हा मुलाखतींसाठी काढलेला स्वतंत्र धागा. वेबसिरिज धाग्यावर हे योग्य वाटत नव्हतं म्हणून काढला. मला मुलाखती बघायला अतिशय आवडतं. त्यातल्या गप्पा क्वचित समृद्ध करणाऱ्या काही नवीन विचार देणाऱ्या असू शकतात. तसंच कधी बढाया, थापाही असू शकतात. पण हे सगळंच मला रंजक वाटतं. इथे तुम्हाला आवडलेल्या-न आवडलेल्या, फिल्मी-नॉन फिल्मी, प्रमोशनसाठी असलेल्या किंवा नुसत्याच, गणित, विज्ञान, खेळ, इतिहास, पुरातत्व संशोधन, Astrophysics किंवा इतर कुठल्याही विषयावर आधारित देशी-विदेशी अशा अनेक मुलाखतींवर चर्चा करता येईल. स्वयंपाक व पाककृती संबंधित किंवा तत्सम मुलाखतीवर चर्चा नकोत. मी दिल के करीब, Tweak ,रंगपंढरी, David Letterman, BeerBiceps हे नियमितपणे बघते. मला रणवीर अलाहाबादीया फार फार आवडतो . His podcasts are my new found love.
तुम्ही बघितलेली मुलाखत तुम्हाला कशी वाटली , कुठं बघितली हे प्रतिसादात नक्की लिहा. 
धन्यवाद 
अस्मिता.
फायनली ! गार्डियन मधे असे
फायनली ! गार्डियन मधे असे आर्टिकल अजून कसे आले नाही याचीच वाट पाहत होतो, आणि ते आलेच.
The one change that worked: I stopped listening to podcasts – and my mind flooded with ideas
https://www.theguardian.com/lifeandstyle/2026/aug/31/the-one-change-that...
हे आर्टिकल एकदम 'पेहेमे मै
द इकॉनॉमिस्टने घेतलेली युवल
द इकॉनॉमिस्टने घेतलेली युवल नोआ हरारीची ही मुलाखत मननीय आहे.
The one change that worked: I
The one change that worked: I stopped listening to podcasts
आता या शीर्षकाचे पॉडकास्ट आले की मी सु डो मी !
(No subject)
आरपार मध्ये स्मिता जयकरची
आरपार मध्ये स्मिता जयकरची मुलाखत ऐकली. आवडली. पाठारे प्रभू दिसतायत. का माहीत नाही खूप फॅमिलिअर स्टाइल वाटली तिच्या बोलण्याची. सीकेपी आणि पाठारे यांच्या वागण्याबोलण्यात साम्य असेल तर माहीत नाही पण लहानपणी बाबांकडच्या काकी, आत्या वगैरे जश्या ऐकल्या तसेच वाटले ऐकताना. आत्मविश्वास, प्रॅक्टिकॅलिटी हे सगळं आठवलं.
वीणा पाटील यांनी घेतलेल्या
वीणा पाटील यांनी घेतलेल्या दोन मुलाखती उत्सुकतेने बघितल्या. अच्युत गोडबोले, भरत दाभोळकर.
हे सेलिब्रिटी लोक कामानिमित्ताने चिकार जगभर फिरत असतात त्यामुळे खरंतर त्यांच्याकडे त्याबद्दल सांगण्यासारखं खूप असू शकेल म्हणून त्यांच्या प्रवासांवर, त्यातल्या किश्श्यांवर मुलाखतींचा जास्त भर असेल असं वाटलं होतं पण तसं काहीच दिसलं/ऐकू आलं नाही. बराचसा वेळ त्यांच्या करीयरवर बोलण्यातच गेला. त्याबद्दल त्यांच्या इतरत्र असलेल्या मुलाखतींमध्ये असंख्यवेळा ऐकून झाले आहे. त्यामुळे कंटाळा आला. वीणा पाटीलही मध्येमध्ये बोलून संभाषण फार तोडतात असं वाटलं.
Pages