मी केलेला वेंधळेपणा!!!!

Submitted by नंदिनी on 20 April, 2009 - 05:42

जुन्या मायबोलीवरचे काही फारच मजेदार बीबी होते. त्यापैकी हा एक!!

http://www.maayboli.com/hitguj/messages/644/104457.html?1225138364

कुणाचे असेच काही गमतीशीर अनुभव असतील ते इथे टाका...

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

संदीप आमचा एक अत्यंत साधासा शेजारी होता.. स-स मुळे गफलत झाली. माझी खात्रीये, तो जर कोणी हीरो टाईप असता तर खैर नव्हती.. Happy

सुनिधी, माझ्याही बायकोने एक दोन वेळा माझे आडनाव बदलुन सांगितले आहे... Uhoh एकदा तर आठवत नाहीय म्हणुन माझ्याकडे निरागस चेहर्‍याने बघत बसली नुस्ती.... Sad

सुनिधी, माझ्याही बायकोने एक दोन वेळा माझे आडनाव बदलुन सांगितले आहे... एकदा तर आठवत नाहीय म्हणुन माझ्याकडे निरागस चेहर्‍याने बघत बसली नुस्ती.... >> माझ्या बायकोनी पण बरेचदा असं केलय. ती आजहि पगाराचा चेक शिला बागुल (माहेरचं आडनाव) नावानीच घेते. मी बरेच वेळा तीला घ्यायला तिच्या ऑफिसमधे जातो, तिनी तिच्या सहकार्‍याना माझी ओळख करुन देताना मधुकर एवढच सांगितलेलं.
एक दिवस तिला घ्यायलो गेलो, बाहेर रिसेप्शन मधे बसलो होतो. एक कलिग आला, मला बघुन विचारलं.
"नमस्कार बागुल साहेब, कसं काय चाललं." मी चॅटच पडलो.
मला मुलगी झाली तेंव्हा तिच्या ऑफिसचे सहकारी दवाखान्यात भेटायला आले. एक जण म्हणाला "मुलगी अगदी बागुल साहेबांसारखी दिसतेय." यावेळी मात्र मी बागुल नाही रामटेके आहे हे तळमळीने जाहिर केलं.

ती आजहि पगाराचा चेक शिला बागुल (माहेरचं आडनाव) नावानीच घेते.
या सगळ्या बायका अश्याच का वागतात... Angry मला वाटत होते हे काम फक्त माझीच बायको करत असेल.....

मी लग्नानंतर लगेच नवीन नोकरी जॉईन केली होती. तिकडे एकदा 'अहो' न्यायला आले. रिसेप्शनला नाव आणि माहेरचं आडनाव सांगितल. तुम्ही कोण विचारल्यावर स्वतःचं नाव सांगितल तेव्हा रिसेप्शनिस्टच्या लक्षात आलं तो कोणाला भेटायला आलाय मग तिनी मला बोलवलं. लग्नानंतर माझं आडनाव बदललयं आणि नवीन ठिकाणी मी सासरचं नाव लावलय हे नवरोबा विसरलेच होते.

मल्ल्या इतकं लाल व्हायला काय झालं? सगळ्या बायकांनी लग्नानंतर नवर्‍याचं नाव लावावं हा हट्ट का? त्यांना ही माहेरचं (स्वत:चं) नाव प्यारं असतंच की...
तुम्ही बदला बघु नावं बायकांच्या माहेरप्रमाणं.. आहे का हिम्मत? Angry

दक्षे,माझ्या बायकोचं लग्नाआधीचं नाव जर संपदा रतन टाटा असलं असतं तर मी लग्नानंतर निश्चित माझं नाव बदलून तिचं माहेरचं नाव घेतलं असतं Proud

आश्यु.... Lol
दक्शे, नाव कुठे बदलायला सांगितलंय.. मी आडनावाचं बोलतोय.... Proud
लग्ना नंतर सुद्धा वडलांचंच नाव 'मध्ये' ठेवलं तर निट नाही दिसनार ना... Sad
मग सासरा कोन जावई कोन.. उगाचाच नस्ता गोंधळ... होकिनै.... Proud

किरू खरेच अशक्य आहेस Rofl
सॉफ्ट्वेअर वाल्याना कळेल हा वेंधळेपणा. मी टेस्टिंग करताना verified लिहून issue क्लोज केला. आणि वर एक गोड स्मायली टाकली. Happy अशी.

तोषा :हहगलो:,
माझ्या आधीच्या ऑफिसमधे असताना, एक कार्यक्रम होता गणेश कला क्रिडाला , मला सुरवातीच गणेश स्तवन म्हणून सुरवात करुन नंतर कार्यक्रम पण कंडक्ट करायचा होता, तेव्हा नुकतच लग्न झाल होत. सगळे माहेरच्याच आडनावाने ओळखायचे, अचानक आमच्या ऑफिस मधल्या माणसाने डिक्लीयर केल now i will hand over the mike to Mrs.Patwardhan , मी स्टेजच्या अगदी समोरच्याच खुर्चीत बसलेले ढिम्म, आणि विचार करतेय , हे काय हे कोण Mrs.Patwardhan कंडक्ट करणारे कार्यक्रम आता ?? स्टेज वरचा माणुस डोळे वटारुन माझ्या कडे का बघतोय ते कळेना माझ्या मैत्रीणी ने ढोसल मला कोपराने तेव्हा लक्षात आल मलाच जायच्य स्टेज वर Proud

अचानक माझ्या लक्षात आलं की नवर्‍याचा चार्जींगला लावलेला मोबाईल तो तसाच घरीच विसरुन गेलाय. मी लगेच आतल्या खोलीत गेले माझा फोन घेतला आणि सतत त्याला "तो फोन घरीच विसरुन गेलाय" हे सांगण्यासाठी त्याला फोन करायला लागले. रिंग होते पण हा उचलतच नाहीये याचा मला जामच राग आला.

