हा मुलाखतींसाठी काढलेला स्वतंत्र धागा. वेबसिरिज धाग्यावर हे योग्य वाटत नव्हतं म्हणून काढला. मला मुलाखती बघायला अतिशय आवडतं. त्यातल्या गप्पा क्वचित समृद्ध करणाऱ्या काही नवीन विचार देणाऱ्या असू शकतात. तसंच कधी बढाया, थापाही असू शकतात. पण हे सगळंच मला रंजक वाटतं. इथे तुम्हाला आवडलेल्या-न आवडलेल्या, फिल्मी-नॉन फिल्मी, प्रमोशनसाठी असलेल्या किंवा नुसत्याच, गणित, विज्ञान, खेळ, इतिहास, पुरातत्व संशोधन, Astrophysics किंवा इतर कुठल्याही विषयावर आधारित देशी-विदेशी अशा अनेक मुलाखतींवर चर्चा करता येईल. स्वयंपाक व पाककृती संबंधित किंवा तत्सम मुलाखतीवर चर्चा नकोत. मी दिल के करीब, Tweak ,रंगपंढरी, David Letterman, BeerBiceps हे नियमितपणे बघते. मला रणवीर अलाहाबादीया फार फार आवडतो . His podcasts are my new found love.
तुम्ही बघितलेली मुलाखत तुम्हाला कशी वाटली , कुठं बघितली हे प्रतिसादात नक्की लिहा. 
धन्यवाद 
अस्मिता.
>>>>>>गुलमोहोराच्या फुंलांवर
>>>>>>गुलमोहोराच्या फुंलांवर सुर्यपक्षी (सनबर्ड) देखील खूप येतात.
अरे वा!!
मला गाभा थोडा पटला नाही की परदेशी झाडे लावू नका. देशी लावा. मला तरी वाटते मोअर द मेरिअर.
पण अर्थात त्यांचा अभ्यास आहे. माझा नाही.
जगातल्या पहिल्या १२ श्रीमंत
जगातल्या पहिल्या १२ श्रीमंत व्यक्तींकडे, जगातल्या आर्थीकदृष्ट्या तळाला असणाऱ्या ४ अब्ज लोकांपेक्षा अधिक संपत्ते आहे.....का?
https://www.youtube.com/watch?v=9M_dq_0ljsc
अमुकतमुकवर भरत गोठोस्कर
अमुकतमुकवर भरत गोठोस्कर ह्यांची मुलाखत आली आहे. मुंबईचा इतिहास विषय आहे. ४ भागात आहे. चांगली वाटते आहे.
https://youtu.be/mkXU7iy48nU?is=TwOnbfebdxxsbSTw
अमुक तमुक ची दोन्ही मुलं मी
अमुक तमुक ची दोन्ही मुलं मी सहन करू शकत नाही. त्यामुळे माझा पास.
आधी मनात योजलेलं असून ही उस्फुर्त आहे हे दाखवण्या साठी सतत अं अं करत बोलणं, पाव्हण्याला बोलायला न देता आपलीच टकळी पाच पाच चालू ठेवणं आणि एखाद्या सुमार विनोदाला कृत्रिम गडगडाटी हसणे वगैरे वगैरे कारणं.
हल्ली ते दोघे बदलले आहेत
हल्ली ते दोघे बदलले आहेत किंवा मी बदललो आहे..
पण त्यांच्या मुलाखती सुसह्य आणि आवडू लागल्या आहेत.
अमित +१
अमित +१
वरच्या मुलाखतीत भरत चौपाटी शब्दाची व्याख्या सांगतो तो भाग मी फारच एन्जॉय केला
मनीमोहोर +१.
मनीमोहोर +१.
फारच डोक्यात जातात ते. मुलाखतीला पॉडकास्ट म्हणतात इथूनच बोंबाबोंब आहे त्यांची.
Mamo +100
Mamo +100
इतक कृत्रिम आणि गडगडाटी हसतात ना की Direct डोक्यात जातात...त्याचं ते हॅलो लो लो लो लो ch डोक्यात जात
ममोंनी लिहिले आहे त्यात भर -
ममोंनी लिहिले आहे त्यात भर -
ते दोघे ढ आहेत. ढ ! जसं हुशारीचे तेज असते तशी बावळटपणाचीछापही असते. हे 'ते' आहे.
