मी केलेला वेंधळेपणा!!!!

Submitted by नंदिनी on 20 April, 2009 - 05:42

जुन्या मायबोलीवरचे काही फारच मजेदार बीबी होते. त्यापैकी हा एक!!

http://www.maayboli.com/hitguj/messages/644/104457.html?1225138364

कुणाचे असेच काही गमतीशीर अनुभव असतील ते इथे टाका...

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुरुवात अर्थात माझ्याकडून्!!

दुपारी जेवण झाल्यावर डबा घासला आणि टिश्यूपेप्रने तो पुसत असताना केलेला हा अस्सल वेंधळेपणा!!!
चमचा पुसला. टिशू चुरगळला आणि फेकला. चमचा डस्टबिनमधे Proud
--------------
नंदिनी
--------------

तू चमचाच फेकलास ना, माझ्या ऑफिस कलिग ने ५०० ची नोट टाकली होती डस्ट बीन मधे (खरच)

मी एक दिवस चहा मायक्रोच्या ऐवजी फ्रिज मधे ठेवला, फ्रिज च दार लावल आणि टाईम सेट करायला गेले तेव्हा कळल काय झाल ते

-------------------------------------------------------------------------------
मुंबई गटग वृत्तांत इथे वाचा http://www.maayboli.com/node/7035

http://www.youtube.com/watch?v=6_OfAvkxaTI कृपया ही अ‍ॅड बघा.

Donate Eye - Bring Light to Blind

हे तर मी कित्तीवेळा केलंय. एकदा पाहूणे येणार होते म्हणून २ किलो काकडी कोचवली कोशिंबिरीसाठी हॉलमधे बसून (आमच्याकडे किसलेली आवडत नाही). एका हातात काकडीचे ताट आणि एका हातात सालांचे ताट असं घेवून किचनकडे निघाले. पॅसेजमधे डस्टबीन आहे. उरकायच्या घाईत मी एवढ्या मेहनतीने कोचलेली काकडी डस्टबीन मधे टाकली आणि सालं हातात तशीच. एका क्षणातच भानावर आले पण आता काही उपयोग नव्हता. मग बुंदी रायतं केलं Sad
************
धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरुरायाची | झाली त्वरा सुरवरा विमान उतरायाची ||

Lol एकदा बायको आजारी असताना तिला बि-प्रोटीनच्या डब्यात तिने भरून ठेवलेले मक्याचे पीठ दुधात टाकून प्यायला दिले होते ! Biggrin

पहाटे उठून अभ्यास्-बिब्यास करण्याच्या यडचापपणाच्या पहिल्या आणि एकमेव दिवशी, आईने करून ठेवलेला चहा, साखर, दूध घालून कोमट करून प्यायले. इतका कडू जहर... पावडर बदलली काय तुम्ही लोकांनी, जरा कमी घालत जा ना, पावडर... वगैरे आरडा ओरडा झाल्यावर आईने सावकाश सांगितलं की मी कडू चिराईत प्याले.....

वाटी आणि पेला ह्या परिमाणांची उलटा-पालट करून केलेले पाकातले लाडू... लोक अजून आठवण काढतात त्या चिक्कीची.

आमसुलाची कढी... आमसूल घालायला विसरून केलेली!

हे स्वयंपाकघरातलं!

नेहमीप्रमाणे ऑफिसला जायला उशीर होत असल्याने, 'वैनी, जरा स्टेशनपर्यंत सोड" ह्या धाकट्या दीराच्या प्रार्थनेला 'तथास्तू' म्हटलं. माझं सगळं आवरून, खाली जाऊन, मोटरबाईक चालू करूनही मी उभी.... किती वेळ? सताठ मिनिटं तरी... मनात म्हटलं, किती हळूबाई तरी....

मागून इमारतीचा वॉचमन आला... ओ, बाई, तुमचे दीर स्वयंपाकघराच्या खिडकीतून ओरडतायत. तुम्ही त्यांना घरात ठेऊन, दाराला कुलुप लावून आलाय Blush

पण हे किस्से खूप खूsssssप जुने हं!

दाद Lol
************
धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरुरायाची | झाली त्वरा सुरवरा विमान उतरायाची ||

दाद डिस्क्लेमर टाक ग, मी एकटीच हसतेय ऑफिस मधे Proud
-------------------------------------------------------------------------------
मुंबई गटग वृत्तांत इथे वाचा http://www.maayboli.com/node/7035

http://www.youtube.com/watch?v=6_OfAvkxaTI कृपया ही अ‍ॅड बघा.

