मुलाखत कशी वाटली.

Submitted by अस्मिता. on 28 June, 2023 - 21:16

हा मुलाखतींसाठी काढलेला स्वतंत्र धागा. वेबसिरिज धाग्यावर हे योग्य वाटत नव्हतं म्हणून काढला. मला मुलाखती बघायला अतिशय आवडतं. त्यातल्या गप्पा क्वचित समृद्ध करणाऱ्या काही नवीन विचार देणाऱ्या असू शकतात. तसंच कधी बढाया, थापाही असू शकतात. पण हे सगळंच मला रंजक वाटतं. इथे तुम्हाला आवडलेल्या-न आवडलेल्या, फिल्मी-नॉन फिल्मी, प्रमोशनसाठी असलेल्या किंवा नुसत्याच, गणित, विज्ञान, खेळ, इतिहास, पुरातत्व संशोधन, Astrophysics किंवा इतर कुठल्याही विषयावर आधारित देशी-विदेशी अशा अनेक मुलाखतींवर चर्चा करता येईल. स्वयंपाक व पाककृती संबंधित किंवा तत्सम मुलाखतीवर चर्चा नकोत. मी दिल के करीब, Tweak ,रंगपंढरी, David Letterman, BeerBiceps हे नियमितपणे बघते. मला रणवीर अलाहाबादीया फार फार आवडतो . His podcasts are my new found love.

तुम्ही बघितलेली मुलाखत तुम्हाला कशी वाटली , कुठं बघितली हे प्रतिसादात नक्की लिहा. Happy
धन्यवाद Happy
अस्मिता.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

फुलवा खामकरची मुलाखत ऐकायला सुरुवात केली आहे, किती उत्साही जीव!!
ती तिच्या चाइल्डहुट ट्रॉमाजबद्दलही मोकळेपणाने बोलली आहे. अनेक वर्षं तिने तो काळ तिच्या जाणीवेतून ब्लॉक केला होता, आणि आता त्याचे पडसाद जाणवतात अशा अर्थाचं ती बोलली आहे.
मी परवा इथे दु:खाच्या चर्चेवरून 'अस्मिता बोलते आहे ते दु:खाच्या कारणांबद्दल, आणि संदीपची कविता आहे ती दु:खाच्या अनुभवाबद्दल' असं लिहिलं होतं - ते या अशा संदर्भाने होतं. एखादं दु:ख त्या त्या वेळी आपण पार करतो, कधी ब्लॉक करतो, कधी (काम, छंद, अगदी व्यसनांतही) एस्केप करतो, निरनिराळ्या पद्धतींनी 'cope' करतो - पण ते कालांतरानेही, आणि अगदी अनपेक्षित वेळी/ठिकाणी आपल्याला गाठू शकतं!
असो.

(आता तुम्हाला कविता नावडली तर नावडली, त्याला काही इलाज नाही. Proud )

ममव असणं ह्यात चुकीचं किंवा गैर काही आहे का
>>>
ममव असणं गैर नाहीच. पण इतर अनेक कलाकार, लेखक ममव घरात जन्माला येऊनही त्यांच्या कलेच्या कक्षा विस्तारल्या. अर्थात त्याला तत्कालीन समाज, परिस्थिती वगैरे कारणीभूत असतील. संदीप सलीलचा आवाका तसा वाढला नाही एवढंच निरीक्षण.

उदा. अजय अतुल यांच्या संगीताचा जनरल बाज ग्रामीण आहे. तो बाज ते पकडून ठेवतातच पण त्याचवेळी त्यांचा पहिला अल्बम विश्व विनायक ग्रामीण नाही वाटत. सैराटमध्ये त्यांनी झिंगाट सारखं अस्सल निमशहरी संगीत दिलं आणि दुसऱ्या गाण्यात अख्खा फिलहार्मोनिक ऑर्केस्ट्रा वापरला.

