परतोनि पाहे (परदेशातून परतलेल्या, परतू इच्छिणा-यांचे अनुभव)

Submitted by रैना on 5 January, 2010 - 01:52

इथे खालील मुद्यांवर चर्चा / अनुभव अपेक्षीत आहे. शक्यतो उपदेशापेक्षा (काय करायला हवं वगैरेंचे डोस) अनुभव लिहा. आपण विचारांती काय निर्णय घेतला, का घेतला आणि तो कसा निभावतो आहोत.

- तुम्ही भारतात का परतलात, परतावसं का वाटलं (नक्की प्राण का तळमळला?) परतल्यावर आता कसं वाटतय ? (व्यक्तिगत बरेवाईट अनुभव, ठेचा, विचारमंथन).
-- तळ्यात मळ्यात- परतावसं वाटतय, हिम्मत होत नाही? दोलायमान परिस्थिती आहे? नवराबायकोपैकी एक अत्यंत नाखुष आहे ?
- परततानाची चेकलिस्ट ( काय करावे आणि करु नये)
- केल्याने देशाटन परदेशात काय मिळवलं, काय गमावलं
-भारतातील संधी, नोकरी, व्यवसाय, आर्थिक परिस्थितीचा आढावा (अनुभव), वर्क लाईफ बॅलन्स (व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्याला देता येणारा वेळ)
- मुलं आणि तदनुषंगिक शेकडो गोष्टी ( शाळा, शैक्षणिक पद्धत, पाल्याचा सर्वांगीण विकास, भाषांचा सराव, गणिताचा सराव, वातावरणाचा सराव)
- वृद्ध होत चाललेल्या मातापित्यांची जवाबदारी. पुन्हा एकत्र आल्यावरचे अनुभव. त्यांच्या दृष्टीकोनातून तुमचे परदेशगमन आणि पुनरागमन.
- समाजाचे देणे
- दोहोंचा अनुभव घेतल्यावर आता काय करायचा मानस आहे ?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>सोशल लाईफ ला इथे मिक्स व्हा असे काही जणांनी लिहीले आहे, कितीश्या अमेरिकन्स सोबत तुमचे रोजचे सोशल व्यवहार >>आहेत? इथे अमेरिकन लोकांनाच सोशल प्रॉब्लेम आहेत हे ही सांगीतले जाते की.

केदार, मिक्स होण्याआधी ते जाणून घ्यावे लागते. लोकांना साधे शिष्टाचारही माहीत नसतात. इथेच मी कुठेतरी वाचले होते की ऑफिसमध्ये चांगली ओळख होती म्हणून कोणीतरी अमेरिकन कलिगच्या घरी गेले मग आतिथ्य केले नाही, लहान मुलाच्या हातावर काही ठेवले नाही इ. आता त्या व्यक्तीने निमंत्रण दिले नसेल तर वीकएन्डला असे उठून कोणाच्या घरी जाणे हे अजिबातच इथल्या पद्धतीत बसत नाही. आणि मग या लोकांना आपण नको असते इ. आरोप करायचे.

>>कितीश्या अमेरिकन्स सोबत तुमचे रोजचे सोशल व्यवहार आहेत?
आता रोजचे 'सोशल व्यवहार' म्हणजे काय? इथे भारतातले निकष लावू नको. Happy रोजचे ऑफिसमध्ये बोलणे, लंच तर असतेच बाकी 'सोशलाइज' व्हायला रोज वेळ कुठे असतो? त्यांनाही नसतो आणि आपल्यालाही नसतो. लंच, हॅपी अवर, volunteering असं काही ऑफिसमधल्या लोकांमध्ये होत असेल तर तेव्हा नक्की जावं. दर शनिवार-रविवारीही वेळ नसतो. समरमध्ये थोडाफार असतो म्हणायला हरकत नाही. इथल्या अमेरिकन फॅमिलीचा इतर अमेरिकन लोकांशी समाजात जेवढा संबंध येईल तेवढाच इतर इमिग्रंट्सचा येऊ शकतो. बाकी फॅमिली इथे नसते म्हणून थोडाफार कमी म्हणता येईल.

>>ते योग्य जरी असले तरी ९० टक्के भारतीय अमेरिकन सोशल लाईफ मध्ये सामील नसतात. त्यांना >>मग आपल्या मिंत्राशी "जुळवून"घेउन शनि-रविवारी पॉटलक करावे लागतात.
इथे शिक्षण घ्यायला मिळाले तर ते आणि दुसरं आपली मुलं ही खरं तर या समाजाला जाणून घेण्याची, त्यांच्यात मिसळण्याची मोठी संधी मिळवून देतात. त्यांच्या शाळा, वीकएन्ड अ‍ॅक्टिव्हिटीमुळे त्यांचे अमेरिकन फ्रेन्डस होतात. त्यांना प्ले डेटला बोलावणे, आपल्या मुलांना पाठवणे हे करता येते. नेहमी पॉटलक करण्यापेक्षा हे बरे. Happy शेजारपाजारची मुले घरी येणे,खेळणे, आपली त्यांच्याकडे जाणे, जेवण-खाण, उधार-उसनवार (अंड्यापासून स्नो ब्लोवर पर्यंत. Happy ) , मदत हे सगळे इथेही होते. मग मराठी असोत, भारतीय असोत, अमेरिकन किंवा इतर देशी.

