मी केलेला वेंधळेपणा!!!!

Submitted by नंदिनी on 20 April, 2009 - 05:42

जुन्या मायबोलीवरचे काही फारच मजेदार बीबी होते. त्यापैकी हा एक!!

http://www.maayboli.com/hitguj/messages/644/104457.html?1225138364

कुणाचे असेच काही गमतीशीर अनुभव असतील ते इथे टाका...

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

असंच नुकतंच लंच ब्रेक मधली शेतीवाडी उरकून ऑफीसच्या कामाकडे परतलेलो... तरीही मनात ते फार्मचेच विचार चालू होते... तेव्हढ्यात बॉस म्हणाला अरे अ‍ॅपल्स अ‍ॅण्ड ऑरेंजेस डोमेन बूक करा...

मी कुजबूजत शेजारणीला विचारलं, सर पण खेळतायत वाटते.. विशलिस्ट असे सांगतायत काय ओरडून... तेव्हड्यात पुन्हा ओरडले, अरे केलं का डोमेन बूक, मला ऑर्डर दिसत नाहीये... तेव्हा कुठे डोक्यात प्रकाश पडला...

नाहीतर हॉटेलच्या वेबसाईटचं नाव कोणी असं ठेवतं का? फळविक्रेत्याच्या वेबसाईटचं नाव वाटत होतं... माझा तरी काय दोष??

कन्यारत्नाला आंघोळ घातल्या नंतर टॉवेलने तिचे केस पुसायला सुरुवात केली. मिनिट भराने केसात हात फिरवुन पाहीला तर केस अगदी कोरडे.. मला आश्चर्यच वाटले. कारण रोज डोके पुसताना केस ओले राहील्याचा तिचा जप चालुच असायचा.. लगेचच लक्षात आले की मागील आठवड्यात केस कापलेले, त्यामुळे छोटे केस लवकर कोरडे झाले असणार.. मी ही स्वतःवर खुश झालो. नंतर बाहेर आल्यावर कन्यारत्न चित्कारले.. पप्पा आज तुम्ही मला केसावरुन आंघोळ घातलीच नाही तर केस कशाला पुसत होतात.. ? Uhoh

सतिश Rofl

समू बहुतेक आज तुला सॉल्लेट कॉम्पिटिशन.
काल रात्री जेवणं झाल्यावर टीव्ही लावला. टीपॉयवरचा चष्मा उचलला, लावला. टीव्ही काही नीट दिसेना. बापरे नंबर वाढला की काय? पण एका दिवसात इतका नंबर वाढू शकतो? नाही नाही ..हे असं एकाच डोळ्याला होतंय. शेजारी नवरोबा होते. त्यांना तसं म्हटलं..... नेहेमीप्रमाणे त्यांनी फारसं लक्ष दिलं नाही. म्हणून चष्मा काढला आणि लक्षात आलं, कालच चष्म्याची उजवी काच निघालेली आहे म्हणून तो दुरुस्तीसाठी बाजूल ठेवलेला होता. पण त्याचीच सवय असल्याने पटकन तोच घातला गेला. एकच काचवाला! आता नवरोबांचं बरोब्बर लक्ष गेलं. नेमकं नको तेव्हा..............वेंपणाची छान चेष्टा झाली.
काय समू ,ड्रीमू ....आहे ना कॉम्पिटीशन?

कमॉन ड्रीमू, समू.......

गेली काही पानं ढासू वेंधळेपणा झालेला नाही..... चला कामाला लागा. आम्ही वाट पाहतोय Wink

मानुषी लई भारी Proud

भुंगा भाव आज काल म्ह्या डोसक ठीकाणावर ठेऊन रहातो अन कामाचा लोड बि कमी हाए त्यामुळ सगळ नॉरमल बोहेवियर सुरु हाये Happy पण दोन दिसा अगोदर एक ओशाळवाणा वेप झाला तो लिहु कि नग ह्या ईचारात व्हते, तर झाल अस:

म्ह्या तोंड धुवायला म्हणुन लेडिज रुम ला गेलो, आता त्या आधी मेल्या मेलांच टॉयलेट येत त्यामुळे म्ह्या लेडीज रुम ला जातांना मान खाली घालुन जातो परवा पण गेलो, पन लेडिज रुम मधुन परततांना ... मेल टॉयलेट मध्ये दुसर्‍या डिपार्टमेंट चा कलीग होता आणी बाहेर आणखी कोणी तरी ऊभ होत, मी लेडीज रुम मधुन बाहेर आले नि नेमक त्या बाहेरच्या मेला ने आतल्या मेलाच (माझ्या कलीगच) नाव घेऊन त्याला बोलावल ... अन मी सरळ तीथे आत पाहिल... माझा तो कलीग तीथे वॉश बेसीन मध्ये हात धुत होता, मी आत पाहिल्या बरोबर त्याला जाम ओशाळल्या सारख झाल, मी आपल काय झाल नाही च्या आवेशात आत बघुन परत सरळ बघत निघुन आले आणी मग माझी पेटली कि मी कुठे पाहिल!!!! (आता त्या कलीग ने हि आत गेल्यावर दार बंद कररायला हव होत ना!! एकतर कलीग असलो तरी अजुन एकदाही आम्ही बोललेलो नाही, तसा प्रसंग पण येत नाही पण येता जातो बघतो एकमेकांना बास. छ्या!!!

छानच आहे हा बी बी....

नक्कि कधी ते आठ्वत नाही पण लहान असतानाचा किस्सा..

दुसर्‍या दिवशी उपास असल्याने आईने मला रात्री साबुदाने भिजत घालुन ठेवायला सांगितले.... आणि दुसर्‍या दिवशी आईचं चालु झालं सकाळी सकाळी 'तु सासुकडुन माझ्या नावाचा उद्धार करुन घेणार' आणि घरी सगळे हसायला लागले.....
मी काय केल असेन तर 'साबुदाण्यातलं पाणी न काढता रात्रभर पाण्यातच भिजत ठेवले होते':) Happy
त्या दिवशी एकदम कडक उपास झाला....

मी पण हा प्रकार (साबूदाणा) केला आहे.. आणि मग कुणीतरी सांगितल्यावर टिश्युपेपरवर साबूदाणा पसरवून वाळवला आहे .

शाळेत जाताना माझ्या मुलीला सॉक्स घालून झाले होते, बुट घालण्याच्या तयारीत होते आणि मी वेंधळेपणाने नेहेमीचे ब्रह्मवाक्य म्हटले 'आ कर लवकर' Happy मुलगी म्हटली "अगं आई बुट घालताना काय 'आ' करायला सांगतेयस?

अन्जली Lol

अंजली Proud

अगं वर्षू
एकाच काचेचा चष्मा घालून ओव्हरकॉन्फिडन्टली नवरोबांना म्हणतेय की नंबर इतका कसा काय वाढला...तोही एकाच डोळ्याचा! खरी गोष्ट कळल्यावर.............धरणीमाते ...............!

ब्रह्मवाक्य म्हटले 'आ कर लवकर' >>>>>>>>>>व्वा! छान अंजली यू आर ऑन राइट ट्रॅक.
माझ्या घरात पहिली काही वर्षे सहा लहान मुलं असायची. अगदी पाठोपाठची.......माझी २, नणंदेची २ आणि जावेची २.
नणंद गावातच त्यामुळे नेहेमीच येऊन जाऊन! आम्हा सर्वांना सतत मुलांच्याच सहवासात आणि त्यांच्याच भाषेत बोलायची सवय!
आम्हा सर्वांचीही अशी काही ब्रम्हवाक्यं होती.
एकदा मी, दीर, आणि नवरोबा एवढीच मेंबरं घरात होतो(फॉर अ चेंज).
शांतपणे(हे पण फॉर अ चेंज बर्का!) टीव्ही बघत होतो. टीव्हीवर विमान दिसलं. दीर टाळ्या वाजवत, " मिSSSमान मिSSSमान".
अगं इतका लाजला तो नंतर!
अगं हे टायपताना सुद्धा हसतीये मी!