Donate Eye - Bring Light to Blind

दाद, जबरदस्त...
मी काल ताकाची कढी करण्यासाठी म्हणून ताकात बेसन घातलेले होते. नवर्‍याला वाटलं की ताकाचा रंग असा नाही बदलला... त्याने अजून चार ते पाच चमचे बेसन घातले.

कधी करपलेलं ताकातलं पिठलं असा पदार्थ खाल्लाय??
--------------
नंदिनी
--------------

अरे बापरे, हे वाचल सगळ नि एक समाधान
मी काय तो एकटा या जगात वेन्धळा नाहीये!
आईला अन लिम्बीला हे सान्गायलाच हव! Proud

हॅत्तिच्या. मग वरुन लसणीची फोडणी देवून थोडं अजून घट्ट करायच. मग ताकातली उकड झाली असती फक्त तांदळाऐवजी बेसनाची.
************
धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरुरायाची | झाली त्वरा सुरवरा विमान उतरायाची ||

एकदा मी स्टेपलर ची पीन उलटी धरून माझ्या बोटातच स्टेपल केलेली Proud
------------------------
देवा तुझे किती सुंदर आकाश
सुंदर प्रकाश सूर्य देतो

अय्या, अगदी काल परवाचे पण द्यायचेत होय Happy

ते काही नाही.. एव्हढा कसा वेंधळेपणा होतो आपल्या हातून... नवरा म्हणतो तसा एकावेळी एकाच गोष्टीचा विचार करायचा...
एकाग्रतेने, अतिशय आठवणीने तबल्याची हातोडी, हाताला लावायचा पावडरचा डबा असलं सगळं परत परत तपासून बघत एका कार्यक्रमाच्या प्रॅक्टिसला गेले... आणि हो! तबला तेव्हढा न्यायचा राहिला Happy

पण कोणताही वेंधळेपणा मी, एकदाच करते हं.... दुसर्‍यावेळी तबला विसरणं शक्यच नाही.... हातोडीची बॅग विसरेन कदाचित Happy
क्रिएटिव्हिटी हवी बुवा त्यातही... सारखा सारखा तोच तोच काय वेंधळेपणा करायचा म्हणते मी!

केदार, हसतोयस काय... एव्हढे नाही बाई आम्ही हे... Wink

एकदा कुकरमध्ये भाताच भांड ठेवलेल पण पाणीच घातल नाय. तेंव्हा कुकरचा सेफ्टी वॉल्व्ह जो ऊडालाय तो आजतागायत सापडला नाही Proud
------------------------
देवा तुझे किती सुंदर आकाश
सुंदर प्रकाश सूर्य देतो

आजतागायत सापडला नाही <<< काय शेतात स्वयंपाक करता का ? Wink

जंगलात असणार कारण आसपास व्हॉल्व घालून द्यायचं दुकान दिसलं नाही त्याला आणि उडालेला व्हॉल्व शोधत बसलाय अजून. अरे तो व्हॉल्व रुजून त्याचं झाड पण झालं. पुढच्या वर्षी तुला व्हॉल्वच व्हॉल्व मिळतील हां !
************
धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरुरायाची | झाली त्वरा सुरवरा विमान उतरायाची ||

आयला आपल्यासारखे अजुनही नमुने आहेत हे पाहुन जबरी(राक्षसी) आनंद झालाय. Proud
माझीतर लिस्ट मोठी आणि अफाट आहे वेंधळेपणाची...

गाडीची चावी डेस्कवर विसरून खाली पार्कींगमधे जाणे.
अ‍ॅक्सेस कार्ड घरी ठेवून ऑफीसला येणे.
ऑफिशियल मेल लिहीताना सब्जेक्टची जागा ब्लॅंक ठेवणे. इ. इ.....इ रेस्ट टु एन !

बायको गावाला गेल्यावर प्रत्येक नवर्‍याचा नेहमीचा वेंधळे पणा गॅसवर दुधाचे पातेले गॅस सुरु ठेऊन ऑफिसल जाणे!

एकदा असाच मला कंपनीत फोन आलेला अहो तुमच्या घरात आग लागलिए आणि खूप धूर बाहेर येतोय!
खरी धावत पळत आलो तर दुधाचे पातेले काळे ठिक्कर झालेले आणि खाली मंद गॅस तसाच सुरु! Proud

नंदिनी बरं झालं सुरु केलास हा बीबी.. मी खुपच मिस करत होते... आपल्यासारखेच अजुन बरेचजण आहेत हे समजल्यावर जरा समाधान वाटतं. नवरा नामक प्राणी टपुनच बसलेला असतो, त्याला दाखवायला बरं पडतं..:)

अगदी वेळेवर धागा सुरु झालाय हा... Happy माझापण नुकताच झालेला वेंधळेपणाचा किस्सा आहे.

