परतोनि पाहे (परदेशातून परतलेल्या, परतू इच्छिणा-यांचे अनुभव)

Submitted by रैना on 5 January, 2010 - 01:52

इथे खालील मुद्यांवर चर्चा / अनुभव अपेक्षीत आहे. शक्यतो उपदेशापेक्षा (काय करायला हवं वगैरेंचे डोस) अनुभव लिहा. आपण विचारांती काय निर्णय घेतला, का घेतला आणि तो कसा निभावतो आहोत.

- तुम्ही भारतात का परतलात, परतावसं का वाटलं (नक्की प्राण का तळमळला?) परतल्यावर आता कसं वाटतय ? (व्यक्तिगत बरेवाईट अनुभव, ठेचा, विचारमंथन).
-- तळ्यात मळ्यात- परतावसं वाटतय, हिम्मत होत नाही? दोलायमान परिस्थिती आहे? नवराबायकोपैकी एक अत्यंत नाखुष आहे ?
- परततानाची चेकलिस्ट ( काय करावे आणि करु नये)
- केल्याने देशाटन परदेशात काय मिळवलं, काय गमावलं
-भारतातील संधी, नोकरी, व्यवसाय, आर्थिक परिस्थितीचा आढावा (अनुभव), वर्क लाईफ बॅलन्स (व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्याला देता येणारा वेळ)
- मुलं आणि तदनुषंगिक शेकडो गोष्टी ( शाळा, शैक्षणिक पद्धत, पाल्याचा सर्वांगीण विकास, भाषांचा सराव, गणिताचा सराव, वातावरणाचा सराव)
- वृद्ध होत चाललेल्या मातापित्यांची जवाबदारी. पुन्हा एकत्र आल्यावरचे अनुभव. त्यांच्या दृष्टीकोनातून तुमचे परदेशगमन आणि पुनरागमन.
- समाजाचे देणे
- दोहोंचा अनुभव घेतल्यावर आता काय करायचा मानस आहे ?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

तुम्ही भारतात प्रवास करणार असाल तर इंडिगो ने कुठे जाणार असाल तर सामान जपा. परवा एकाचे चेकिन बॅगेज मधले पैसे व डेबिट कार्ड लोडर ने चोरले. व एअरलाइनने साधी माफी पण मागितली नाही. पोलिस केस करून पैसे तुमचे तुम्ही परत मिळवा असे सांगितले.

वेस्टर्न कल्चरची नक्कल करणारा एक अ‍ॅस्पिरेशनल क्लास आहे पण काही लोक त्याच्या पुढे जातात. रिशी व्हॅली किंवा महर्शी महेश योगी वगैरे शाळामधून भारतीय तत्त्वज्ञान योग वगैरेची बैठ्क मुलांना देतात व
अभ्यास इन्ग्रजीतून असतो. मुलांची समतोल वाढ होण्यासाठी. याचा उलट परदेशातील कंझ्युमरिस्ट कल्चर्ला तोंड देताना संयम राखण्यासाठी मुलांना उपयोगच होइल.

इथे काही शाळा आहेत ना हार्वर्ड इंटरनॅशनल किंवा शेरवूड कॉन्वेन्ट नावाच्या. अगदी जुन्या शहरात गल्लीत.
लैच अ‍ॅस्पिरेशनल.

नीधप, अतिशय संतुलित पोस्ट!! आत्ताच घरात मित्रांबरोबर ह्याच विषयावर चर्चा करताना ही पोस्ट वाचुन दाखवली. Wonderfully Put! Happy

. परवा एकाचे चेकिन बॅगेज मधले पैसे व डेबिट कार्ड लोडर ने चोरले. >> पैसे व डेबिट कार्ड यासारख्या मौल्यवान बस्तु चेक इन करण्यामागचे प्रयोजन कळले नाही.

हो ना, एक ह्यान्डब्याग (किती बरे वाटले हा शब्द लिहून) अलाऊड असते ना?

अलाऊड असताना चेक इन ब्यागेत पैसे आणि कार्ड ठेवणे हे ' वेंधळेपणाच्या 'बीबीवर जायला पाहिजेत...

(रच्याकने, मामीसाहिबा, तुम्ही वेंधळेपनाच्या बीबी वर फारसे नसता? वेंधळेप्रूफ आहात का? अहो त्या बी बी वर करमणूक होते. मन मोकळे होते, आपल्यासारखे अनेक आहेत असे पाहून धीर येतो , गिल्ट(कानकोंडेपणा :फिदी:) जाते अन आत्मविश्वास वाढतो.