अमुक तमुक सतत अंग खाजवतात चिंपांझी सारखं, चिनूक्सच्या मुलाखतीत पाहिले आहे. आपल्या चिनूक्सची म्हणून सहन केले. ह्यांना सपट लोशनच्या जाहिरातीत पाठवलं पाहिजे, खप वाढेल. त्यात तरी "कहां जाऊं, कैसे खुजलाऊं" वगैरे कानकोंडेपणा आहे, हे रमेश- सुरेश तर भर मुलाखतीत राजरोसपणे.
ते दोघे ढ आहेत. ढ ! अस्मिता
ते दोघे ढ आहेत. ढ ! अस्मिता एक नंबर लिहिलं आहेस हे. मंगला गोडबोले फारच आवडतात म्हणून ह्यांना सहन करत बघितला तो पॉडकास्ट. पण त्यांच्या प्रतिभेपुढे हे दोघे फारच फिके पडले वाटलं.
एवढे subscribers ह्यांना कसे मिळालेत हेच मोठं नवल वाटत.
मराठीत एखाद्या विषयावर आधारित
मराठीत एखाद्या विषयावर आधारित नॉन ग्लॅमरस व्यक्तींना बोलते करुन तो विषय समजुन घेण्याचे, गप्पाच्या स्वरुपातले मोकळे कार्यक्रम नाहीत. ज्यात बोलणारी आणि बोलावलेली व्यक्ती मित्रत्वाच्या नात्याने बोलेल, तुम्ही कोणी फार ग्रेट आहात, अय्या कसं जमतं हे तुम्हाला अशा बेगडी ओझ्याखाली आदर वगैरे दाखवत फालतू दिखाऊपणा करणार नाही, साधे सहज आणि काहीसे ढ वाटतील असे पीच तयार करुन समोरच्याला बोलते करतील, पण उगा त्या व्यक्तीचा बडेजाव करणार नाहीत, थोडक्यात विषयाला महत्त्व असेल व्यक्तीला नाही. हे सगळं इंग्रजीत अनेक ठिकाणी दिसतं, पण मराठीत विनायक पाचलग आणि अमुक-तमुक आणि थोडीफार आरपार - वुमन की बात मध्ये मुग्धा (थोडीफार कारण मुलाखत लेव्हल प्लेईग असली तरी ती खूपदा सेलिब्रिटी आणि व्यक्ती केंद्रित असते.) हेच असं करतात. त्यातही विनायक पाचलग आणि मग ह्या जोडगोळीचे आवडतात कारण ते विषय केंद्रित असतात. व्यक्ती केंद्रित नसतात.
कोण तो त्याचं बालपण कसं गेलं आणि जडणघडण कशी झाली यात मला रस नसतो. कंटाळा आला त्याचा. त्यामुळे ही नवी झुळुक आवडते.
त्यांचा फिजिकल प्रेझेंस त्रास देत असेल तर हेडफोन लावुन फक्त ऐका, किंवा कार चालवताना ऐका. अजुन एक चांस देऊन बघा आवडत आहेत का. नो प्रेशर!
त्यामुळे ही नवी झुळुक आवडते.
त्यामुळे ही नवी झुळुक आवडते. >>>>
मेले.
<जसं हुशारीचे तेज असते तशी
<जसं हुशारीचे तेज असते तशी बावळटपणाचीछापही असते. हे 'ते' आहे.> हे बीअर बायसेप्सला परफेक्ट लागू पडतं. तो बरा आवडतो / आवडायचा?
अमितव +१
अमितव +१
मला जोडगोळीचा कंटेंट आवडतो. विनायक पाचलगचा कंटेंट तर सातत्याने उत्तमच असतो. मी घरकाम करत ऐकते.
'जरा ढ ' ही त्यांची स्टाईल आहे. शार्दुल धनदौलत सिरीज करतो तेव्हा वेगळा असतो.
