Submitted by नंदिनी on 20 April, 2009 - 05:42
जुन्या मायबोलीवरचे काही फारच मजेदार बीबी होते. त्यापैकी हा एक!!
http://www.maayboli.com/hitguj/messages/644/104457.html?1225138364
कुणाचे असेच काही गमतीशीर अनुभव असतील ते इथे टाका...
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
साकीनाका, खनीज .. काय चाल्लय
साकीनाका, खनीज .. काय चाल्लय काय हित??? पो.भ.ह.
(No subject)
वर्षे तुझा किस्सा
वर्षे तुझा किस्सा मैत्रिणीच्या नावावर खपवत नाहीस ना?
आजचा सर्वात मोठा वेंधळेपणा
आजचा सर्वात मोठा वेंधळेपणा ...
=====================
"भांडायला नळावर" जमलेले सगळे छान, सुंदर, म्हणताहेत आणि एकमेकांची
"तारीफ पे तारीफ", "तारीफ पे तारीफ", "तारीफ पे तारीफ" करताहेत
कोणी तरी तिथे जाऊन भांडणे लाऊन या बघू... :फिदि:
काल सकाळी पोळ्या केल्या,आणि
काल सकाळी पोळ्या केल्या,आणि घाईघाईत उरलेली कणीक self वर ठेवली आणि पिठीचा डबा fridge मध्ये ठेवला!! सन्ध्याकाळी office मधुन आल्यावर हा प्रकार लक्षात आला!!!
आधी पोस्टलय का कल्पना
आधी पोस्टलय का कल्पना नाहि,
पण मी एकदा अतीशय दमून आल्यावर चष्मा न काढताच चेहरा धुतलाय, क्षणभर असंही वाटलं की डोळ्यांना गार का बरं नाहि वाटलं ?
अगदी पुढच्याच क्षणी कळलं!
दळणवळणाच्या साधनांमधे 'जाते,
दळणवळणाच्या साधनांमधे 'जाते, गिरणी, मिक्सर' ही काही साधने आहेत असं मला एकानी सांगितल होतं.
याला मुर्खपणा म्हणतात कि
याला मुर्खपणा म्हणतात कि वेंधळेपणा माहीत नाही. पण लिहितो.
अहमदाबादहून जोधपुरला बसने जात होतो. पहाटेची वेळ. झोपेत असतानाच आवाज आला, 'चलो भाई, जोधपुsssर. मी पटकन खाली उतरलो. चौकात एक मिशाळ, रंगीत दातांचा रीक्षावाला उभा होता. त्याला पुर्ण पत्ता सांगितला. त्यावर रिक्षावाल्याने विचारले, कोणत्या शहरातला पत्ता आहे हा?
'जोधपुर्'...मी
त्यावर तो म्हटला हे 'सुमेरपुर' आहे. जोधपुर अजुन १५० किमी आहे.
तोपर्यंत बस निघुन गेली होती. तेवढ्यात मागुन एक बस आली.
पिठीचा डबा fridge मध्ये
पिठीचा डबा fridge मध्ये ठेवला!! >>> फ्रीज की फ्रीजोबा
श्री ... पिठीचा डबा म्हणजे
श्री ... पिठीचा डबा म्हणजे पोळ्या लाटताना पोळीला जे पीठ लावतो त्या साठी एक छोटा डबा असतो त्याबद्दल म्हणतेय ती, मोठा पीठाचा डबा नव्हे बर का , हो ना धनश्री
हो ,छोटा पीठीचा डबा...
हो ,छोटा पीठीचा डबा...
'चलो भाई, जोधपुsssर' >> मी
'चलो भाई, जोधपुsssर' >>
मी ज्या अॅप्लिकेशन करता काम करते, त्याच नाव 'मायटाईम' आहे..