शिवाय डोके थन्ड राहून झोपही शान्त येते.... :फिदी:)

(रच्याकने, मामीसाहिबा, तुम्ही वेंधळेपनाच्या बीबी वर फारसे नसता? >> लेटेस्ट वें माझाच लिहिलाय की राव. अजून कपाळावरचे टेंगुळ गेले नाहीये. मी वर सांगितलेली घट्ना एका तरुण जोडप्याच्या बाबतीत गोवा मुंबै प्रवासात घडली. मला ही तुमच्यासारखीच शंका आली. गोव्याहून परतत असल्याने तो इफेक्ट असेल. पण इंडिगो लै ब्याकार ओवरॉल. एकुणच परदेशात सर्विसेस चांगल्या अस्तात व इथे आल्यावर देशी झटके बसू नयेत म्हणुन मी अश्या पोस्टी लिहीत असते.

आता आयपीएल चे प्रमोशन बघून मन अगदी देशी पणाने सध्या भरलेले आहे. वापस अपने घर में / सारे जहांसे अच्छा सचिन व स्टीव वॉ एकाच लायनीत उभे वगैरे. आयपीएल बघायला तरी या बॉस. त्या बेस बॉल/ रग्बीत काय ठेवले आहे. ( दिवे बरे का!)

$१०० दिले तर अमेरिकेत IPL लाईव्ह दिसते. अधिक माहीतीसाठी www.directv.com मध्ये cricektticket शोधा. (disclaimer: माझा आणि त्यांचा काहीही आर्थिक संबंध वगैरे नाही, मामींचे ऐकून कुणी लगेच त्यासाठी भारताला मूव्ह करू नये म्हणून लिहिले.) Happy

आंतर्जालविषयक कायद्यांबद्दल सचिंत होऊन मी इथले लिखाण उडवले आहे. उगाच मायबोलीवर काही गैर परिणाम होऊ नयेत म्हणून.

माझा पण आयपीएलशी काहीच आर्थिक संबंध नाही. क्रुपया गैरसमज नसावा. Happy

झक्की शेवट्च्या वाक्याला अनुमोदन.

नीधप खरेच चांगले पोस्ट आहे. आधी लिहायचे राहिले.

मीपण आयपीएल चे अगदी प्रेमाने लिहिले होते. आजकाल सगळे सगळीकडेच दिसते. त्यांनी फक्त त्या देशी भावनेचा चांगला वापर केला आहे. ते मोठे रेड कार्पेट, स्टेडियमचा लखलखाट जागतिक कीर्तीचे खेळाडू. आता परवा पासून खूप मजा येणार त्यात तुम्ही ही सहभागी व्हावेत एवढेच. कारण मागच्या वरशी ती स्पर्धा दुसरीकडे घेतली होती. हिशेबच करायचा तर ५५०० रु. त टाटास्काय वर्शभर सर्व च्यानेल्स मिळतात वर १२ सिनेमे फुकट. Proud

आम्ही थोडेच ऑस्कर बघायला नाहीतर सुपर्बोल बघायला येणार आहोत तिथे. इथे नाहीतर युट्युबवरच बघू की.

काही महिन्यांपूर्वी सुरु झालेली ही साईट बघा. startup आहे IITK मधील एकाची. मी ह्यात असलेल्या दोन कं. मध्ये काम केले आहे.. त्यानुसार दिलेले पगाराचे आकडे बरोबर वाटत आहेत.

आंतर्जालविषयक कायद्यांबद्दल सचिंत होऊन मी इथले लिखाण उडवले आहे. उगाच मायबोलीवर काही गैर परिणाम होऊ नयेत म्हणून.

आंतर्जालविषयक कायद्यांबद्दल सचिंत होऊन मी इथले लिखाण उडवले आहे. उगाच मायबोलीवर काही गैर परिणाम होऊ नयेत म्हणून.

झक्की, मला तुमचे मुद्दे कळले पण त्यांच्या प्रस्तुतीकरणामुळे आणि काही पुर्वी घडलेल्या वादांमुळे ते मुद्दे कोणी सरळ पणे घेणं अशक्य आहे. त्यात तुम्ही भारत सोडुन खुप वर्ष झाली आहेत हे ही विसरायला नकोच.