>>इथे अमेरिकन लोकांनाच सोशल प्रॉब्लेम आहेत हे ही सांगीतले जाते की
हे वाक्य मला कळले नाही.

परत गेलेल्या आणि जाऊ इच्छिणार्‍यांपेक्षा द्विधा, का जावे/का रहावे याबद्दलच आता जास्त चर्चा चालू आहे. Happy

हो लालू तू लिहीलेस ते अगदी योग्य आहे. मी ही यातले बरेच करतो. पण कितीसे भारतीय हे करतात हा प्रश्न आहे. मी "सोशल लाईफ" हा मुद्दाही जाण्याबद्दलच मांडला आहे. कारण कूठेही राहीलो तरी सोशल लाईफ इज अ मस्ट. ( निदान मला तरी.) आणि भारतीयांचे सोशल लाईफ मी लिहायला नको. Happy

हॅपी अवर, volunteering असं काही ऑफिसमधल्या लोकांमध्ये होत असेल तर तेव्हा नक्की जावं. >> अगदी हे मी म्हणत आहे की इथे जावं लागत, अमेरिकन्स गेम पाहावे लागतात, तर हे लागू नये, आपोआप होत नाही, जे भारतात आपोआप होते. ( आता मल इन्ट्रेस्ट आहे म्हणून NBA पाहतोच :), पण मी आलो तेंव्हा आणि आताही मी भारतीयांना, अमेरिकेन्स बरोबर त्यांच्या गेम्स बद्दल पुअर काँमेंट टाकताना पाहील्या आहेत.) ज्यांना गेम खरच आवडतात ते अपवाद प्लिज वगळा. मला ही NBA शिवाय करमत नाही.

हा प्रश्न फक्त पहिल्या जनरेशनला येतो, दुसर्‍याला नाही, कारण ते इथेच वाढले आहेत. पण माझा मुलगा इथे वाढावा म्हणून मी माझ्या सोशल लाईफला का बळी द्यावे हा विचार मी खरच करतो.

इथे राहणार्‍यांबद्दल मला आदर आहेच, फक्त मी देखील का भारतात जाईल हे मांडत आहे.

पण त्या आधी भारतात परतलेल्यांचे अनुभव वाचायला आवडेल...
>>>>>>>>

मी २००२ ते २००६, चार वर्षे स्पेन मध्ये होतो. मग परत आलो. तब्बल २४ वर्षे भारतात राहुन फक्त ४ वर्षे बाहेर काढली असल्याने पुन्हा भारतात आल्यावर काही विषेशः त्रास झाला नाही! रस्ते, वीज, पाणी, धुळ, इ इ नेहमीच्या रोजच्या धकाधकीत सुरुवातीला तब्येतीला थोडेसे प्रश्न आले, पण मग सगळे व्यवस्थित झाले!

नंतर लग्न झाले:) मग फॉरेन रिटर्ण नवरा मिळाला म्हणुन बायकोला पण फॉरेन ला जाऊशी वाटले. मग भारतात तीन वर्षे राहुन पुन्हा ऑस्ट्रेलियात आलोय. सहा महिने झालेत. एव्हाना बायकोची फॉरेनची हौस पुर्ण झाली आहे. (माहेरी अन सासरी ५०-६० जणांच्या एकत्र कुटुंबात राहिलेली बायको इथे दिवसभर एकटी किंवा कधीतरी सोशल फंक्शन मध्ये जाउन ही रुळु शकत नाही, असे तिला वाटते. अन, माझे प्रोब्लेम तर सर्वांना माहितीच आहेत :))

त्यामुळे, इथला दोन वर्षाचा, आता दीड फक्त, स्टे झाला कि आम्ही पुन्हा भुर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र!!

(डिसक्लेमर- हा अनुभव प्रातिनिधिक नाही)

फक्त टु फिट इन, अमेरिकन करतात त्या गोष्टी आवडत नसल्या तरी कराव्यात असं म्हणत नाही मी. मी उलट त्याविरुद्ध आहे. पण तुम्ही बेसिक गोष्टी जाणून घेऊन वागलात की त्या लोकांनाही तुम्ही 'वेगळे' वाटत नाही मग ते मोकळेपणाने बोलतात.
>> पण माझा मुलगा इथे वाढावा म्हणून मी माझ्या सोशल लाईफला का बळी द्यावे हा विचार मी खरच करतो.
म्हणजे भारतातल्या का? मला म्हणायचेय एक घरचे लोक सोडल्यास तिथे जे असले असते तेच इथे असू शकते. तू वर म्हटल्याप्रमाणे नवीन पिढीला हा प्रॉब्लेम येतच नाही, पण तुला प्रॉब्लेम कमी करायला मात्र त्याचा उपयोग होईल (इथे रहायचे असेल तर).

