Submitted by नंदिनी on 20 April, 2009 - 05:42
जुन्या मायबोलीवरचे काही फारच मजेदार बीबी होते. त्यापैकी हा एक!!
http://www.maayboli.com/hitguj/messages/644/104457.html?1225138364
कुणाचे असेच काही गमतीशीर अनुभव असतील ते इथे टाका...
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
फोन फ्लश करायचा विचार होता,
फोन फ्लश करायचा विचार होता, पण "अशावेळी आतील बॅटरीने अख्ख्या इमारतीच्या पाईपलाईनचा विस्फोट होऊ शकतो का" ह्याची अधिकॄत माहिती वाचल्याचं आठवेना , म्हणून म्हटलं नको रिस्क!>>
मधु,हा विचार करताना वेंधळेपणा केला नाहीस हे काय कमी आहे??
ता.क.----फोन फ्लश करायचा
ता.क.----फोन फ्लश करायचा विचार होता, पण "अशावेळी आतील बॅटरीने अख्ख्या इमारतीच्या पाईपलाईनचा विस्फोट होऊ शकतो का" ह्याची अधिकॄत माहिती वाचल्याचं आठवेना , म्हणून म्हटलं नको रिस्क!
माझ्या मावसभावाची मुंज होती.
माझ्या मावसभावाची मुंज होती. मुंज लागल्यावर लहान बटु '`ॐ भवति भिक्षां देही ।' म्हणजे `भिक्षा द्या' असे म्हणत समोर येतो आणि मग त्याच्या झोळीत भिक्षा घालण्यासाठी घरातल्या आयाबाया फळे, भूकलाडू वगैरे घेऊन तयार राहतात. माझ्याही हातात त्याला देण्यासाठी काहीतरी देऊन ठेवले होते. गुरुजी बटुला घेऊन निघाले. पहिला स्टॉप माझ्यासमोर. गुरुजींनी ( त्याला ) सांगितले आता म्हण ..."भिक्षां देही" ... मीच जोरात खणखणीत आवाजात म्हटलं "भिक्षां देही" आजूबाजूला हास्यकल्लोळ झाला. एवढीही काही लहान नव्हते मी. चांगली आठवी-नववीत असेन.
आयुष्यात सीतामाई आणि धरणी किती वेळा आठवली असेल बरं ?
मधु चांगलं केल फोन फ्लश नाही
मधु चांगलं केल फोन फ्लश नाही केला ते , बाकी काही नाही पण पाईपलाईन तुंबल्यामुळे बाकीच्यांचे वांधे झाले असते .
<<< एकदा आईवर इंप्रेशन मारायला जाऊन ज्वारीच्या पीठाची कणीक भिजवली....नंतर काय उद्धार झाला तो सांगायला नकोच! >>> हा प्रकार काही कळला नाही .
श्री, पोळ्यांची कणीक
श्री, पोळ्यांची कणीक गव्हाच्या पिठाची भिजवतात.
मीच जोरात खणखणीत आवाजात
मीच जोरात खणखणीत आवाजात म्हटलं "भिक्षां देही" आजूबाजूला हास्यकल्लोळ झाला.
>> नकळत मोठ्यांदा हसले.. नशीब घरातच आहे!
बापरे! एक दिवस माबोवर आले
बापरे! एक दिवस माबोवर आले नाही तर काय प्रगती आहे?
हे सगळ झाल किस्से वाचून.
अशक्य किस्से आहेत
मागे मामींशी बोलण झालं होतं,
मागे मामींशी बोलण झालं होतं, की प्रत्येक माणून हि एक नॉलेज बॅन्क असते आणि ते नॉलेज प्रिझर्व करायला हवं.
हे सर्व वाचून परत तेच वाटलं
किरु, अगो, कहर आहात !!! >>>
किरु, अगो, कहर आहात !!!
>>> आयुष्यात सीतामाई आणि धरणी किती वेळा आठवली असेल बरं ?
मस्त किस्से आहेत एकेक... माझा
मस्त किस्से आहेत एकेक...
माझा कालचा किस्सा... एक फोन नम्बर एसेमेस करुन बहिणिला कळवायचा होता... मेसेज टाइप केला आणि फोनबूक मधून जो पाठवायचा होता तो नम्बर पण कॉपी केला.. पुन्हा मेसेज मध्ये फक्त पेस्ट करायचा होता तो नम्बर... आणि मेनु मधुन पेस्ट ओपशन सीलेक्ट करण्याऐवजी मोबईलवर ctrl+V शोधत बस्ले... आपल्याच तन्द्रित!
हा बीबी सगळ्यात वरच ठेवा...
हा बीबी सगळ्यात वरच ठेवा... कायमचा....
मेनु मधुन पेस्ट ओपशन सीलेक्ट
मेनु मधुन पेस्ट ओपशन सीलेक्ट करण्याऐवजी मोबईलवर ctrl+V शोधत बस्ले... आपल्याच तन्द्रित!
खुपश्या वेळेस मी Ctrs + Z शोधलंय...
कधी कधी तर गाडी चालवतना रस्ता चुकला की मनात Ctrl + Z चा विचार आलाय...
(काही चुकलं की माझं असंच होतं...)
Ctrs + Z ची सवय झाल्यामुळे
Ctrs + Z ची सवय झाल्यामुळे चुकापण वाढल्यायत असं दिसतय!!