काल ऑफिसात मायटाईमच्या ऐवजी मायबोली म्हणाले
बरोबर आहे ना , नाहीतरी आमचा
बरोबर आहे ना , नाहीतरी आमचा टाईम सगळा मायबोलीवरच जातो , त्या अॅप्लिकेशनच नावच बदलुन मायबोली टाईम ठेव
खरं आहे रे बाबा! सध्यातरी
सरसेनापती असे मी आणि आईने
सरसेनापती असे मी आणि आईने एकदा केलय. पुण्याहून बीडला जातांना. आम्ही गाडीत झोपलो होतो, कंडक्टर खाली ओरडत होता बीड, बीड. आम्ही ताडकन दोघी उठलो आणि खाली उतरलो. पण बीडचे नेहमीचे ओळखीचे बस स्टँड दिसेना म्हणून बघीतले तर मध्येच कुठेतरी बस थांबवली होती चहासाठी आणि कंडक्टर माणसे गोळा करत होता गाडीसाठी. मग परत गाडीत येवुन बसलो.
कस्तुरीमृगाच्या बेंबीत
कस्तुरीमृगाच्या बेंबीत कस्तुरी असते म्हणे. परिक्षेत कस्तुरीमृगावर टीप लिहा म्हणून प्रश्न होता. त्यात माझ्या एका वर्ग मित्राने लिहिलं होतं.... कस्तुरी मृगाच्या बेंबीत कस्तुरीची डबी असते... आणि तो पेपर आमच्या मॅडम नी वर्गात वाचून दाखवला होता
मी पण असला करामाती प्रकार केलाय पण सर्वांसमोर नाही
कुठल्या तरी शिक्षक दिनी मी गणितातली समीकरणे शिकवणार होतो. त्याची आदल्या दिवशी प्रॅक्टिस करत होतो. आई, वडील आणि मुलाचं समीकरणे वापरून वय काढायचं होतं. माझ्या समीकरणाने मला मुलाचं वय २५ वर्षे, आईचं वय १३ वर्षे आणि वडीलांचं वय ६-७ वर्षे असं काहीतरी दिलं होतं 
सगळ्यांचे किस्से एकदम भारि,
सगळ्यांचे किस्से एकदम भारि, नावाच्या घोळाचे तर एकदम फर्मास मी एवढा वेळ हसत होते कि माझा ११ महिन्यांचा लेक पण हसु लागला माझ्या सोबत :).
तर आता शाळेतले किस्से सुरुच आहेत तर हा एक माझा. मी लहान असताना बालकमंदिर हा आमच्या मराठि शाळेत केजि ला समांतर असा प्रकार होता ह्यात पहिल्या वर्षि मुलांना लिहिता येत नाहि म्हणुन वार्षिक परिक्षा तोंडि व्हायचि, माझ्या परिक्षेचा हा प्रसंग. आई रोज सकाळि पुजा करुन केलेल्या स्वयंपाकाचा नैवेद्य देवांना दाखवायचि आणि नैवेद्याच ताट गायिला लावायचि हा प्रकार रोजचा असल्यामुळे गाईंना सवयिचा झाला होता म्हणुन हमखास त्यावेळि एखादि गाय यायचि, आणि गायिला ताट नेवुन देण्याच काम माझ असल्यामुळे मलाहि. परिक्षेच्या आदल्या दिवशि नेमकि आईने काहि कारणाने खराब झालेलि भिजवलेलि मटकि पण नैवेद्याबरोबर गाईपुढे नेउन टाकायला सांगितलि. योगायोगाने दुसर्या दिवशि परिक्षेत बाईंनि प्रश्न विचारला दुध देणार्या प्राण्यांचि नाव सांगा मी सांगितलि, मग विचारल गाय काय काय खाते? मी सांगितल नैवेद्य आणि मटकिचि उसळ :).
दक्षे..माझ्या मैत्रीणीचाच
दक्षे..माझ्या मैत्रीणीचाच किस्सा आहे .. माझा नै कै!!!
रमा.. नैवेद्य आणी उसळ
रमा.. नैवेद्य आणी उसळ
पुन्हा एकदा सांगतो. हा बीबी
पुन्हा एकदा सांगतो. हा बीबी केवळ 'मी केलेला वेंधळेपणा 'आहे. नवरा ऑफिस, मित्र, शेजारी यानी केलेला नाही. फार तर त्यानी केलेले वेंधळेपणे तुमी स्वतःच्या नावावर 'मी केलेला म्हणून पोस्ट करा. प्रश्न तत्वाचा आहें. ('हे' वरचा अनुस्वार प्लीज नोट करावा.)