चंपक, तू नशिबवान आहेस बाबा! फार कमी लोकांना जमते असा निर्णय घेणे आणि तो राबवणे! आलिकडेच माझी एक मैत्रीण यु के मधुन परत कायमची भारतात गेली आहे. त्यांचेही अगदी ठरलेलेच होते की ठरावीक ईतके assets जमवुन परत जायचे. पण असे प्लानिंग करणे महत्वाचे आणि ते प्रत्यक्षात आणणेही! अर्थात प्रत्येकाची परिस्थीती निराळी आणि नशीबाची साथही महत्वाचीच!

मला हा वयाशी पण निगडित प्रॉबलेम वाटतो.(म्हणजे परतावे का इथेच्(परदेशी कुठे) रहावे.
तो कसा...
तर असा.. वय विचारात घेता मानसिक व शारीरिक ताकद विसरु शकत नाही ह्या निर्णयात. तुम्ही १५ व्या वर्षी कुठे परदेशी आलात तर वयाच्या ३५ व्या वर्षी जर पुन्हा जायचेच झाले तर थोडेफार रिजिडिटीने का होइना मॅनेज करू शकता स्थित्यंतर. का तर... त्या फेज मध्ये एक शारीरक, मानसिक लेवल वर सुद्धा झालेले बदल असले तरी एक विचार केला जावू शकतो पण रिजिडिटी असतेच थोडीफार. का तर खाजगी लेवल वर असलेले बदल्(मुले असल्यास मुले थोडीफार समजत्या वयाची, नोकरीत अपेक्षित असलेली स्टेबिलिटी,ठराविक गोल पुरे झाले असल्यास/नसल्यास वगैरे वगैरे..), आणि त्या वयात नवीन बदलास झेलु शकायची ताकद व इच्छा जरा कमीच पडते. ( 'कमी पडते' ,नसते असे नाही).

अचानक एक सवय लागलेली असते जीवन जगायची. आपली मानसिक तयारी करायला वेळ लागतो एका सर्टन वयात. २१ व्या वर्षी केलेले स्ट्रगल आता ३५ व्या वर्षी करणे श्क्य आहे का? आता कोणी म्हणेल 'करायचे असेल तर कोणीही काही कुठल्याही वयात करु शकतो' हि युक्ती नकोय इथे. Happy
मग आणखी वेळ गेला ह्याच निर्णयात समजा ५-१० वर्षाने फरक पडला तर शक्यता खूप कमी होत जाते. कारण ह्या निर्णयात मग लग्न झालेले असल्यास मुले हा एक आणखी महत्वाचा मुद्दा होत जातो( तो पहिल्यापासूनच असतो पण ५-६ वर्षे वयाची मुले आपण हँडल करु शकतो हाच बहुतेक पालकांचा कॉन्फिडन्स कमी झालेला मी जवळच्या कुटूंबात पाहिला आहे.)

आणि वयामानाप्रमाणे ती कॉम्पिटीशन्स(सर्व लेवलची) झेपतील का नाही हा विश्वास थोडा आणखी १०% ने कमी होतो.

बरे माझ्या अनुभवाने तिकडने(भारतात) १५ वर्षाची असताना आलेली मुले(फक्त स्वानुभवाने) बरी अ‍ॅडजस्ट होतात परदेशी (अपवाद आहेतच. व आता २०१० मधली १५ वर्ष वयाची पिढी कशी आहे ह्याचा अंदाज मला बिलकूल नाही हे लक्षात घ्या व एका चांगल्याच अर्थाने घ्या हे वाक्य.) Happy
पण इथून १५ वर्षाची वाढलेली मुले नेणे कठिण आहे.(चांगल्या अर्थाने घ्या). त्याच्याकडून भारतात अ‍ॅडजस्ट होण्याच्या अपेक्षा चुकीच्या ठरल्यात( आणखी एक फॅमिलीचा अनुभव). Happy

त्यामूळे हा पुर्ण व्यतिगत निर्णय आहेच व कोणाला व्ययतिक दृष्ट्या काय महत्वाचे असेल ,नसेल ह्यावरून घेतला तर उत्तम ठरतो. उगाच दुसर्‍याचे हे चुकीचे व ते चुकीचे असे म्हणण्यात काही अर्थ नसतो. फक्त दुसर्‍याच्या अनुभवाने आपण स्वःताला काही मुद्द्यांवर चाचपडू शकतो जे मुद्दे आपल्या लक्षात न्हव्ते आले कधी इतकाच फायदा आहे ह्या चर्चेचा. Happy बाकी प्रत्यकाची गरज हि वेगळी व युनिक असु शकते हा निर्णय घेताना हे पाहिले आहे. Happy

मनःस्विनी खुप चांगले व रिअलिस्टीक पोस्ट. आमचा परतिचा निर्णय याच कारणांमुळे बारगळत असायचा. ज्यावेळी होता. Happy आम्ही नेहमी ५-इयर प्लान करायचो.
मी ठरवते की आता रिटायर झाल्यावर सहा महिने देशात व सहा महिने इथे रहायचे. बघु ते तरी जमते का? Happy