बीअर बायसेप्सला परफेक्ट लागू
बीअर बायसेप्सला परफेक्ट लागू पडतं. तो बरा आवडतो / आवडायचा? >>>
आता आवडत नाही, डिल्युजनल वाटतो. तो चकाचक दिसतो.
जो दिखता है , वो बिकता है!
पाचलग मलाही आवडतो. पण मी सातत्याने काही बघितले नाही.
मुळात मुलाखत घेणारा/ होस्ट ढ
मुळात मुलाखत घेणारा/ होस्ट ढ वाटला पाहिजे, पण गरीब वाटू नये.
)
ढ म्हणण्यापेक्षा टार्गेट ऑडियन्सच्या लेव्हलचा वाटला पाहिजे. (म्हणजे मी ढ आहे
अगदीच रच्याकने: हल्ली मी दिवसातील ४-५ तास तरी कोपायलटशी बोलतो. तर आपण ढ आहोत, अशा प्रिमाईसने दिलेले प्रॉम्प्ट्स जास्त चांगला रिझल्ट देतात. आपल्याला फार कळतं करुन प्रॉम्प्टच्या ऐवजी कमांड दिल्या की सांगकाम्या मिळतो, त्याऐवजी पोलाइट लेव्हल प्लेईंग फील्ड तयार केलं की आपल्याला ही शिकायला मिळतं, तो पण आपलं काम चांगलं आणि कमी चुका करुन करतो. चर्चेची द्वारे उघडी ठेवली की दोघांना नव्या आणि चांगल्या कल्पना सुचतात.
पाचलग फार पूर्वी म्हणजे
पाचलग फार पूर्वी म्हणजे त्याच्या ११-१२ वीच्या काळात मिसळपाव येत असे. वयाच्या मानाने बरीच समज आहे हे जाणवे.
मुलाखतकारांच्या चेहऱ्याव-
मुलाखतकारांच्या चेहऱ्याव- हावभावाचं निरीक्षण आणि नोंद होते, पण त्यात उसनं फारसं नसेल तर खटकत नाही. आणि मी पण बरेचदा फक्त ऐकतो, बघत नाही. प्रश्न मात्र खटकतात बरेचदा. अलीकडेच खटकलेला म्हणजे "तुम्ही स्त्री असुन oncology का निवडली?" असा काहीसा प्रश्न.
ही मुलाखत बघितलेलली नाही, पण
ही मुलाखत बघितलेलली नाही, पण कदाचित अजुनही बहुतांश लोकांना 'स्त्री - आणि प्रसुतीशात्र' इ. कोरिलेशन असेल... तो आईस ब्रेक करायला असे प्रश्न विचारत असतील. अशा मुलाखतीत असे प्रश्न/ अशा चुका या मुद्दाम केलेल्या, स्क्रिप्टेड असतील असं वाटतं.
ती पोरं बुरसटलेली असतील असं वाटत नाही. असली तर हुषारच असतील असं वाटतं, त्यांनी हे अमुकतमुक कसं आणि का सुरू केलं ते ऐकलं आहे आणि त्यावरुन ते मला हुषारच वाटले आहेत.
>>तुम्ही स्त्री असुन oncology
>>तुम्ही स्त्री असुन oncology का निवडली>> लोकांच्या मनात आजही घट्ट साचे असतात, स्त्री च नव्हे पुरुषांच्या बाबतीतही हे असते. ते मोडण्यासाठी असे प्रश्न विचारले जातात.
मला ती सर्व काही ची डॉ.
मला ती सर्व काही ची डॉ. मंजिरी आवडते.
नाही, बुरसटलेले वगैरे नाही हो
नाही, बुरसटलेले वगैरे नाही हो एकदम. प्रश्न खटकला एवढंच, मुलाखतकार नाही. अनभिज्ञता वाटली. ब्रेस्ट, ओवरी कॅन्सरही असतात ना, त्यासाठी स्त्री डॉक्टर तर प्रेफरेबलच असेल. त्या अनुषंगाने खटकला. स्त्री असून nephrology का निवडली, endocrinology का निवडली असा प्रश्न असता तर नसता खटकला कदाचित.