झक्कीसाहेब, आयसीसी वर्ल्ड ट्वेन्टी२० २०१० एप्रील्-मे मध्ये बार्बेडोस, सेंट लुसीया (करेबीयन आयलंड्स) इथे आहेत. भारतापेक्षा ही ट्रीप स्वस्त आणि सोयीस्कर. करेबीयन गेटअवे प्लस क्रिकेट; एका दगडात दोन पक्षी. जाणार कां? Happy

काही खात्रीच वाटत नाही, कोण केंव्हा कसे लुबाडेल! आधीच पाकीस्तानी खेळाडू घेणे वादग्रस्त मुद्दा, नि त्यातून सुरक्षा म्हणजे दिव्य! केंव्हा कुठे स्फोट होईल सांगता येत नाही!
>> कुठेही राहा, आयुष्य नश्वरच आहे. आला क्षण सुंदर प्रकारे घालवणे एवढच काय ते आपल्या हातात.
कमीतकमी मी ज्या गावात रहातेय सध्या, तिथे मी दररोज २+ लुटालुटीच्या/गोळीबाराच्या बातम्या वाचतेच. अगदी वैयक्तिक अनुभव ही आहे. हे गाव अमेरिकेतच आहे. आयुष्य अनिश्चितच असतं.

असो.. लईच झालं तत्वज्ञान!

आंतर्जालविषयक कायद्यांबद्दल सचिंत होऊन मी इथले लिखाण उडवले आहे. उगाच मायबोलीवर काही गैर परिणाम होऊ नयेत म्हणून.

बर्याच दिवसापासून वाचते आहे हा धागा.. कारण अर्थातच परत जायचा आहे ..जाण लांबणी वर पडता आहे कारण काहीही असो.. स्वतःच्या समर्थनासाठी मग सम दुखी लोक शोधायचे आणि आनंदी व्हायचा चला .. म्हणजे आम्हीच मूर्ख नाही हे स्वतः ला पटवून द्यायला.. रैना, निधप, महेश, अदिती आणि बाकी हि जणांचे मत वाचले..
महेश चे सर्व प्रथम अभिनंदन.. आणि तुमच्या सारखे लोक कमी असतात (मुलांना मराठी शाळेत घालणं हा त्यातला एक भाग झाला ) .. हे सांगणं जरुरी आहे .. कारण जेव्हा ८०- ९५% लोक वेगळे वागतात आहेत तेव्हा हि स्वतःच्या विश्वासापायी आपल्या जागेवर ठाम राहणा आणि त्याला बायकोची सोबत मिळणे राज योगच ..
इथेही मला अमेरिकन सापडले आहेत जे मूल्यांना जपतात आणि समाधानी असतात.. कारण त्यांना जे बरोबर वाटला त्यांनी ते केला.. क्रमश..

झ्क्की, तुमचं दुरच्या नात्यातलं कोणी आयपीएल प्रमुख नाही का चहापीत खेळाडूंच्या जागेवर बसवण्यासाठी? Proud

तेव्हा जायचा असेल तर अपेक्षा घेऊन जाऊ नाही हाही मुद्दा पटला.. आता माझ्या बाबतीत पहिला कारण नेहमी सारखा ..
आई वडील.. काही जनासाठी हे कारण पोकळ असेल.. परत स्वतःचा समर्थन करायला काही तरी कारण द्यायला हे बरं पडता.. पण जवळ असूनही ते तुमच्या सोबत राहतीलच असा नाही तर काय उपयोग अशे भरपूर भेटतील.. पण ज्यांना मानसिक आधार वागिरे काळात नाही त्यांनी अशा लोकांच्या वाटेला जाऊ नये आणि आपल्या सारख्या लोकांनी त्यांच्या वाटेल जाऊ नये..
पण विचार नक्की करावा कि खरच हे सबळ कारण आहे का.

