मी केलेला वेंधळेपणा!!!!

Submitted by नंदिनी on 20 April, 2009 - 05:42

जुन्या मायबोलीवरचे काही फारच मजेदार बीबी होते. त्यापैकी हा एक!!

http://www.maayboli.com/hitguj/messages/644/104457.html?1225138364

कुणाचे असेच काही गमतीशीर अनुभव असतील ते इथे टाका...

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हा माझ्या नवर्‍याचा किस्सा. माझ्या मैत्रिणि चे नाव आहे निलिमा आणि तिच्या मुलीचे नाव आहे निमिषा. माझ्या नवर्‍याला नेहमी ह्या नावांमधे confusion. एकदा त्यांच्या घरी गेलो असतांना माझा नवरा दारातुनच 'निलिमा, निलिमा, सोना कुठे तु? चल आपण छान छान खेळुया, ये बाहेर लवकर" अस आगदी लाडिगोडिने हाका मारत होता. ति काही येत नव्हती आणि आम्हाला आमच्या हासण्याने काही सुचत नव्हते. तरी त्याच हेच चालु "नेहमी तर येते माझ्या जवळ, आज बाइसाहेबांचा काही मुड नाही बहुतेक" . शेवटि ते पिल्लुच म्हणालं "काका तुम्ही मला कुठे बोलावताय?" Happy

Rofl

माधुरी Lol माझं बर्‍याच वेळी होतं असं , शेजारणीचं नाव आहे राधा अन मुलीचं मुक्ता , त्या मुक्ता ला बर्‍याचदा राधा म्हणून झालय चुकून Proud

माधुरी.... Lol नावांमधे confusion या मध्ये तर माझा कोणी हात धरत नाही.. Proud ( अन ते किस्से इथे टाकन्या सार्खेही नाहीय्ते )

हे विश्वास बसणार नाही पण माझ्या बाबतीतही झाले आहे. ११ वर्शांपूर्वी.

नवर्‍याचा एक कलीग अगदी प्रेमाने अश्विनी ये की कडेवर घेतो म्हण्ला. तेव्हा माझी पोर ६ महिन्याची होती. त्याची बायको रागाने जांभळी झालेली.
आता मुलीचे नाव आहे पूर्णिमा. कंपनीचे पण. तर खूप लोक पूर्णीमा मलाच म्हणतात. क्या करे?

Rofl
त्या पल्लीच्या आणि विनय देसायांच्या बक्षिसात हा मल्ल्या लवकरच भागीदार होणार अस दिसतय. Happy
नावांच कन्फ्युजन Lol

नावाचा एक किस्सा.... एक दिड वर्षापुर्वीचाच आहे... Proud

माझ्या एका मैत्रीणीचा वाढदिवस होता. तिचं नाव स्वाती, आधल्या दिवशी पासुन लक्शात ठेवलं होतं "उद्या स्वातीचा वाढदिवस आहे...उद्या स्वातीचा वाढदिवस आहे...रात्री १२ ला फोन कराय्चे..." पन दिवसभरात 'स्वातीचं' 'श्वेता' कधी झालं कळ्ळंच नाही. Uhoh
घरी गेल्यावर आईला सांगुन मोकळा "उद्या श्वेताचा वाढदिवस आहे... रात्री १२ ला फोन कराय्चे... जाम पिडनार मी तिला.." आई तरी म्हनाली "अरे दोन महीन्यापुर्वीच झाला ना तिचा वाढदिवस.. :अओ:" तरी मि लक्श दिलंच नाही. रात्री १२ ला लावला फोन.. श्वेताला.....
ती: (झोपेत)... "काय बे एवढ्यारात्री फोन ? ठिक आहे ना सगळं ?"
मी: "हँ......:अओ: "
ती: "हॅलो, झोपेत लावलायस्स का चुकुन.. ?"
मी: "येडे हॅप्पी बड्डे...."
ती: "ठेव फोन तु झोपेत आहेस, सकाळी बोल्लुयात" आणि तिने ठेवला... Sad
मला कळेच ना काय झाले ते... वर दुसर्‍यादिवशी तिला (स्वातीला) दम देउन विचारत होतो काल असं का केलंस म्हणुन.... तिची बत्ती गुल !!!! डायल लिस्ट काडुन चेक्लं... आनि दाखवलं तिला....
उचकलीच ती (तिची तरी काय चुक होती म्हणा... Proud ) "अबे मी स्वाती आहे, श्वेता नाही... कधी सुधरनार रे बाबा... "

(झोपेत फोन रिसिव कर्न्याचे किस्से वेगळेच... Wink त्या सवयी मुळे मी एक नविन सवय जडवुन घेतलीय, सकाळी उठल्यावर रिसिव्ड कॉल्स चेक करायचे, वेळ मी झोपल्या नंतरची असेल तर कॉल करुन पुन्हा बोलायचे...... कारण काही आठवतच नस्ते काय बोल्लेलो अस्तो ते. )

मी तर माझ्या मैत्रिणीच्या कडेवर असलेल्या तिच्या मुलाचा गालगुच्चा घेवून लाडात म्हटलं होतं "अले हृषिकेश ! कशा आहेश तू मन्या? " त्यावर ती फिदिफिदी हसून म्हणाली "अगं हा उत्कर्ष, आणि माझा नवरा हृषिकेश". तिच्या बहिणीनेपण एकदा तिला म्हटलं होतं "तू तुझी कामं आटप, मी हृषिकेशला भरवते" Biggrin

अ‍ॅश Lol

लगे रहो मल्लिभाई........... Lol
अ‍ॅश, लय म्हणजे लयच भारी आणि तुझ्या मैत्रिणीची बहीण पण लय भारी. Proud

मी हृषिकेशला भरवते>>>> Lol

नशिबवान आहे ह्र्षीकेश.. अशी मेव्हणी मिळालिय... Proud

मल्ल्या... बहुतेक तुझ्या सगळ्यात जास्त पोस्टी असतील वेंधळेपणाच्या .... Lol
(बक्षीस नाहीये बरं का.... लक्षात ठेव) Wink

मी नेहमीसारखाच कामावर जायला निघालो, बाहेर पडताना बॉडी स्प्रे मारायची सवय त्यादिवशी गडबडीत स्प्रे मारला, वासाने लक्षात आलं हे `हीट' होतं. एकदा तर चक्क घरातून निघालो, जिन्यापर्यंत गेल्यावर आईने हाक मारली म्हणाली अरे आज बॅग नाही नेत मी म्हटलं ही काय घेतलेयं आणि पाहतो तर काय ते चक्क चिंपाट होत. ....

खरचं एक एक किस्से आठवले की आजही हसु येतं ..

बाहेर पडताना बॉडी स्प्रे मारायची सवय त्यादिवशी गडबडीत स्प्रे मारला, वासाने लक्षात आलं हे `हीट' होतं.
एक्दम 'हिट' वेंधळेपना.. Proud मग ? त्या दिवशी कित्तीजण बेशुद्ध पडले ? का तुच आधी पडलास ? Lol

बापरे.. मस्तय,लई धम्माल चाललीये इकडे !!!.. कधी लो वाटत असेल तर इकडे यावं.. हसता हसता पुरेवाट होते,,

अम्या Rofl Rofl

Pages