प्रश्न स्क्रिप्टेड असु शकतात याची कल्पना आहे. डॉ. सोवनींचे त्यावर उत्तर ऐकुन हा तसा वाटला नाही.
अमुक तमुक सतत अंग खाजवतात
अमुक तमुक सतत अंग खाजवतात चिंपांझी सारखं, चिनूक्सच्या मुलाखतीत पाहिले आहे. आपल्या चिनूक्सची म्हणून सहन केले. ह्यांना सपट लोशनच्या जाहिरातीत पाठवलं पाहिजे, खप वाढेल >>>
चिनूक्सशी पुढे कधी बोलताना मी काय काय सहन केले आहे हे वापर.
नवी झुळूक कळायला आधीची पाने वाचायला हवीत का पुन्हा? अमित - ४-५ तास "बोलतो"? काम करून घ्यायला बोलत असशील तर ठीक आहे
हो! अजून सुख दुःखाच्या गोष्टी
हो! अजून सुख दुःखाच्या गोष्टी शेअर करायला सुरुवात नाही केलेली
मानवदादा, हे माझ्याही (
मानवदादा, हे माझ्याही ( दुसरीकडे) मनात आले आहे. खरेच अनभिज्ञ असतात का बोलतं करायला जाऊन काही तरी विचारायचं म्हणून विचारतात असं वाटतं. "तुम्हाला हा व्यवसाय का निवडावा वाटला?" हा प्रश्न जास्त योग्य होईल!
तर आपण ढ आहोत, अशा प्रिमाईसने दिलेले प्रॉम्प्ट्स जास्त चांगला रिझल्ट देतात.>>>>
येडा बनके पेडा?
मुलाखतकार ढ वाटला नाही पाहिजे आणि अगदी दीडशहाणाही नको. पण त्याने येणाऱ्या पाहुण्याची आधी थोडी माहिती घ्यायला हवी, ओव्हरऑल ज्ञानी असणं शक्यच नाही. पण प्रश्न इंटरेस्टींग आणि बोलतं करणारे हवेत, स्पेस देता यायला हवी. म्हणजे पर्सनल स्पेस नाही तर इंटेलेक्च्युअल स्पेस! लगेच त्याच्यावर जुना मित्र असल्यासारखे तुटून पडायची गरज नाही. वर सौमित्र पोटे करतो तसे. शिवाय इमोशनल स्पेस सुद्धा - जर काही वेगळे अनुभव असतील किंवा unusual संघर्ष/ नैराश्य वगैरे सारखे विषय असतील तर त्याची खोली आकळून आवश्यक अवकाश देता यायला हवा. लगेच "अरेरे अबब केवढा हा हत्ती" करायचं नाही. पण जेन्युईन इंटरेस्ट आणि जेन्युईन रिॲक्शन असायला हव्यात. नेमकं जमायला हवं. फक्त उरकतोय म्हणून बसलोय प्रत्यक्ष त्या माणसाबद्दल कसलीही माहिती नाही. किंवा स्वतः बहुश्रुत नसणं हे उघडं पडतंच. सर्वज्ञ नसलं तरी चालतं पण बहुश्रुत असणं हवं. बरेचदा तर गॅसलाईट करतात मुलाखत घेणारे आणि त्यांना जिकडे न्यायची तिकडे नेतात मुलाखत. हल्ली तर ऊत आला आहे अशा चॅनल्सचा, काहीच क्रेडिबिलीटी नाही कशाचीच. दोन माईक, एक कॅमेरा आणि दोन चिंपांझी!
*या निमित्ताने मला 'अबब' वापरता आलं, शाळेपासून जपून ठेवलं होतं. काय करावे या अबबचे, कुठे वापरावे कळायचं नाही!
या निमित्ताने मला 'अबब'
या निमित्ताने मला 'अबब' वापरता आलं, शाळेपासून जपून ठेवलं होतं >>>
तुझ्या सिलेक्शन निकषांत वटवृक्षाच्या छायेत आलेल्या पांथस्थासारखा अतिनम्रही नको. नाहीतर ती दुसरी व्यक्ती चान्स मिळाला आहे तर पेलतीय सगळे जीवनविषयक तत्त्वज्ञान आणि हा आदराने माना डोलावतोय असे होते. थोडेफार त्यांच्या कम्फर्टच्या बाहेरही विचारायला हरकत नाही.