रात्री कुकरमधे भात लावताना मी नेहमी सकाळी केलंलं वरणपण कुकरमधे ठेवते. त्याच बरोबर भिजवलेली कणिक नॉर्मल टेंपरेचरला आणण्यासाठी फ्रीजबाहेर काढुन ठेवते.. . गेल्या आठवड्यात वरण कुकरमधे ठेवण्याऐवजी कणिकच कुकरमधे ठेऊन दिली आणि कुकरच्या ३ शिट्ट्या होऊन दिल्या... कणिक छान शिजुन निघाली आणि हे लक्षात कधी आले.. पोळ्यांची कणिक सापडेना तेव्हा...

>>गॅसवर दुधाचे पातेले गॅस सुरु ठेऊन
यावरुन आठवल, शासकीय अभियांत्रिकीच्या हॉस्टेलमधला नेहमीचा प्रकार,
उशिरा (१०-११ वाजता) उठायच, मग घाइघाइनी आवरायच, (आजतरी) आंघोळ करावी या उद्देशानी बादलीत रॉड लावायचा (पाणी गरम करायला), तेही दुसर्‍याच्या रुममधे (तीळच काय, हॉस्टेलमधे सगळ्या वस्तु कमीत कमी सात जण वाटुSन वापरणार!) मग काहीतरी आठवल्यावर, ते पाण्याचं विसरुन तसच कॉलेज गाठायच!
संध्याकाळी बघितल की पाणी उडालेलं, बादली वितळलेली, रॉड तुटलेला...
... आता नवीन रॉड येइपर्यंत (कमीत कमी) सात जणांच्या आंघोळीचे वांदे!

दाद, दिराला घरात कोंडून ठेवण म्हणजे कहरच झाला. त्यापेक्षा नेणार नाही अस स्पष्ट सांगायच ना त्याला Happy
कणीक कूकरमधे शिजवण कधी ऐकल नव्हत Happy

दाद, कायच्या काय किस्सा गं. मी अगदी इमॅजिन करून हसत होते.(तुझा दीर खिडकीत उभा राहून ओरडतोय अन तू खाली ओरडतेय मनातच पण वेगळ्या कारणासाठी).

सव्या,
>>त्यापेक्षा नेणार नाही अस स्पष्ट सांगायच ना त्याला <<
LOL.

एकदा मी फोन वरून बोलताना फ्रीजमधले काहीतरी भांड उचलायला गेले अन फोन फ्रीजमधेच ठेवून पातेले दोन हातांने बाहेर ठेवून फोन तासभर शोधत बसले होते. इतकी वैतागले होते त्या तासभरात की लँडलाईनवर १० -१२ वेळा सेल नंबर फिरवून पण फोनचा आवाज येत न्हवता. मग डोके दुखायला लागले तेव्ह चहासाठी दूध घ्यायला फ्रीज उघडले तर काय....

एकदा ऐन दिवाळीच्या आदल्या दिवशी आई बाबांना आजोळी जावं लागलं. मग काय, चकली आणी बेसनाचे लाडू करण्याचा मी घाट घातला. तेव्हा होते फक्त चौदा वर्षांची. परत आल्यावर माझे लाडू, चकल्या बघून/चाखून आई हसायची थांबेना... मी भजणीचे लाडू अन बेसनाच्या चकल्या केल्या होत्या !!

चकल्यांचं अन माझं नक्की काही तरी वैर आहे... अगदी गेल्या दिवाळीला मायबोली वरच्या रेसिपीने चकल्या करायला घेतल्या. पॅन मधे तांदळाचे पीठ भाजयला घेतले... बराच वेळ झाला तरी त्याचा ना रंग बदलला ना काही वास सुटला.. मग काही वेळाने पाणी सुटून थोडा पीठ लागलं अस वाटायला लागलं... आता तांदळाच्या पीठाला पाणी कसे सुटणार, पॅनच ओला असणार असा विचार करत मी आपली बराच वेळ भाजत उभी... शेवटी कंटाळून "झालं असेल भाजून!" असा विचार करत ते पीठ परातीत काढलं... पीठ थंड झाल्यावर तिखट, मीठ टाकायच्या आधी मला काय सुचलं माहित नाही पण मी चव घेउन बघीतली आणी गम्मत काय? मी चक्क इतका वेळ पीठी साखर भाजत होती!!!!!
अजून्ही विचार करते मी चव न घेता पीठ भिजवायला घेतलं असत तर?

