मी केलेला वेंधळेपणा!!!!

Submitted by नंदिनी on 20 April, 2009 - 05:42

जुन्या मायबोलीवरचे काही फारच मजेदार बीबी होते. त्यापैकी हा एक!!

http://www.maayboli.com/hitguj/messages/644/104457.html?1225138364

कुणाचे असेच काही गमतीशीर अनुभव असतील ते इथे टाका...

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

टोक्योला एक ओळख्ची फॅमिली होती. मुलाचं नाव आदित्य नी नवर्‍याचं राहुल. मी नेहमी तिला उलटं विचारायचे की राहुल आता किती वर्षाचा झाला, शाळेत जातो का? वगैरे... एकदा तिच्या सासू सासर्‍यांसमोरच विचारलं होतं Proud

मी एकदा मैत्रिणीच्या नवर्‍याला स्वीट किस आणि लेकाला हाय लिहिलं होतं मेलमधे Blush

>>मी एकदा मैत्रिणीच्या नवर्‍याला स्वीट किस आणि लेकाला हाय लिहिल>><<

आई गं.. हे तर खूपच खतरनाक... मैत्रीण चक्कर येवून नाही पडली?

सायो, Happy

माझ्या बहिणीने सायोसारखेच केले होते, तिच्या मैत्रीणीचे नवर्‍याचे नाव घेवून विचारले, आता तरी रहातो का हा तुझ्याशिवाय? आणि अजून बाटली सुरु केली का नाही.(पुढे ही एक विचारले पण लिहित नाही...)
तुम्ही गेस करा.

माझ्या पुतणीच्या लग्नात झालेला किस्सा. अंतरपाट धरलेला होता. भटजी काकांनी तिच्या हातात माळ दिली आणि सांगितलं कि अंतरपाट सरल्यावर ही माळ गळ्यात घालायची. अंतरपाट सरला, ढोल ताशे वाजले आणि माझ्या पुतणीने ती माळ स्वतःच्याच गळ्यात घातली. मस्तपैकी विडिओ वर पण रेकॉर्ड झालंय Happy

मी एकदा मैत्रिणीच्या नवर्‍याला स्वीट किस आणि लेकाला हाय लिहिलं होतं मेलमधे >>> मैत्रिणीने तिच्या नवर्‍याचा पार किस काढला असेल घरी गेल्यावर . Proud

मेरी एक रानी.. मेरी और एक.. मेर्‍या और चार रान्या... >>> केदार लिफ्टमध्ये एवढ्या राण्या सापडल्या का रे Proud

सायो, करु शकतेस तुला हवे तर.. Wink
बहिण त्या दिवशी घरी आलेली तेव्हा इतकी खजील झालेली, स्व:तावरच वैतागलेली, भयंकर चिडलेली. एक तर मूळात बहिण आहे सिरियस. बहिण गेली होती ह्याच मैत्रीणीच्या मुलाच्या वाढदिवसाला.हे प्रश्ण बहिणीने मैत्रीणी, लहान मुलगा व नवरा असतानाच विचारले. वाढदिवसाला आलेली गँग जरा लांबच होती म्हणून निभावले(इती बहिण).
एकल्यावर आमची हसून पार वाट लागली. म्हटले जावू दे ना... मैत्रीणच आहे ना. पण तरीही वैतागलेली.

Rofl

सिंडे, मला ते फोन चे संभाषण डोळ्या समोर उभे राहिले आइइइग Happy नुसती हासत सुटलेय..
किरु, स्मिता, अश्विनी Happy त्या बाईंचा चेहरा recording मधे बघणेबल झाला होता

सगळे किस्से वाचुन ह.ह.पु.वा.

माझ्या एक मित्राचा हा वेंधळेपणा, तो फार साधा-भोळा आणि आज्ञाधारक आहे(होता). ... त्याच्या लग्नाचा दिवस , त्याला जे कोणी नातलग भेटत त्यांच्या तो पाया पडत होता. लग्न घटीका जवळ आली, शेवटचे मंगलाष्टक झाले, भट्जीने आंतर्-पाट काढुन म्हण्ट्ले, "आता एकमे़कांना हार घाला".
ह्याला काय झाले काय माहित, काहि समजण्यच्या आत हा पठ्ठ्या हार घालुन तिच्या पाया पडला. Happy
.... जेंव्हा सगळ्यांना कळले तेंव्हा जो तो त्याची मजा घेत होता.

