Submitted by नंदिनी on 20 April, 2009 - 05:42
जुन्या मायबोलीवरचे काही फारच मजेदार बीबी होते. त्यापैकी हा एक!!
http://www.maayboli.com/hitguj/messages/644/104457.html?1225138364
कुणाचे असेच काही गमतीशीर अनुभव असतील ते इथे टाका...
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मी आणि माझा एक कलिग.. आम्ही
मी आणि माझा एक कलिग.. आम्ही भोपाळला एका क्लायंटकडे सॉफ्टवेअर इंप्लिमेंटेशनकरता गेलो होतो. काही प्रॉब्लेम आला की आम्ही आमच्या बॉसला ऑफिसमध्ये फोन करायचो. बॉसचं नांव रंगराजन आणि रिसेप्शनीस्टचं नांव वर्धिनी.
एकदा काम करत बसलो होतो. रात्रीचे ११:३० वाजले होते. एका गोष्टीकरता बॉसला फोन करायला लागणार होता. मी ऑफिसचा नंबर फिरवला. सहा सात बेल्स वाजल्यानंतर तिकडून फोन उचलला गेला.
"Hello.. Vardhini here.."
मी बुचकाळ्यात.. च्यायला वर्धिनी कशी काय अजून ऑफिसमध्ये!!
मी विचारलं Is Ranga around?
वर्धिनी.. (वैतागलेल्या स्वरात) - How come Ranga will be in my house at this time?
तो स्वर ऐकूनच मी जीभ चाऊन (स्वतःची) लगेच फोन ठेऊन दिला. पाहिलं तर वर्धिनीच्या नावापुढे दोन फोन नंबर्स सेव्ह केले होते. पहिला नंबर तिच्या घरचा होता आणि दुसरा ऑफिसचा. मी वेंधळेपणाने (नेहमीप्रमाणे :फिदी:) पहिला नंबर फिरवला होता.
हा हा हा हा....... हा हा हा
हा हा हा हा....... हा हा हा हा....... हा हा हा हा.......
बास माझे पोट दुखायला लागले.
मी विचारलं Is Ranga around ..
मी विचारलं Is Ranga around .. किर्या... अशक्य

किरु त्या सेक्रेटरीचं WFH का
किरु त्या सेक्रेटरीचं WFH का ? ( आता कोणाच्या घरुन ते विचारु नका )
एकदा वरणभात कालवून मुली समोर
एकदा वरणभात कालवून मुली समोर ठेवला. तू हवे तेवढे तूप घे म्हणून. तेल व तुपाची भांडी जरा सारखीच आहेत. तिने चक्क तेल ओतून घेतले व मला ओरड्ली कसे तरीच लागते आहे म्हणून.
मामी, गोडे तेल होतं ना ? लाल
मामी, गोडे तेल होतं ना ? लाल तिखट घ्यायचत की टाकून मग त्या भातात. छान लागतं तेल, तिखट, मीठ
बायकोने काहीतरी शिजायला ठेवलं
बायकोने काहीतरी शिजायला ठेवलं होतं. त्यावर झाकण टाक म्हणाली. मी हाताला मिळेल ते झाकण टाकलं. झाकण शिजत्या आमटीत जाऊन पडलं. (भांड्यापेक्षा झाकण थोडसंच लहान होतं). मग ते झाकण उचलता येईना. झाकण भांड्यात अडकून बसलं असं की बाहेर निघेना. मग पक्कड, हातोडी इत्यादी हत्त्यारं बाहेर आली पण शिजत्या आमटीवर असले प्रयोग करायला परवानगी मिळाली नाही. पातेलं वाकडं करून प्रवाही आमटी काढता आली असती पण त्यात असलेले घनपदार्थ काढणे अशक्य....
पुढे बराच वेळ काय झालं असेल हे कळेलच तुम्हाला
परदेसाई... खो खो खो.. वाट
परदेसाई... खो खो खो.. वाट लागली असेल तुमची, खर्र खर्र सांगा.
(किस्से अफलातुन आहेत हे नकोच सांगायला).
बाकी ती नावांची अदलाबदल बायका जास्त करतात हे पाहुन धक्का बसलाय
मामी वरणभातवर तेल इइइइ.
मामी वरणभातवर तेल इइइइ.
मी हे दोन्-तिन्दा केलेय. माझी
मी हे दोन्-तिन्दा केलेय.
माझी लेक लहान असताना. संध्याकाळी ऑफिसहून घरी येताना तीला बेबी सिटर कडेच विसरुन यायची. घरी येउन कार पार्क करुन गाडीचे मागचे दार उघडायला गेल्यावर लक्षात यायचे अरे कार्-सीट्मध्ये ती नाहिये. नशिब जास्त ड्राइव करावे लागत नाही.