>>एकदा मी फोन वरून बोलताना फ्रीजमधले काहीतरी भांड उचलायला गेले अन फोन फ्रीजमधेच ठेवून पातेले दोन हातांने बाहेर ठेवून फोन तासभर शोधत बसले होते. <<
Biggrin
>>मागून इमारतीचा वॉचमन आला... ओ, बाई, तुमचे दीर स्वयंपाकघराच्या खिडकीतून ओरडतायत. तुम्ही त्यांना घरात ठेऊन, दाराला कुलुप लावून आलाय <<
Biggrin
मी तर घरात आई झोपलेली असताना कुलुप लावून क्लास ला गेलो आहे.......

आमच्या घरी थंडीच्या दिवसात Parachute चे तेल थिजून जाई. मग वडील ती बाटली आंघोळीचे पाणी तापत असलेल्या पातेल्यात (गरम पाण्यात) काही वेळ धरत. हे मी रोज पाहत असे. एकदा वडील कामात असताना मला तेल गरम करुन हवे होते. म्हणून ती बाटली एका पातेल्यात ठेऊन ते पातेले गॅस चालू करुन त्यावर ठेवले........थोड्याच वेळात जळका वास येऊ लागला, तशी चूक लक्षात आली. मग ते पातेले तसेच कचर्‍यात टाकून दिले...तर कामवाल्या आजीनी "चांगलं पातेलं कचर्‍यात कशापायी फेकताय" म्हणून ते आईला (आतल्या बाटलीसकट) परत आणून दिले......

दादचा दीर... खि खि खि ....

मी लहान असतांना आमच्याघरी जेव्हा पहिल्यांदा ड्रेसिंग टेबल बनवला तेव्हा त्यात स्वतःला आपादमस्तक न्याहाळ्तांना मी असा काही हरखून जात असे की हातावर घेतलेलं तेल आहे की पावडर त्याचं भानच उरत नसे आणि......... हमखास पावडर डोक्यावर आणि तेल चेहर्‍यावर होई मग माझी....बहिण प्रचंड खिदळत आईला हे जाऊन सांगे आणि माझ्या केसातली पावडर काढणं आईसाठी डोकेदुखी होऊन बसे.......त्यामुळे कित्येकदा माझी सकाळची शाळा बुडली.......नंतर याचं प्रमाण एवढं वाढलं की मुद्दाम शाळा बुडवण्यासाठी हा डोक्यात पावडर टाकून घेतो असं सांगत बहिणीने आईचे कान भरले.

तेव्हापासून किती तरी दिवस पाँड्सचा तो गुलाबी डबा आई कपाटात कुलूप लावून ठेवायची आणि मी पावडरसाठी रान उठवल्यावर चिमुटभर पफवर टाकून फक्त पफच हातात द्यायची..

'तारे जमीन पर' बघितल्यानंतर बहिणीने मला फोन करून सांगितलं.....
'दादा तुला लहानपणी 'डिसलेक्सिया' झाला होता म्हणून....'

'दादा तुला लहानपणी 'डिसलेक्सिया' झाला होता म्हणून....' Lol

नवीन लग्न झाल्यावर 'सुनेच्या हातचे बटाटेवडे हवेत' असा आग्रह झाला. पुतण्या बिचारा घाईघाईनं बटाटे घेऊन आला. माझे बटाटेवडे मस्त होतात असा (उगाचच )आत्मविश्वास असल्याने त्या भरात वेंधळेपणानं सगळेच्या सगळे पाच सहा किलो बटाटे उकडत लावले.
मग काय.. मी, नवरा, मोठे दीर, जाऊबाई नि पुतण्या इतक्या पाचच लोकांसाठी भला थोरला ढीग बटाट्यांचा... त्यातले थोडे घेतले नि बाकीचे दिले दडपून फ्रीजमधे... फक्त पुतण्याला माहीत होती अंदरकी बात.

सध्याकाळी बटाटेवड्यांची तारीफ करताना दीर म्हणाले, 'पोरीचा अंदाज पण अगदी बिनचूक आहे. उकडले पण नेमके...'
आतल्या खोलीतून पुतण्या गात होता...'बट्टू इन द फ्रिज्...बट्टू ऑन द ओटा.. बट्टू बट्टू एव्हरीव्हेअर.....'

नंतर बिचार्‍या जाऊबाईंनी आठवडाभर आलू पराठे, बटाटा भाजी, असा बटाटासप्ताह साजरा करून कसेबसे संपवले ते बटाटे Happy
----------------------------------------------------------------------------------

फूलोंसे कांटे अच्छे होते है,
जो दामन थाम लेते है.
दोस्त से दुश्मन अच्छे होते है
जो जलकर नाम लेते है.

Pages