हा हा हा..
हा बाफ कधीच आटणार नाही बहुतेक!
प्रविण, अगोनं पण अश्याच धर्तीचा पराक्रम लिहिलाय काही पानांमागे (बटू ऐवजी तीच भिक्षांदेही म्हणालेली :D).. तुमचा वाचूनही खूप हसले.

"तुम्ही गेस करा. ""मी एकदा मैत्रिणीच्या नवर्‍याला स्वीट किस आणि लेकाला हाय लिहिल"
सगळे अफलातुन किस्से आहेत ...धमाल नुसती.... प्रत्येकाने रोज ईथे येऊन हजेरी लावली की झाली दिवसाची छान सुरवात.. परत परत वाचले तरी चालेल..

मस्त किस्से.

काही दिवसांपूर्वी नवर्‍याला ऑफिसमधे महत्वाच्या क्लायंट बरोबर अर्थातच महत्वाची मिटिंग होती. छान झकपक तयार झाला नि गेला. मिटिंगला थोडा वेळ राहिलेला नि लक्षात आलं की पायात घरातल्या स्लीपर्स आहेत.

नशीब, ऑफिस फार दूर नाहीय. आता रोज विचारते निघण्याआधी.. 'शूज घातलेत ना' म्हणून.

टिल्लू, माझ्या एका जिजाजींनी असं केलेलं. लग्नात सगळ्या वधूपक्षाकडच्या आयाबायांना नमस्कार करायला आलेले ते. सगळ्या मेहुण्या जाम खेचत होत्या त्यामुळे नर्व्हस झाले नि मलाही नमस्कार केला वाकून. मी सातवीत होते तेव्हा..

लग्नापूर्वी नवर्याच्या घरी फोन केला..फोन त्याच्या वडिलांनी उचलला आणी त्यांचा आवाज डिट्टो माझ्या नवर्यासारखाच ..मग काय मी त्यांनाच जामलं'कल क्यों नही आये मिलने?" ते बिचारे चाचरत..'कौन्,कहां' म्हणतच राहिले'.. तरी माझ्या लक्षातच आलं नाही ,म्हणून मी त्यांना अजून जामलं,' का आता तुला जागापण लक्षात नाही भेटायची इ.इ."तेव्हढ्यात त्यांनी मला (कसंबसं)थांबवून म्हटल,'ठैरो,रम्मी को बुलाता हूं".. ते ऐकलं आणी मी तिथेच थिजले. पुढे लग्न झाल्यावरही वर्षभर सर्वांना कारण मिळालं टु पुल माय लेग!!!

पण आमच्या नगरच्या लोकांना सवयच आहे फोन दिसला की उचलायचा आणि बोलत सुटायचे. (नाहीतर शेजारी उभे राहुन फोटो काढायचा )
>>>
सिन्डे जबानको लगाम दो.. Angry

वर्षु Lol

सगळेच... Rofl

लग्नावरून एक किस्सा आठवला. माझ्या मैत्रीणीचे लग्न होतं. ती मुस्लिम होती त्यामुळे तो भरपूर मोठा सेहरा आणि घूंघट मधे बिचारी पार गडबडून गेली होती. बिदाईच्या वेळेला अर्थात रोना धोना जोरसे चालू!! सर्व नातेवाईकाच्या गळ्यात पडून पडून "संभलके रहना" "नीट रहा गं बाय" वगैरे वगैरे.

अचानक सर्वजण हसायला लागले. नवरी चक्क नवर्‍याच्याच गळ्यात पडून रडत होती!! नवर्‍याच्या चेहरा बघणेबल झालेला. हे सर्व व्हिडीओ रेकॉर्डिंग मधे अर्थातच!!

वेलकम बॅक नंदु Happy
अग बाई तुझी कादंबरी कधी पूर्ण करणार आहेस. किती दिवस वाट बघायची? लवकर लिही ना गं Sad

संक्रांतीच्या शुभेच्छा सगळ्या वेंधळ्यांना Happy

Pages