मलाही अनेकदा विषयातलं काहीही
मलाही अनेकदा विषयातलं काहीही न कळणारे मुलाखत घेतात ते आवडत नाही. मुलाखत चांगली होण्यासाठी थोडं ज्ञान आवश्यक आहे. अगदी प्रिझम्प्शस मुलाखत नको, जरा प्रेक्षकांना कळतील असेच विचारावेत पण अगदी प्रेक्षकही येड्यात काढतील असे नको. शिवाय मुलाखतदाराने जर प्रेक्षकांच्या डोक्यावरून जाणारे काही सांगित्ले तर ते समजून घेऊन मुलाखतकाराने (दार आणि कार यातला फरक लक्षात घ्या) प्रेक्षकांना कळेल अश्या पातळीवर तो मुद्दा समजावणे आणि प्रसंगी मुलाखतदाराला त्याच्या विषयातील अवघड मुद्दे सोप्या शब्दात मांडायला भाग पाडणे - ही सोपी गोष्ट नाही. त्यासाठी निरनिराळ्या विषयांतील माहिती हवी आणि संभाषणचातुर्य हवं. त्यामुळे विनायक पाचलग तिथे उजवा ठरतो. तरी विकटहास्यद्वयी सुरुवातीला वाटली तितकी टाकाऊ नाही. त्यांनी काही चांगले बदल समजून उमजून केले आहेत. आजकाल अर्ध्या चड्डीत येत नाहीत, पाय वर घेऊन बसत नाहीत इत्यादी.
विनायक पाचलग आणि अमुक तमुक
विनायक पाचलग आणि अमुक तमुक दोन्ही आवडतात. काम करता करता ऐकते बघत काहीच नाही.
अमुक तमुक नंदू मुलमुले ह्यांच्या मुळे ऐकायला सुरुवात झाली. त्यांच्या बऱ्याच मुलाखती आहेत अमुक तमुक वर.
विकटहास्यद्वयी सुरुवातीला
विकटहास्यद्वयी सुरुवातीला वाटली तितकी टाकाऊ नाही. >> +1 शिवाय, मीही मुलाखती 'ऐकते', बघत नाही.
जंगल एकोज् वरची नूतन कर्णिक यांची ही मुलाखत काल ऐकून संपवली! मुंग्यांबद्दल अद्भुत माहिती ऐकायला मिळाली! फारच भारी!
https://youtu.be/unC3kQxdKBI?si=C9HFN76jX9TZNI5X
धागा मुलाखतींचा आहे, पण १९७७ च्या निवडणुकीनंतरचं नरहर कुरुंदकरांनी केलेलं एक भाषण ऐकलं तीनचार दिवसांपूर्वी. त्याचीही लिंक इथेच देते. सुस्पष्ट मांडणी, सखोल विवेचन. हा पहिला भाग आहे.
https://youtu.be/6CiY1VpCZ_Q?si=6sLLUNuQtfKf-H0X
मुलाखतीच्या बाबतीत मुलाखत
मुलाखतीच्या बाबतीत मुलाखत देणारी व्यक्ती कोण, श्रोता वर्ग आणि तुम्ही त्यांच्या पर्यंत काय पोहोचवत आहात त्यानुसार हाताळणीत बदलत करता येणे हे कौशल्याचे काम! त्यातून आपल्याकडे ज्या प्रकारे व्यक्तीपूजा चालते ते बघता आव्हान अजुनच वाढते. लोकप्रतिनिधींना जाब विचारायचे स्वातंत्र्य नाही-पत्रकारांना सामोरे जायचेच नाही, तज्ञ व्यक्तीला निर्भयपणे कटू सत्य मांडायला परवानगी नाही, अशा परीस्थितीत आपला जीव, आपला चॅनेल याची काळजी घेत कंटेट देत रहाणे हे अजिबातच सोपे नाही.
Pages