कधीही न आटणारा बाफ म्हणून
कधीही न आटणारा बाफ म्हणून नामकरण करुयात आता!
). कावळ्याची मनातल्या मनात माफी मागत (अन स्वतःला बावळी-कावळी म्हणून घेत) - चरफडत रेस्टरूम मधे गेले.
भन्नाट आहेत सगळेजण..
काल सकाळी फॉर्मल कपडे घालून ऑफिसला निघाले.. नवरा मागून हसत आला.. मी टकाटक फॉर्मल कपड्यांखाली स्पोर्ट शूज घातलेले.
त्यावरुन दोन जुन्या गोष्टी आठवल्या:
१. खूप वर्षापूर्वी एकदा ऑफिस मध्ये टीमलीडशी बोलत होते.. तर जाणवलं की तो विचित्रपणे बघतोय. जरा रागच आला. मनातल्या मनात 'असा कशाला बघतोय, डोंबकावळा कुठचा' वगैरे संवाद सुरु झाले..
पण थोड्याच वेळात माझं लक्ष माझ्या ड्रेस कडे गेलं- आणि मला समजलं की मी ड्रेस उलटा घातला आहे (आतली बाजू बाहेर
२. ही तशी मागच्या वर्षीची गोष्ट.
एका वेंधळ्या कलीगच्या घरी सगळे लंच ला गेलो. तो तेवढ्यातल्या तेवढ्यात 'काम आहे' नावाखाली ऑफिसातला लॅपटॉप घेऊन आला. अर्थातच तो इतका वेंधळा आहे की जेवण करून जाईपर्यंत 'काम आहे' आणि 'लॅपटॉप आणलाय' दोन्ही विसरला.
मग परत जाताना तो कार मध्ये चढल्यावर त्याच्या घरातून लॅपटॉप माझ्या जर्किन मधे लपवून आणला.
सगळे जण वाट पहात होतो, की आत्ता ह्याला रियलाईज होईल, मग ह्याला रियलाईज होईल.. काहीच नाही.. शेवटी काही जणांनी विषय छेडला. तर साहेब एकदम गाडी वळवून परत जायला लागले.. निम्म्याहून जास्त अंतर कापलेलं - म्हणून शेवटी आम्ही त्याला सांगून टाकलं की अरे, आहे लॅपटॉप आणि मग यथेच्छ्य टिंगलटवाळी सुरु झाली.
आणखीन थोड्या वेळानं लक्षात आलं की ह्या लॅपटॉप लपवायच्या गडबडीत मी स्वतःचे फॉर्मल शूज घालायचे सोडून त्याच्या घरातल्या बाथरूम स्लीपर्स घालून आलेले.
मग काय - पब्लिकनं त्याला सोडला आणि मला धरला..
(दुसर्यासाठी खड्डा खोदून स्वतःच त्यात पडणे म्हणजे काय ते त्या दिवशी कळलं :D)
सिंडी, तुझ्यासारखाच माझा एक
सिंडी, तुझ्यासारखाच माझा एक किस्सा आहे.. पण जराशी बरी आवृत्ती..
मैत्रिणीची वयानं बरीच मोठी असलेली बहिण आणि तिचा नवरा आलेले मैत्रिणीच्या घरी.
आम्हाला जेवायला बोलावलं.
आता मुलाचं नाव अवधूत आणि नवर्याच नाव अद्वैत.
नाव ऐकून मला वाटलं उलट असेल.
जेवण वगैरे झालं आणि गप्पा मारता मारता मी 'बरं का रे अद्वैत' असं म्हणून त्याच्याशी जे लहानमुलासारखी बोलायला सुरुवात केली..
मैत्रिणीच्या बहिणीचा नवरा आणि माझा नवरा - दोघही कावरेबावरे झालेले..
पण वेट पपीज पेक्षा बरी आवृत्ती!
लिफ्ट मधे शिरून , जर ६व्या
लिफ्ट मधे शिरून , जर ६व्या मजल्यावर उतरायचे असेल तरी, सोबतचा माणूस जर ४थ्या वर उतरला तर गपगुमान त्याच्या मागुन बाहेर पडायचे समोरचे डिपार्ट्मेंट दिसल्यावर आणि लिफ्ट चे दार बंद होउन ती वर निघून गेली कि हे ऊमजायचे , मग बावळट्ट चेहेर्याने पुन्हा लिफ्ट्ची वाट पाहत उभे रहायचे, असे माझ्यासारखे कुणाचे होत नाहि का? ए.भा.प्र.