आता थोड्या एळा आधीअस झाल कि मले जमीनिवर पडलेले एक ईरेजर सापडल ते म्ह्या म्हाया टेबलावर ठेवल नंतर भुक लागली म्हनुन म्ह्या पर्स मधुन पर्क काढली आणी ती खात व्हते, खाता खाता पर्क टेबला वर ठेवली अन काम्युटर मध्ये डोसक घातल नंतर खाण्यासाठी पर्क एवजी पर्क जवळ पडलेला ईईईईईईईईईरेजर ऊचलला Proud तो तोंडात घालणार तो डोळ्यासनी चॉकलेटी एवजी पांडर पांडर अस दिसल म्ह्या ईचार करु लागलो पर्क पांढरी कशी काय झाली Happy

पर्क पांढरी कशी काय झाली स्मित<< समु त्याचं काय आमचे डोळेही पांढरे व्हायला लागलेत आता किश्श्यांनी ..
अंजली लगे रहो

सतिश, Lol
समू, ___________ /\____________ Rofl
अग काय हे? पण खरच तुझा आणि इतरांचे वेंप वाचून माझा दिवस छान जातो.
मानुशी, श्वेते, अंजली, लगे रहो. Lol

भरत, हो ना आता माझा वेंप लपवण्यासाठी अशी काहीतरी ठोकाठोकी करावी लागणार Happy
घरातले कॉमन वेंपणे (म्हणजे हे आमच्यातले कोणीही करू शकते)
१. स्वयंपाकघरातल्या कपाटातले काही हवे असेल तरी आधी फ्रीजचे दार उघडुन आत बघत बसणे.
२. घराची किल्ली कुठे ठेवली आहे हे न आठवणे, म्हणजे बाहेरून आत येताना पण (तुझ्याकडे असेल, नाही तुझ्याकडेच दिली होती, पर्सच्या असंख्य कप्प्यात कुठेतरी, पँटच्या की जॅकेटच्या खिशात) आणि घरातून बाहेर जाताना पण.
अजून आठवले तर लिहिते.

अंजली Lol

समस्तांना नमस्कार Happy

आज कामावर लवकर यायच असल्याने सकाळी जाम घाई घाई झाली कशी बशी बस पकडली अन बशीत मोसंबी, राजगीर्‍याचा लाडु असा मस्त ब्रेकफास्ट केला (सकाळी बशीत एवढी गर्दी नसते त्यामुळे शीटावर एकट बसुन मस्त आरामात खात येत, आज बरेच दिसांनी म्ह्या बशीत खाल्ल :)) तेवढ्यात माझ्या शीटावर बसायला एक लेडी आली तीला आत बसवल आन मग ध्यानी आल आपला गॉगल डोळ्यावर नाही, निघतांना तर लावला होता मंग काय पर्स मधे, बॅग मध्ये, बशीत ईकडे तीकडे समदी कड शोधला पन गावला नाही म्हटल "गेला गॉगल" !! मंग आपला पुणेरी स्ट्रोल निट बांधायला गेले तेव्हा डोसक्यावर केलेला गॉगल हाताले लागला Proud डोक्यात गॉगल अन बसभर वळशी अस झाल एकदम Proud

माझ्या बाबांना लॅचला किल्ली तशीच लावून घरात येऊन दार लावून घ्यायची सवय आहे. २-३ वेळा शेजार्‍यांनी सांगितले की चावी बाहेर लटकतेय.
यावर उपाय म्हणून त्यांनी डबल लॉकचे लॅच लावून घेतले. म्हणजे एक चावी लावून तशीच अडकवून दुसरी चावी लावली तरच उघडेल. त्यात आधीचे लॅच पण.
पण वापरले एकदाच. माझ्याबरोबर इंदूरास राहायला आले तेव्हा(माझी तिकडे ट्रान्सफर झाली होती) परत आल्यावर दाराशी काय झटापट केली असेल कुणास आठवून. आता मी ते धूड काढून टाकायला लावले.

Pages