संस्कृती.. मोठा शब्द मोठा कारण .. परत दिशाभूल करणारा.. नसतील हो आजू बाजूचे सुसंकृत ..(भावार्थ घ्या शब्दार्थ आणि मतितार्थ नको ) पण हवेत नक्की आहे .. गणपती चे १० दिवस साजरे करताना सगळ्या गोष्टी नसतील चांगल्या पण तुमच्या वर आहे तुम्ही काय करावे आणि मुलांना काय शिकवायचे.. सगळाच वाईट नाही .. पण हा सुधा संस्कार असतो.. पहिल्या दिवशी गणपती आणणे , आईची धावपळ बघणे , मोदक खाणे .. सार्वजनिक गणपतीच्या इथे पळत जाऊन आरती करणे.. ह्या रम्य आठवणीचा खजिना मुलांना देणे तुमच्या हातात असते ..

इथे आपला उगाच करू का नको क्रिसमस .. मुलांना पाहिजे आपल्याला नको .. कारण इथे तो हवेत असतो.. ते पण छानच करतात कि त्यांचा सन .. आपण आपला उणे काढत बसतो छे आमची मिठाई बघा हो अस्सल दुधाची .. ह्यांचा म्हंजे पळवाट.. pretzel ला chocolate फासायचा ..आणि म्हणे मिठाई .. जेव्हा तुम्हला वाटता कि सगळे सोबत आनंद उपभोगू शकत नाही तेव्हा जा खरच जा मायभूमीला.. बाकी मग संण कसा हि साजरा करा न .. स्वतःच्या घरी नका बसवू गणपती..

आम्ही सगळा इथे हि करतो ..बरोबर आहे तेवढ्या साथी तिथ जायची गरज नाही .. त्यांचा दृष्टीकोन बरोबर आहे .. कारण ते तटस्थपणे कमी जास्त..चांगला वाईट ..प्रदूषण - नोन प्रदूषण .. comfort - discomfort अशी तुलना करून आपल्यला काय पाहिजे हे ज्यांना कळता त्यांना माझा सलाम.. ..

जमत नाही बॉस मध्येच मन का काय असता .. मध्ये येत .. आणि मग चालू होते द्विधा मनास्तिथी.. तेव्हा एक प्रयत्न करून बघयला हरकत नाही ..नेहमी साठी regret नको कि जाऊन बघितलाच नाही (हे मला माझ्या अमेरिकन advisor नि सांगितला आहे मास्टर्स करताना.. बाकी सगळ्या गोष्टी परत मिळवू शकता गेलेली वेळ परत येत नाही ) .. म्हणून जातो आहे.. त्यासाठी citizen शिप वागिरे घेवून गेलो तर खूप उशीर झालेला असेल.. कदाचित ज्यांच्यासाठी जातो आहे ते हि नसतील.. तेव्हा आता जाणे योग्य ..

क्रमश..

तुम्ही तिथे हि अमेरिकन/ इतर देशवासीय होवू शकता आणि इथेही भारतीय राहू शकता.. मग गोची काय हो.. आपल्यालाच कळत नाही काय पाहिजे .. ..
आनंद आणि सुख तात्पुरते असतात.. समाधान चिरकाळ ( हे हि त्यांनीच सांगितला आहे) .. समाधान हा शब्द परवलीचा आहे हे जिथे जाऊन मिळेल तिथे राहावे असा मला वाटता..

फुकटचे सल्ले आणि उपदेशाचे डोस दिल्याबद्दल माफी असावी.. पण काही म्हणा समाधान मिळाले समर्थन मिळाल्याचे आणि अजून गालफडात हि बसली जी नेहमीच बसते .. बाकीचे लोक हि ती खातात हा असुरी आनंद..

प्रित तुम्ही लिहिताय चांगल पण तुम्हाला नक्की काय अभिप्रेत आहे तेच नेमकं आमच्या पर्यंत पोहोचत नाहीये , थोडक्यात... डोक्यावरुन चाललयं . Proud Light 1

हाहाहा श्री तुमची काही चूक नाही.. हे मी स्वगत लिहील आहे.. .. एक मन आहे (भावनिक असावा ).. दुसरा (वैचारिक असावा) जाऊन काय कप्पाळ करणार..त्यावरचे माझे विचार..
असो तर .
सुदर्शन नि लेख लिहिला होता तसाच काहीसा डोक्यात घेऊन जाणार आहे .. आणि त्यांनी जे लिहिला आहे तेच अपेक्षित आहे .. >>बाबा काय खुश होते >>
बाकी बारीक सारीक गोष्टी कडे लक्ष न देता रक्त दाब न वाढवता बहुतेक जगता येयील एवढी माफक अपेक्षा घेऊन जाऊ या.. असा ठरवला आहे सध्या तरी.. एक वर्ष तरी लागणार आहे .. इथे डोकावले कारण प्लान्निंग करायचा आहे .. काही धक्के बसू नये म्हणून .. पण एक बसलाच कारण मानसी ने सांगितले कॉलेज मध्ये तिप्पट फिया असणार.. त्यावर एक प्रश्न आहे .. हि मुला अमेरिकेची नागरिक तर राहतीलच न .. तर त्यांना इथे पाठवायची संधी तर आहेच न कि ती बंद होते काही काळाने.. हे गृहीत धरून चालतो आहे कि पोरं उजवेच निघतील आणि त्यांना इथे पाठवू पुढच्या शिक्षणासाठी .. ह्यवर तुमचा काय मत आहे ते हि ऐकायला आवडेल..