या संदर्भातली शिक्षणपद्धतीबद्दलची चर्चा वाचली. माझा मुलगा आत्ता पाचवीत आहे. (म्हणजे माझा 'अमेरिकन' शिक्षणपद्धतीशी गेली ५-६ वर्षंच संबंध आला आहे, आणि तेवढाच अनुभव आहे. तरीही) काही बाबी प्रकर्षाने जाणवल्या. इथे 'घोकंपट्टी'पेक्षा मुलांना विषय समजण्याला महत्त्व जास्त दिलं जातं. अवांतर वाचन, चालू घडामोडींची निदान जुजबी माहिती - हे मुलांनी करावं म्हणून आवर्जून प्रयत्न केले जातात. शिक्षक आणि पालक यांच्यात आवर्जून संवाद (communication) घडवून आणला जातो. 'तुम्ही आणि आम्ही मिळून हे एक मूल चांगलं वाढवू या' - अशी एकूण फिलॉसॉफी आत्तापर्यंत दिसली.

(माझ्या शाळेच्या आठवणी 'मुलात काय वाईट आहे ते शोधून त्याचा दोष एकमेकांवर ढकलू या' अशा फिलॉसॉफीच्या आहेत. Proud आता परिस्थिती बदलली असल्यास कल्पना नाही.)

याच फिलॉसॉफीमुळे मुलाचा कल आणि अ‍ॅप्टिट्यूड याचा जास्त (आणि रास्त) विचार केला जातो असं वाटतं. काही तत्कालिक अडचणी असतील (घरी कोणी आजारी आहे, काही कारणाने घरचं वातावरण अभ्यासाला पोषक नाही) तर त्यावर उभयपक्षी विचारविनिमय करून तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जातो. तसंच कोणात काही learning disabilities वगैरे असतील तर त्याबाबतचाही awareness मुळातच आहे. (आपल्याकडे 'तारे जमींपर' आल्यावर अचानक याचा शोध लागला असावा अशा बातम्या पेपरमधे वगैरे वाचल्याचं आठवतं.)

सोशल लाईफबद्दल शर्मिलाने लिहिलंच आहे. नवीन नवीन असताना (कानात अजून 'मेरे देश की धरती' वगैरे घुमत असतानाच्या काळात) भारतीय माणसंच काय ती प्रेमळ, भारतीय आहारच काय तो चौरस आणि समतोल, भारतीय संगीतच काय ते थोर, भारतीय खेळच काय ते नामी, भारतीय विवाहसंस्थाच काय ती उत्तम, भारतीय कुटुंबपद्धतीच काय ती आदर्श (भारतीय संस्कृती हीच काय ती एक संस्कृती!!) - असे पूर्वग्रह बर्‍याच जणांचे असतात. यातले काही माझेही होतेच. (खोटं कशाला बोला! :P) पण परदेशात राहून जर एक सर्वात महत्त्वाची गोष्ट शिकली असेल तर ही की माणसं इथून तिथून सगळी सारखीच असतात. (थोडं मेलोड्रॅमॅटिक भाषेत सांगायचं तर सगळ्यांचं रक्त लाल आणि अश्रू खारटच असतात!) Happy

माझ्या मुलाने माझ्यासारखंच वाढलं पाहिजे असा माझा आग्रह नाही. त्याला खायला काय आवडतं, कुठली भाषा बोलतो, कुठली गाणी ऐकतो, कुठले सण साजरे करतो - या आता वरवरच्या बाबी वाटतात. त्याने एक चांगला माणूस व्हावं इतकंच वाटतं.

व्यवसायाचा मुद्दा ही आहे. मी ज्या रसायन्/फार्मा (शेती/राजकारणाव्यतिरिक्त फावल्या वेळेत करतो ते Happy ) व्यवसायात/नोकरीत आहे त्यात, भारतात कधीही कुठेही उपजिविका/करियर घडु / घडवु शकतो. पन जे लोक आय टी सारख्या क्षेत्रात आहे त्यांना नोकरी/व्यवसायाच्या संधी भारतासारख्या विकसनशील (!) देशात कमी आहेत. मग त्यांना ईच्छा असुनही परत येउ शकत नाहीत. त्यांनी उगाच भावनिक बनुन निर्णय घेउ नयेत असे वाटते. .....

अमेरिकन शिक्षणपद्धती एवढी 'परिपूर्ण ' आहे तर जगाच्या काना कोपर्‍यातून विविध क्षेत्रात का एवढे मनुष्यबळ आयात करावे लागते ? (झक्कींसारखी माणसेही जिथे पन्नासपन्नास वर्षे खपून जातात म्हणजे ........... :फिदी:)

खालील अनुभव प्रातिनिधीक नाही.
माझ्यासाठी इथे म्हणजे भारत आणि तिथे म्हणजे अमेरिका.

तीन वर्ष विद्यार्थी म्हणून अमेरीकादेशी जॉर्जियाप्रांती राह्यल्यानंतर असूदेत म्हणून EAD करून घेतलं. त्यातले तीनच महिने वापरले आणि मग मिळत असलेले जॉब सोडून भारतात परत आले.

