. मी वर्षातून एकदाच भेटते सर्वाना पण बाकी सर्व वर्षातून २-३ दा तरी एकत्र येतात.

western culture बद्दल अजूनतरी फार काही वाईट अनुभव नाही आला. कदाचित माझ्या आजुबाजूला मी माझ्यासारखीच मंडळी गोळा केली आहेत. काही प्रमाणात मी पण बदललेय.

१५ दिवसांच्या भारत भेटीत सगलेच चान वागतात ,ground reality तुम्हाला कुनीच स्पष्टपणे सांगणार नाहीत.
>> माहीत नाही.. निदान माझातरी आत्तापर्यंतचा अनुभव खूप वेगळा आहे.. मला वाटतं फॅमिली सापेक्ष असतं हे!>>

नानबाला अनुमोदन.आम्हिपण लवकरच भारतात जाणार आहोत्.कारण फक्त दोघांचे आईवडील्.आम्हाला त्यांना ह्या वयात एकटं राहुन नाहि द्यायचं.आणि तिथे सगळे नातेवाईक आठवड्यात किंवा महिन्यात तरी भेटतातच.त्यामुळे नुसती धमाल असते.मित्र परीवार पण एवढा मोठा आणि अडचणीला धाऊन येणारा आहे.
त्यामुळे इथे खुप एकटं वाटतं.
आत्ताच आम्हि नवीन घरात शिफ्ट झालो,सगळं दोघांनीच केलं,हेच भारतात जेव्हा शिफ्टिंग झालेलं तेव्हा १० जण तर असेच जमा झालेले मदतीला.अर्थात हा माझा अनुभव आहे.
माझ्यापुरतं बोलायचं झालं तर ,जर्मनी आणि अमेरिका मला खूप आवङले,लाईफ स्टाईल खूपच छान आहे,पण जेव्हा सणवार येतात्,घरच्यांचे वाढदीवस,गेट टुगेदर असतात्,तेव्हा नुसतं फोनवर बोलताना खुप गलबलतं.त्यातुन कुनी आजारी असेल तर जास्त काळजी वाटत राहते.माझे सासु सासरे तर आम्हाला काळजी वाटेल म्हणुन कधी कधी सांगतपण नाहित्,म्हणुन अजुन काळजी वाटते.
असो,हि माझी कारणं झाली परतोनी जाण्याची Happy

>>पण भारतात मुख्यत्वे मोठ्या शहरात तर सगळेच western culture (त्याची भ्रष्ट नक्कल) येत आहे. त्यात काय डोंबलाची नातीगोती तुम्ही त्यांना शिकवणार.आणि परक्या लोकांची भ्रष्ट नक्कलच मुलाना शिकवाण्यापेक्षा खरेखुरी पाश्चिमात्या संस्क्रुती शिकलेले जास्त चांगले नाही का.<<
जिथे रहायचे तिथली संस्कृती आपलीशी करणे हे इष्टच.
भारतातल्या संस्कृतीत झालेले बदल हा धेडगुजरीपणा आणि परक्यांची केवळ भ्रष्ट नक्कलच असं म्हणणं टोकाचं आहे. मोठ्या शहरात वाढणारी सगळी पिढी ही इतकी वाईट संस्कारांच्यात वाढतेय हे म्हणणं काही पटत नाहीये.
चांगले वाईट दोन्ही बदल प्रत्येक संस्कृतींमधे होत असतातच. चांगले वाईट हे ही तसं सापेक्षच आहे. जसा हा परतोनी पाहे चा निर्णय.
कुणाला आपल्या माणसांसाठी, कुणाला मुलांच्यात भारतीय संस्कृतीसाठी परत यावसं वाटतं तर कुणाला मुलांच्या उज्वल भविष्यासाठी, स्वतःच्या करीअरसाठी परदेशातच रहावसं वाटतं. दोन्ही गोष्टी आपापल्या जागी योग्य आहेत. ही सगळीच कारणे त्या त्या माणसासाठी प्रामाणिक असतात आणि दरवेळेलाच हा वरती उल्लेखलेला पोपट होतोच असं नाही.
असो... शेवटी आईबापाला पुरेशी अक्कल असेल तर एक चांगला/ली मनुष्यप्राणी म्हणून मुलाला वाढवणं हे जगाच्या पाठीवर कुठेही शक्य आहे.

Pages