मी केलेला वेंधळेपणा!!!!

Submitted by नंदिनी on 20 April, 2009 - 05:42

जुन्या मायबोलीवरचे काही फारच मजेदार बीबी होते. त्यापैकी हा एक!!

http://www.maayboli.com/hitguj/messages/644/104457.html?1225138364

कुणाचे असेच काही गमतीशीर अनुभव असतील ते इथे टाका...

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सहीच कौतूक! तुझ्या किस्स्यामुळे एक अत्यंत फालतू पीजे आठवला
एका झुरळाला 'कजरा रे' गाणं ऐकवले तर ते तात्काळ मेले. का? तर ते 'हीट' गाणं होतं म्हणून. Proud

आता माझा नवरा पाठ करतच जातो त्यांची नाव :)..
आजुन एक... हा माझ्या भावा बद्दल.. त्याच्या लग्नाच्या दिवशी ... मंगलअश्टक सुरु होण्या आधी मारुतीचे दर्शन घ्यायची प्रथा आहे ना.. ते करुन आलो आणि मग वरातीत सगळे नाचलो. हे झाल्यावर जेव्हा hall मधे जायला लागलो तेंव्हा वहिनीच्या आई ने जावायाला (म्हणजे माझ्या भावाला) ओवाळलं आणि एक बाई हातात कळशी घेउन उभी होती. कुणितरी म्हट्ल की 'हं आता त्यांच्या डोळ्याला पाणी लावा' तर माझ्याच भावाने घाईघाईत कळशी त आपली बोटे घालुन त्या उभ्या असलेल्या बाई च्या च डोळ्याला पाणी लावलं :)....
हे live द्रुश्य डोळ्या देखत खुप कमी लोकांनी पाहिल ना पण जेव्हा लग्नाची कसेट पाहिली तेव्हा सगळेजण हे shooting बघुन पोट धरुन धरुन हासत होते.. कित्तीदा तरी pause / repeat केल आम्ही....

माधुरी Rofl Rofl

माधुरी Rofl Rofl त्या बाई चक्कर येवून पडल्या असत्या तर त्याने तीच कळशी घेवून त्यांच्या डोक्यावर पाणी मारलं असतं.

नवर्‍याचा एक कलीग अगदी प्रेमाने अश्विनी ये की कडेवर घेतो म्हण्ला. तेव्हा माझी पोर ६ महिन्याची होती. त्याची बायको रागाने जांभळी झालेली
>>>
मामी , तुमचा रंग कोणता झाला ते नाही लिहिलेत? (बहुधा काळानिळा)

आमच्या एका मित्राच्या बायकोचे नाव संजू आणि मुलीचे नाव अंजू आहे. मी त्याना हाक मारायच्या भानगडीतच पडत नाही इतकं कन्फ्युजन चालू असते...

मस्त किस्से,,, हा बीबी तुम्हा सर्वाच्या वेंधळेपणानेच चालू आहे..तेव्ह्ह असेच चालू द्या,

कौतुक, माझ्या मामेबहिणीने डिओच्या ऐवजी हेअर स्प्रे मारला होता Happy पण निदान ते ड्रेसिंग टेबलवर तरी होतं. तुमच्या ड्रेसिंग टेबलवर हिट??

काल कोल्हापुरात स्ट्रॉबेरी घेत होते. तो पन्नासला दोन पॅक म्हणत होता. मी पस्तिसला एक पॅक दे म्हणत होते. Proud

मी पस्तिसला एक पॅक दे म्हणत होते >> नंदिनी Rofl
तो म्हणाला असेल.. काय वडिंग्यासन आलाय्सा का ? (क्या अलिबाग से आये हो क्या चे कोल्हापुरी व्हर्जन :फिदी:)

टूरवर होतो आणि बॉसने अचानक मिटींग हॉल्मध्ये बोलवल. आम्ही कलिगच्या रुममध्ये टाईमपास करत बसलो होतो.

घाईघाईत तयार होताना कलिगचा स्प्रे उचलला आणि शर्टवर डोळे बंद करुन फवारला. सेंटचा वास यायच्या आत बाकिच्यांच हसण ऐकू आलं. डोळे उघडल्यावर कळल, पर्फ्युम ऐवजी शेव्हिंग फोमचा टिन उचलला होता.

अमित Lol

हे अत्ताचे किस्से वाचून मला चॅलेंज खेळ आठवला.. त्यात सगळे नाही का म्हणत..
मेरी एक रानी.. मेरी और एक.. मेर्‍या और चार रान्या... Proud

खरय रे केद्या, मला कौतुकच्या किश्श्यावरनच माझा वेंधळेपणा आठवला. नायत्र स्वतःचा वेंधळेपणा लक्षात ठेवण्याइतका वेधळा नाहिये मी Proud

<<खरं चॅलेंज असते मेरी दस रान्या म्हणत पानं टाकण्यात!!! >>
ते सुद्धा हातात दहा पानंच नसताना...