रोज सकाळी साडे आठ ते नउ वेळ
रोज सकाळी साडे आठ ते नउ वेळ असतो पण त्यावेळात टीवीवर काहीच येत नाही. बेकार व्यायामाचे प्रोग्राम येतात म्हणुन रोज चरफडते. आज प्रकाश पड्ला. ते प्रोग्राम आपल्यासाठीच आहेत.
ट्रेन मधे जे टीटी येतात तिकिट तपासायला त्यांना पुरी लहान पणी ट्वीटी म्हणत असे. ( पिवळा कार्टून पक्षी.)
पुरी >> ?????
पुरी
>>
?????
पुरी >> ?????पुर्णिमा हो तिचा
पुरी
>>
?????पुर्णिमा हो तिचा चेहरा गोल चान्दोबा आहे म्हणून तिला पुरी म्हणतात.
माय टाईम, माय बोली
माय टाईम, माय बोली
>>>पुन्हा एकदा सांगतो. हा
>>>पुन्हा एकदा सांगतो. हा बीबी केवळ 'मी केलेला वेंधळेपणा 'आहे. नवरा ऑफिस, मित्र, शेजारी यानी केलेला नाही. फार तर त्यानी केलेले वेंधळेपणे तुमी स्वतःच्या नावावर 'मी केलेला म्हणून पोस्ट करा. प्रश्न तत्वाचा आहें. ('हे' वरचा अनुस्वार प्लीज नोट करावा.)
त्यापेक्षा बी बी च वेन्धळेपणाचे किस्से असा रिनेम करावा... कसें (से वरचा अनुस्वार नोट करावा).. दुसर्यांचे किस्से वाचून पण गडाबडा लोळायला होतेच की
त्यापेक्षा बी बी च
त्यापेक्षा बी बी च वेन्धळेपणाचे किस्से असा रिनेम करावा..>>>
त्यापेक्षा 'मायबोलीवरील खुसपट काढण्याची जागा' असा धागा सुरु करावा आणि असले 'टेक्निकल' मुद्दे तिथे लिहावेत
'मायबोलीवरील खुसपट काढण्याची
'मायबोलीवरील खुसपट काढण्याची जागा' असा धागा सुरु करावा >> आगाऊ
काल माझ्या स्वप्नात बहीणीने
काल माझ्या स्वप्नात बहीणीने गॅस चालू ठेवला होता. मी तिला फटके दिले(झोपेत). ते बहुदा आमच्या 'अहों' ना पडले असणार. सकाळ पासून फटकारत आहेत. बरीच आगपा़खड पण झालीय.
पनू.. बिच्चारे 'अहो' (हे
पनू..

बिच्चारे 'अहो' (हे खर म्हणजे पिवळा पितांबर सारखे होइल..)
काल दुपारी गटगवरुन घरी आले तर
काल दुपारी गटगवरुन घरी आले तर घरी कोणीच नव्हतं. म्हटलं आता कुणीच नाहीय तर मस्त झोप काढु २ तास. थोडसं खोकल्याचं औषध घेतलं आणि मस्त पांघरुण घेऊन झोपुन गेले. ५.३० ला भाऊ आला. २-३ वेळा कडी वाजवुन मला उठवण्याचा असफल प्रयत्न केला त्याने. पण हाय रे कर्मा, माझीच झोप ती. मी कसली उठतेय.म्हणुन मग त्याने शेवटचा प्रयत्न म्हणुन खिडकीतुन २-३ वेळा आवाज दिला. मी तडमडत उठले, फ्रीजवर लॅच की होती ती त्याच्या हातात देऊन परत येऊन झोपले. हा खिडकीतुन पहात तसाच उभा की अशी काय ही?? लॅच की ने काय करुन आता?? परत २-३ वेळा हाका मारुन मला परत उठवलं आणि दार उघडुन घेतलं त्याने. आत आल्यावर खाऊ की गिळु असं पहात होता माझ्याकडे.
Pages