परतोनि पाहे (परदेशातून परतलेल्या, परतू इच्छिणा-यांचे अनुभव)

Submitted by रैना on 5 January, 2010 - 01:52

इथे खालील मुद्यांवर चर्चा / अनुभव अपेक्षीत आहे. शक्यतो उपदेशापेक्षा (काय करायला हवं वगैरेंचे डोस) अनुभव लिहा. आपण विचारांती काय निर्णय घेतला, का घेतला आणि तो कसा निभावतो आहोत.

- तुम्ही भारतात का परतलात, परतावसं का वाटलं (नक्की प्राण का तळमळला?) परतल्यावर आता कसं वाटतय ? (व्यक्तिगत बरेवाईट अनुभव, ठेचा, विचारमंथन).
-- तळ्यात मळ्यात- परतावसं वाटतय, हिम्मत होत नाही? दोलायमान परिस्थिती आहे? नवराबायकोपैकी एक अत्यंत नाखुष आहे ?
- परततानाची चेकलिस्ट ( काय करावे आणि करु नये)
- केल्याने देशाटन परदेशात काय मिळवलं, काय गमावलं
-भारतातील संधी, नोकरी, व्यवसाय, आर्थिक परिस्थितीचा आढावा (अनुभव), वर्क लाईफ बॅलन्स (व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्याला देता येणारा वेळ)
- मुलं आणि तदनुषंगिक शेकडो गोष्टी ( शाळा, शैक्षणिक पद्धत, पाल्याचा सर्वांगीण विकास, भाषांचा सराव, गणिताचा सराव, वातावरणाचा सराव)
- वृद्ध होत चाललेल्या मातापित्यांची जवाबदारी. पुन्हा एकत्र आल्यावरचे अनुभव. त्यांच्या दृष्टीकोनातून तुमचे परदेशगमन आणि पुनरागमन.
- समाजाचे देणे
- दोहोंचा अनुभव घेतल्यावर आता काय करायचा मानस आहे ?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आता मला भीति वाटते की भारतात पण हाउसिंग बबल लवकरच फुटणार का? >> शक्यता आहे बॉस. चायना बद्दलही असे म्हणतात.

आता मला भीति वाटते की भारतात पण हाउसिंग बबल लवकरच फुटणार का>> >>>

पूर्ण भारतात हॉसींग बबल नाहीये. तुम्ही जो भारत म्हणत आहात तो पुणे, हैद्राबाद, सिकींद्राबाद, मुंबई जवळील इलाका, गुरगाव, बंगळूर असा आयटी रिलेटेड भाग पाहत आहात.

आता इतर शहरातल्या पण किमती वाढत आहेत पण ते आयटी रिलेटड नाही तर त्याचे मुख्य कारण आहे सहावा वेतन आयोग. हा आयोग लागु झाल्यामुळे शिक्षक, प्राध्यापक अश्या लोकांना भरपुर एरिअर्स मिळाले आहेत व आता शिक्षकांचे पगार साधारण २०,००० झाला आहेत. अचानक आलेल्या पैशाचे काय करावे ( दरमहा ७ ते २०००० एक्स्ट्रा) तर प्रॉप्रर्टी मध्ये गुंतवावेत, आज ना उद्या दुप्पट होतील असा विचार सध्या चालू आहे. नविन घर घेणारे अनेक लोक हे शिक्षक, प्राध्यापक, सरकारी नौकर, क्लास ३, २, १ आहेत हे इतर दुय्यम शहरात प्रॉपर्टी साठी फिरले तर लगेच लक्षात येईल. (अनुभव).

