लहान व मोठ्यांसाठी कला उपक्रमः ठसे वापरून शुभेच्छापत्र

Submitted by संयोजक on 12 September, 2026 - 12:57

लहान व मोठ्यांसाठी कला उपक्रम: ठसे वापरून शुभेच्छापत्र

आठवतंय का, एक काळ असा होता की आपण एकमेकांना शुभेच्छा देण्यासाठी शुभेच्छापत्रे पाठवत होतो.
आता या मोबाईलच्या आणि डिजिटल युगात आपण सगळ्या शुभेच्छा ऑनलाइनच देतो.
मोबाईलवर मेसेज लिहिला, एकदोन ईमोजी टाकले की झाले काम. शुभेच्छापत्रे देणे-घेणे पार विसरूनच गेलो आहोत का आपण?

स्वतः हाताने बनवलेली शुभेच्छापत्रे, त्यातली चित्रे, संदेश समोरच्याला आपल्या मनातल्या खऱ्या भावना सांगून जातात.
आपल्यापैकी अनेकांनी अशी जुनी शुभेच्छापत्रे अगदी सांभाळून ठेवली असतील, यातच सगळे आले.

तर या वर्षी आम्ही मायबोलीकरांसाठी घेऊन आलो आहोत एक अभिनव शुभेच्छापत्र स्पर्धा.
तुम्हाला मराठी शुभेच्छापत्र बनवायचे आहे पण....
ते बनवताना त्यावर फक्त ठसे वापरायचे आहेत. यासाठी तुम्ही हाताचे, बोटांचे ठसे, कोणत्याही फळ, फूल, वनस्पती किंवा वस्तूंचे ठसे वापरू शकता.
चला तर मग! लागा कामाला! लढवा तुमची कल्पनाशक्ती आणि बनवा सुंदर शुभेच्छापत्रे.

कलाकृतीसाठी नियमः-
१. ठश्यांसाठी कोणत्याही वस्तूंचा,नैसर्गिक संसाधनांचा वापर करता येईल.
२. एकाच कलाकृतीमधे अनेक संसाधनाचा वापर करता येईल.
३. यासाठी कोणतेही रंग वापरण्याची परवानगी आहे.

उपक्रमाचे नियम :
१) प्रवेशिका पाठवण्याकरता 'मायबोली गणेशोत्सव २०२६' या ग्रूपचे सदस्य असणे आवश्यक आहे. हा ग्रूप सदस्यनोंदणीकरता १४ सप्टेंबर रोजी खुला करण्यात येईल, याची कृपया नोंद घ्यावी.
२) लेखनाचा धागा हा पर्याय निवडून लेखन करा.
३) प्रवेशिकेचे शीर्षक पुढीलप्रमाणे द्यावे - ठसे वापरून शुभेच्छापत्र- तुमचे मायबोली सदस्यनाम
४) प्रवेशिकेसोबत किमान एक प्रकाशचित्र देणे अनिवार्य आहे.
(प्रकाशचित्रे कशी द्यायची याची माहिती येथे मिळेल. - https://www.maayboli.com/node/1556)
५) शुभेच्छापत्र स्व:त तयार केलेले असावे.
६) प्रत्येक प्रवेशिकेला "मायबोली गणेशोत्सव २०२६" अशी शब्दखूण द्यावी.
७) एक सदस्य कितीही प्रवेशिका देऊ शकतो.
८) प्रवेशिका पाठवण्यासाठी अंतिम मुदत - शुक्रवार सप्टेंबर २५, २०२६ अमेरिकेतील पॅसिफिक टाईम झोन (PST) रात्री १२:०० पर्यंत.

!!! गणपती बाप्पा मोरया!!!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users