मुळात माझा शिकायचा विषय असा होता की जिथे इतर भारतीय सापडण्याची शक्यता खूप दुर्मिळ होती. मी जिथे एम एफ ए करत होते तिथे मी भारतीय आणि एक इंडोनेशियन डॉक्टोरल रिसर्चचा विद्यार्थी सोडला तर सगळे अमेरिकनच होते. त्यांच्याबरोबर मिक्स होताना सुरूवातीपासून कधी प्रॉब्लेम आला नाही. पर्यायही नव्हता. मात्र रहात होते भारतीय रूममेटस बरोबर त्यामुळे अधूनमधून देसी डोसची गरज असल्यावर तोही मिळे.
उन्हाळ्याच्या सुट्टीत इंटर्नशिप केली तिथेही एकही भारतीय नव्हता आणि तेव्हा रूममेटस पण कधी भारतीय नव्हत्या.

माझी परतायची कारणे...
१. आधीपासूनच ठरलेलं होतं तसं. मला मुंबईतच काम करायचं होतं. तेव्हा EAD च्या पलिकडे रहाणं शक्यच नव्हतं.
२. मला EAD च्या खाली दोन जॉब्ज मिळू शकत होते. पण एकात उत्तम अनुभव होता आणि भागेल इतके पण पैसे नव्हते तर दुसर्‍यामधे पैसे ठिकठाक असले तरी अनुभव म्हणून फार काही घडण्यासारखं नव्हतं.
३. काम सांस्कृतिक क्षेत्राशीच संबंधित असल्याने मला तिथे काम करताना आपण परके आहोत हे सतत जाणवत रहायचं. कोणीही तसं जाणवून दिलं नसलं तरी त्यांच्या सांस्कृतिक जाणिवा नुसत्या समजून पण घेणं आपल्याला कधी कधी अवघड जातंय आणि आपल्या सांस्कृतिक जाणिवांचा इथे काही संबंध नाहीये हे दिसत रहायचं. आपण मुख्यधारेत सामावले जाणं हे मला अवघड वाटलं त्यामुळे मी कधी तिथे रूजलेच नाही. विज्ञान, तंत्रज्ञान या क्षेत्रात हे जाणवत नसावं त्यामूळे या क्षेत्रातले लोक तिथे रूजू शकत असावेत असं वाटतं.
४. सोशल लाइफ चा मुद्दा आहेच पण तो प्रत्येकाप्रमाणे बदलत असावा.
५. मला जे हवं ते शिक्षण आणि ज्ञान भारतात मिळू शकत नव्हतं म्हणून मला अमेरिकेत जावं लागलं. आळेकर सरांच्यामुळे आणि माझ्या वडिलांची परिस्थिती होती म्हणून हे शक्य झालं. पण हे प्रत्येकालाच शक्य असेल असं नाही. त्यामुळे जे मला तिथे मिळालं ते मी इथे (भारतात) नवीन मुलांना देत रहाणं ही माझी नैतिक जबाबदारी मला अमेरिकेत पाउल ठेवल्याच्या पहिल्या क्षणापासून जाणवत आलेली आहे. त्यामुळे परतणं ओघाने आलंच.

परतल्यानंतर.....
१. माझी इंडस्ट्री ही मुळातच बेशिस्तीच्या पायावर उभी असल्याने निराशा खूप पदरी आली. अर्थात जायच्या आधीही इथे थोडं काम केलेलं असल्याने त्याची मानसिक तयारी परत येताना होतीच.
२. एकटं रहाण्याने अनेक घोळ झालेले होते. परत आल्यावर आईने किती वाजता घरी येणार विचारलं तरी इरिटेट व्हायचं. सवयच गेली होती. आता झाली.
३. कामाच्या संदर्भातल्या अनेक गोष्टी मी अजूनही मिस करते. संदर्भग्रंथालयांचा मुक्त अ‍ॅक्सेस ही गोष्ट त्यातली सगळ्यात महत्वाची. जी अमेरिकेत विद्यार्थ्याला युनिव्हर्सिटीत तर मिळतेच पण पब्लिक लायब्ररीमधे प्रत्येक नागरिकालाही मिळते. इथे मी केवळ व्हिजिटिंग फॅकल्टी असल्याने मला पुण्यात जयकरची किंवा मुंबई युनिव्हर्सिटीच्या लायब्ररीची मेंबरशिप ही सलग अगदी थोड्या काळापुरती मिळते.
४. बेसिक सुविधांच्यात मला कधीच प्रॉब्लेम आला नाही. पाण्याची कमतरता आणि पर्यायाने विजेची हे संपूर्ण देशावरचंच नाही तर जगावरचं येऊ घातलेलं संकट आहे. आणि ते आणण्यात आपला अंशतः का होईना हात आहेच तर त्याचे चटके भोगणं हे आलंच की ओघाने.
५. परतल्याचा पश्चात्ताप कधीही झाला नाही. आता ९ वर्षं होत आली परतून. मधल्या काळात दोनतीन महिन्यांसाठी एक अमेरिकावारीही झाली तेव्हा आपला निर्णय योग्य होता याची खात्री पटली.

