परतोनि पाहे (परदेशातून परतलेल्या, परतू इच्छिणा-यांचे अनुभव)

Submitted by रैना on 5 January, 2010 - 01:52

इथे खालील मुद्यांवर चर्चा / अनुभव अपेक्षीत आहे. शक्यतो उपदेशापेक्षा (काय करायला हवं वगैरेंचे डोस) अनुभव लिहा. आपण विचारांती काय निर्णय घेतला, का घेतला आणि तो कसा निभावतो आहोत.

- तुम्ही भारतात का परतलात, परतावसं का वाटलं (नक्की प्राण का तळमळला?) परतल्यावर आता कसं वाटतय ? (व्यक्तिगत बरेवाईट अनुभव, ठेचा, विचारमंथन).
-- तळ्यात मळ्यात- परतावसं वाटतय, हिम्मत होत नाही? दोलायमान परिस्थिती आहे? नवराबायकोपैकी एक अत्यंत नाखुष आहे ?
- परततानाची चेकलिस्ट ( काय करावे आणि करु नये)
- केल्याने देशाटन परदेशात काय मिळवलं, काय गमावलं
-भारतातील संधी, नोकरी, व्यवसाय, आर्थिक परिस्थितीचा आढावा (अनुभव), वर्क लाईफ बॅलन्स (व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्याला देता येणारा वेळ)
- मुलं आणि तदनुषंगिक शेकडो गोष्टी ( शाळा, शैक्षणिक पद्धत, पाल्याचा सर्वांगीण विकास, भाषांचा सराव, गणिताचा सराव, वातावरणाचा सराव)
- वृद्ध होत चाललेल्या मातापित्यांची जवाबदारी. पुन्हा एकत्र आल्यावरचे अनुभव. त्यांच्या दृष्टीकोनातून तुमचे परदेशगमन आणि पुनरागमन.
- समाजाचे देणे
- दोहोंचा अनुभव घेतल्यावर आता काय करायचा मानस आहे ?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

रैना,
छान विषय...
सन 2013 नंतर आता सन 2016 पर्यंत, मधे काही वेगळे बदल झाले असतील, नवीन सदस्य अॅड झाले असतील, त्यासाठी धागा वर काढणे आवश्यक वाटतय...

I am in the process of publishing a novel (written from perspective of fictional characters) based on the topic of immigration and return to India. Please consider watching the book trailer: https://youtu.be/7k_KoJ8xxZo

जवळपास दहा वर्षांनी परत जायचा निर्णय घेतलाय पण जॉब शोधायला खुप त्रास होतोय. आधी वाटलं अमेरिकन फोन नं असल्याने कॉल येत नाहियेत म्हणुन मग भारतीय नंबर देण्याची व्यवस्था केली. पण काहीच नाही. मग एक भारतवारी करुन पाहिली पण कसा म्हणजे कसाच रिस्पॉन्स नाही. जवळ जवळ १३ वर्षांचा आय्टी मधला अनुभव आहे. इथे भारतीय सर्विस कंपनी सोडुन कंसल्टंसी जॉईन केल्यामुळे "आता मला परत पाठवा" असे म्ह्णणण्याचाही ऑप्शन नाहीये. जवळच्या मित्रमंडळींचं म्हणणं असं आहे की साधारण ९ ते १० वर्ष अनुभव असलेल्यंना पटकन जॉब मिळतात पण तिथुन पुढे रेफरन्स शिवाय जॉब मिळणं जवळजवळ अशक्य आहे. हे कितपत खरं आहे?

परत गेलेल्यांपैकी कुणाला असा अनुभव आला असल्यास क्रुपया आपण अशा परिस्थितीत काय केलेत सांगितलेत तर आभारी राहीन.

या कोविड काळात कोणी भारतात परतला आहे का?
त्यांना काय वाटते, नोकरी मिळविणे किती अवघड होते?
ते भारतात कसे स्थायिक झाले
अर्थात मी आयटी क्षेत्राबद्दल विचारत आहे

Pages