ह्याला बबल म्हणायचे का प्रश्न मलाही अनेकदा पडला, पण त्याचे उत्तर अनेकदाही नाही असेच येत आहे त्याचे कारण म्हणजे भारतात असणारी लोकसंख्या व असणारे जागेचे व्यस्त प्रमाण. खासकरुन पुणे, बंगळुर, मुंबई इथे. जागा कमी व असणारी मागणी अचानक वाढली. (उपरोक्त शहरात मध्यमवर्गीयांचा पगार १० लाख रु प्रति वर्षे झाला आहे.) त्यामुळे २००५ नंतर जागेची मागणी जी वाढली ती बुम मध्ये जशी टिकून राहीली तशीच गेल्या दिड वर्षातील मंदीमध्येही टिकून राहीली. डिसेंमध्ये मी देशात पुण्यात २ बेडचा प्लॅट पाहतो होतो गुंतवणूक म्हणून तर तिथे ३५ लाख ते ४० लाख किंमत आहे. ही मंदी नंतरची किंमत जी थोडी वाढत चालली आहे, म्हणजे जर टेक्नीकल टर्म मध्ये बोलायचे झाले तर प्रॉपर्टी मार्केटला २BHK साठी ३२ लाखाला सपोर्ट आहे, पण ४० लाखाला रेसिस्टन्स आहे. म्हणजे किंमत जर आज आहे त्यापेक्षा २ ते ३ लाख कमी झाली तर अनेक नविन घर घेणारे मार्केट मध्ये येउन घर घेतील. तसेच किंमत ४० लाखाला गेली तर घरात (गुंतवणूकीसाठी) व्हॅल्यू नाही म्हणून अनेक लोक घर घेणे कॅन्सल करतील. ही रेंज सध्या जास्त आहे, पण ती भविष्यात कमी होईल असे वाटते.

त्यामुळे हे बबल आहे का नाही हे ठरवता येत नाही, मुंबई मध्ये जागा उपलब्ध नसल्यामुळे अगदी गेल्या दोन दशकांपुर्वी पासून नरिमन पाँईट, कुलाबा इथल्या जागा ३००० ते ५००० रु ला फुट असायच्या. तीच गत आता पुणे, बेंगलोर इथे होत आहे. जर नविन आयटी सिटीज निर्माण झाल्या तर मात्र किंमती परत थोड्या कमी होतील पण अगदीच २५ लाख होणार नाहीत असे वाटते.

२ सेंट्स.

केदार- सहमत. फक्त तुझ्या यादीत नागपूर, कलकत्ता, दिल्ली, कानपुर, नाशिक पण टाक. इथल्या किमतीही कैच्याकै वाढल्यात.

तुम्ही जो भारत म्हणत आहात तो पुणे, हैद्राबाद, सिकींद्राबाद, मुंबई जवळील इलाका, गुरगाव, बंगळूर असा आयटी रिलेटेड भाग पाहत आहात. >>>>>>

फक्त तुझ्या यादीत नागपूर, कलकत्ता, दिल्ली, कानपुर, नाशिक पण टाक >> आणि औरंगाबादबद्दल काय मत आहे? माझा तिथे एक भला मोठा प्लॉट आहे म्हणुन विचारत आहे. Happy

केदार काहीतरी गडबड आहे. सहाव्या वेतन आयोगानुसार अ‍ॅरिअर्स भरपूर मिळाले? कोणाला? आणि भरपूर म्हणजे किती? राज्य सरकारने अ‍ॅरिअर्स म्हणून एक पैसाही दिला नाही कॅश. पी एफ मधून लॉक करून दिला. केन्द्र सरकारमधल्या लोकाना कॅश मिळाली ती साधारण दोनेक लाख सरासरी. तेवढ्यावर कुणी ३५ लाखाची घरे घ्यायला पळत सुटणार नाही.

उपरोक्त शहरात मध्यमवर्गीयांचा पगार १० लाख रु प्रति वर्षे झाला आहे
>> कोणता मध्यम वर्ग?६ व्या वेतन आयोगात येणार्‍या कोणत्याही क्लास वन अधिकार्‍यास एवढा पगार मिळत नाही. त्यामुळे ६ व्या आयोगाचा आणि घराच्या किम्मतवाढीचा फारसा संबंध नाही. घरांच्या किमती २००५ च्या दिवाळीपासून पेटायला सुरुवात झाली. मटेरिअलच्या किमती , पुण्यातील टीडीआर स्कॅन्डल हीही मुख्य कारणे आहेत. पुण्यात आणि माझ्या खेड्यात बांधकामाचा खर्च ९०० रु.चौ फू येतो.म्हणजे गावाकडे १००० चौ फू घर फुकटच्या जागेवर बांधायला ९,००,००० रु. लागतातच किमान.