यापुढे...
माझं काम हे फ्रिलान्स पातळीवरचे असल्याने प्रोजेक्ट बाय प्रोजेक्ट मी कुठेही असू शकते. कुठेही मधे जगाच्या पाठीवरचे सगळे देश आले. प्रोजेक्ट हे एखाद्या महिन्यापासून वर्षभरापर्यंत कितीही मोठं असू शकतं. पण त्यानंतर परतून 'गड्या आपला गाव बरा!'

परत एकदा डिस्क्लेमरः हा अनुभव प्रातिनिधीक नाही.

नीधप यांच्या परतायची कारणे मधले मुद्दे #३ आणि #५ अगदी बरोबर आहेत.
मी या आधी लिहिले होते की आपण बाहेर मोकळेपणाने राहू शकत नाही, त्यात मुद्दा #३ ची पण भर आहे.
कितीही ठरवले तरी आपण बाहेरच्या लोकांमधे पुर्णपणे सांस्कृतिक दृष्ट्या मिळून मिसळून नाही राहू शकत.
मी ज्या भारतियांना असे मिक्स होऊन रहाताना पाहिले आहे ते बरेच वेळा मार्केटीन्ग क्षेत्रातले होते,
कामाच्या गरजेमुळे परदेशी लोकांसोबत सतत पार्ट्या, ट्रिपा, गोल्फ खेळणे, इ. गोष्टी करत असतात.
जपान मधे अभक्ष भक्षण आणि अपेय पान, धुम्रपान हे फारच कॉमन आहे. जर तुम्ही यापैकी काहीच करत नसाल तर सोशली मिक्स होणे फार फार अवघड आहे.
In most cases, जपानी लोक या अशा सोशल रिलेशन्स मुळे कामे देतात. माझ्या ऐकिवात असे आहे की युरोप, अमेरिका, आदी देशांमधे असे work culture नाहीये. ते लोक पक्के professional आहेत. जर तुम्ही चांगले काम करू शकत असाल तर या असल्या सोशल रिलेशन्सची गरज नसते.

नीधप , तुमचा अनुभव खरंच प्रातिनिधिक नाही पण विचाराची स्पष्टता त्यात आहे. काय मिळवायचं हे स्पश्ट आहे. हेही पाहिजे आणि तेही पाहिजे अशी कुतरओढ त्यात नाही.अगदी फिल्मी स्टायलीत सांगायचं म्हनजे कुछ पानेके लिये कुछ खोना पडता है. मुळात नीधपंचं जाणं हे इथली धूळ, भ्रष्टाचार्,आरक्षणं , पात्रतेप्रमाणे उपलब्ध नसलेल्या संधी , चांगली लाईफ स्टाईल या कारणांकरता नव्हतं कारण तिचं तिच्या प्रोफेशनवर प्रेम होतं हेच आहे. खरंतर इथून जाणार्‍या मंडळीना ह्या पुढच्या अडचणींचा अंदाज कसा आला नाही हेच कळत नाही. याचं कारण अ‍ॅड हॉक पद्धतीनं निर्णय घेणं हेच असू शकते. फायदे आणि तोटे समोरासमोर बसवून त्यात आपल्या दृष्टीने फायदेशीर पटणारा निर्ण्य घेणे इष्ट. मग मात्र उरलेल्या बाबींकडे कठोरपणे पाठ फिरवून वाटचाल करणे आवश्यक. माझा एक मित्र अमेरिकेत खूप सुवर्णसंधी असतानाही वडलाना सोडून जायचे नाही या एकमेव कारणामुळे इथेच राहिला आणि कमी पगारावर आणि मध्यम स्तरावरील लाइफ स्टाईलने जगत राहिला . वडील वारले पण तो खूप आनन्दी आहे. अगदी भारतातलेच पहाना आजारी आई जवळ रहायला मिळावे म्हणून एका सिनियर आय ए एस अधिकार्‍याने स्वेच्छा निवृती घेतली. उद्देशात स्पष्टता असली की निर्णय घेणे सोपे.
निदा फाजलीने म्हटल्याप्रमाणे
कभी किसको मुकम्मल जहां नही मिलता
कहीं जमीं तो कहीं आसमां नही मिलता....

तेरे जहांमे ऐसा नही के प्यार ना हो,
जहां उम्मीद हो इसकी वहां नही मिलता....

अगदी भारतातलेच पहाना आजारी आई जवळ रहायला मिळावे म्हणून एका सिनियर आय ए एस अधिकार्‍याने स्वेच्छा निवृती घेतली. >>>> केळकर साहेब का?