आज अनेक दिवसांनी इकडे डोकावत आहे. आयुष्याची गाङी अनेक धक्के खात चालली आहे, त्यामुळे माबोचे स्टेशन यायला कधी कधी वेळ लागतो Happy
प्रित, धन्यवाद अभिनंदनाबद्दल. मागे मी याच बाफवर कबूल केले होते की मुलीच्या शाळेचे अनुभव लिहिन. पण तेव्हा जमले नव्हते.
आमचे निकष होते, मराठी माध्यम आणि शाळा घराच्या जवळ असणे. त्याप्रमाणे आम्ही जवळची एक शाळा निवडली, तशी जुनी आणि प्रसिद्ध शाळा आहे. (नाव लिहावे की नाही असा प्रश्न पडला आहे).
माझ्या मुलीचे पहिले चार पाच वर्षापर्यंतचे बालपण जपान मधे गेले होते. तिकडे आम्ही तिला प्ले ग्रूप मधे घातले नव्हते, पण पुण्यात एकदा २/३ महिन्यांसाठी एका प्ले ग्रूप मधे घातले होते, सवय व्हावी म्हणून.
पहिली मधे असताना आम्हाला फार काही वेगळेपण जाणवले नाही. तिच्या वर्गाच्या बाईंना आम्ही कल्पना दिली होती. त्यामुळे त्या तिच्याकडे विशेष लक्ष द्यायच्या. तीचा स्वभाव बराच बुजरा होता. अर्थात घरात खुप चांगला आहे, पाठांतर चांगले आहे, उच्चार चांगले आहेत, आता तर मराठी वाचनाची फार चांगली गोडी लागली आहे. पण दुसरीत गेल्यावर अनेक गोष्टी बदलल्या. को एड आहे, त्यामुळे मुले पण शेजारी बसतात. वस्तु हरवणे, चोरीला जाणे, वह्या पुस्तके फाटणे, इ. चालू झाले, आम्ही आधी दुर्लक्ष केले, तक्रार करून पाहिली, पण त्याचा थोडाफार उपयोग झाला, पण ती शाळेत रमत नाहीये हे चांगलेच जाणवत होते. आम्ही अनेकदा बाईंना, मुख्याध्यापिकांना भेटलो. या सर्वातुन आम्हाला असे लक्षात आले की त्या शाळेत येणारी मुले ही आजुबाजुला असलेल्या स्लम्स सारख्या एरिया मधली आहेत. अनेक मुला मुलींना घरचे आजुबाजुचे मिळणारे संस्कार हे फार वेगळे आहेत. आमची मुलगी पहिलीत असताना आम्हाला घरी येऊन अतिशय घाणेरड्या शिव्या सांगुन त्याचा अर्थ काय असे विचारायची. Sad
आता आम्ही शाळा बदलायचा निर्णय घेत आहोत. थोडे अवघड जाईल, कारण आता नविन शाळा घराच्या जवळ नसणार आहे. नविन शाळा मराठी माध्यमाचीच पहाणार आहोत. आणखी एक कारण माझ्या फिरस्तीमुळे जागा पण बदलावी लागणार आहे.
मला अनेक जणांनी जातीबद्दल पण सांगितले, की त्यामुळे फरक पडतो. पण मला ते फारसे पटत नाही. कारण मी स्वतः ज्या शाळेत होतो, त्या शाळेत अनेक भिन्न जातींची मुले होती, पण म्हणुन माझे काही वाईट झाले नाही. महत्वाचे असतात संस्कार.
बापरे, लिहिण्याच्या नादात बरेच लिहिले गेले...

Pages