पुण्यात दोन नम्बरच्या इन्वेस्टरनी किमती वाढवून ठेवल्या आहेत. नोकरदारानी नव्हेत. नोकरदार त्यामुळे मेले. ते घरे घेउ शकत नाहीत . निदान पुण्यात तरी.

आंतर्जालविषयक कायद्यांबद्दल सचिंत होऊन मी इथले लिखाण उडवले आहे. उगाच मायबोलीवर काही गैर परिणाम होऊ नयेत म्हणून.

हूड मी ३५ लाखाची घरे ते घेत आहेत असे कुठे म्हणालो? सहावा आयोगाचा मुद्दा दुय्यम शहरांबाबत म्हणत आहे. नांदेड, जालना, अकोला, हिंगोली इ इ जिथे आजही जमीनी ३ लाख रु मध्ये २००० स्वे फुट मिळतात. कित्येक जणांनी अश्या जमिनी घेतल्या आहेत.

साध गणित आहे हूड जर आजपर्यंत खर्च ९ ते ११,००० रु मध्ये चालत असताना जर पगार १६ ते २०,००० झाला तर तुम्ही उरलेल्या दर महिन्याचा पैशांचे काय कराल. कुठेतरी गुंतवणूकच ना?

उपरोक्त शहरात घर घेणारे सरकारी नौकर नाही तर आयटीवाले आहेत ज्यांच्या घरातले इनकम १० लाख रु च्या वर आहे.

वर दोन वेगवेगळे मुद्दे अन त्याची कारण आहेत.

पुण्यात दोन नम्बरच्या इन्वेस्टरनी किमती वाढवून ठेवल्या आहेत >> हे २००३ ते २००७ मध्य ह्या पहिल्या चक्रात. आता मंदी नंतर नाही त्या किमती तिथेच टिकल्या फार पडल्या नाहीत. अर्थबाजारात किमती कोणी वाढविल्या ह्याला महत्व नाही तर आज ती किमंत परवडते हा ह्याला महत्व आहे. पुण्यातल्या आयटी लोकांना आज परवडत आहे, उद्या कदाचित नाही. तो टेक्नीकल मुद्दा त्यामुळेच मांडला आहे. ४० लाखाला असल्यामुळे माझ्याकडे पैसा असूनही त्यात "व्हॅल्यू" नाही म्हणून मी घर घेतले नाही. माझ्यासारखे विचार करणारे खूप जन असतात. जे ३२-३३ ला घर घेतील. ( पण हे झाले गुंतवणूकी बाबत) ज्यांना पहिलेच घर घ्यायचे आहे त्यांना पर्याय नाहीच.

आता तुमचेच गणित घेऊ. .. स्कँडल कसे झाले ते गौण. पण आज साधारण ७०० ते ८०० रु पर स्वेअर फुट बांधकामाला खर्च येतो. ( नो लॅव्हीश लाईक इटालियन मार्बल, साधारण चांगले बांधकाम)

जर ९००,००० रु नुस्ते घर बांधायला येणार असतील तर जागेलाही निदान गणिताला तेवढे धरुन चाला की. ( ९०००००/ १२०० स्वेअर फुट म्हणजे ७५० रु ही जागेची किंमत कुणी दिली तर निदान आता २,३ प्लॅट घ्यायला तयार. Happy म्हणजे टोटल झालं १८ + सोसायटी, रजीष्ट्रेषन म्हणजे २० पर्यंत + अ‍ॅमिनेटिज + प्रॉफिट. टेक्स यु टू २५ +
आणि मी वर तेच लिहीले की २५ ला त्या किमती कधीही येणार नाहीत. अश्याच गणिताने मी ती सपोर्ट अन रेसीस्टन्स काढली, भाव थोडे वेगळे घेउन कारण पुणे, बंगलोर इ ठिकाणी आता ७५० रु स्वे फुट ने जमिन मिळत नाही ती खूप जास्त भावाने मिळते. (नांदेडला माझ्या घरासमोरजी जागा ९०० रु स्वे फुट आहे)