अगदी अपेयपान आणि धूम्रपानही करून बघितलं मी सगळ्यांबरोबर. त्याचाही काही प्रॉब्लेम नव्हता मलातरी. सगळे तिथले मित्रमैत्रिणी हेही नाटकवाले म्हणजे माझ्यासारखेच थोडेसे टाळकं सरकलेलेच तरीही गप्पा टप्पा करताना एखादा असा संदर्भ येऊन जायचा की मी म्हणजे काय विचारल्यावर सगळ्या गप्पा थंडावायच्या.. त्यात त्यांचा दोष नाही आणि माझाही.
उदाहरणादाखल गंमत म्हणून...
मी पारंपारीक नाटक(लोककला) ज्याला म्हणायचे ते त्यांच्यासाठी एथनिक होतं आणि मी बोलताना ट्रॅडिशनल असं म्हणल्यावर त्यांना प्रोसिनियम मधलं, स्थळ दिवाणखाना वालं ठराविक रिअलिस्टिक नाटक आठवायचं. यावरून खूप वाद झाला होता. मग मला एथनिक हा शब्द आठवला....
म्हणजे मुद्दा राह्यला बाजूला या शब्दांच्या वापरातच फुकट वेळ जातो असं व्हायचं कधी कधी..

आंतर्जालविषयक कयद्यांबद्दल सचिंत होऊन मी इथले लिखाण उडवले आहे. उगाच मायबोलीवर काही गैर परिणाम होऊ नयेत म्हणून.

पण त्यांनाहि चमकायला इथेच का यावे लागते? भारतात का जमत नाही?<<
भारतात राहून चमकलेले/ चमकणारे हुशार लोक शेकड्याने आहेत.

भारतातून अमेरीकेत गेलेले सगळे खरंच हुशार असतात आणि चमकतात इत्यादी गृहितक महान विनोदी. असो.

आंतर्जालविषयक कयद्यांबद्दल सचिंत होऊन मी इथले लिखाण उडवले आहे. उगाच मायबोलीवर काही गैर परिणाम होऊ नयेत म्हणून.

प्रश्न परत येण्याचा चाललाय.. तुमचे सोडा हो. जोवर मी इथे आहे , तुमची काय हिम्मत आहे इथे येण्याची? आणि नुसते हिंजवडी (हिंजेवाडी नव्हे) म्हटले तरी विमानतळावरून मागे पळाल तुम्ही.

आंतर्जालविषयक कयद्यांबद्दल सचिंत होऊन मी इथले लिखाण उडवले आहे. उगाच मायबोलीवर काही गैर परिणाम होऊ नयेत म्हणून.

झक्की - चुकतय तुमचं.
तुम्हाला सबबी वाटताहेत कारण तुम्ही भारतातली सध्याची परिस्थिती पाहिलेली नाही.
माझ्या बहिण मैत्रीणी सकट बर्‍याच बायकांना आई झाल्यावर जॉब सोडताना पाहिलंय. आणि ह्याचं कारण त्यांना त्यांच्या कामात मजा वाटत नव्हती हे नसून अमानुष वेळा /प्रेशर हे होतं.
बहिणीला दररोज ९-१० वाजायचे परतायला - ती एका बँकेत काम करायची.
आल्यावरही दुसर्‍या दिवशीच्या टारगेटचे SMS यायचे मॅनेजर कडून (ती सेल्स मध्ये नसतानाही - त्यांना सेल्स आणि ऑपरेशन्स ची दोन्ही कामं करायला लागायची.)
तिची ४ वर्षाची मुलगी जेवायची नाही - आईशी बोलायची नाही (आई मिळत नसल्याचा राग म्हणून) -
शेवटी तिनं नोकरी सोडली.
प्रत्येकाचा पिंड व्यवसायाचा नसतो. आणि भारतातल्या नोकर्‍यात तुमच्याकडून फक्त कामाची अपेक्षा नाही करत - त्या तुमच्या २४*७ वेळाची अपेक्षा करतात.
आपल्या आयुष्यावर आपला कंट्रोल नसणं ह्यापेक्षा कुठलं भयानक फीलिंग नसतं.
मी स्वतः अशा प्रोजेक्ट मध्ये काम केलं आहे - जिथे मी आणि माझी आख्खी टीम ८ महिने दररोज रात्री २-३ ला घरी यायचे आणि दुसर्‍या दिवशी सकाळी ९ ला पुन्हा ऑफिसला जायचो. ह्यात वीकेंडस ही आले.
असं म्हणू नका की आम्ही काम नीट नाही करायचो.. काम असेल तर ते न करण हा माझा पिंडच नाही..
पण मला ते काम आवडतं म्हणून माझे आईबाबा, नवरा, सासू सासरे, भावंड ह्यांच्या बरोबर वेळ घालावायला मिळूच नये असं नाही. ह्यात कुठच बॅलन्स नाहिये.
त्यामुळे वर्क लाईफ बॅलन्स हा नक्कीच एक खूप महत्त्वाचा मुद्दा आहेचे इथे राहायचं का परत भारतात जायचं हा विचार करताना.

नीधप, केदार, महेश, स्वाती, चंपक आणि इतर सगळे - मस्त मुद्दे मांडलेत.
भन्नाट!
अमेरिकन शिक्षणपद्धती एवढी 'परिपूर्ण ' आहे तर जगाच्या काना कोपर्‍यातून विविध क्षेत्रात का एवढे मनुष्यबळ आयात करावे लागते ?
>> मलाही हा प्रश्न पडलेला.. प्रत्येक वर्गाला प्रोजेक्टर सकट अनेक सोई सुविधा, मुलांची कमी संख्या, विचार करायला लावणारी शिक्षण प्रणाली हे सगळं असताना, इथली सर्वसामान्य माणसं जास्त का शिकत नाहीत? मुलांना क्ष/० करताना कॅल्क्युलेटरची गरज का पडते?