होते होते बर्याच वेळा होते
होते होते बर्याच वेळा होते बर्याच लोकांचे पण तुम्हीच म्हणता तसे ह्याला 'बावळटपणा' म्हणतात.. इथे वेंधळेपणा अपेक्षित आहे.
ह. घ्या.
माझा नवरा आज सकाळी ऑफ़िसला
माझा नवरा आज सकाळी ऑफ़िसला जाताना सेलफ़ोन विसरला. आठवण झाली तोपर्यंत कॉम्प्लेक्स बाहेर गेला होता. मग २ मिनिटे गाडी थांबवून मला फ़ोन करण्यासाठी तोच फ़ोन शोधत राहीला. लक्षात आल्यावर वैतागून घाईघाईने परत आला. शेजारच्या विंगमध्ये शिरून ईंटरकॉम चालत नाही असे पाहून लिफ़्टमधून ५व्या मजल्यावर गेला... गायत्री माथूरने दार उघडून "अरे अंकल? आप? आईये ना" असे स्वागत केल्यावर त्याच्या काय झाले ते लक्षात आले.
तो पर्यंत मी त्याचा फ़ोन घेवून खाली उतरलेच होते. ड्रायवरने "साहेब सी विंग मध्ये कशाला गेलेत काय की... फ़ोन राहिला म्हणत होते" अशी बातमी देवून मला गोंधळात टाकले होतेच.
मी अनावर हसतेय म्हणून जाताना भडकूनच ऑफ़िसला गेलाय आता.
त्याचा इमेल आयडी दे, हि लिंक
त्याचा इमेल आयडी दे, हि लिंक पाठवून तू अजून हसत्येस हे कळवतो
(No subject)
:p
पुन्हा अंकल म्हटल्याने आणखीच
पुन्हा अंकल म्हटल्याने आणखीच भडका उडाला असेल...
नाही खरं म्हणजे... गायत्री
नाही खरं म्हणजे... गायत्री पुतणीच्याच वयाची आहे
आणखीच भडका उडाला असेल >>
आणखीच भडका उडाला असेल >> बरोबर हूड काका
वैजयन्ती ऑन्टींचे म्हणणे
वैजयन्ती ऑन्टींचे म्हणणे बरोबर असू शकेल....
बायकोने तूप करायला ठेवले
बायकोने तूप करायला ठेवले होते,ते काढून झाल्यावर 'उरलेल्या बेरीत अर्धे भांडं पाणि घालून उकळ' अशी सूचना दिली. थोड्यावेळाने ती जेंव्हा परत आली तेंव्हा पाण्याने निम्मे भरलेले तुपाचे मोठे भांडे पाहून तिला झिट आली.एवढं पाणी का घातलं असं विचारल्यावर 'तूच मला अर्धे भांडं पाणी घालायला सांगितलसं' म्हणून मी वाद घातला आणि 'भांडं' म्हणजे तुपाचे नव्हे तर पाणी पितो ते,ज्याला 'तुमच्या' घरात 'पेला' म्हणतात इ. एक्सप्लेनेशन ऐकावे लागले.
अर्धं भान्डं हा शब्दप्रयोग
अर्धं भान्डं हा शब्दप्रयोग व्हेग आहे. आगाऊ तुला पाठिम्बा आणि सहानुभूती. मी असतो तर मीही तुझ्याप्रमाणेच केले असते.
आगाउ
आगाउ
आज परत उलटा कुडता घातला. काल
आज परत उलटा कुडता घातला. काल तसाच काढून ठेवलेला. ब्रेफा खाउन बीच वर हिन्डताना लक्शात आले. तडक परत.
मने, चेहरा बावळट, मन वेंधळं
मने, चेहरा बावळट, मन वेंधळं ते वेंधळच....
>>>'भांडं' म्हणजे तुपाचे
>>>'भांडं' म्हणजे तुपाचे नव्हे तर पाणी पितो ते,ज्याला 'तुमच्या' घरात 'पेला' म्हणतात इ.
सॉलीड
बाप रे, मी तर लग्न झाल्यावर
बाप रे, मी तर लग्न झाल्यावर एका जोडप्याला नवर्याची ओळख करुन देताना, 'हा माझा नवरा संदीप, अं, नाही नाही सतीश' अशी करुन दिली होती. नवीन लग्न असल्याने भांडण वाचले आणि आता नवरा तो किस्सा विसरल्यामुळे ८-१० वर्षानंतर सुद्धा जे मिळाले असते टोमणे ते वाचले...
संदीप कोण मग..
संदीप कोण मग..
सुनिधी, बघ तोच प्रश्ण...
सुनिधी, बघ तोच प्रश्ण...
Pages