निबंध, औरंगाबादला आता किमती वाढत चालल्या आहेत. बिड बायपासला एक नगरी उभी राहत आहे जिथे २ बेड ची किंमत १७ लाख आहे. पुण्यात किंवा औबाद मध्ये प्लॅट व नांदेड किंवा औ बादला जमीन ह्या विचाराने मी तिकडे भरपुर फिरलो. तुझा प्लॉट कुठल्या भागात आहे? बिड बायपासला असेल तर् त्याचे ऑलरेडी सोने झाले. N4 वगैरे भागात असेल तर आता तुझा प्लॉट शहराच्या मध्यभागी आला असे समजुन चाल कारण त्याचा पुढे अगदी मुकूंदवाडी पर्यंत वस्ती आहेत आणि किंमतही बर्‍यापैकी वाढल्या आहेत.

केदार Happy
तो प्लॉट मी २००० मध्ये घेतला होता. आणि त्यावेळी त्याच्या जवळ ती नाथ वॅली (इंटरनॅशनल)शाळा होती. आता हे एक्झाटली कुठे येते माहित नाहि. जागा १५०० स्के.यार्ड आहे (फुट नाही).

भारतातल्यापेक्षा इथे(दुबई) स्वस्ताई आहे असं वाटायला लागलय हल्ली

निबंध, औरंगाबादलापण किम्मती कायच्या काय वाढल्या आहेत, पैठणरोड म्हणजे तर बटोरो दोनो हातसे असंय सध्या.

श्यामली! तेरे मुं में घी शक्कर. अगं शप्पथ मला काहिच अंदाजा नाहि गं. आता त्याचे पेपर्स हुडकायला हवेत. लक्षच जात नाहि. कधी काळी अशीच घेउन ठेवले होते.
बघ मुठभर मांस चढले अंगावर. Happy

तो प्लॉट मी २००० मध्ये घेतला होता. आणि त्यावेळी त्याच्या जवळ ती नाथ वॅली (इंटरनॅशनल)शाळा होती. आता हे एक्झाटली कुठे येते माहित नाहि. जागा १५०० स्के.यार्ड आहे (फुट नाही). >> एक आगांतुक सल्ला. जर भारतात तुमची जमीन असेल तर त्याच्यावर नियमीत लक्ष ठेवणे अतिशय आवश्यक आहे. अतिक्रमण/खोटे सातबाराचे उतारे करुन परस्पर विक्री असे धंदे (मोक्याची जागा असेल तर जास्तच) होण्याची शक्यता असते. कोर्ट कचेर्‍या करण्यात वर्षानुवर्षे निघुन जातात आणी त्यातून सगळे हाताला लागेल अशी शाश्वती नाही. चुभुद्याघ्या.

नात्याशी सहमत. माझ्या वडिलाना, आणि इतर काही नातेवाइकांना पण फार त्रास झालेत यापायी. जागा , त्यातही प्लॉट बळकावणे ही फार कॉमन समस्या आहे असं दिसतंय. Sad खूप केसेस पाहिल्यात/ऐकल्यात अशा.

नात्या! माझा भाउ औरंगाबादेतच राहतो. पण मी कधीही चौकशी केली नाहि त्या प्लॉट्बद्दल त्याच्याकडे नेहमी असेच वाटायचे की जास्तीत जास्त ५ एक लाख झाली असेल त्याची किम्मत. आणि त्यावेळी तिथे जे कहि बंगले होती सगळे फार्म हाउस होते. मला वाटते जागा तशी सुरक्षीत आहे तरी आता लक्ष घालते. त्यावेळी तिथे एक वॉचमनपण रहायचा सगळ्या जागा घरे राखायला. आता आजच भावाला फोन लावते.
धन्यवाद सल्ल्याबद्दल!