फुलवा ताई (मुग्धा त्यांना ताई म्हणते आणि मला त्या फारच आवडल्या म्हणून ताईच Lol ) आवाका, ते वर्तुळ सीमित असणे, आपले संदर्भ, संपर्क आधी सीमित असणे आणि मग बाहेरच्या जगात प्रवेश झाल्यावर, ओपन-अप होणे, क्षितीजे विस्तारणे आणि काही काळाने आधीची वर्तुळे गळुन पडणे, रिलेट न होणे याबद्दल बोलतात. ते आवडले.
शाळेत हुषार मुलांना वेचुन एका वर्गात आणि बाकी इतर दुसरीकडे याचा खोलवर परिणाम झाला, आणि ती ते शाळेत बोलावले असताना जाऊन बोलली. हे ही आवडले. आमच्या शाळेतही हाच, किंवा थोडाफार असाच प्रकार १०ला करत असत.
आणि एक आवडलं ते कशाचा रिग्रेट नसणे. चुका केल्या, काही परत परत केल्या. पण त्या प्रसंगातून त्या निर्णयातुन गेले म्हणूनच मी आज ही अशी झाले. त्यामुळे त्याचा रिग्रेट नाही. हे मला सर्वात जास्त आवडलं. अगदी माझ्याच मनातलं बोलत होती असं वाटत होतं.
चाईल्डहुड ट्रॉमा बद्दल थेट बोलणे, अ‍ॅथलॅटिक्स, तिचा स्टुडिओ, विद्यार्थी घडवणे - असलेले ज्ञान वाटणे किती नॉन निगोशिएबल आहे...
आणि ही अनेक गोष्टी भावल्या. धर्म, जात, मानवता, याबद्दल व्होकल असणं, तिची आई, आजी. काहीही हातचं राखुन न ठेवता बोलत होती असं वाटत होतं.

@रॉय @सुनीती >>> लगानच्या गाण्याबद्दल जनरेशन गॅप हे कारण नसावं. कारण जोधा अकबरची काही गाणी, स्वदेसमधली जीवघेणी शहनाई आवडते. रहमानच्या नंतर आलेल्या चित्रपटातले काही संगीतही खूप आवडते. बहुतेक जे आवडतं त्यात नेमकं काय आवडलं हे सांगता येतं. पण एखादी गोष्ट का अपील होत नाही याचं कारण नाही सांगता येत.

ते या अशा संदर्भाने होतं. एखादं दु:ख त्या त्या वेळी आपण पार करतो, कधी ब्लॉक करतो, कधी (काम, छंद, अगदी व्यसनांतही) एस्केप करतो, निरनिराळ्या पद्धतींनी 'cope' करतो - पण ते कालांतरानेही, आणि अगदी अनपेक्षित वेळी/ठिकाणी आपल्याला गाठू शकतं!
>>>>>
तू लिहिले आहे त्याच्याशी सहमत स्वाती. मला वाटलं चर्चा आता सुखदुःखाच्या पलिकडे गेली आहे, त्यामुळे तुझं लिहायचं राहून जातंय की काय. सुखदुःखे समेकृत्वा लाभालाभौ जयाजयौ, मुद्देवंचित नहीं होने का ! Lol

हो हो! Lol

मुक्ता बर्वेचं . फुलवा खामकरचं वरील उदाहरण योग्यच आहे या संदर्भात. पण ते अध्याहृत नव्हतं का चर्चेत? आणखी एक म्हणजे काही दुःखे अशी असतात की त्यासोबत आयुष्य काढावे लागणार असते, ऑन गोइंग ट्रॉमा, फक्त मागील ट्रॉमाच्या आठवणी नाही.
तर असे सगळे दुःख धरून, त्या कवितेचा अर्थ कळुनही ऐकली तेव्हा फार अपील झाली नव्हती. माबुदो असेल. बऱ्याच कवितांबद्दल होते असे.

>>> पण ते अध्याहृत नव्हतं का चर्चेत?
नसावं असं मला जाणवलं.

>>> मुक्ता बर्वेचं वरील उदाहरण
आता फुलवा खामकरला मुक्ता बर्वे समजून नवीनच दु:ख दिलंत तुम्ही! Lol

अरारा Lol
ते नाव वेगळ्याच गल्लीतून आलं इथे.