काल एका रिक्श्यच्य मगे लिहिल
काल एका रिक्श्यच्य मगे लिहिल होते , ३ एदिअट्स , अनि आत पहिल तर ३ लोक बसले होते , स्वाति ,मुग्धा अनि मल्लिनाथ !
अगदी ताजा... माझ्या घरासमोर
अगदी ताजा...
माझ्या घरासमोर आमचे एका डॉक्तर स्नेह्यांचे क्लिनिक आहे. ओफिसमधून आल्यावर डॉक्टरांच्या कडे गप्पा मारायला जावून बसतो. समोर म्हनजे रस्त्याचा डिव्हायदर ओलांडून डायगॉनली आपोझिट जायचे.काल रात्री बाहेर पडण्यासाठी घरातले सर्व दिवे घालवले.आणि पादत्राणे घालून खाली आलो.रस्ता ओलान्डून क्लिनिकमध्ये गेलो. डॉक्टरांच्या चेम्बरम्ध्ये जाण्यापूर्वी तिथली नर्स म्हणाली. 'काय विशेष? एका पायात बूट आणि दुसर्या पायात चप्पल घातली आहे ते?"
धरती.. दुभंग... गिळून घेणे वगैरे
तसाच बसलो गप्पा मारीत.
आज ऑफिसला गाडी आनायचा कंटाळा
आज ऑफिसला गाडी आनायचा कंटाळा आला म्हणुन पब्लिक ट्रान्सपोर्टने आलो. ऑफिसला पोहचल्यावर रोजच्या सवयप्रमाणे सरळ ऑफिसच्या पार्कींग मध्ये गेलो...
तेही चालत. पार्कींग मध्ये आत गेल्यावर जाणवलं की आपण काहीतरी चूकलोय... लक्षात आल्यावर डोक्याला हात मारुन घेतला...
तिथेच स्वतःला दिवसभर पार्क
तिथेच स्वतःला दिवसभर पार्क करून घ्यायचे ना !
रॉबिन...
रॉबिन...
मल्ली , हेल्मेट आणलसं का रे
मल्ली , हेल्मेट आणलसं का रे सोबत
परवाची गोष्ट, दुकानात बिलाचे
परवाची गोष्ट, दुकानात बिलाचे पैसे देताना १०० चि नोट पाहुन दुकान्दाराने सुट्टे मागितले. तो पक्का पुनेकर, माझ्या कडे १०० चेच २ नोटा आहेत, सुट्टे नाहीत म्हंटले तरी एकेना.... वरचे चिल्लर तरी द्या म्हनाला. एका हातात सामान होते, दुसर्या हाताने खिशातले सुट्टे काढले. दुकान्दाराला पैसे द्यावे म्हंतो तोच १०० ची नोट गडप...
च्यायला हातातंच होती गेली कुठे म्हणुन शोधु लागलो... खाली वगैरे पडली का म्हणुन गर्दीत इकडे तिकडे वाकुन पाहीलं.. परत पाकीटात ठेवली असेन म्हनुन पाकीट काढुन पाहिलं, त्यात एकच नोट... विचार केला लागला १०० रु ला बांबु...
"....
बायको दुरुन पाहत होती, मी काही तरी शोधतोय म्हणुन तिथुनच हाक मारुन विचार्ले. तिला तिथुनच पाकीटातली दुसरी १०० चि नोट काढुन दाखवली.... तिने कप्पाळाला हात मारुन घेत माणसांच्या गर्दीतुन पोहत पोहत माझ्या जवळ येउन तिहि शोधु लागली.... तिला "अरे आत्ताच हातात होती, कुठे ठेवली आठवत नाही" असं सांगवं म्हनुन तोडातलं पेपेर हातात घेतलं. तेव्हा रागाने ती ओरडलीच..
"हे काय हे.....
तेव्हा क्ळ्ळं की इक्ता वेळ नोट कुठं होती ते..
मल्लि, मल्लि अहो काय हे? एका
मल्लि, मल्लि अहो काय हे?
एका पाठोपाठ एक वेंधळेपणा करायला कस काय जमत हो? आम्हाला पण सांगा की जरा...... 
:फिदि:
हुडा, मुद्दाम केलस ना हा वेंधळेपणा??? आपल्या वादाला उत्तर म्हणुन?
मल्ल्या ... भंजाळला आहेस का
मल्ल्या ... भंजाळला आहेस का रे वेंधळ्या
मल्ल्या मला पण असेच होते
मल्ल्या मला पण असेच होते बरेचदा. कधी कधी वस्तू समोरच असते पण गडबडीत दिसत नाही. शोधुन शोधुन चिडचिड होते अगदी. मग कोणीतरी मुर्खात काढून समोरच अस्ल्याचे दाखवून देतो.
मल्ली
मल्ली
मग कोणीतरी मुर्खात काढून
मग कोणीतरी मुर्खात काढून समोरच अस्ल्याचे दाखवून देतो. <<<<<पने,बघ म्हणजे लोकांनी किती वेळा सिद्ध करुन दाखवलय
सगळ्यांना माहिती असलेली गोष्ट
सगळ्यांना माहिती असलेली गोष्ट सिद्ध का करायला जातात लोक ? वेंधळे कुठचे...
(No subject)
असुदे...
असुदे...

का रे दिवट्यानों मी काय
का रे दिवट्यानों
मी काय एकटीच नाय अशी.
Pages