माझ्या नवर्‍याच्या एका मित्राला असाच अनुभव आला. दिल्लीतल्या घराला कुलुप घालुन हे लोक हैदराबादला आले. वर्ष सहा महिन्यांनी भाडेकरी मिळाला म्हणुन गेले तर ते घर दुसर्‍याच कुणी तिसर्‍याच कुणाला विकले होते.

पुण्यात बालेवाडी स्टिडिअम, वारजे, वाकड इथे ४५ ते ५५ लाखात ३ बेडरुम फ्लॅट्स मिळतात अजून तरी. हीच रेंज २००७ पासून आहे. मधे थोडी कमी झाली होती पण आता पुन्हा अशाच किमती आहेत.

>>त्यातही प्लॉट बळकावणे ही फार कॉमन समस्या आहे असं दिसतंय. खूप केसेस पाहिल्यात/ऐकल्यात अशा. <<
"खोसला का घोसला"; पाहिला नसेल तर जरुर पहा... Happy

आज पुन्हा हा बीबी वाचला आणि नक्कीच भरकटल्यासारखा वाटतोय... भारतातले बाजारभाव ह्या दिशेने चाल्लेय चर्चा.. Uhoh

भरकटल्यासारखा वाटतोय. पण मूळ विषयातलाच महत्वाचा धागा आहे. मात्र एक नक्की कि त्याला आवश्यकतेपेक्शा जास्त महत्व दिल्यासारखे वाटतेय आणि बाकीचे मुद्दे गौण असल्यासारखे वाटतायत. तसेच भारतात परतण्याचा विचार करणार्‍यांसाठी फारच निराशाजनक वाटत आहे.

पुण्यात बालेवाडी स्टिडिअम, वारजे, वाकड इथे ४५ ते ५५ लाखात ३ बेडरुम फ्लॅट्स मिळतात अजून तरी.

>> म्हणजे या किमती फार कमी आहेत असे म्हणायचे का तुला? निदान अ‍ॅफोर्डेबल तरी? Uhoh
'तिकडच्या' मंडळीना असतील बुवा..

काही उपायः

जे केवळ आईवडिलांसाठी परत जातोय म्हणत आहेत त्यांच्यासाठी:

१. आईवडिलांना इथे आणल तर? आईवडिल जर साठीचे असतील तर इथेही मोठ्या शहरात सिनियर इंडियन्सचे ग्रुप्स आहेत. ते आठवड्याला एकत्र येतात.
२. आईवडिलही स्वतःचे ग्रुप्स तयार करु शकतात ह्या वयात आले की
३. इथेही त्यांच्या तब्येतीची काळजी घेता येईल
४. काही ठिकाणी इंडियन डॉक्टर्स फी न घेतापण मदत करतात.
५. त्यांना ग्रीन कार्ड मिळण्यासारख असेल तर तेही इथे काम करु शकतात, नाहीतर व्हॉलंटीयर कामं आहेतच
६. इथे तब्येत चांगली असली तर सत्तरीतले लोकंपण काम करतच असतात.

माझ्या मैत्रीणीची आई रिटायर होऊन इथे आली आहे ती शाळेतल्या मुलांना after school care सारखी सांभाळून स्वतःचे पैसे मिळवते. त्यामुळे उपरं वाटत नाही. वेळ चांगला जातो. रोजच ३-४ तास काम.

केदार,

माहिती छान मिळते आहे तुझ्याकडून.

माझी बहिण म्हणाली की टप्प्याटप्प्यानी ऐरीअर्स मिळणार आहे. म्हणजे यावेळी फक्त ३२ हजार दिला. असे ५ वर्षात पुर्ण पैसे दिले जातील. एकदाच ही रक्कम देणार नाहीत. शिवाय ३२ पैकी १६ हे GPF मधे जातील आणि उरलेले १६ हे हातात देतील. लोकांचे पगार वाढलेत तसे वस्तूंचे भाव देखील खूप वाढलेत.

आर्च, मुद्दा फक्त आईवडीलांना इथे आणायचा असा नाही. मी जर माझ्या आईला इथे आणले तर आमचे अकोला सुटेल. तिथले आम्ही पाहुणे होऊ.

आर्च, चांगला सल्ला आहे.