आता अध्याहृत वाचुन मला काहीच कळेनासं झालंय. काय चर्चा आणि काय उदाहरण हेच डोक्यातुन गेलं. बाकी अध्याहृत असेल तर गेल्यावर्षीच्या संयोजकांना माहित असणार! Wink Proud

दुःख नळातून येतं नसेल तर शेंदूनही काढता येतंच.
रच्याकने: अद्याहृत नव्हतं का हा प्रश्न नव्हता खरं तर, अध्याहृत नव्हतं तर असं म्हणायचं होतं. (अशानेच आमची एम्पथी कुणाला कळत नाही. Proud )

Lol मला तर मुक्ता बर्वे आणि अध्याहृत दोन्ही कळाले नाही. कांगारू सारख्या उड्याही मारल्या पोस्टीवरून. गणेशोत्सव आठवला, मुंबई पुणे मुंबई आठवला. विनाकारण. पण मग सुरेश वाडकरने कविता म्हंटली नाही, मुलाखत दिली नाही तरीही त्याची सुद्धा फजिती झाली होतीच. संबंध असणे योगायोग आहे, अवांतर नैसर्गिक आहे. Lol

खरेच्या कवितेवरून झालेल्या चर्चेला "नळावरची भांडणं" अशी उपमा देणार होते पण स्वाती आलीच नाही आणि चर्चा ममवकडे वळली. मग जे मिळेल त्यावर बोलत राहावे ह्या ममव गुणामुळे त्यावर लिहिले. Lol असं ऐन भांडणातून टाईमप्लीज करू नये, उपमा वाया जातात.

ममव पण तोंडीलावयला बरं वाटतं ताटभर दिलं की उबग येतो. >>>> अमित तुझा मुद्दा आणि पोस्ट पटली. पण हे सगळ्याच बाबतीत होत नाही का?
ताटभर "गेम ऑफ थ्रोन्स" तरी झेपतं का? Happy "प्रपंच" हे उदाहरण बरोबर आहे.

माझेमन, तुझीही पोस्ट पटली.

वावे, "रिलेटेबेल" संदर्भात गॉट किंवा इतर बर्‍याच फॅन्टसी किंवा बरेच चित्रपट रिलेटेबल नसूनही आवडतातच की. त्यामुळे रिलेटेबल आणि क्वालिटी हे दोन्ही असावं लागतं असं मला वाटतं.

पराग +१
'रिलेटेबल' असण्याबद्दल मीही तेच लिहिलंय आणि Happy रिलेटेबल असणं हे आवश्यक नाही आणि पुरेसंही नाही एखादी कलाकृती आवडण्यासाठी. पूरक असू शकतं.

रिलेटेबल म्हणजे काय?
मी अनेक साय फाय कथा वाचल्या सिनेमे बघितले. कुठेही रिलेटेबल चा प्रश्न आला नाही.
कदाचित रिलेटेबल म्हणजे काय ते मला समजले नसेल.

मी मघाशी कारण<>परिणाम/अनुभव म्हटलं तेच रिलेटेबद्दलही म्हणेन.
दु:खाची कारणं रिलेटेबल नसतील, पण अनुभव युनिवर्सल असतो! म्हणून तो अनुभव नेमका रेझोनेट होतो तेव्हा या कथा भावतात.

जिवलगांचा वियोग असो, आपला अपमान/मानहानी (humiliation) असो, भूक/दारिद्र्य असो - आपण राजघराण्यातले नसलो तरी या भावना आपल्याला कळू शकतात.

आपण राजघराण्यातले नसलो तरी या भावना आपल्याला कळू शकतात.>>>
ब्रेड मिळत नाहीये तर केक का खात नाहीत हे लोक?
राजघराण्यातले रीलेटेबल.

Apathy?
But The Queen is sincearly concerned about the citizen/

जे आपण आपल्या मर्यादीत विश्वात अनुभवू शकत नाही तो अनुभव देता येणे हे तर कलेचं मोठं वैशिष्ट्य आहे. मूळ भावना त्याच पण त्यांचे कंगोरे, complexity, layers आणि कॉम्बिनेशंस व्यक्ती आणि परिस्थितीप्रमाणे बदलणारे.. म्हणूनच जे न देखे रवी ते देखे कवी आहे न... आपल्याला माहिती
असलेले, अनुभवलेले तेवढेच, त्याच पॅटर्नमध्ये सादर करायचे कलाकारांनी ठरवले तर सगळ्याच कलाकृती किती मर्यादीत होऊन जातील...
कलाकार स्वतः न घेतलेले अनुभव, जाणीवा किती ताकतीने आणि कृत्रिमपणा न येऊ देता दाखवू शकेल, तितके ते भिडेल.

Maybe I am too emotional,
But your apathy is like a wound and salt
असं आणि

I was broken from a young age
Taking my sulking to the masses
Writing my poems for the few
That look at me, took to me, shook to me, feeling me
Singing from heartache from the pain
Taking my message from the veins
Speaking my lesson from the brain
हे बिलिव्हर नावाचं गाणं. My luck my God came from pain. Pain , you made me a believer.
साधारण फक्त सुखामुळेच नाही तर संघर्ष, वेदना, दुःख यामुळे माणूस बदलतो.