आणि मला वाटतं - अमेरिकेतही पीअर प्रेशर असतंच- फक्त वेगळ्या प्रकारचं असतं.
उदा. मुलींचे गुलाबी आणि मुलांचे निळे कपडे (गुलाबी कपडे घालणारा मुलगा 'गे' म्हणे. आणि मग पुन्हा स्टाईल स्टेटमेंट म्हणून गुलाबी घालायचं की आय डेअर टू वेअर पिंक. कसलं डोंबलाचं डेअर!
वरच्या एका पोस्ट मधलं मुलाचं 'इट्स सो कूल' म्हणून ड्रग्ज विकणं.
व्हर्जिन असण्याचा टॅबू.. बॉयफ्रेंड/गर्लफ्रेंड नसण्यानं वाटणारा कमीपणा.
हे सगळे पीअर प्रेशरचेच प्रकार आहेत- असं मला वाटतं.

>>इथली सर्वसामान्य माणसं जास्त का शिकत नाहीत?
कॉलेज शिक्षण महाग आहे. १२ वी पर्यंत पब्लिक स्कूलमध्ये फुकट असले तरी नंतर नाही. आई-वडील शिक्षणाला पैसे देतीलच असं नाही. ज्यांना खरोखरच शिकायचे आहे ते कर्ज काढून नोकर्‍या करत शिकतात. वय आड येत नाही.

इथे एक मुद्दा मी आवर्जून मांडू इच्छितो तो असा की भारतातले प्रदूषण, लाचलुचपत इ. सर्व कारणे खोटी आहेत, त्या सबबी आहेत, अमेरिका सोडून जावेसे वाटत नसले की त्या सबबी सुचतात.
--------------------------------------------------------------------------------
हे वाक्य मला पटले नाही. अमेरिकेतुन परत जाणे किंवा न जाणे हा ज्याचा त्याचा संपुर्णपणे वैयक्तीक प्रश्न आहे. आणि सबबी विचारणारे कोण? त्याना कोणी आन्सरेबल का असावेत? आपण परत गेलो किंवा न गेलो तरी त्याना फरक पडणार नाही किंवा ते आपल्या कुठल्याही उपयोगी पडणार नाहीत मग त्याना काय वाटते त्याची पर्वा का करायची?

मी स्वतः २०१० जुन मधे परत जात आहे तरिही जे द्विधा मनस्थितीत आहेत त्यानी जाण्याचा निर्णय घेण्याआधी पुर्ण विचार करावा आणि जर मनाला पटत नसेल तर जाउ नये असे मला वाटते. (अपवाद कौटुंबीक परिस्थितीचा कारण काही गोष्टी टाळता येत नाहीत, वर कोणीतरी म्हटल्याप्रमाणे नॉन निगोशिअ‍ॅबल)
मी आधीही लिहिल्याप्रमाणे इथुन जाणे सोपे असले तरी जर तिथे गेल्यावर तुमचा निर्णय बदलला आणि कायमचे परत यावेसे वाटले तर येणे तितकेसे सोपे नाही. (नागरिकत्व असल्याशिवाय)

त्यांना का नाही वरील सबबी सुचल्या? <<
प्रत्येकाला स्वतःच्या आयुष्यासाठी काय योग्य आणि काय अयोग्य हे ठरवण्याचा अधिकार असतो. ज्याचं त्याचं आयुष्य त्याचं त्यालाच माहीत असतं. ते पूर्ण माहीत नसताना कुठल्याही कारणांना सबबी म्हणणे हे चूक.
दुसरं म्हणजे आयुष्यात प्रत्येकाचीच धडपड आयुष्य 'सोपं आणि सुखी' करण्यासाठी चाललेली असते मग समृद्धी आणि सुविधांसाठी लोकांनी एका देशाची निवड केली तर त्याला चूक म्हणायचा कुणाला कसा काय अधिकार पोचतो? किंवा उलटा सुद्धा..
मला तरी वरची दोन्ही बाजूची कारणं (माझ्यासकट) ही आयुष्य जास्तीतजास्त 'सोपं आणि सुखी' करण्याचे प्रयत्न वाटले. प्रत्येकाची 'सोपं आणि सुखी' ची व्याख्या वेगळी असेल त्यामुळे प्रत्येकाचे निर्णय वेगळे असतात.

भारतात शिक्षण सबसिडाईज्ड आहे. तुमच्या शिक्षनाचा भार सरकार उचलते, त्यामुळे उच्चशिक्षनाला तुलनेने कमी खर्च येतो.
सहसा येथे राहणारे दुसर्‍या जनरेशनचे मुलं पण शिकलेलेच असतात कारण त्यांचे आईवडिल त्यांना मदत करतात. फार क्वचित लोक करत नाहीत.

Pages