माझ्या आईला मी गेल्या ट्रिपला बरोबर नेले होते. त्यापूर्वी ती समस्त "तिकडचे" झालेल्यांची आरतीच Proud करायची (माझी देखिल)!!!! ह्यावेळी नातीबरोबर ती रमली, नातीला घेऊन मॉलमध्ये जाणे, मला आणायला (?) स्टेशनला येणे, डच डॉक्टरकडे जाऊन वॅक्सिन घेणे, नात झोपली की बाबांशी नेटवरून वादविवाद, सखीचा सल्ला, ई. सेशन्स करणे, ह्यात तिचा वेळ बरा गेला. तिला त्यानिमित्तने नेदरर्लँड फिरायला मिळाले.

आता परत कुठे जायचे असेल माझ्याबरोबर तर ती तयार आहे. चांगले जीवनमान हा मुद्दा तिला पटला आहे, तिने बाबांना पटवलयं!

पण सध्यातरी तिची सगळी मूलं परदेशात जात नाहीत तोवर कायमची यायला ती तयार नाही. Sad त्यामुळे मीच कुर्ला - पार्ला करत बसलेय!!!!

सर्व चर्चेचे फलित मला तरी असे वाटते - जे जाणारच आहेत ते काहिही करुन जातीलच आणि ज्यांना जायचे नाही (किंवा नक्की ठरत नाही) असे काही ना काही कारणे काढुन जाणार नाहीत. इकडे जीवमान कसे नी तिकडे कसे यावर फार अवलंबून असणार नाहीच त्यावेळी.

बरोब्बर मिनोती. खरेच इकडे आणि तिकडे अशी तुलना करण्यात काही अर्थ नाहीये. जे तळ्यात मळ्यात करत आहेत, त्यांनी एकदाच मन घट्ट करून तुम्हाला जो पटेल तो निर्णय घेऊन टाका आणि त्या द्रूष्टीने तयारीला लागा /आहात तिकडेच आनंदात रहा.
कुणासाठी म्हणुन (तुमचे मन मारून) जाणार असाल तर त्या माणसाची गरज संपली की पुढे काय याचाही विचार करायला हवा.
प्रत्येक ठिकाणाचे फायदे आहेत तसेच तोटेही असतातच.
मुले लहान आहेत तोवर जातिल तिकडची होवुन जातात. प्रश्न मोठ्यांचा असतो. मोठ्यांनी निर्णय घ्यायचा आणि पार पाडायचा असतो. जो निर्णय घेऊ त्याप्रमाणे मुलांच्या मनाची तयारी करायची.

आम्ही गेल्या वर्षी कायमचे म्हणुन पूर्ण गाशा गुन्डाळून भारतात गेलो. १ वर्ष भारतात होतो. काही कारणाने पुन्हा एकदा इकडे परत आलो आहोत. मनातून आम्हाला इकडे रहायचे नाही. त्यामुळे पुन्हा एकदा परत जाण्याचा प्रयत्न नक्की करणार.

आर्च, मुद्दा फक्त आईवडीलांना इथे आणायचा असा नाही. मी जर माझ्या आईला इथे आणले तर आमचे अकोला सुटेल. तिथले आम्ही पाहुणे होऊ.>>

बी, म्हणजे परत स्वतःचाच विचार न? Proud

आर्च, स्वतःचाच विचार असं नाही वाटत. आई-बाबांचं भारतातलं आयुष्य पूर्णपणे वेगळं असतं. लग्न-कार्य, बारशी, डो.जे., नातेवाईक, देव-धर्म हे इथे तिथल्यासारखं कधीच नसणार. केवळ सिनियर इंडियन्सचे ग्रुप्स यावर त्यांची माणसांची भूक भागेल का? या वयात येऊन त्यांनी सगळं adjust करायचं (नवीन हवामान, नवीन systems, भाषा, खाणे-पिणे) त्यापेक्शा आपण आत्ता तरुण आहोत आणि बरीच वर्षे भारतात काढली आहेत तर आपल्याला adjust होणं सोपं असेल असं वाटतं.

Pages