मायबोली गणेशोत्सव २०२६ - उपक्रम व स्पर्धा

Submitted by संयोजक on 9 September, 2026 - 11:19

मायबोली गणेशोत्सव २०२६ - उपक्रम व स्पर्धा :
यावर्षीच्या सर्व उपक्रम आणि स्पर्धा एकत्र, एकाच ठिकाणी पाहण्यासाठी सोयीचे व्हावे यासाठी हा धागा.
(उपक्रम व स्पर्धा जसजसे घोषित होत जतील तसे हा धागा अद्ययावत करण्यात येईल. )
अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या उपक्रम व स्पर्धांच्या लिंकवर क्लिक करा.

मायबोली गणपती प्रतिष्ठापना : https://www.maayboli.com/node/88805

आमच्या घरचा बाप्पा : https://www.maayboli.com/node/88777

बाप्पाचा नैवेद्य : https://www.maayboli.com/node/88778

लहान मुलांचे उपक्रम:
- लहान मुलांसाठी उपक्रम : माझ्या घरातला महाराष्ट्र

कला उपक्रम -
-लहान व मोठ्यांसाठी कला उपक्रमः ठसे वापरून शुभेच्छापत्र

मोठ्यांसाठी लेखन उपक्रम:

- लेखन उपक्रम : गेले करायचे राहून
- लेखन उपक्रम : माझा पहिला विमानप्रवास
- लेखन उपक्रम : चुरा लिया है तुमने जो दिल को - आशा

मोठ्यांसाठी लेखन स्पर्धा:

-शशक लेखन स्पर्धा
- लेखन स्पर्धा - पाककृती लेखन

पाककृती स्पर्धा:
- पाककृती स्पर्धा १ : जिन्नस एक, पदार्थ अनेक
- पाककृती स्पर्धा क्रमांक २ : दिसतं तसं नसतं
- पाककृती स्पर्धा क्रमांक ३ : पेय - फळ + फूल + मसाला : चवींचा त्रिवेणी संगम

गंमतखेळ
- गंमतखेळ - मराठी चित्रपट आणि मालिकांवर मीम्स
- गंमतखेळ - काहीच्या काही फॉर्वर्ड

प्रकाशचित्रांचे झब्बू
- प्रकाशचित्रांचा झब्बू १ - प्रवेशद्वार/ दरवाजे
- प्रकाशचित्रांचा झब्बू २ - जुनी नवी उपकरणे

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अतिशय चांगले उपक्रम.
मायबोलीला तीस वर्षे पूर्ण झाल्याबद्दल संस्थापकांचे अभिनंदन आणि सर्व सभासदांना शुभेच्छा !

सगळे उपक्रम छान आहेत
जरा घरची पूजा वगैरे झाली की येतेच सहभाग नोंदवायला.
गणपती बाप्पा मोरया

एक चौकशी होती - शशक स्पर्धा एकच आहे का?

तशी हरकत नाही पण अकरा दिवस रस अलंकार रस अलंकार हेच चालू राहायचे..

दरवर्षीप्रमाणे संयोजक पुन्हा एकदा सर्वांना लिहिते करण्यात यशस्वी ठरले आहेत. यापूर्वी मी माबोवर लेख मागच्या गणेशोत्सवावेळी लिहिला होता आणि त्याआधी त्याच्या आधीच्या गणेशोत्सवावेळी!

यावेळी 'लेखन उपक्रम : माझा पहिला विमानप्रवास' हे वाचून मनात आठवणींची खूप ढवळाढवळ झाली. कारण जेंव्हा हा प्रवास झाला तेंव्हाच त्याचे वर्णन लिहून भारतात आईवडिलांना पाठवले होते. ते आठवले. पण ते आता इतक्या वर्षांनी कुठे आहे? कसे शोधायचे? असेल तर कोणत्या स्वरूपात आहे? असे अनेक प्रश्न मनात आले. सुदैवाने ते सापडले. ते यानिमित्ताने जसेच्या तसे येत्या एकदोन दिवसांत इथे देणार आहे. आज इतक्या वर्षांनी/दशकांनी ते पुन्हा वाचताना मलाच भरून आले. त्यामुळे संयोजक मंडळींपैकी ज्यांना कोणाला हा विषय सुचला त्यांना खरंच _/\__ __/\__