माधुरी .. आणि त्यावर किरु ची comment.... हसुन वाट लागली. Rofl
कौतुक आणि त्या किस्शावरचे झब्बे ... धम्माल्ल्ल!!!!

मी मागच्यावर्षी एक वेंधळपणा केला.. वरच्या इतका विनोदी नाहीये पण जरा लाज वाटलीच समोरच्या अनोळखी माणसासमोर..
बँकेत फोन केला, 'लॉकर' बद्दल माहिती घ्यायला. म्हटले काय साईज आहे लॉकर चा, तर ३ बाय ५ असे उत्तर मिळाले. काय ठेवता येइल त्यात तर म्हणाला, documents. फी वगैरे विचारले आणि मग उगीचच बोलायचे म्हणुन बोलले, '३फुट बाय ५फुट, म्हणजे बराच मोठा लॉकर आहे की!!!!!!!!! .. बाप रे, तो टुण्णदिशी उडी मारुन फोनमधुन बाहेर यायचाच राहिला होता.. बसलेला धक्का ओसरल्यावर तो म्हणाला, लॉकर ३ इन्च बाय ५ इन्च' आहे आणि दिड फुट लांब आहे. मी घाईघाईत फोन बंद केला.

माधुरी, Lol

हा एक धम्माल किस्सा माझ्या बहिणीचा आणि भावाच्या मित्राचा. एकदा भाऊ आणि त्याचा मित्र अप्पु मोठ्या बहिणीकडे- स्वाती- आले होते. मी आणि धाकटी बहिण पण गेलो हे दोघे आले म्हणुन. सकाळीच जिजांच्या मित्राचा फोन आला. स्वाती बेडरुममधे होती. मी मधल्या पॅसेजपाशी दात घासत होते. आणि बाहेरच्या खोलीत अप्पु बसला होता. आता मित्राच्या मोठ्या बहिणीच्या सासरी गेल्यावर ते सुद्धा इतर सगळे घरात असताना फोन उचलायचे अप्पुला काही कारण नव्हते. पण आमच्या नगरच्या लोकांना सवयच आहे फोन दिसला की उचलायचा आणि बोलत सुटायचे. (नाहीतर शेजारी उभे राहुन फोटो काढायचा :फिदी:) अप्पुची बोलण्याची पद्धत थोडी नगरी (हेल काढुन) आहे. तर फोन आला आणि स्वातीने आतल्या खोलीत तर आप्पुने बाहेरच्या खोलीत एकदमच उचलला. हे त्यांचे संभाषण:
अप्पु: हालो
स्वाती: हॅलो
अप्पु: हां बोला
स्वाती: कोण बोलताय आपण ?
अप्पु: तुम्ही कोण बोलताय ?
स्वाती (जरा चिडुन): कोणाशी बोलायचय तुम्हाला ?
अप्पु: अहो तुम्हाला कोणाशी बोलायचय ते सांगा
स्वाती(फणकार्‍याने): अहो तुम्ही फोन केलात ना ? कुणाशी बोलायचय ?
अप्पु: ओ बाई अहो तुम्ही फोन केलात म्हणुन तर मी बोलायला लागलो. काय वेळ जात नाय काय ?
स्वाती: हे बघा तोंड सांभाळुन बोला आणि नंबर डायल करायच्या आधी एकदा चेक करा.....

ह्या दोघांना काही सांगेपर्यंत सगळ्यांची हसुन हसुन मुरकुंडी वळली. माझी तर अजूनच हालत खराब, सगळी पेस्ट घशात Sad भावाने कसं तरी अप्पुच्या हातुन फोन घेतला. एवढावेळ जिजांचे मित्र पण शांततेत गम्मत ऐकत होते.

मी नेहमी माझ्या दोन जवळच्या मैत्रीणीच्या नवर्‍याची नावाची अदलाबदली करते. एकतर आताशा बर्‍याच कमी वेळा बोलतो. मग फोन केला की, मनोज कैसा है?(खरे तर तिच्या नवर्‍याचे नाव सुनिल). व दुसरीला फोन केला की सुनिल कैसा है. हेच अगदी ईमेल मध्ये पण होते... ईमेल लिहिला की सुनिल कैसा है असे विनिताला म्हणणार. फोन करायच्या आधी बर्‍याच वेळा घोळते मनात आशाचा नवरा सुनिल... विनिताचा मनोज... पण नेमका घोळ घालते. ४-५ वेळा असे झालेय. का माहित नाही ह्याच दोघींच्या बाबतीत काय होते. तशी इतकी वाईट मेमरी नाअहीये माझी. पण जाणून बूजून आपण ज्यास्त लक्षात ठेवायचा प्रयत्न केला की मेमरी नेमकी दगा देते असेच लक्षात आलेय.
त्यानंतर आता नावाने विचारायच्या एवजी कैसा है तेरा पती? Happy असेच आजकाल विचारते.

Pages