सतरंगी रे - मुझे मौत की गोदमें सोने दे ह्या ओळी पण मला भिडतात.

आणि कालच ऐकलेली अटल बिहारी वाजपेयी यांची
कालके कपालपे लिखता हुं मिटाता हुं
संघर्ष पथ पर जो भी मिला ये भी सही वो भी सही.
https://www.instagram.com/reel/DWEq3bFiQJK/?utm_source=ig_web_copy_link

ही अटलबिहारी वाजपेयी यांची कविता तुकड्यात व घाईत ऐकली आहे, शेखर सुमनचा नवा शो त्यावर मनोज वाजपेयीने म्हंटली होती. मी शोधून पूर्ण वाचणार आहे पण फारच आवडली. या पोस्टीचा फॉर्मॅट बिघडला आहे. चालवून घ्या.

स्पार्कल पोस्ट आवडली.

पण मग सुरेश वाडकरने कविता म्हंटली नाही, मुलाखत दिली नाही तरीही >>> हे "मी मोर्चा नेला नाही, संपही केला नाही" च्या चालीतच वाचलं. तसंच लिहीलं आहेस बहुतेक Happy

ल-प्रि - आवडली नाहीत हे जरा स्ट्राँग होईल. पण आवर्जून कधी ऐकली नाहीत आणि ऐकावीशी वाटली नाहीत हे खरे ("मितवा" वगळता). आता ती मदनमोहनच्या गाण्यांसारखी "तुम्ही त्यांच्यापर्यंत अजून पोहोचला नाहीत" लेव्हलची असतील तर पुढेमागे अचानक नव्याने सापडतील.

मला स्वदेसमधले "यूँ ही चलाचल राही" प्रचंड आवडते. ऑटाफे. ये जो देस है तेरा मधली - माझेमन यांनी लिहीले तसे - "जीवघेणी" सनई फार भारी आहे. त्याव्यतिरिक्त फारसे काही खास वाटले नाही (गाण्यांमधे. पिक्चर मस्तच आहे). जोधा अकबर मधले ते अझीम-ओ-शान शहनशाह वगैरे आवडते. बाकी गाणी कधी नीट ऐकलेलीच नाहीत. कहने को जश्न-ए-बहाराँ है थोडेफार ऐकले आहे. पण ते ही कधी क्लिक झालेले नाही.

यावरून मला असे वाटते की ज्यांना रागदारी चांगली समजते, संगीतात केलेले प्रयोग लगेच कळतात - अशांना ही गाणी जास्त आवडत असावीत. मग त्यांनी कधीतरी उलगडून दाखवली की माझ्यासारख्यांना आवडतील Happy

>>मदनमोहनच्या गाण्यांसारखी "तुम्ही त्यांच्यापर्यंत अजून पोहोचला नाहीत" लेव्हलची <<. Happy
रेहमानची सुरुवातीच्या काळातली (रोझा, बाँबे) गाणी आउटस्टँडिंग होती/आहेत. त्यानंतरची ठिक-ठाक, लगान त्यातलाच. ती मुलाखत तर मी तुझी पाठ खाजवतो, तु माझी खाजव या ट्रॅकवर होती..

बाय्दवे, माझ्याकडे ९९ साँग्जचा साउंडट्रॅक आहे. त्याबद्दल नंतर कधीतरी... Proud

स्पार्कल +१
संदीप खरेच्या कविता किंवा गाणी मला 'भिडत' नाहीत. ना सलील कुलकर्णीचं संगीत. त्याचा समकालीन वैभव जोशीच्या कविता आवडतात. पटतात. त्याचा शब्दांशी चाललेला खेळ, किंवा त्याची शब्दांशी असलेली मैत्री सुखावून जाते.
कविता आवर्जून वाचायला गेले नाही तरी वाचनात येणार्‍या कवितांची दखल नेहमीच घेतली जाते. कविता समजण्यासाठी दु:खाची किंवा सुखाची गरज का लागते? त्याशिवायही कविता अनुभवता येतात की.

लगानची गाणी आवडतात. पण हा कार्यक्रम अगदीच ठिक वाटला.

Pages