
नमस्कार मायबोलीकर मंडळी!
आपल्या स्वयंपाकघरात फळांचा वापर नवीन नाही. कैरीचे पन्हे, कोकम सरबत, लिंबू सरबत, आंब्याच्या विविध पाककृती यांची आपल्याला सवय आहे. मसाल्यांशिवाय भारतीय स्वयंपाकाची कल्पनाही करणे कठीण. स्वयंपाक हा फक्त चवीचा विषय नसतो, तर रंग, सुगंध, पोत आणि कल्पकता यांचाही तो सुंदर मेळ असतो.
पण या वेळची गंमत थोडी वेगळी आहे!
या स्पर्धेत तयार करायचे आहे असे एक पेय, ज्यामध्ये *फळ, खाद्य फूल किंवा फुलाचा खाद्य भाग आणि किमान एक मसाला* हे तीन घटक असतील. तिन्ही घटक पाककृतीमध्ये स्वतंत्रपणे ओळखता येतील अशा प्रकारे वापरलेले असावेत. तुम्ही निवडलेले तीन घटक जिन्नस त्यांच्या मूळ रूपात घेऊन त्यावर तुम्ही स्वतः प्रक्रिया करून वापरायचे आहेत. म्हणजे फळ घ्यायचं , त्याचा विकत मिळणारा रस -juice किंवा गर pulp नाही. फूल वापरायचं , फुलांचे इसेन्स नाही.
जिन्नस शास्त्रीयदृष्ट्या फळ किंवा फूल असला, तरी भारतीय पाकशास्त्रात त्याचा ज्या स्वरूपात वापर केला जातो, त्याच स्वरूपात या स्पर्धेत त्याची गणना केली जाईल. उदा. लवंग शास्त्रीय दृष्ट्या फूल/ कळी आहे तरी मसाला म्हणूनच वापरण्यात यावी.
या तीन घटकांशिवाय अन्य काही जिन्नस पाककृतीला पूर्णता देण्यासाठी वापरू शकता. हे जिन्नसही शक्यतो त्यांच्या मूळ रूपात घेऊन प्रक्रिया करून वापरावेत. अर्थात साखर, मीठ, चाट मसाला यांसारखे जिन्नस अपवाद .
गुलाब, जास्वंद यांसारख्या खाद्य फुलांचा वापर करून पेयाला वेगळी चव, रंग किंवा सुगंध देता येईल. आपल्या आवडीचे फळ आणि योग्य मसाल्याची साथ देऊन तयार करा काहीतरी नवे, कल्पक आणि चविष्ट!
पारंपरिक पेयाला नवे रूप द्यायचे की अगदी नवी पाककृती तयार करायची, हे तुम्ही ठरवायचं!
चला तर मग, फळ, फूल आणि मसाल्याची ही भन्नाट संगत अनुभवुया!
*नियम*
१. प्रवेशिका पाठवण्यासाठी मायबोली गणेशोत्सव २०२६ या ग्रुपचे सदस्यत्व घेणे आवश्यक आहे. हा ग्रूप सदस्यनोंदणीकरता १४ सप्टेंबर रोजी खुला करण्यात येईल.
२. या ग्रुपचे सदस्यत्व घेतल्यावर लेखनाचा धागा हा पर्याय निवडून तुमची पाककृती लिहा.
३. प्रवेशिकेचे शीर्षक पुढीलप्रमाणे द्यावे - पाककृती स्पर्धा ३ - (तुमचे मायबोली सदस्यनाम)
४ पाककृतीसाठी लागणारे साहित्य, त्याचे प्रमाण आणि पाककृतीतील पायर्या स्पष्ट लिहाव्यात.
५ पाककृतीसोबत साहित्याचा आणि तयार पदार्थाचा अशी दोन छायाचित्रे द्यावीत. मधल्या पायर्यांचेही फोटो देता आले तर उत्तम.
६. प्रवेशिकेला "मायबोली गणेशोत्सव २०२६" अशी शब्दखूण द्यावी.
७. प्रवेशिका देण्याची अंतिम मुदत शुक्रवार, २५ सप्टेंबर २०२६, अमेरिकेतील पॅसिफिक टाइम झोननुसार रात्री १२ वाजेपर्यंत आहे.
८. स्पर्धेचा निकाल मतदानाने ठरवण्यात येईल.
९. लेखन कुठेही पूर्वप्रकाशित नसावे.
१०. एक सदस्य कितीही प्रवेशिका देऊ शकतो.
गणपती बाप्पा मोरया !
कल्पक आहे ही स्पर्धा.
कल्पक आहे ही स्पर्धा. अल्कोहोलिक पेय चालतील का? कॉकटेल्स की फक्त मॉकटेल्स. माझ्या रिकाम्या चौकश्या.
झकास !
झकास !
आयुर्वेद वाल्यांनी विषम अन्न म्हणून कितीही नको सांगितले तरी Fruits + spices हे फार आवडते कॉम्बो आहे ❤
शरबतखोरी साठी नवनवीन रेसिपींची वाट बघतो 👍
मस्त आहे ही स्पर्धा...
मस्त आहे ही स्पर्धा...
ह्या वर्षी एकदम सगळ्या स्पर्धा उपक्रम जाहीर न करता एकेक येतायत. हे आवडलं आहे. त्यामुळे उत्कंठा टिकून राहिली आहे.
एक फुकटची शंका केशर कशात मोडेल , मसाला की फुल ?
ही स्पर्धाही सहीच एकदम.
ही स्पर्धाही सहीच एकदम.
मी काहीच करणार नाही पण..
मी काहीच करणार नाही पण..
एक फुकटची शंका केशर कशात मोडेल , मसाला की फुल ?>>> मला पण शंका आली म्हणून कालच चेक केलं. केसर फुल नाही.
म्हणजे मसाला असावं.
कल्पक आहे स्पर्धा
कल्पक आहे स्पर्धा
फूलाचा भाग तर आहे ना. फूल
फूलाचा भाग तर आहे ना. फूल नाही माहीते. पराग कण असावे.
केशर फुलाचा भाग आहे. फुलातील
केशर फुलाचा भाग आहे. फुलातील स्त्रीकेसर.
पण वापर मसाला म्हणुन होतो. तेव्हा दिलेल्या नियमानुसार मसाल्यात गणला जाईल.
ओह ओके मानव. धन्यवाद.
ओह ओके मानव. धन्यवाद. स्त्रीकेसर हे माहीत नव्हते.
मस्त स्पर्धा आहे!! यात काही
मस्त स्पर्धा आहे!! यात काही डोकं चालेल असं वाटतं नाही पण यात येणाऱ्या एन्ट्री वाचून शिकेन.
कॉफी पुड किंवा चहाची पानं
कॉफी पुड किंवा चहाची पानं यातल्या एखाद्या कॅटेगरी मध्ये बसतील का?