'मी इतक्या वे़ळा फोन करते आहे आणि हा उचलत नाहीये.
इतक्या वेळा करते आहे म्हणजे तसच काही कारण असणार हे कस कळत नाही याला.
हे म्हणजे ज्याच करायला जाव भल्....
मला काय करायचय .....
राहेनाका का घरी फोन.'

चिक्कार वैतागले.

थोड्या वेळानी त्याचा ऑफिसमधुन फोन आला , मी लगेच ओरडायला सुरवात करणार तेवढ्यात तोच म्हणाला की "फोन घरी विसरलोय तेव्हा आज मला फोन करायचा असेल तर याच नंबरवर कर" Sad

पनू... issue क्लोज होणे हे एका डेव्हलपर साठी स्मायली हुन काही कमी नाही.. Proud
स्मि.. Rofl

मने Rofl

स्मी.... Lol
केद्या बरोबर रे... Wink
पन पने वर स्मायली म्हंजे डेव्हलपरला स्वर्ग दोन बोट उरले असेल....

सुनो ....सुनो ....सब कान खोलकर,ध्यान देकर... सुनो ....
मी केलेला "वेन्धळेपणा" .......म्हणजे .मी माय बोली वर आलो ...

'(मी इतक्या वे़ळा फोन करते आहे आणि हा उचलत नाहीये .....)
मी पण आज सेल विसरला आहे ....त्यामुळे ....

>>मी केलेला "वेन्धळेपणा" .......म्हणजे .मी माय बोली वर आलो ...

परतीच्या बोलीवर का नाही? Proud

मी केलेला "वेन्धळेपणा" .......म्हणजे .मी माय बोली वर आलो >> आणि नुसते येउन थांबला नाहीत.. तर सदस्यत्व घेतलेत हा दूसरा मोठा वेंधळेपणा Proud

एकदा पाहुणे येणार होते. नवीन लग्न झालेले असल्यामुळे जरा टेन्शनमधेच होते. खीर आणि कढीची पातेली जवळ जवळ ठेवलेली होती. कढीत अजून फोडणी घालायची होती. कढीत घालण्यासाठी कोथिंबीर कापली आणि पटकन खिरीत टाकून दिली.
नंतर जो व्याप झाला............................................

एकदा आमची पार्टी चालू होती. हॉल तसा छोटा पडत होता. मुलंही लहान होती तेव्हा. व सर्वांनी आपापली मुलं आणली होती. ज्या मित्राच्या घरी पार्टी चालू होती ....त्याची एक छोटी मुलगी नुसतीच इकडून तिकडे करत होती. तिला बसायच होतं कुठे तरी. आमचा एक मित्र सोफ्यावर बसलेला होता. तो आपल्या मांडीवर थाप मारत म्हणाला ....
"ये गं नीलम इथे जागा आहे बघ्.........ये.........राहू देत सगळे उभे.......आपण बसू."
सर्वात गंमत म्हणजे नीलम हे आमच्या मित्राच्या बायकोचं नाव व मुलीचं पूनम. त्यातही त्याच्या दुसर्‍या मुलीचं नाव प्रीतम ..........आई नीलम आणि मुली पूनम प्रीतम. आहे ना कन्फ्यूजिंग?
या दोघींमध्ये नावांचा घोटाळा नेहेमीच व्हायचा. पण हे .....................?

एक खराखुरा सरदारजी चा जोक आहे, माझ्या पहिल्या हापिसातला.
आमचं हापिस होतं तिसर्या मजल्यावर आणि चवथ्या मजल्यावर गच्ची- तिथे एक पत्रा टाकून शेड तयार केली होती कॅन्टीन साठी.
एके दिवशी माझ्या बाजूला बसणारे सरदारजी मनमोहनसिंग (!) हे आमच्या बरोबर जेवायला चवथ्या मजल्यावर आले, आणि त्यांच्या लगेच(!) लक्षात आलं की ते डबा खालीच स्कूटर मध्ये विसरले आहेत.

ते चार मजले उतरून खाली स्कूटरपाशी आल्यावर त्यांच्या लक्षात आलं कि ते स्कूटरची चावी तिसऱ्या मजल्यावर त्यांच्या टेबलवरच विसरले आहेत.

परत बिचारे तीन मजले चढून वर आले आणि चावी घेऊन परत खाली जाऊन डबा घेऊन चवथ्या मजल्यावर आम्हाला जॉईन करते झाले !!

Pages